४५ व्या वर्षी ते जगातले ४४ वे श्रीमंत व्यक्ती बनले. टेक्सासमधील त्यांचा बंगला हा जगातील १५ वा आलिशान बंगला ठरला.
थ्रिलर चित्रपटांच्या दुनियेत हिचकॉकचंच नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यानं नामवंत कलाकार चित्रपटात वापरले तसंच कित्येक अज्ञात कलाकारांना नामवंत केलं, अनेक वेचक आणि प्रसिद्ध स्थळं चित्रीकरणासाठी वापरली आणि कॅमेरा हवा तसा फिरवला.
ज्यांच्या शास्त्रीय संगीताने रंगमंच गाभारा आणि सभागृह मंदिर बनत असे अशा उच्च दर्जाची सांगीतिक क्षमता असलेल्या किशोरी आमोणकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या श्रेष्ठ गायिका. त्यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी झाला.
किशोरी आमोणकर या ख्यातनाम गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्या कन्या; मात्र त्यांनी शास्त्रीय संगीत शिकायला प्रारंभ केला तो भेंडी बाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर यांच्या तालमीत. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी मातोश्री मोगुबाईंकडे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. मोगुबाईंचे शिक्षण अल्लादियॉं खॉं साहेबांकडे झाले होते. घराण्याचे गाणे शिकत असताना त्यात किशोरी आमोणकर यांनी प्रयोगशीलता आणली. घराणी वेगवेगळी असली तरी संगीत एकच आहे असे त्या म्हणायच्या. गाण्यामध्ये रस महत्त्वाचा असतो, असे त्या सांगायच्या. साहित्यशास्त्रात रससिद्धांत वापरला जातो. भारताच्या प्राचीन संगीत परंपरेचा वेध घेण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. हे तत्त्व आजच्या काळात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड होती. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते. घराण्यांच्या रूढ भिंतींना फारसे महत्त्व न देणाऱ्या बुद्धिमती किशोरीताईंनी कालांतराने सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला; आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बंदीशी असोत किंवा ठुमरी गायिकीतला कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. सिनेसंगीतालाही त्यांनी त्याज्य मानले नाही. १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या "गीत गाया पत्थरों ने' या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्व गायन केले. चित्रपटसृष्टीत आलेल्या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. मुंबईतल्या एलफिस्टन महाविद्यालयात शिकलेल्या किशोरीताईंना मुळात डॉक्टर व्हायचे होते. परंतु त्यात मन रमल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहून घेतले. "जाईन विचारीत रानफुला' हे मराठीतील त्यांचे गीतही स्वरशिल्पाचा नमुना ठरला. त्यांनी 'स्वरार्थरमणी – राग रससिद्धान्त' हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. १९८७ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने; तर २००२ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरवले. तसेच १९८७ साली संगीत सम्राज्ञी पुरस्कार, २००२ साली संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप इ पुरस्कार मा.किशोरी आमोणकर यांना मिळाले होते. शास्त्रीय संगीतात मोलाची कामगिरी बजावताना त्यांनी शिष्यांची फौज तयार केली. माणिक भिडे, नंदिनी बेडेकर, आरती अंकलीकर-टिकेकर, देवकी पंडित आणि रघुनंदन पणशीकर हे त्यातील काही महत्त्वाची शिष्यगण.किशोरी आमोणकर यांचे ३ एप्रिल २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
किशोरी आमोणकर यांचे गायन
अवघा रंग एक झाला.
https://www.youtube.com/watch?v=5p5hy-2AjTA
https://www.youtube.com/watch?v=FglVACXnQIk
https://www.youtube.com/watch?v=VylhIJF50sI
https://www.youtube.com/watch?v=zLgXP-WvXLM
https://www.youtube.com/watch?v=ddimw49-waw
https://www.youtube.com/watch?v=RSba7WebiXo
किशोरी आमोणकर यांची गाजलेली गाणी :
अवघा रंग एक झाला,बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,माझे माहेर पंढरी,हे श्यामसुंदर राजसा,अवचिता परिमळु,कानडा विठ्ठल,अवघा तो शकुन,जनी जाय पाणियासी,जाईन विचारित रानफुला,पडिलें दूरदेशीं,पाहतोसी काय आता पुढे,मी माझें मोहित राहिलें,या पंढरीचे सुख,सोयरा सुखाचा विसांवा
सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी १ जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. त्यांचा जन्म १३ जून १९५१ रोजी झाला. ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्रेलिखित पहिल्याच नाटकाने हजाराहून अधिक प्रयोगांचा विक्रम केला होता. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, चार दिवस प्रेमाचे, मोरुची मावशी अशा एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. नाटकांच्या तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारे निर्माते म्हणून सुधीर भट नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचे सुरुवातीला मोरुची मावशी हे नाटक प्रचंड गाजले.
