(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते शशी कपूर

    हिंदी चित्रपटसृष्टीत हॅपी गो लकी म्हणून ओळख असलेल्या शशी कपूर यांनी कपूर घराण्याचा कोणताही स्तोम माजवला नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकता येथे झाला. बलवीरराज अर्थातच शशी कपूर हे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यापुढे येतो तो देखणा चेहरा.

    घरंदाज, अदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. बहुतेक लोकप्रिय चित्रपटांमधून शशी कपूर असेच दिसले. प्रामाणिक, लाघवी, शांत, संयमी आणि बघता क्षणी नायिकेला प्रेमात पडायला लावणाऱ्या भूमिका त्यांच्या वाटय़ाला जास्त आल्या आणि त्याच लक्षात राहिल्या. मा. शशी कपूर यांचे शिक्षण मुंबईत झाले. वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. १९४८ साली आलेल्या ‘आग’ व १९५१ साली आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केल्या. हा गोड दिसणारा, गोड हसणारा छोकरा पुढे त्यांच्या त्याच हास्यासाठी व अवखळपणासाठी प्रसिद्ध झाला.

    घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनीही जपला. मात्र, तरीही वडिल पृथ्वीराज कपूर यांच्यासह थिएटरमध्ये ते बरीच वर्ष रमले. तरुणपणी इतर कपूरांप्रमाणे त्यांनीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशीकपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नायक म्हणून ११६ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

    जब जब फूल खिले या सिनेमातली नंदा आणि शशी कपूर यांची जोडी विशेष गाजली. कपूर यांच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट आहेत. जब जब फुल खिले, शर्मिली,कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा एका हून एक विलक्षण चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने तर बॉक्सऑफिसवर एकच धमाल उडवून दिली.. दीवार, रोटी कपडा और मकान, त्रिशूल, दो और दो पाच, नमक हलाल, सिलसिला, शान, कभी कभी या हीट फिल्म्स या जोडीने दिल्या आणि प्रेक्षकांच मनोरंजन केलं.

    शशी कपूर यांच्या सत्यम् शिवम् सुंदरम्, जब जब फूल खिले या चित्रपटातील अभिनय खूपच गाजले. शशी कपूर हे देव आनंद व राजेश खन्नाप्रमाणे ‘रोमॅन्टिक हीरो’ म्हणून स्त्री-चाहत्यांत आपले स्थान निर्माण करू शकले. ती त्याची मोठीच मिळकत. हिंदी चित्रपटांबरोबरच मा.शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. ‘फिल्मवालाज’ या त्यांच्या निर्मितीसंस्थेच्या वतीने त्यांनी जुनून व कलियुग ३६ चौरंगी लेन अशा विविध चित्रपटांची निर्मिती केली.

    हिंदी रंगभूमीसाठी शशी कपूर यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरचीची त्यांनी पुर्नउभारणी केली. शशी कपूर यांना २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना २०१४ साठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता.

    वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे कपूर कुटुंबातील ते तिसरे सदस्य होते. १६० चित्रपटांत त्यांनी काम केले होते. तीन वेळा त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते. शशी कपूर यांचे ४ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    शशी कपूर यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=VO3EHeCKbEE
    https://www.youtube.com/watch?v=jZ-CQMDwiSc

  • रंगभूमीवरील व चित्रपटातील प्रसिद्ध गायक-नट पंडितराव नगरकर

    पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला.

    मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता.

    हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या.

    संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी-संन्यास ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कला-विलास’ च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले.

    शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली. लग्नाची बेडी, एकच प्याला मधल्या संगीत भुमिका ते शेवटपर्यंत करत होते. मी गातो नाचतो आनंदे.. अशी काही भावगीते पण त्यांनी गायली.

