(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सतीश तारे

    आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने मराठी रंगभूमीसह टीव्ही आणि चित्रपटांत आपला ठसा उमटवणारे विनोदी अभिनेते सतीश तारे यांनी वडिलांच्या नाटकांमधूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली.हौशी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्तपणे मुशाफिरी केली. प्रा.जयंत तारेंच्या “फुलराणी” या पुण्यातील बालनाट्य चळवळीत अग्रेसर असलेल्या संस्थेतून सतीश तारे यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.”

      October 4, 2013


  • खंडुजी गायकवाड

    आपण स्वच्छ राहतो. आपले घर स्वच्छ ठेवतो आणि कचरा घराबाहेर कुठेही टाकतो. सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपली अनास्था ठळकपणे दिसते. ही अनास्था संत गाडगेबाबांनी ओळखली आणि स्वच्छतेसाठी हाती खराटा घेतला. त्यांचा औरंगाबादचे खंडुजी गायकवाड यांनी घेतला आहे. अनेक नाटकांचे लेखन, अभिनय यात लोकप्रियता मिळवूनही लोककलेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांचे स्वच्छता अभियान महाराष्ट्रा बरोबरच राज्याबाहेरही पोहचविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

    स्वच्छतेचा संदेशयात्री

      July 14, 2017


  • श्रीधर व्यंकटेश केतकर

    (1884 - 1937)

    महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचं अवजड -अवघड कार्य केतकरांनी पूर्ण केलं, हे त्यांचं ठळक योगदान म्हणायला हवं. पण याशिवाय केतकर समाजशास्त्रज्ञ, इतिहाससंशोधक आणि कादंबरीकार होते.

    इ.स. 1911 साली अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठांची पदवी त्यांनी मिळवली. `द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया` ही त्याची पदवी त्यांनी मिळवली. `द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया हा त्यांचा विषय होता. यात या विषयावरचे अनेक मूलभूत विचार त्यांनी मांडले आहेत. भारतीय सर्थशास्त्र आणि कायदा याचाही त्यांचा अभ्यास होता.

    1915 साली तेवीस भागांच्या ज्ञानकोशाचं काम त्यांनी हाती घेतलं विशेष आर्थिक पाठबळ नसताना, आणि इतर संशोधकलेखकांची मदत नसतानाही हे मोठं कार्य त्यांनी चौदा वर्षात पूर्ण केलं. या कोशाच्या लिखाणापासून ते छापून घेण्यापर्यंत अनेक अडथळे आले. अखेरीस स्वतचाच छापखाना काढून त्यांनी ज्ञानकोश छापून घेतला. छापखान्यासाठी `लिमिटेड कंपनी`चा अभिनव प्रयोग केतकरांनी केला. या सार्‍या खटाटोपांचं वर्णन `माझे बारा वर्षाचे काम ऊर्फ ज्ञानकोश मंडळांचा इतिहास` यात त्यांनी केलं आहे.

    `गोंडवनातील प्रियंवदा`, `ब्राम्हणकन्या` या त्यांच्या काही कादंबर्‍या आहेत. `महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण` यात वाड्गमयीन तर निशस्त्रांचे राजकारण`, `व्हिक्टोरिअस इंडिया` या दोन गंथांत राजकीय मतं प्रगट केली आहेत.

    साहित्यातून त्यांनी सुधारणावादी विचार मांडला. त्यांचं वैयक्तिक जीवनही इतर चारचौघांपेक्षा निरांळ होतं. एका जर्मन ज्यू स्त्रीला विधिवत हिंदू धर्मात आणून तिच्याशी केतकरांनी विवाह केला होता. अपत्य नसल्यामुळे दोन अनाथ मुलांनाही सांभाळलं.

    कोणतीही अत्याधुनिक साधनं. मदत हाताशी नसताना फक्त चौदा वर्षात ज्ञानकोश पूर्ण करणारे केतकर `ज्ञानकोशकार` म्हणूनच प्रामुख्याने प्रसिध्द आहेत.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      March 11, 2015


  • डॉ. सच्चिदानंद शेवडे

    स्विट्झर्लंडमधील माउंट टिटिलिस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नांवावर जमा आहे.

      June 29, 2022


  • केशव विष्णू बेलसरे

    त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘नामसमाधी सहजसमाधी’ हा ग्रंथ लिहिला.

      June 25, 2022


  • संत निवृत्तिनाथ

    प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले संत निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु होते. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.

    ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला. निवृत्तिनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.

    सुमारे चारशे योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर असे अभंग आ​णि एक ह​रिपाठ एवढी रचना निवृत्तिनाथांनी केली आहे. निवृत्तिदेवी, निवृ​त्तिसार आ​णि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृ​त्तिनाथांनी ​लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेवली आहेत.

    ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरला देह ठेवला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे.

      June 3, 2015


  • डॉ.केशव बळिराम हेडगेवार (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक)

    डॉ. हेडगेवार यांनी तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी – व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्‌’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते.

      June 9, 2022


  • शिवाजीराव पाटील-निलंगेकर

    राजकारणाचा व मंत्रीपदाचा दीर्घ अनुभव असलेल्या शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द अल्प असली तरी राज्याला विकासाच्या दिशेने नेणारी होती.

      September 3, 2010


  • डॉ. संजय रामचंद्र कंदलगावकर

    प्राचार्य, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली

      May 25, 2010


  • वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे

    लेखक, समीक्षक, भाषाभ्यासक वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे

      July 26, 2017