‘ती फुलराणी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ या नाटकांना सुध्दा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. मराठी नाटक सातासमुद्रापार युरोप, अमेरिकेत नेण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या नाटकांना परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला. काही काळ नाटय़निर्माता संघाचे ते अध्यक्षही होते. अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचेही प्रदीर्घ काळ ते सदस्य राहिले. नाटय़व्यवसायाच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी शासनदरबारी मांडण्यात आणि त्यांची सोडवणूक करून घेण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे.
जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन, नाटकांचे परदेश दौरे, नवे विषय हाताळणे आणि नाट्यप्रयोगांचे विक्रम ही त्यांची वैशिष्ट्ये होती. नटांची अत्यंत काळजी घेणारे, इंटिरियर डिझायनिंग करणारे, उत्तम खवय्ये आणि तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालणारे म्हणून भट प्रसिद्ध होते. "मोरूची मावशी‘ हे नाटक प्रचंड गाजले. मात्र, "गांधी विरुद्ध गांधी‘ या नाटकाने व्यवसायात त्यांना खोट दिली. पण ते कधीच मागे हटले नाहीत. विजय चव्हाण, सुनील बर्वे, प्रशांत दामले यांची कारकीर्दही त्यांनी उभी केली.
मराठी रंगभूमीचा शो मॅन म्हणूनही त्यांना ओळखले जात असे. सुधीर भट यांचे निधन १४ नोव्हेंबर २०१३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पंकज मलीक हे रवीन्द्र संगीतात विशारद होते. रवीन्द्र संगीताला शान्तिनिकेतन मधून लोकांच्या पर्यत पोहचवण्याचे श्रेय पंकज मलिक यांनाच जाते.
दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला. त्यांचा जन्म २ जून १८९० रोजी झाला. पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते एक चतुरस्र् कलाकार होते. कलाव्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मुंबईत १९०८-०९च्या सुमारास फोटोग्राफीचा स्टुडिओ सुरू केला. पुढे केशवराव भोसले, बालगंधर्व यांच्या नाटकांसाठी पडदे रंगवले, इतकेच नव्हे तर त्यांनी ‘गंधर्व कंपनी’ला वेशभूषा, अलंकार, आभूषणे इत्यादींची डिझाइन्सही करून दिली. स्मारक-शिल्पे करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. ज्या काळात चित्रपटनिर्मितीसाठी लागणा-या मूलभूत सुविधा, यंत्रसामग्रीही उपलब्ध नव्हती, त्या काळात बाबूरावांनी चित्रपटनिर्मितीचे साहस केले. १९१७ मध्ये कोल्हापूरला त्यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ स्थापन केली व जवळजवळ २६ चित्रपटांची निर्मिती केली. ‘सावकारी पाश’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. हा चित्रपट चित्रपटनिर्मितीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड समजण्यात येतो. झुंजारराव पवार, व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, अनसूयाबाई आदींनी त्यात भूमिका केल्या होत्या.
बाबूराव हे स्वत: उत्तम इंजिनीअर व संकलक होते. आपल्याला चित्रीकरणासाठी लागणारा हवा तसा कॅमेरा त्यांनी स्वत: बनवून घेतला होता. ते सिनेमाचे पोस्टर, फोटो पाहूनच आपले आगामी सिनेमाविषयीचे मत बनवणार, हे गृहीत धरून बाबूरावांनी आपल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’च्या ‘सिंहगड’ (१९२३) या चित्रपटाची लक्षवेधक पोस्टर्स तयार करून ग्रँट रोडचे ‘नॉव्हेल्टी थिएटर’ असे काही सजवले-नटवले की, त्या काळी अर्धी मुंबई खास ‘नॉव्हेल्टी’ पाहायला तिथे लोटली होती. त्यांचे ‘सिंहगड’चे पोस्टर काळाच्या ओघात नष्ट झाले; पण त्यांच्या ‘सतिसावित्री’, ‘कल्याण खजिना’, ‘सावकारी पाश’ (सर्व मूकपट, काळ : १९२१ ते १९२७), ‘शाहीर रामजोशी’ आदी चित्रपटांची पोस्टर्स, ‘उषा’ चित्रपटांचे बुकलेट आजही पाहायला मिळते, ही सर्व चित्रे म्हणजे दुर्मीळ कलेक्टर्स आयटम्स आहेत. आपल्या स्टुडिओत चित्र रंगवण्यासाठी चित्रफलकाच्या आधारासाठी लागणारा ईझल त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने डिझाइन केला होता. त्या ईझलसमोर एका जागेवर बसून चित्रकर्त्यांला काम करता येई. त्यांनी चित्रफलक वर-खाली करण्यासाठी व कोणत्याही उंचीवर स्थिर करण्यासाठी ईझलमध्ये पायाने दाबण्याच्या पॅडलची व्यवस्था केली होती. अशी सुविधा असलेला ईझल कुठल्याही पेंटरकडे नव्हता. बाबूराव उत्तम मोटार मेकॅनिकही होते. बोलपटांचे आगमन झाल्यावर ध्वनीने, दृश्यकलेवर आक्रमण केले असे समजून बाबूराव पेंटरांनी सिनेउद्योगातून निवृत्ती पत्करली. पण त्याआधी त्यांनी व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, दामले, फत्तेलाल, धायबर असे शिष्योत्तम तयार केले.सतत कलेचा ध्यास आणि नावीन्याचा शोध घेण्यात बाबूरावांनी आपली उभी हयात घालविली. मा.बाबूराव पेंटर यांचे १६ जानेवारी १९५४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ :- इंटरनेट
जे जन्मापासूनच वेगवान असतात त्यांची क्षमता इतरांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असते. बरोबरीच्या लोकांना मागे टाकून ते कमी वयात यशाचे शिखर गाठतात. फॉर्च्युन ५०० कंपनी डेलचे संस्थापक अध्यक्ष मायकल डेल हे अशांपैकीच एक.
सुजित कुमार यांनी अनेक हिंदी आणि भोजपुरी सिनेमांतून भूमिका साकारल्या होत्या. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९३४ रोजी झाला. आराधना या हिंदी सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.
सुजित कुमार यांनी छूटे राम, विदेशिया, दंगल, गंगा कहे पुकार के, गंगा जइसन भौजी हमार, सजनवा बैरी भइले हमार, हमार भौजी, माई के लाल, संपूर्ण तीर्थयात्रा अश्या लोकप्रिय भोजपुरी चित्रपटात कामे केली. त्यांना भोजपुरी चित्रपटातील पहिला सुपरस्टार समजले जाते. त्यांचे इतर हिंदी चित्रपट कोहरा, आँखें, ‘द बर्निंग ट्रेन’, आराधना, इत्तफाक, मन की आँखें, आन मिलो सजना, हाथी मेरे साथी, अमर प्रेम, शरारत.
त्यांनी खेल, चॅम्पियन, ऐतबार या हिंदी सिनेमांची निर्मिती केली. सुजित कुमार यांचे ५ फेब्रुवारी २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कृष्णा बोरकर यांच्या आजवरच्या प्रवासात व्ही. शांताराम, राजकमल स्टुडिओ, ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम यांचेही महत्त्वाचे स्थान आहे. एकदा ‘राजकमल’चे मुख्य रंगभूषाकार बाबा वर्दम आलेले नसताना बोरकर यांनी ‘राजकमल’मधील ज्येष्ठ अभिनेते बाबुराव पेंढारकर यांची रंगभूषा केली. शांताराम बापू यांनी ठीक आहे, अशा शब्दात पावती दिली आणि नंतर चक्क स्वत:ची रंगभूषा बोरकर यांना करायला सांगितली.
संगणक व त्याच्याशी संबंधित लहानमोठी उपकरणे आता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहेत. कॉम्पॅक्ट डिस्क- अर्थात ‘सीडी’ ही त्यातीलच एक.
रेकॉर्ड प्लेअरची जागा टेप रेकॉर्डरने घेतली आणि पुढे काही काळातच कॅसेट कालबाह्य़ ठरून त्यांची जागा ‘सीडीं’नी घेतली. संगीत साठवणे आणि ऐकणे हा ‘सीडी’चा केवळ एक उपयोग झाला. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही माहितीचा साठा संग्रहित करण्यापासून तो दुसर्याला हस्तांतरित करण्यापर्यंतच्या प्रचंड व्यवहारात ‘सीडी’ हे महत्त्वाचे माध्यम ठरले.
१९८२ साली सोनी कंपनीने पहिली सीडी बनवून वितरित केली तेव्हा हाताच्या एका पंजात मावेल अशी ही तबकडी कालांतराने धनाढ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांसाठी दैनंदिन वापराच्या वस्तूचे स्थान पटकावेल असे कोणालाही वाटले नसेल. मात्र फार थोडय़ा व्यक्तींना याची जाणीव असेल, त्यातीलच एक म्हणजे ‘सोनी’ या जगप्रसिद्ध उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष नोरिओ ओगा !