    व्ही. शांताराम यांच्या अमरभूपाळी या चित्रपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांनी न्याय दिला. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. मा.पंडितराव नगरकर यांचे २८ जुलै १९७७ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ गायक, अभिनेते रामदास कामत

    ‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे कामत यांचे ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. त्यांनी गायलेली ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘विनायका हो सिद्ध गणेशा’, ‘हे गणनायक सिद्धिविनायक’, ‘हे शिवशंकर गिरिजा तनया’ आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत. तसेच रावणकृत शिवतांडव स्तोत्र हे रामदास कामत यांनी खड्या आवाजात गायलेले आहे.

  • जुन्या काळातील जेष्ठ संगीतकार नौशाद अली

    नौशाद यांचे लहानपण लखनौमध्ये गेले. ते ज्या ठिकाणी राहायचे त्याच्या बाजूलाच एक थिएटर होतं. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला.पूर्वी चित्रपट चालू असताना त्याचं पार्श्वसंगीत पडद्यासमोर बसलेली मंडळीच द्यायची. घरात बसल्या बसल्या या पार्श्वसंगीताचे सूर नौशाद यांच्या कानांवर पडायचे. यामुळे ते संगीताकडे खेचले गेले. लादनसब हे अशा प्रकारचे संगीत देण्यास माहीर होते. त्यांचा वाद्यवृंद पार्श्वसंगीत देत असताना नौशाद त्यांच्या सार्या गोष्टी टिपून घ्यायचे. यामुळे त्यांच्या शाळेला दांड्या व्हायला लागल्या. पावलं आपोआप थिएटरकडेच वळायची. त्यांचे वडील तापट होते. त्यांना मा.नौशादचा हा नाद मुळीच पसंत पडलेला नव्हता. वयात आल्यावर नौशादनी घरदार सोडलं. ते सोडणं त्यांना क्रमप्राप्तच होतं. त्या वेळी लखनौमध्ये अनेक वाद्यवृंद तेव्हा कार्यरत होते. त्यात नौशादनी आपला स्वतःचा 'विंडसर एंटरटेनर' नावाचा वाद्यवृंद सुरु केला. दहा वर्ष त्यांच्या कानांवर जे संगीत पडलं होतं त्यातून त्यांना चाली स्फुरायला लागल्या. हा वादयावृदं स्वतःचा असल्याने त्यांचा स्वतंत्रपणे सारं काही करायला लागल्या. हा वादयवृदं स्वतःचा असल्याने त्यांना स्वतंत्रपणे सारं काही करायला मिळायचं यामुळे त्यांची प्रातिभा फुलली.

