निरंजन उजगरे यांनी एक मुख्य काम केले ते म्हणजे कवी-संपादन-अनुवादाच्या कार्यासाठी भारतभर भ्रमण केले , आणि त्यांच्या महत्वाकांक्षी ‘ काव्यपर्व ‘ या पुस्तकांची निर्मिती झाली. . स्वातंत्र्योत्तर भारतीय कविता -२१ भाषा आणि १७० कवींच्या कविता त्यात आहेत.
July 1, 2022
राजेश रमेश गायकवाड हे वसईमधील एक पत्रकार असून ते मुंबई उपनगर वार्ता या वृत्तपत्रासाठी वृत्तसंकलनाचे व रिपोर्टरचे काम करीत आहेत.
August 29, 2011
अमृता खानविलकर हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींपैकी एक बहुचर्चित नाव आहे. तिने आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे.
August 8, 2020
“कला” व व्यवस्थापन ही तर दोन टोकाची क्षेत्र. या दोन्ही क्षेत्रात अनोखा ठसा, त्यात ही वेगळेपण करुन ते टिकवणारी फारच कमी मंडळी आपल्याला पहायला मिळतात, असंच “सदा उल्हासित व्यक्तिमत्व स्वाती खंडकर”
August 22, 2013
किरण यज्ञोपावित हा मराठीमधील ताज्या दमाचा दिग्दर्शक आहे., व तजेलदार चित्रपटांद्वारे रसिकांचे निखळ मनोरंजन करून काही लोकांच्या जीवनातील जळजळीत वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही त्याची शैली आज मराठी रसिकांच्या मनाला चांगलीच भिडलेली दिसते. चिंचवडमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या किरणला लहानपणापासूनच नाटक बघण्याची विलक्षण आवड होती. तरूणपणी प्रायोगिक रंगभुमीमध्ये चपखल बसणार्या अनेक चित्रपट, नाटके, लघुनाटके, व छोट्या मोठ्या जाग्रुतीपर स्किट्ससाठी संहितालेखनाचे काम त्याने केले होते.
August 16, 2011
December 15, 2010
झोपेचा अभ्यास करणारे वेगळे शास्त्र असू शकते व त्यावरून आपल्या आरोग्याबद्दल महत्त्वाचे निष्कर्ष हाती येऊ शकतात, हे तसे आपल्याकडे अलीकडेच रुजले आहे. डॉ. प्राजक्ता देशपांडे यांनी आपल्या पतीसह अमेरिकेत स्लीप मेडिसीनविषयी संशोधन सुरु केले आणि याच क्षेत्रातील संशोधनाचा लाभ आपल्या समाजास देण्यासाठी हे दांपत्य भारतात परतले. भिन्नगती मुलांच्या झोपेचे गणित त्यांच्या मानसिक स्वास्थ्यात बदल घडवू शकते, असे महत्वपूर्ण संशोधन त्यांनी आता केले आहे.
निद्रादेवी नमो:स्तुते
July 24, 2015
राजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख आहे. कोल्हापूर. सावंतवाडी, गडहिंग्लज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
निपाणी येथील महिला बिडी कामगार व शेतकर्यांच्या तंबाखू आंदोलनापासून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. शिरगुप्पे यांचे “सडक” हे नाटक व त्यातील कविता आजही आंदोलकांच्या तोंडी आहेत.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी ते गेली दहा वर्षे जोडले गेले आहेत. धरणग्रस्त, देवदासी प्रथा निर्मूलनाच्या लढ्यातही ते सहभागी झाले होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांत भाग घेतला आहे. नाट्यलेखन व दिग्दर्शन म्हणून त्यांची अनेक नाटके गाजली आहेत.
तुकोबांच्या पत्नीच्या जीवनावरील “तिच्या नवर्याचे वैकुंठगमन”, “कपान”, “होते कुरुप वेडे”, “उंटावरचा शहाणा”, “आम्ही क्रांतिसिंह आहोत”, “हा आणि बारावा” अशी नाटकांचे लेखनही त्यांनी केले.
किशोर, मासिक ऋग्वेद, लोकमत वगैरेंमध्येही त्यानी विपुल लेखन केले आहे. हिंदू-मुस्लिम समस्येवर आधारित “षड्यंत्र” या माहितीपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. बसवाण्णांच्या तत्वज्ञानाचे ते गाढे अभ्यासक आहेत.
सांगली येथे झालेल्या दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राजाभाऊ शिरगुप्पे यांनी भुषविले आहे.
## Shirguppe, Rajendra Vitthal (Rajabhau Shirguppe)
## Shirguppe, (Prof) Rajendra Vitthal
January 14, 2016
फडके, ललिता
‘तू नसतीस तर कळले नसते जीवन म्हणजे अथांग प्रीती. तू नसतीस तर जुळल्या नसत्या गीतांच्या या मंजुळ पंक्ती.’ गायक व संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांनी ‘वहिनीच्या बांगडय़ा’ या चित्रपटासाठी स्वत: स्वरबद्ध करून गायलेल्या या गीताच्या ओळी त्यांच्या सहधर्मचारिणीला तंतोतंत लागू पडाव्या, एवढी खंबीर आणि प्रदीर्घ साथ ललिताबाईंनी त्यांना दिली.