नोरिओ ओगा हे दूरदृष्टीच्या व्यावसायिक नेतृत्वापैकी एक होते. ‘सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणार्या नोरिओ ओगा यांच्या कर्तृत्वाचा आलेख प्रचंड मोठा असला तरी त्यांची चटकन पटणारी ओळख कॉम्पॅक्ट डिस्क- अर्थात ‘सीडी’चा जनक अशी करून देता येईल. आपल्या उद्योगातून तयार होणारे कोणतेही उत्पादन हे मुख्यत: ग्राहकाला सहजतेने हाताळता आले पाहिजे हा ओगा यांचा आग्रह असे आणि या ध्यासातूनच त्यांनी या क्रांतिकारी तबकडीला जन्म दिला होता.
१९५३ साली ‘त्सुशिन क्योगो’ मध्ये आलेले नोरिओ ओगा तेव्हा फाइन आर्ट्स व संगीताचे शिक्षण घेत होते. ऑपेरा सिंगर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. प्रत्यक्षात घडले ते वेगळेच. या तरुणाची ध्वनी व विद्युत अभियांत्रिकीची जाण आपल्याला फायद्याची ठरेल हे सोनीच्या संस्थापकांनी हेरले आणि ओगा हे रीतसर या उद्योगात रुजू झाले. तिशी गाठण्याआधीच ओगा अधिकारपदी पोहोचले. सर्वसाधारणपणे जपानी उद्योगात एवढय़ा अल्प काळात असे पद मिळणे दुर्लभ असते.
१९५८ साली ‘त्सुशिन क्योगो’चे नामकरण ‘सोनी कॉर्पोरेशन’ असे झाले. ही कंपनी जगातील पहिला टेपरेकॉर्डर बनविण्याच्या खटपटीत होती. अल्पावधीतच ते साध्य झाले आणि पुढे वर्षभरात ओगा हे कंपनीच्या टेपरेकॉर्डर विभागाचे सरव्यवस्थापक बनले.
ओगा यांचे स्वप्न त्यापुढचे होते. कॅसेटची एक बाजू वाजवून झाली की ती उलटी करून पुन्हा चालू करावी लागे. संगीत ऐकणार्यांसाठी ही एक ‘कटकट’ होती. एखाद्या गायकाचे गाणे ऐन रंगात आले आहे आणि तेवढ्यात टेप संपल्यामुळे रसभंग झालाय हे चित्र तेव्हा नेहमीचेच. त्यामुळे जास्त काळ, विना-व्यत्यय संगीताचा आस्वाद घेण्यासाठी एखादे नवे साधन शोधून काढता येईल काय, यावर त्यांचे विचारचक्र सुरू झाले.
त्यांचा आवडता संगीतकार बिथोवेन याची नववी सिंफनी ७५ मिनिटांची होती. ही पूर्ण सिंफनी सलग ऐकता येईल अशी १२ सेंटिमीटर व्यासाची कॉम्पॅक्ट डिस्क बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतला.
१९८२ साली सोनीची पहिली सीडी बाजारात आली. अवघ्या पाच वर्षांतच सीडींच्या खपाने लॉंग प्लेईंग (LP) रेकॉर्ड्सना मागे टाकले. सीडीमध्ये सुधारणा होऊन १९९२ मध्ये मिनी डिस्क (एमडी) आली. त्यानंतर सीडीच्याच आकारात अधिक साठा करण्याच्या क्षमतेच्या ‘डीव्हीडी’ तयार होऊ लागल्या.
शिक्षण घेताना त्यांनी ऑपेरा सिंगर होण्याचे स्वप्न बाळगले होते, त्यानुसार स्वत:चा वाद्यवृंद बनवण्याची त्यांची मनीषाही पूर्ण झाली. ‘टोकियो फीलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा’ चे ते प्रमुख होते.
२००० साली निवृत्त झाल्यानंतरही ओरिओ नोगा यांनी सोनीच्या सल्लागारपदाची धुरा अखेपर्यंत सांभाळली. एप्रिल २०११ मध्ये वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि ‘सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणारे एक सक्षम व खंदे नेतृत्व लुप्त झाले.
एखाद्या उद्योगसमूहाची कीर्ती देशाच्या सीमा ओलांडते... जगभर पसरते... खरे तर त्या उद्योगाला लाभलेले कल्पक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व यासाठी कारणीभूत असते हेच खरे !
-- निनाद प्रधान
Copyright © 2025 | Marathisrushti