    मुख्य म्हणजे आपणही संगीतकार होऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांना लखनौमधल्या कार्यक्रमातून मिळाला. विंडसर एंटरटेनचे कार्यक्रम घेऊन त्यांनी मग जयपूर, जोधपूर, सिकर, माऊंट अबू, सिरोही, विरमगाम अशा ठिकाणी दौरे काढले. विरमगामला शेवटचा कार्यक्रम झाल्यावर त्यांना मुंबई साद घालायला लागली. स्वप्नाची नगरी मुंबई एवढी जवळ आली असताना आपण माघारी लखनौला जाण्यापेक्षा मुंबईत जाऊन अपलं नशीब अजमावावं या विचाराने ते मुंबईला आले. तेव्हा ते फक्त १६ वर्षांचे होते आणि त्यांच्या खिशात दमडीही नव्हती. जवळ होता तो फक्त संगीतकार होण्याचा आत्मविश्वास. दादरला शिवाजी पार्क आणि ब्रॉडवे सिनेमाच्या आवारात रात्रीचे ते झोपायचे. सकाळी छोटंमोठं काम मिळतं का ते शोधत फिरायचे. पण याच ब्रॉडवेला एके दिवशी आपण संगीत दिलेला चित्रपट झळकेला याची त्यांना खात्री होती. सुरुवातीला एन्. ए. (म्हणजे नौशाद अली) दास या नावाने त्यांनी काही गाणी स्वरबध्द केली. उस्ताद झंडे खाँ यांच्याकडे त्यांना शेवटी ४० रु. महिना पगार असलेली नोकरी मिळली. नंतर रणजित स्टुडिओत जाऊन काम मिळतं का ते पाहायला लागले आणि रणजित स्टुडिओच्या सरदार चंदूलाल खेमजी यांनी त्यांना आपले संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्याकडे साहाय्यक म्हणून ठेवून घेतलं. या ठिकाणी नौशादंना खेमचंदजींकडून बरंच काही शिकायला मिळालं. पण अजूनही त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. दरम्यान गीतकार दीनानाथ मधोक त्यांना घेऊन मोहन भवनानी या निर्मात्याकडे घेऊन गेले. या भवानानींना एक नवा संगीतकार हवा होता. मधोकनी त्यांना नौशादचं नाव सुचवलं. मधोक यांनी नौशादमधले गुण पक्के हेरलेले होते. पण तेव्हा नौशाद अवघे वीस वर्षांचे होते. हा एवढा कोवळा पोरगा काय कपाळाचं संगीत देणार, असंच तेव्हा भवनानींना वाटलं होतं. पण तरीही मधोक यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी महिना १०० रुपये पगारावर आपल्या 'प्रेमनगर' चित्रपटाला संगीत देण्याचं काम नौशाद यांच्याकडे सोपवलं. मा.नौशादनी अवघ्या तीन महिन्यांत 'प्रेमनगर' ला संगीत दिलं. त्यांना फक्त तीनशे रुपये मिळाले. पण त्यापेक्षा त्या चित्रपटाच्या श्रेयनामावली संगीतकार म्हणून त्यांचं नाव झळकलं होतं याचं त्यांना विशेष अप्रूप वाटलं. १९४० च्या सुरुवातीला झळलेल्या 'प्रेमनगर'च संगीत लहानथोरांना आवडलं आणि संगीतकार नैशादचा उदय झाला. यानंतर्च नौशाद यांना छोटी-मोठी कामं मिळत गेली. विजय भट, कारदार यासारखे निर्माते त्यांच्यावर फिदा झाले. यामुळे 'माला', 'दर्शन', 'शारदा', 'कानून'. 'कीमत', 'पहले आप', नमस्ते', 'सन्यासी', 'संजोग', 'जीवन', 'गीत', 'शहाजहान', 'नाटक', 'दर्द', 'दिल्लगी', 'दुलारी', 'दिवाना' असे मा.नौशादजीचें चित्रपट आले.

    नौशाद यांचा या चित्रपटसृष्टीत त्यामुळे जम बसला. पण त्यांची बऱ्याच जणांनी फसवणूकही केली. एका चित्रपटाद्वारे त्याकाळी लाख रुपये गोळा करणारे हे निर्माते त्यांच्या हातावर नाममात्र पैसे ठेवायचे. १९४४ साली गुलाम हैदर यांच्यापासून स्फूर्ती नौशादनी 'रतन' मध्ये उत्तर भारतीय ढंगाचं संगीत बेमालूमपणे वापरलं आणि 'रतन'च संगीत अफलातून लोकप्रिय झालं. नौशाद यांचा 'रतन'मुळे खूप गाजावाजा झाला. 'द मास्टरो विथ मिडास टच संगीतसम्राट नौशाद', 'नौशाद नौशद चालीस करोड में एकही नौशाद' अशी त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली जाऊ लागली. १९५७ मध्ये 'मदर इंडिया'ची जुळवाजुळव सुरु होती. मेहबूब खानच्या आधीच्या 'अंदाज'ला नौशादनीच लाजवाब संगीत दिलेलं होतं म्हणून त्यांचीच 'मदर इंडिया'च्या संगीतासाठी त्यांनी निवड केली होती. पण आता नौशादनी पहिल्यांदा आपली रॉयल्टी मेहबूब खान यांच्याकडे मागितली आणि त्यांनीही ती दिली. यानतंर त्यांची आर्थिक चणचण संपली. नौशाद यांनी नंतर दर्जेदार संगीत देण्याचा सतत प्रयत्न केला. वर्षभरात ते एकच चित्रपट यासाठी करायचे. त्यांना गायकांकडून कसून तयारी करुन घेतल्याशिवाय गाणं रेकॉर्डिंग करायला आवडायचं नाही. लता मंगेशकर, रफी ही मंडळा त्यांच्याकडे तासनतास एकाच गाण्यासाठी रिहर्सल करायला न कंटाळता यायची. आजही नौशाद म्हणतात, 'आपल्याकडे गायक, गायिकांना संगीतकारांपेक्षा अधिक मान मिळतो हे सपशेल चुकीचे आहे. गाण्याची चाल, त्यावरचे संस्कार संगीतकार करत असतो. त्या गाण्याच्या सुरेलपणाचा वा बेसुरीपणाचा मालक तो संगीतकार असतो. आम्हा संगीतकारांमुळे अनेक गायक - गायिकांचं नावं झालं हे लक्षात घ्या. संगीतकाराविना गायक काहीच करु शकत नाही. लता, रफी हे चांगले गायक असल्याबद्दल प्रश्नच नाही. पण त्यांच्याकडून उत्तम प्रकारे गाऊन घेणार्या, संगीतकारांना तुम्ही कमी लेखू नका.' लताकडूनही आपल्या मनासारखं गाणं जोवर येत नाही तोवर तिला गायला लावण्याचा हट्ट नौशाद धरायचे. रफीने गायलेलं 'कोई सागर दिल को बेहलाता नही' किंवा शमशाद बेगमचं 'छोड बाबुल का घर' ही गाणी केवळ मा.नौशाद हा संगीतातला चमत्कार होता. यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असायचे. ते जे काही करायचे ते मात्र मनापासून असायचं. ते श्रध्दापूर्वक रेकॉर्डींगही करायचे. 'बैजू बावरा'तल्या 'मोह भूल गये सावरियाँ' गाण्याच्या रेकॉर्डींगची गोष्ट अशी आहे. हे गाणं भैरव रागातलं असल्याने भैरव म्हणजे शिवशंकर म्हणून नौशादनी रेकॉर्डिंग करायच्या आधी सर्वाना स्नान करुन शुचिर्भूत होऊन रेकॉर्डिंग करायचा आग्रह धरला होता.

    'बैजू बावरा'ने नौशादना तुफान लोकप्रियता तर दिलीच, पण त्यांना स्वतःला फार मोठं समाधान दिलं. या एका चित्रपटात त्यांनी बहुतेक सगळ्या रागांचा वापर केला. रफीच्या आवाजातली 'मन तडपत हरी दर्शनको आज' मालकंसमध्ये, ओ दुनियाके रखवाले' दरबारीमध्ये त्यांनी तयार केलेलं होतं 'तू गंगांकी मौज मै', 'दूर कोई गाये', 'इन्सान बनो' ही सगळी गाणी गाजली. नौशाद यांच्या कारकीर्दीतला 'बैजू बावरा' हा कोहिनूर हिरा ठरला. पलुस्कर आणि उस्ताद आमिर खान यांची जुगलबंदीही पेश केली. सुरुवातीला 'बैजू बावरा'मध्ये दिलीपकुमार - नर्गिस अशी जोडी घेतली जाणार होती. पण नौशादनीच यामुळे प्रेक्षक निव्वळ या जोडीला पाहायला येतील. याचं कथानक, संगीत उपेक्षित राहील अशी शंका व्यक्त करुन नव्या कलाकारांना घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार मीनाकुमारी, भारतभूषण ही जोडी घेतली गेली आणि या जोडीलाही पुढे स्थिरावता आलं. त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात बँडवर 'छोड बाबुलका घर' वाजवलं गेलं होतं आणि त्यांच्या सहाव्या आणि सर्वात धाकट्या मुलीच्या लग्नालाही बँडवर. हेच गाणं वाजवलं गेलं तेव्हा त्यांना भरुन आलं होतं. आपण दिलेलं संगीत चिरकाल टिकणात्रं आहे याचीच साक्ष बँडवाल्यांनी दिली होती. याचं कारण हे गाणं यांनीच 'रतन'साठी शमशाद बेगमकडून गाऊन घेतलेलं तर होतं! मा.नौशाद यांचे निधन ५ मे २००६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • दिग्दर्शक आणि निर्माते ताहिर हुसेन

