(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठीतील दर्जेदार नाटकांचे लेखक वसंत कानेटकर

    महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाट्यक्षेत्रातील एक नाव म्हणजे वसंत कानेटकर. वसंत कानेटकर यांचे शिक्षण पुणे व सांगली येथे झाले. त्यांचा जन्म २० मार्च १९२२ रोजी झाला. इंग्रजी विषय घेऊन एम. ए. पदवी मिळविल्यानंतर नाशिक येथे हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात सुमारे २५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. नाटककार म्हणून ओळख असलेल्या कानेटकरांनी सुरुवातीला कथा, कादंबरीपासूनच आपल्या लेखनाला सुरुवात केली. वि. स. खांडेकर यांचा सहवास मिळाल्याने साहित्याचा दर्जेदारपणा कळत नकळत रूजला गेला. नाशिकला आल्यावर कुसुमाग्रजांच्या सहवासातूनही त्यांच्यातील साहित्यिक आणखी फुलत गेला.

    ३० वर्षांच्या काळात त्यांनी सुमारे चाळीस नाटकं आणि काही एकांकिका रंगभूमीच्या ओटीत घातल्या. प्रेक्षकांची आवडनिवड जाणणारा एक प्रयोगशील नाटककार म्हणून ते लोकप्रिय होते. वेड्याचं घर उन्हात हे त्यांचे पहिले नाटक म्हणजे मनोविश्लेषणाचा एक नवीन प्रयोग होता. त्यानंतर देवांचं मनोराज्य, प्रेमा तुझा रंग कसा, रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड जाहली, मत्स्यगंधा, हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया, कस्तुरीमृग, वादळ माणसाळतयं, अश्रूंची झाली फुले, मला काही सांगायचयं इ. अनेक नाटके त्यांनी लिहिली. १९८८ मध्ये ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला होता. वसंत कानेटकर यांचे ३१ जानेवारी २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    pd - January 31, 2019


  • लेखक पु. भा. भावे

    मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. भा. भावे. त्यांच्या नावावर सतरा कथासंग्रह आहेत. त्यातील सतरावे वर्ष, पहिले पाप, संस्कार, सुगंध, प्रतारणा, मोहं, फुलवा, नौका, प्रायश्चित्त अशा अनेक कथा आजही आठवतात. . जिथे जिथे दंभ, ढोंग, खोटेपणा आहे तिथे तिथे भाव्यांची लेखणी वज्रप्रहार करते. भाव्यांच्या काही कथांवर चित्रपटही तयार झालेले आहेत.

    pd - April 12, 2021


  • भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी

    कामगारांबाबत व्ही. व्ही. गिरी यांना कमालीची आस्था होती. कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. कामगारांसंबंधीचे विचार इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर प्रॉब्लेम्स इन इंडियन इंडस्ट्री, जॉब्ज फॉर अवर मिलियन्स वगैरे पुस्तकांद्वारे मांडले.

    pd - October 19, 2023


  • Photogenic – नम्रता गायकवाड

    Photogenic – नम्रता गायकवाड

    मधाळ हसणारी, गालावर गोड खळी असलेली, बोलक्या डोळ्यांची, सुरेख केसांची वळण लाभलेली, तरतरीत नाकाची अन् कलावतीला शोभेल अशीच उंची लाभलेली नम्रता गायकवाडची लोभस व्यक्तिरेखा सर्वांच्या डोळ्यात भरेल अशीच आहे.

    एखाद्या प्रकल्पावर काम करत असताना त्या प्रकल्पाची गरज ओळखून त्याला साजेसा ठरेल असा चेहरा छायाचित्रकाराला निवडायचा असतो. मात्र काही चेहरे असे असतात त्याला कोणताही मेकओव्हर केला तरीहि त्यात तो शोभून दिसतो. मराठी सिनेइंडस्ट्रीत अशी काही मोजकी लोक आहेत. या यादीत नम्रता गायकवाड हिचं नाव घेता येईल. मधाळ हसणारी, गालावर गोड खळी असलेली, बोलक्या डोळ्यांची, सुरेख केसांची वळण लाभलेली, तरतरीत नाकाची अन् कलावतीला शोभेल अशीच उंची लाभलेली नम्रता गायकवाडची लोभस व्यक्तिरेखा सर्वांच्या डोळ्यात भरेल अशीच आहे. तिच्यातले हेच गुण एक अभिनेत्री म्हणून तिला जितके महत्वाचे ठरतात. तितकेच ते तिला मॉडेल म्हणून प्रेजेंट करताना उपयोगी पडतात.

