(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुण्याचे सार्वजनीक काका – चारुदत्त सरपोतदार उर्फ चारुकाका

    चारुदत्त सरपोतदार हे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व होते. गेली सुमारे सत्तरहून अधीक वर्षे ‘पूना गेस्ट हाउस’च्या माध्यमातून कलावंतांपासून सर्वसामान्य पुणेकर खवय्यांचे चोचले पुरविणारे चारुदत्त सरपोतदार हे शेवटपर्यत पुण्याच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत होते.

  • मराठी सिनेअभिनेते मोहन गोखले

    घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मा.मोहन गोखले वावरले.

  • क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख १

    इंग्रजांनी चापेकर बंधूंना फासावर चढवले आणि सावरकर मनातून पेटून उठले. त्यांची कुलदेवता भगवती (कालिका) होती. असे म्हणतात की चापेकर बंधूंच्या फाशीनंतर सावरकर घरातील देव्हाऱ्यातील देवी समोर संतापाने स्वतःचे प्राण त्याग करण्याच्या मनःस्थितीत होते. या देशाला स्वातंत्र्य दिलेस तर मी माझी मान सुद्धा कापून तुझ्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक करीन असे ते देवी समोर बसून गाऱ्हाणे घालीत होते. “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ त्यांनी देवी समोर घेतली. मनात जी क्रांतीची ठिणगी पेटली त्यामुळे सावरकर अत्यंत अस्वस्थ होते.

  • अभिनेता सुव्रत जोशी

    ‘किंगडम ऑफ ड्रीम्स’ या थिएटरच्या एका नाटकात त्याला मुख्य भूमिका मिळाली आणि तिचं त्याच्या पहिल्या व्यावसाईक कामाची सुरुवात होती. नॉट इन फोकस, बिनकामाचे संवाद, ड्रीम्स ऑफ तालीम आणि अमर फोटो स्टुडीओ ही त्याने केलेली नाटके.

  • डिस्को किंग’ संगीतकार व गायक बप्पी लहिरी

    बप्पी लहिरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीते खूप लोकप्रिय झाली होती. किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन देखील बप्पी दा यांच्या संगीत शैलीने प्रभावित झाला होता. मायकल जॅक्सनने बप्पी दा यांना मुंबईत झालेल्या शोमध्ये आमंत्रित केले होते.

  • ब्रिटीश वैद्यक जेम्स पार्किन्सन

    मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे. १८१७ साली जेम्स पार्किन्सन याने प्रथम ही स्थिती लोकांच्या नजरेस आणून दिली. या आजाराला ‘पार्किन्सन रोग’ असे म्हणतात. या आजाराचा शोध लावणाऱ्या जेम्स पार्किन्सन याच्या नावाने हा आजार ओळखला जातो.

  • मराठी गायक, संगीतकार, चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक अवधूत गुप्ते

    अवधूत गुप्ते यांची वेगळी अशी ओळख मराठी माणसाला करून द्यायची आवश्यकता नाही. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९७७ रोजी झाला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘बाई बाई मनमोराचा’ या दोन गाण्यांच्या नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले. त्यांची दाद द्यायची पद्धत, कौतुक करायची पद्धत काही वेगळीच होती. अंगावर काटा आला, ‘मित्रा तोडलंस! जिंकलंस!, ‘टांगा पलटी घोडे फरार’ या शब्दांत दिलेली दाद स्पर्धकांचाही हुरूप वाढवत असे. ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा थेट प्रश्नद विचारत ते दिग्दर्शकाच्याही खुर्चीवर विराजमान झाला.
    खुपते तिथे गुप्ते’मुळे अवधूत गुप्तें मुलाखतकार ही झाले. मराठीतील आघाडीचे संगीतकार-गायक-निर्माते-दिग्दर्शक असा नावलौकिक असलेल्या अवधूत गुप्ते यांनी मराठी व हिंदी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत दिले आहे. त्यांनी मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचे व परीक्षणाचे कामही केले आहे. सागरिका म्युझिक कंपनीच्या पाऊस या अल्बमामार्फत गायक व संगीतकार म्हणून त्यांचे पदार्पण झाले. त्यानंतर वैशाली सामंत ह्यांच्या सोबत त्यांनी बनवलेला ऐका दाजीबा हा इंडिपॉप अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला. ‘बाई बाई मनमोराचा पिसारा.....’, ‘जय जय महाराष्ट्र माझा...’, ‘पोरी जरा ';हळू हळू चाल...’ आणि ‘ढिपाडी ढिपांग’ या गाण्यांना तर रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    खुपते तिथे गुप्ते या वरची मुलाखत अवधूत गुप्ते यांची http://sahityasuchi.erasik.com/articles/Avadhut_Gupte
    अवधूत गुप्ते यांची वेबसाइट www.avadhootgupte.com