    जिद्दीच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कर्तृत्वाचा खोल ठसा उमटवलेल्या दिग्दर्शक आणि निर्माते ताहिर हुसेन यांचे घराणे मुळचे अफगाणिस्तानातले, पश्तुन वंशाचे. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी हुसेन यांच्या घराण्याचे संबंध होते. महाविद्यालयात शिक्षण घेतानाच, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करायचा निर्णय घेतला होता. प्रारंभी मुंबईतल्या स्टुडिओत संवाद लेखक, सहदिग्दर्शक आणि अन्य कामे करीत करीत हुसेन यांनी चित्रपट निर्मितीचे तंत्र समजून घेतले.

    जब प्यार किसी से होता है, हा त्यांनी १९६१ मध्ये दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट प्रचंड गाजला. त्याला अमाप लोकप्रियता मिळाली. धंदेवाईक तडजोडीला नकार देणारे हुसेन यांनी पन्नास वर्षात मोजकेच चित्रपट काढले पण ते सर्व उत्कृष्ट होते. तिसरी मंझिल, या चित्रपटात शम्मी कपूर आणि आशा पारेख यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातली गाणी बरीच वर्षे गाजत आहेत.

    अनामिका, जखमी, प्यार का मौसम, जब प्यार किसी से होता है, जन्म जन्म का साथ, मदहोश, कारवॉं, तुम मेरे हो, दुल्हा बिकता है, लॉकेट, खून की पुकार, हे त्यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केलेले चित्रपट देशभरातल्या चित्रपटगृहात रौप्यमहोत्सवी ठरले होते. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन करताना प्रवाही कथेबरोबरच चित्रपटांची तंत्र शुध्दताही त्यांनी सांभाळली. अनेक नव्या कलाकारांना संधी देतानाच, तंत्रज्ञही घडवले. ही त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीला देणगी होय! साध्या, सोप्या प्रेमकथेवरचा प्यार का मौसम हा चित्रपट तेव्हाच्या युवकांत अत्यंत लोकप्रिय झाला होता. अनामिका हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही प्रदर्शित झाला होता.

    चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खान हा मा.ताहिर हुसेन यांचा मुलगा. त्यांच्या तालमीतच आमिर खान तयार झाला. ताहिर हुसेन हे लेखक आणि पटकथा लेखक होते. पटकथा लिहिताना ते भारतीय प्रेक्षकांची नाडी ओळखूनच संवाद लेखन करीत. तशीच गीतेही चित्रपटासाठी गीतकारांकडून लिहून घेत. सर्वांना माणुसकीने वागवणारा निर्माता आणि दिग्दर्शक असा त्यांचा चित्रपटसृष्टीत लौकिक होता. ताहिर हुसेन यांचे २ फेब्रुवारी २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

    ताहिर हुसेन यांचे चित्रपट
    निर्माता- कारवाँ (1971), अनामिका (1973), मदहोश (1974), जख्मी (1975), फिर जनम लेंगे हम (1977), खून की पुकार (1978), दूल्हा बिकता है (1982), लॉकेट (1986), हमारा खानदान (1988), तुम मेरे हो (1990), हम हैं राही प्यार के (1993),
    दिग्दर्शक - तुम मेरे हो (1990)