‘प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे एक स्त्री असते,’ या वापरून गुळगुळीत झालेल्या वाक्याची सार्थता ललिताबाईंचं आयुष्य ज्यांनी जवळून पाहिलंय त्यांनाच पटू शकेल. वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ललिताबाईंनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा सुधीर फडके या वलयांकित व्यक्तिमत्त्वाला पन्नासहून अधिक वर्षे साथसोबत करणारी ‘गृहिणी-सखी-सचिव’ काळाच्या पडद्याआड गेली. सुधीर फडके यांची पत्नी किंवा आजच्या पिढीतील संगीतकार श्रीधर फडके यांची आई, एवढीच त्यांची ओळख सांगणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या आरंभीच्या काळात आपल्या भावमधुर आवाजानं मोहिनी घालणाऱ्या पाश्र्वगायिकांमध्ये ललिताबाईंचा समावेश करणं अगत्याचं ठरतं. पूर्वाश्रमीच्या त्या ललिता देऊळकर. एका सारस्वत मध्यमवर्गीय कुटुंबात १९२५ सालच्या ललितापंचमीला त्यांचा जन्म झाला. वडील देऊळकर हे कापडाचे व्यापारी. ललिताबाईंचे दोन काका उत्तम गाणारे आणि आजीचाही आवाज गोड. त्यांच्याच प्रेरणेनं छोटी ललिता गाणं शिकली. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं, हा त्या काळातल्या सर्वसाधारण सारस्वत मंडळींचा दृष्टिकोन. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा ‘हिला तुम्ही सिनेमात का पाठवत नाही’, असा प्रश्न केला. देऊळकर खरं तर या गोष्टीला राजी नव्हते. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी अखेर ती तयारी दर्शविली. चट्टोपाध्याय यांच्याच ओळखीने ललिताबाईंना ‘बॉम्बे टॉकीज’ या मातब्बर संस्थेत प्रवेश मिळाला. ‘बॉम्बे टॉकीज’ची आघाडीची नायिका देविकाराणीसोबत ‘दुर्गा’मध्ये एक फुटकळ भूमिका त्यांनी केली. याच संस्थेच्या ‘अंगूठी’मध्ये त्या दोन गाणीही गायल्या. ‘बंधन’, ‘कंगन’ या चित्रपटांपर्यंत त्या ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये होत्या. १९४०च्या दशकाच्या अखेरीस खऱ्या अर्थानं पाश्र्वगायनाचं युग आलं. याच काळात सी. रामचंद्र यांनी ललिताबाईंच्या आवाजाचा कल्पकतेनं वापर करून घेतला. त्यांचं संगीत असलेल्या ‘साजन’मधलं ‘हमको तुम्हारा ही आसरा’ हे ललिताबाईंनी मोहम्मद रफीसोबत गायलेलं गाणं चांगलंच गाजलं. पण कहर केला तो सी. रामचंद्र यांच्याच ‘नदिया के पार’मधल्या ‘मोरे राजा हो. ले चल नदिया के पार’ या ललिता आणि रफी यांच्या युगुलगीतानं! बडे संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनीही ‘शहीद’साठी ललिताबाईंकडून दोन गाणी गाऊन घेतली. त्यातलं ‘कदम उठाकर रुक नही सकता’ हे समरगीत आजही आठवणीत असणार. याच काळात मराठीतले उगवते संगीतकार सुधीर फडके यांच्यासाठीही त्या गायल्या आणि पुढे त्यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. २९ मे १९४९ रोजी झालेल्या त्या विवाह सोहळय़ात खुद्द मोहम्मद रफीनं मंगलाष्टकं म्हटली होती, हाही एक दुर्लभ योग! मराठीतही त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. जशास तसे, मायबहिणी, उमज पडेल तर, वंशाचा दिवा, जन्माची गाठ, माझं घर माझी माणसं, रानपाखरं, चिमण्यांची शाळा, प्रतापगड इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी पाश्र्वगायन केलं. पुणे आकाशवाणीवर सर्वप्रथम सादर झालेल्या ‘गीतरामायण’मधली काही गाणीही त्या गायल्या. सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक आणि राजकीय पैलूही होते. त्यातील सर्व टप्प्यांवर बाबूजींना खंबीर साथ मिळाली ती ललिताबाईंची. म्हणूनच गदिमा प्रतिष्ठानतर्फे काही वर्षांपूर्वी ललिताबाईंना लाभलेला ‘गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार’ त्यांच्या कर्तृत्वाचा मान राखणाराच ठरला. ‘ललिताने घराकडे पूर्णपणे लक्ष दिल्यामुळेच मी एवढे यश मिळवू शकलो,’ असं अभिमानानं सांगणाऱ्या सुधीर फडके यांनी आठ वर्षांपूर्वी निरोप घेतला. तेव्हापासूनच खरे तर त्या खचल्या होत्या. आता ती पणतीही निमाली आहे.
August 5, 2017
य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले.
July 19, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti