(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. शुभा अशोक चिटणीस

    हिंदी विषयात एम.ए.पी.एच.डी. करणार्‍या मुंबई विद्यापीठात आणि बेडेकर महाविद्यालयात २५ वर्षं अध्यापनाचे कार्य करणार्‍या; तसंच नियतकालिकं, वृत्तपत्र यांतून सातत्याने लेखन करणार्‍या डॉ. शुभा चिटणीस या ठाण्यातील एक यशस्वी व्यक्तिमत्व !

      May 23, 2014


  • बी. टी. देशमुख

    विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत प्रा. बी. टी. देशमुख यांचा पराभव झाल्याने, प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या शैक्षणिक चळवळीचा आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या संसदीय संघर्षांचाही पराभव झाला आहे. भाऊराव तुळशीरामजी उपाख्य बी. टी. देशमुख नावाची चळवळ १९६० साली अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात सुरू झाली आणि पाहता पाहता या चळवळीने राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात संचार सुरू केला.

    विद्यार्थी असतानाच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बी. टी. सहभागी झाले. बी. टीं.च्या घरी अठराविश्वे दारिद्रय़ होते. पण, तरूण वयापासूनच परिस्थितीला शरण न जाता संघर्षरत राहण्याची बी.टीं.ची वृत्ती होती. शिक्षण आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, अशा दोन्ही आघाडय़ांवर सक्रिय राहण्यासाठी पोट किमान भरलेले असावे, ही मूलभूत गरज होती आणि ती भागवण्यासाठी भाऊराव नावाचा हा युवक चक्क कंपोझिटरचे म्हणजे छापखान्यात अक्षरे जुळवण्याचे काम करत असे. कंपोझिटरची ही नोकरी करत करतच राज्यशास्त्र या विषयात एम.ए. ची पदवी संपादन केली आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. तो काळ शिक्षकी पेशासाठी कमी वेतन आणि प्रामाणिकपणे विद्यादानाचा होता. विद्यादान करणाऱ्यांना चरितार्थासाठी येणाऱ्या अडचणी स्वत: अनुभवताना बी. टीं. मधला चळवळ्या जागा झाला. त्यातूनच महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसाठी विदर्भभर आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. नेतृत्वासाठी नैतिक पातळीवर असणारे स्वच्छ चारित्र्य त्यांच्याजवळ होतेच. त्यामुळे शिक्षक चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे आपसूकपणे चालत आले. नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाचे (नुटा) १९७३ पासून आजपर्यंत ते अध्यक्ष आहेत. सलग एखाद्या चळवळीचे ३७ वर्षे अध्यक्षपद भूषवले जाण्याचा हा विक्रमच असावा! ‘नुटा’चे अध्यक्षपद सांभाळत असतानाच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे अपरिहार्यपणे आले. चळवळी उभारतानाही विद्यादानाच्या व्रतापासून बी. टी. क्षणभरही ढळले नाहीत. प्राध्यापकपदाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होईपर्यंत म्हणजे ३०-३२ वर्षे बी.टी. नियमितपणे शिकवत असत. केवळ रस्त्यावर संघर्ष करून शिक्षकांचे प्रश्न सोडवता येणार नाही, म्हणून १९८० साली बी.टीं.नी विदर्भ पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेत प्रवेश केला. अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी बी.टीं.नी विधिमंडळात सर्व संसदीय अस्त्रांचा वापर केला. हे विद्यापीठ स्थापन झाल्यावर म्हणजे १९८६ मध्ये हा मतदारसंघ अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. या मतदारसंघातून सलग पाच वेळा बी.टी. विधान परिषदेवर विजयी झाले. ३० वर्षांच्या संसदीय जीवनात त्यांची प्रतिमा अभ्यासू आमदार म्हणून राहिली. शिष्टाचाराचा, वर्तनाचा कोणताही तोल ढळू न देणारा आणि तरी अत्यंत आक्रमक आमदार म्हणून बी. टी. देशमुख यांची कारकीर्द तेजस्वी राहिली, तशीच ती निष्कलंकही राहिली. याच संयत आक्रमकतेच्या जोरावर शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यात बी.टीं.ना यश आले. एखाद्या विषयावर बी. टी. बोलायला लागले तर संपूर्ण सभागृहात पूर्ण शांतता असे. दहा-बारा वर्षांत बी.टी. आणि नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सभागृहात विदर्भाच्या अनुशेषाच्या निवारणासाठी जो ‘संसदीय संघर्ष’ उभारला गेला, त्याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल. विदर्भाच्या विकासाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना देशमुख-गडकरी या दुकलीने अक्षरश: सळो की पळो करून सोडले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर गडकरी दिल्लीला गेले आणि विकासाच्या संसदीय लढाईची जबाबदारी एकटय़ा बी.टीं. वर आली. एकाच वेळी संसदीय आणि उच्च न्यायालय अशा दोन पातळ्यांवर एकहाती ही लढाई बी.टी. लढत होते. बी.टीं.च्या पराभवामुळे विधान परिषदेतील या लढाईचे नेतृत्वच संपले आहे, असे नव्हे तर या लढाईची धार अतिशय बोथट झाली आहे. विधान परिषद निवडणुकीतील बी.टी. देशमुख यांच्या पराभवाचा अर्थ इतका असा व्यापक आहे आणि विदर्भाचे केवढे मोठे नुकसान झालेले आहे, हे स्पष्ट करणारा आहे. बी.टी. देशमुख तन आणि मनाने चळवळे आहेत. वयाच्या सत्तरीतही चैतन्याने फुललेलेच आहेत. ते हार मानणार नाहीत. आता पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरू करतील. त्यांच्या पुढच्या लढाईला शुभेच्छा!