  • जेष्ठ बॉलिवूड, व बंगाली अभिनेत्री मुनमुन सेन

    मुनमुन सेन यांचे खरे नाव श्रीमती देव वर्मा आहे. त्यांचा जन्म २८ मार्च १९४८ रोजी कोलकाता येथे झाला.शिलाँग येथील लॉरेंटो स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुनमुन यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली, तामिळ, तेलगू, मल्याळम, मराठी आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांची कन्या. तर मुनमुन यांच्या मुली रिया सेन आणि रायमा सेन या देखील बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकल्या आहेत. मा. मुनमुन सेन यांनी आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९८४ मध्ये रिलीज झालेला 'अंदर बाहर' हा त्यांचा पहिला सिनेमा. त्यानंतर त्यांनी 'मुसाफिर', 'मुहब्बत की कसम', 'जाल', 'शीशा', 'प्यार की जीत', 'माशुका', 'वो फिर आएगी', '100 डेज', 'वक्त के बादशाह', 'जख्मी रूह', 'कुछ तो है', 'अपना देश पराए लोग', 'पत्थर के इंसान', 'बेलगाम' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले. मा.मुनमुन सेन आपल्या काळातील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असत. काही सिनेमांमध्ये त्या बिकिनीत झळकल्या आहेत. काही सिनेमांमध्ये त्यांनी बोल्ड सीन्सही दिले आहेत. मुनमुन यांनी आता सिनेसृष्टीला रामराम ठोकला असून त्या सध्या राजकारणात सक्रिय आहेत. मा.मुनमुन सेन या पश्चिम बंगालमधील बांकुरा मतदार संघातल्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणुक लढवली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • माझा मित्र कवी प्रवीण दवणे

    नुकतेच प्रवीण दवणेचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले , त्यापैकी एकाचे प्रकाशन दुबईमध्ये झाले. ‘ आमी ‘ नावाची आखाती देशांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यांनी मिळून पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा दुबईत नुकताच झाला झाला .,तेथे प्रवीण दवणेचा ‘ नवी कोरी सांज या मराठी कविता संग्रहाचे प्रकाशन झाले , त्या कवितांचे वाचन तिथे झाले तेव्हा सर्व जणांनी त्याला उस्फुर्त प्रतिसाद दिला.

  • संगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी

    संगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. त्यांचा जन्म १९१९रोजी झाला. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते.

    मोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन केली असे बोलले जाते.मा.जी.एम. दुराणी यांचे ९ सप्टेबर १९८८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • आग्रा घराण्याच्या गायिका व संगीतज्ञ  सुमती मुटाटकर

    सुमती मुटाटकर या हिंदुस्तानी संगीतातील आग्रा घराण्याच्या गायिका व संगीतज्ञ, तसेच दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापिका होत्या.

  • आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा आणि उद्योजिका मीनल मोहाडीकर

    आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरची पहिली महिला अध्यक्ष जर कुणी असेल तर मीनलताईंचे नाव सन्मानपुर्वक घेतले जाते. ‘मराठी माणसाने आपली नोकरी करावी’ या पराभूत मानसिकतेमधून जगणाऱ्या समाजात कोणत्याही पाठबळाशिवाय उभ्या राहिलेल्या मीनल यांनी २०१३ साली शारजात केवळ उदघाटन करून कुठलेही प्रदर्शन न भरवलेल्या इंडियन एग्झिबीशन सेंटर शारजा येथे प्रदर्शन केंद्रात, २०१४ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई येथे यशस्वी उद्योजकांची बाजारपेठ प्रदर्शनाद्वारे नुसतीच आयोजित करुन दाखवली नाहीतर यशस्वी करून दाखवली. ज्या अरब देशात तेथील महिलांना देखील सार्वजनिक जीवनात असे कार्य करण्याची मुभा नाही तेथे जाऊन एका मराठी महिलेने हा नेत्रदीपक उद्यम यशस्वी केला.