    गुणी अभिनेत्री म्हणून यश संपादित केलेल्या तर मॉडेल म्हणून जाहिरात क्षेत्रात वेगळं नाव कमावलेल्या नम्रताचं फोटोशूट करण्याची संधी मला एका नामांकित वृत्तपत्रामुळे मिळाली. यावेळी एथनिक लूकसाठी डिझायनर साडय़ांमध्ये तिचं फोटोशूट करण्यात आलं होतं. मात्र, नम्रताचा चेहरा खरं तर एका छायाचित्रकाराला हवा असलेला असा फोटोजेनिक असाच चेहरा असल्याने तिला मॉडेल म्हणून दिल्या गेलेल्या कोणताही पेहरावात ती उठूनच दिसेल याची खात्री मला होती. पारंपरिक वेशभूषा केलेली नम्रता मी छायाचित्रित केली होती. याच्या विरुद्ध वेस्टर्न आऊटफिटमध्येही तिचं एक छायाचित्र टिपण्याचं मी ठरवलं अन् या छायाचित्रणादरम्यानही ती अधिक खुलल्याचं मला जाणवलं.

    मॉडेलचा एक वेगळा रुबाब स्टुडिओत असतो. तो नेमका कसा जपायचा याचे एथिक्स तिला माहीत होते, तर तिच्या गालावर नेमकी खळी कुठे पडते, चेहऱयावर नेमके कुठे कटस् आहेत या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर वेगळ्या प्रकाशरचनेत तिचे छायाचित्र टिपण्याचा मी प्रयत्न केला. या शूटनंतर अनेक प्रकल्पांमुळे नम्रता आणि माझ्यात संवाद झाले. काही प्रकल्पांवर आम्ही कामही केलं. यातून तिचा आजवरचा जीवन प्रवास उलगडला. व्यावसायिक रंगभूमीवरून एकदम छोटा पडदा आणि थेट रुपेरी पडद्यावर झळकलेली नम्रता आज तरुण अभिनेत्रींच्या यादीत महत्त्वाचं स्थान मिळवून आहे.

    नम्रताला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खरं तर पूरक असं कोणतंच वातावरण नव्हतं. शाळा-महाविद्यालयातही तिने कधी अभिनयात रस घेतला नाही. तसंच घरी अभिनय क्षेत्राचाही कोणताच धागा नव्हता. वडील राज्य शासनाच्या विद्युत विभागात नोकरी करत होते, तर आई ही गृहिणी होती. वडिलांच्या नोकरीनिमित्ताने कुटुंबाला एका शहरातून दुसऱया शहरात सतत स्थलांतर करावं लागत होतं अन् या स्थलांतराच्या काळात केवळ शालेय शिक्षण हेच नम्रताचं उद्दिष्ट नकळत ठरलं गेलं होतं.

    जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाणारा 8 मार्च हा नम्रताचा जन्मदिवस. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या नाशिकमध्ये जन्मलेली नम्रता चौथीपर्यंतच्या शालेय शिक्षणानंतर ठाणे जिह्यातल्या कल्याण इथे कायमची स्थायिक झाली अन् शहरबदलीचा तिचा प्रवास कल्याण शहरात आल्यानंतर संपुष्टात आला. कल्याणच्या नालंदा विद्यालयातून पाचवीनंतरचं शालेय शिक्षण तिने पूर्ण केलं अन् त्यानंतर तिने बिर्ला महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी कमावली. शालेय शिक्षणासोबतच कल्याणच्याच गुरू लक्ष्मी यांच्याकडून भरतनाटय़मचे धडे तिने गिरवले अन् नृत्याचं बाळकडू लहानपणीच मिळवलेली नम्रता आज रुपेरी पडद्यावर ताल धरताना आपल्याला दिसत आहे.

    नृत्यकलेत नम्रताने शालेय काळापासूनच रस घेतला होता. मात्र, अभिनय क्षेत्रापासून ती पार दूर होती. महाविद्यालयीन शिक्षणानंतर कल्याणच्या आचार्य आत्रे नाटय़गृहात वडिलांच्या कार्यालयातून भरवल्या गेलेल्या एका एकांकिका स्पर्धेला केवळ प्रेक्षक म्हणून आलेल्या नम्रतासाठी तो दिवस टार्ंनग पाईंट ठरला. अभिनयाची चंदेरी दुनिया इथे तिला फारच भावली. अनेक प्रश्नांची कालवाकालव तिच्या डोक्यात यावेळी सुरु झाली. एकांकिका स्पर्धेसाठी परिक्षक असलेले अशोक समेळ हे नम्रताच्या वडिलांचे जवळचे मित्रच होते. नम्रताला अभिनयाविषयी पडलेल्या प्रश्नांची उकल अशोक समेळांनी केली खरी. मात्र तिला या क्षेत्रात प्रवेश करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

    अशोक समेळांच्या मार्गदर्शनानंतर अभिनय प्रशिक्षण शिबिरातून नम्रताने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि प्रशिक्षण शिबिराच्या अंती तिला या क्षेत्रात आपलं पाऊल रोवण्यास व्यासपीठ मिळालं ते ‘ज्ञानोबा माझा’ या व्यावसायिक नाटकाचं. ‘ज्ञानोबा माझा’ या नाटकात रुक्मिणीची भूमिका साकारून नम्रता रंगमंचावर आली अन् इथे तिने रसिक मनावर चांगलीच भुरळ घातली. यापाठोपाठ ‘मंगळसूत्र’ या मालिकेतून नम्रता छोटय़ा पडद्यावर झळकली. अलका कुबल या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मुलीची भूमिका तिने या मालिकेत साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून छोटय़ा पडद्यावरून नम्रता घराघरांत पोहोचली. आपला वेगळा चाहता वर्ग तयार होतो न होतो तोच नम्रताला रुपेरी पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली ती ‘स्वराज्य – मराठी पाऊल पडते पुढे’ या सिनेमातून.

    व्यावसायिक नाटकानंतर छोटा पडद्यावर अन् लगेच रुपेरी पडद्यावर गुणी अभिनेत्री म्हणून नम्रताने अल्पावधीतच नाव कमावलं. तिच्या याच अभिनयाच्या जोरावर तिला पुढे ‘विजय असो’ या सिनेमात तसंच आता ‘विठ्ठल विठ्ठल’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी चालून आली. विशेष म्हणजे येत्या 18 ऑक्टोबरला तिचा ‘वंशवेल’ हा सिनेमादेखील येऊ घातला आहे. कै. राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या शेवटच्या सिनेमात नम्रताची मध्यवर्ती भूमिका असून स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समानता आणि कुटुंब जपणूक यावर आधारित असलेल्या या सिनेमाकडे नम्रताचंही आता लक्ष लागलं आहे.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com

    pd - January 21, 2019


  • कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर

    मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर या मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्याही संचालिका होत्या.

    त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले.

    वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. अरूण पौडवाल, अनिल मोहिले, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांनी त्यांच्या गीतांना चाली दिल्या असून सुलोचना चव्हाण, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, मोहम्मद रफी, हेमंतकुमार, आशा भोसले अशा नामवंत गायकांनी गायली आहेत. मा.वंदना विटणकर यांचा पहिला विवाह चित्रकार चंद्रकांत विटणकर यांच्याशी झाला होता. मा.चंद्रकांत विटणकरांच्या निधनानंतर १९८६ साली त्यांनी किशोर पनवेलकर यांच्याशी पुनर्विवाह केला होता.

    वंदना विटणकर यांचे ३१ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    मा.वंदना विटणकर यांची लोकप्रिय गीते

    खेळ कुणाला दैवाचा कळला
    नाते जुळले मनाशी
    मी प्रेम नगरचा राजा
    परिकथेतील राजकुमारा
    राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली गं
    आज तुजसाठी या पावलांना
    अधिर याद तुझी जाळीतसे रे दिलवरा
    हा रुसवा सोड सखे
    हे मना आज कोणी
    अगं पोरी संबाल दर्याला
    तुझे सर्वरंगी रूप
    शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
    खेळ तुझा न्यारा

    pd - December 31, 2016


  • नाटककार, अभिनेते बाळ कोल्हटकर

    महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू.

    pd - July 21, 2017


  • भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम

    ते उत्तम वीणावादक होते. डॉ. कलाम यांना कर्नाटक संगीतात रुची होती. ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘इंडिया २०२०’ आणि ‘इग्निटेड माइंड्‌स’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.

    pd - October 15, 2021


  • बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण

    बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. बंगळूरच्या सोफिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केले.त्यानंतर दीपिकाने बीए करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्ध्यावर सोडून ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. खरं तर वयाच्या ८ व्या वर्षीच दीपिकाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. कॉलेजच्या दिवसांमध्येच तिने रॅम्प वॉक केला होता.लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोज-अप, लिम्का अशा ब्रँड्सची ती अॅम्बेसेडर होती.

    दीपिकाने बॉलिवूडमध्ये 'ओम शांती ओम' सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अॅतक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा 'ऐश्वर्या' हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. आज ती आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून २००६ मध्ये 'फिमेल मॉडल ऑफ द इयर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द इयर'चा मान पटकावला.

    'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', आणि 'गोलियों की रासलीला-रामलीला', हॅपी न्यू 'इयर', ये जवानी है दिवानी, पिकू, रामलीला, बाजीराव मस्तानी हे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दीपिका. हे तिचे हिट ठरलेले सिनेमे. दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅवल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे. बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कॅरमल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता. परंतु आज ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे. सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले होते. पण दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघे आज म्हणजेच ५ जानेवारी रोजी साखरपुडा करणार आहेत. विशेष म्हणजे दीपिकाने साखरपुड्यासाठी स्वतःच्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडला आहे. राम-लीला' या चित्रपटातून रणवीर-दीपिका पहिल्यांदा ऑनस्क्रीन झळकले होते.

    त्यानंतर दोघांचं अफेअर असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली. 'बाजीराव-मस्तानी'या चित्रपटानंतर जणू त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. काही दिवसांपूर्वी फिल्मफेअरच्या पार्टीत दीपिकाने रणवीरचा 'बॉयफ्रेण्ड' असा उल्लेख केला होता. इतकेच नाही तर रणवीर दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबतही अनेकदा दिसला आहे. 'पद्मावती'या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपटात हे दोघे दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे तर दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    pd - January 5, 2018


  • संगीतकार राम कदम

    मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. ‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘झुंज’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘पाहुणी’, ‘सुशिला’, ‘पारध’, ‘गड जेजुरी जेजुरी’ अशा कित्येक संगीतमय चित्रपटांची देणगी मराठीला मिळाली ती केवळ राम कदम यांच्यामुळे. त्यांच्या संगीतामुळे अनेक चित्रपट तरले, विक्रमी ठरले. असं म्हटलं जाते कि, गझल करावी तर मदन मोहननी, कव्वाली करावी तर रोशननी, भावगती करावं तर वसंत प्रभूंनी आणि लावणी करावी तर राम कदम यांनीच! मराठी लावणीचे लावण्या खुलवून त्यांनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मायबाप रसिकांनी दिलेली 'लावणी सम्राट' ही बिरुदावली अभिमानाने मिरवली. कलाकाराला आयुष्यात किमान एक संधी अशी मिळते की जिचे तो सोने करुन जातो. ‘पिंजरा‘ ही संगीतकार राम कदम यांना मिळाली व त्या संधीचे राम कदम यांनी सोने केले. बाजीराव मस्तीनी या चित्रपटातील पिंगा गाण्याबाबत पानीपतकार मा.विश्वास पाटील यांनी या गाण्याबाबत एक नवा मुद्दा समोर आणला होता. तो म्हणजे, मुळात 'पिंगा ग पोरी पिंगा...' याची चाल प्रसिद्ध मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधली आहे.

    पिंगा.. ही चाल मूळ मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधलेली असून त्यांनी संगीतबद्ध केलल्या तीन चित्रपटांतील गाण्यांत त्यांनी ही चाल वापरली असल्याचे विश्वास पाटील म्हणतात. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६२ सालचा अनंत माने दिग्दर्शित भाग्यलक्ष्मी, १९७५ सालचा व्ही शांताराम प्रोडक्शनचा चंदनाची चोळी अंग अंग जाळी आणि १९७६साली अनंत माने दिग्दर्शित पाहुणी या चित्रपटांतील गाण्यांत राम कदमांनी ही चाल वापरली होती. श्री.मधु पोतदार यांनी ‘संगीतबद्ध राम कदम’ या नावाने राम कदम यांचे पुस्तक लिहिले आहे. या संगीतकाराच्या संपूर्ण कारकीर्दीचा तपशीलवार आढावा त्यात घेतला आहे. राम कदम यांचे १९ फेब्रुवारी १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

    संगीतकार मा.राम कदम यांची काही गाणी
    अ आ आई, म म मका
    अहो अहो कारभारी हो
    आई उदे ग अंबाबाई
    आज या एकांत काली
    आली आली हो भागाबाई
    आली ठुमकत नार लचकत
    आली बाई पंचिम रंगाची
    आल्या नाचत नाचत
    उठा उठा हो सूर्यनारायणा
    एक लाजरा न्‌ साजरा
    औंदा लगीन करायचं
    कशी नशीबाने थट्टा आज
    कळी कळी उमलते पाकळी

    pd - February 20, 2017


  • ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खान

    ज्या ग्वाल्हेर घराण्याची परंपरा ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशीद खाँ यांनी चालवली, ते घराणे म्हणजे गायन सादर करण्याची शैली ही भारतीय अभिजात संगीतातील नोंद असलेली पहिली शैली. अनेक प्रतिभावंतांनी त्या शैलीमध्ये मोलाची भर घातली, ती प्रवाही ठेवली आणि तिचे अस्तित्व कायम ठेवण्यास मदत केली.

    pd - February 18, 2018