      August 5, 2017


  • दिलीप धोंडे

    तुकाराम डॉट कॉम या वेबसाइटद्वारे संत तुकाराम यांची गाथा आणि अन्य साहित्य जगातील वाचकांपर्यंत नेण्याचा ध्यास दिलीप धोंडे यांनी घेतला आहे. तुकारामांचे साहित्य १४ भारतीय आणि आठ परदेशी भाषांमध्ये उपलब्ध करुन दिले आहे.

    ध्यास तुकारामांचा

      July 24, 2015


  • अरविंद ताटके

    मराठी साहित्यामध्ये चरित्रात्मक लेखन हा प्रकार खुपचं जुना असला तरीपण, मराठी भाषेत चरित्रात्मक पध्दतीचे लेखन करणारे तज्ञ लेखक मात्र अभावाने आढळतात ! त्यातही प्रसिध्द असलेल्या लेखकांची यादी तर आणखीनच कमी आहे. पण या यादीत सर्वात अग्रभागी असणारे नाव जर कोणते असेल तर ते नक्कीच, अरविंद ताटके यांचं आहे . सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक व वैज्ञानिक अशा वेगवेगळ्या पटलांवरती आपल्या कर्तुत्वाच्या व इच्छाशक्तीच्या जोरावर, उज्ज्वल भविष्याची नक्षी काढणार्‍या कितीतरी दिग्गज व्यक्तींची जीवनशिल्पे त्यांनी शब्दरूपांमध्ये साकारली आहेत. जीवनाकडे प्रेरणादायी व उत्स्फूर्तपणे बघायला शिकवणार्‍या त्यांच्या या मनोरंजनात्मक चरित्रांद्वारे, त्यांनी मराठी साहित्यखाणीला नव्या संस्कारांची व तत्त्वांची अमूल्य भेटच दिली आहे. प्रत्येक महान व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात भोगलेल्या असंख्य यातना आणि सुखद प्रसंग, त्यांच्या जीवनातील ठळक घडामोडी, त्यांचे कार्य, इच्छाआकांक्षा, स्वप्ने, व भावना अशा अनेक आठवणींचा अचुक लेखाजोखा ते या चरित्रांमधून शब्द बध्द केले आहेत.अरविंद ताटके यांचा जन्म ३१ डिसेंबर १९२३ रोजी दादर येथे झाला. तर त्यांचे माध्यमिक शिक्षण ठाण्यातील बी. जे. हायस्कुलमधून पूर्ण झाले. आजपर्यंत अरविंद ताटकेंची सुमारे ५४ पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांच्या लेखनाचे पदार्पण धनुर्धारी मधून झाले. सर डॉन ब्रॅडमन, विजय मर्चंट, विनू मंकड, सर गॅरी रॉबर्स, खंडू रांगणेकर, यांसारख्या क्रीडारत्नांच्या कारकिर्दीतील विवीध पैलु अलगदपणे उलगडणारी पुस्तके ताटकेंनी लिहीली. महात्मा गांधी, गो. कृ. गोखले, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर अशा राजकीय व्यक्तिमत्वांची चरित्रे; तर ना. सी. फडके, ग.त्र्यं.माडखोलकर, पु. भा. भावे, आचार्य अत्रें सारख्या अजरामर साहित्यिकांच्या चरित्रांसोबतचं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, नेपोलियन, विन्स्टन चर्चिल अशा ऐतिहासिक महापुरूषांची चरित्रे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण लेखनाने अगदी तन्मयतेने पार केला. ही चरित्रे लिहिण्याअगोदर अरविंद ताटके स्वतः त्या व्यक्तित्वांना जगले होते, त्यांचे जीवनविषयक दृष्टीकोन, व जगण्याच्या पध्दतींविषयी त्यांनी खात्रीलायक स्त्रोतांकडून आवश्यक माहिती मिळविली होती. त्यामुळे संशोधन व विचापूर्वक लेखन व परीक्षण करून घेतलेला व्यक्तीवेध, हा त्यांच्या लेखनाला अचुकतेशी जोडणारा एक महत्त्वपूर्ण दुवा होता.