  • दाते पंचांग’चे मोहन दाते

    सोलापूर शहर आणि ‘दाते पंचांग’ यांचा ऋणानुबंध जवळजवळ ९५ वर्षाचा. आज पाच लाख इतका खप असलेले ‘दाते पंचांग’ अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. ९५ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नाना ऊर्फ लक्ष्मणशास्त्री दाते यांनी रोवली. लक्ष्मणशास्त्री दाते यांनी लावलेल्या वृक्षाने आज विशाल रूप धारण केले आहे. आता ‘दाते पंचांग’ या नावाने ओळखल्या जात असलेल्या पंचांगाची धुरा नाना दाते यांचे नातू आणि पंचांगकर्ते धुंडीराजशास्त्री दाते यांचे पुत्र मोहनराव दाते यांच्यावर आहे. १९७७ सालापासून मोहनराव दाते या व्यवसायात आहेत. १९९५ साली धुंडीराजशास्त्रींचे निधन झाल्यानंतर ‘दाते पंचांग’ चालविण्याची जबाबदारी मोहनराव दाते यांच्यावर पडली. तेव्हापासून आतापर्यंत मोहनराव ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हे दाते पंचांगाच्या लोकप्रियतेवरून दिसून येतच आहे. त्यांचा जन्म ११ जुलै १९५४ रोजी झाला. पंचांग कार्यात अधिकारवाणीने भाष्य करणारी व्यक्ती म्हणून मोहनराव दाते यांनी नावलौकिक प्रश्नप्त केला आहे. मोहनराव दाते यांच्या कार्याची दखल नुकतीच दिल्लीच्या ‘जैन प्रश्नकृत भाषा भवन’ या संस्थेने घेतली आणि मोहनराव दाते यांची आचार्य कुंदकुंद पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या आधी सोलापूरचे डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. महावीर प्रभाचंद्र शास्त्री यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता पंचांगकर्ते मोहनराव दाते यांची त्यासाठी निवड झाली आहे. जैन समाजाशी संबंधित असलेल्या संस्थेने पंचांगक्षेत्रात कार्यरत असलेल्या मोहनराव दाते यांच्या कार्याची दखल घेऊन कुंदकुंद पुरस्कारासाठी त्यांची निवड केली हे विशेष. एक लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्ली येथे येत्या ३ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात आचार्य श्री विद्यानंदजी आणि बेळगावचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित बाहुबली उपाध्ये यांच्या उपस्थितीत मोहनरावांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. धर्मशास्त्र, मुहूर्तशास्त्र, पत्रिका, गणित आदी विषयातील लोकोपयोगी अभ्यासासाठी आणि या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल मोहनरावाची या पुरस्कारासाठी केलेली निवड सार्थच मानावी लागेल. यंदाच्या वर्षी २१ जून रोजी ज्योतिषी म. दा. भट गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली होती. आता कुंदकुंद पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मोहनराव दाते यांनी ‘दाते पंचांग’ लोकप्रिय करण्याबरोबरच २००० सालापासून पंचांगाच्या जोडीला पॉकेट पंचांग, कन्नड, हिंदी आणि मराठी दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्धी मिळविली आहे. पंचांगकर्ते कै. लक्ष्मणशास्त्री दाते, कै. धुंडीराजशास्त्री दाते, कै. श्रीधर लक्ष्मण दाते यांनी लोकप्रिय केलेले ‘दाते पंचांग’ आता मोहनराव दाते यांनी आणखी लोकप्रिय केले आहे. मोहनरावांच्या समवेत त्यांचे पुत्र ओंकार आणि श्रीधर लक्ष्मण दाते यांचे पुत्र विनय हेही या क्षेत्रात आहेत. पंचांगक्षेत्रात दाते घराण्याचे असे चार पिढय़ांचे योगदान आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची वाढत चाललेली लोकप्रियता लक्षात घेऊन वेबसाइटच्या माध्यमाद्वारेही पंचाग सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य पंचागकर्ते दाते करीत आहेत. भारत सरकारचे ‘राष्ट्रीय पंचांग’ तपासण्यासाठी दाते यांच्याकडे येत असते. हे लक्षात घेता दाते पंचांगकर्ते यांचा या क्षेत्रातील अधिकार किती मोठा आहे याची कल्पना यावी. लहानपणापासून घरातील संस्कारांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले मोहनराव दाते सोलापूरच्या समर्थ बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते. सध्या ते या बँकेचे संचालक आहेत. रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीच्या कार्याशीही ते संबंधित आहेत. सोलापूरच्या नावलौकिकात ज्यांनी भर टाकली आहे त्यात पंचांगकर्ते दाते यांचे नाव कित्येक वर्षापासून अग्रणी आहे. आता पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनीही त्या लौकिकात आणखी भर टाकली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सशस्त्र क्रांतिकारक सेनापती बापट

    १९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालविले. या आंदोलनात कारागृहवासाची तीनदा शिक्षा त्यांना झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेत असताना राजद्रोहात्मक भाषणे केल्याबद्दल अनेकदा अनेक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली.

  • ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर

    १९९७ ला स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेल्या ‘पैज लग्नाची’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे विक्रमी १४ राज्य पुरस्कार मिळाले होते. ‘घे भरारी’ या दुसऱ्या आशयघन चित्रपटाला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर, ‘राजा पंढरीचा’ या भक्तीपटाला ३ राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या ‘राजमाता जिजाऊ’ हा ऐतिहासीक कशानकावर आधारित चित्रपटाला लंडनमध्येही प्रदर्शित करण्यात आलं होतं.