    देश विदेशातील वेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रभुत्व गाजविलेल्या तज्ञ व्यक्तींची मराठी वाचकांना ओळख व्हावी या हेतुने त्यांनी पहिल्यांदा हातात धरलेली लेखणी, शेवटपर्यंत तशीच टिकून राहिली होती. “विडा रंगला” हा कथासंग्रह, “झिनी”, “हिरकणी” या कादंबर्‍या, तसेच पुस्तकांमधून त्यांनी कर्तबगार व्यक्तींचे उलगडलेले अंतरंग, सतत वाचकांच्या भेटीस येत राहिले. उत्कंठावर्धक शैली, व गोष्टी सांगण्या व रंगविण्यामधील त्यांची आत्मियता पाहून वाचकांच्या अंगावर शहारे येतात. एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या वर्णनावरून तिच्या वर्तमानात शिरण्यासाठी, व वाचकांनाही तो संस्मरणीय अनुभव देण्यासाठी लागणारे कौशल्य त्यांना चांगलेच अवगत होते.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015


  • सुरेश साळुंखे

    बैलगाडीला डिस्कब्रेक बसविणे किंवा बुलेटला डिझेलचे इंजिन असे कल्पक तांत्रिक प्रयत्न सांगली जिल्ह्यातील शेतकरी सुरेश साळुंखे करीत असतात. त्यांनी आता ऊसतोडणीसाठी ट्रॅक्टरच्या आकाराचे बहुपयोगी यंत्र बनविले आहे...

    सुरेश साळुंखे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ऊसतोडणीची यांत्रिक किमया हा लेख पुढील पानावर वाचा.

    सुरेश साळुंखे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ऊसतोडणीची यांत्रिक किमया हा लेख वाचा.

    salunkhe-suresh-modified

      September 8, 2015


  • प्रा. राजाराम भोसले

    देशातील पहिला रेडिओ टेलिस्कोपचा प्रयोग यशस्वी करणारे प्रा. राजाराम भोसले यांनी आता कोल्हापुरात वेधशाळा आणि तारांगण उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. सूर्यापासून येणार्‍या रेडिओलहरी, त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतराचे मोजमाप अशा विविध विषयांवर त्यांनी देशातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा तसेच “नासा” च्या प्रकल्पांत संशोधन केले आहे.

    आकाशाशी जडले नाते

      July 24, 2015


  • मनोज जोशी

    मनोज जोशी यांनी सर्फरोश या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सरफरोश, चांदनी बार, हंगामा, देवदास, हलचल, पेज 3, फिर हेरा फेरी से, चुप चुप के, गरम मसाला, गोलमाल, भागम भाग, भूलभुलैया, मेरे बाप पहले आप, बिल्लू, दे दना दन खट्टा-मीठा हे त्यांचे काही हिंदी चित्रपट होत.

      July 14, 2022


  • आस्ताद काळे

    आस्ताद काळे

    आस्ताद काळे हा मराठी नाट्य , चित्रपट आणि मालिका सृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता व गायक आहे.

      August 12, 2020


  • गणेश विनायक अकोलकर

    शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक ग्रंथाचे लेखक गणेश विनायक अकोलकर यांचे निधन २३ नोव्हेंबर १९८३ रोजी झाले. माध्यमिक शिक्षण, शैक्षणिक तत्वज्ञानाची रूपरेषा, शैक्षणिक समाजशास्त्राची रूपरेषा हे त्यांचे शिक्षणशास्त्राचे सैद्धांतिकस्वरूप स्पष्ट करणारे ग्रंथ, तसेच माध्यमिक शिक्षणाची पुनर्घटना, शैक्षणिक मूलतत्वे, शैक्षणिक मनोविज्ञान, व्यक्तिमत्व विकास या ग्रंथासह लोकशाही व शिक्षण आणि शिक्षणाची अधुनिक तत्वज्ञाने हे अनुवादित ग्रंथही त्यांच्या नावावर आहेत.

    ## Ganesh Vinayak Akolkar

      July 27, 2017


  • मुकेश माचकर

    मुकेश माचकर हे महाराष्ट्र टाईम्स, केसरी, प्रहार, अशा नामांकित वृत्तपत्रांमधुन नियमीत स्तंभलेखन व प्रासंगिक लेखन करणारे तरूण पत्रकार आहेत. पत्रकारिता व लेखन या दोन्ही विभिन्न भुमिका समर्थपणे निभावताना त्यांनी त्यांची स्वतःची अशी अगदी वेगळी व मार्मिक अशी शैली निर्माण केल्यामुळे त्यांची गणती आज भारतातल्या निवडक काही जबाबदार व लोकप्रिय पत्रकारांमध्ये होते.

      August 18, 2011