भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून फिनोलेक्स प्लॅसन लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली. इस्रायलबरोबर उद्योगाची भागीदारी करणारी फिनोलेक्स ही देशातील पहिली कंपनी ठरली.
जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे.
स्कूबी हा कुत्रा आणि त्याला पाळणारे मित्रमंडळ, कोठेही काही चुकीचे घडत असेल तर तेथे पोहोचते पण दांडगटांपुढे आपले काही चालणार नाही असे त्यांना वाटत असतानाच स्कूबीच्या करामतींमुळे, दुष्टांना धडा शिकवला जातो, अशा स्वरूपाची ही मालिका मुळात जॉन केनेडींच्या हत्येनंतर, ‘चित्रवाणी सचेतपटांमध्ये फार हिंसाचार असतो’ या तक्रारीला उत्तर म्हणून सुरू झाली.
२००७ मध्ये त्यांनी आपली सेलिब्रिटी मैनेजमेंट कंपनी ‘Bling’ ची सुरुवात केली. दीपिका पादुकोण पासून फरहान अख्तर पर्यत अनेक सेलिब्रिटी त्याचे क्लाइंट आहेत. २००३ ते २०१२ पर्यत अतुल कसबेकर यांनी किंगफिशर कैलेंडरसाठी फोटो शूट केले.
पूर्वा गोखले. शांत,गोड चेहरा, चेहऱयातील सात्त्विकता, टवटवीतपणा हे तिचे खास वैशिष्टय़.
इतिहासाची वेगळी साक्ष देणाऱया ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत सईबाईची चोख भूमिका साकारणारी, तर ‘कुलवधू’ मालिकेतून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवलेली अन् ‘रिमझिम’, ‘थरार’, ‘भाग्यविधाता’ या मराठी, तर ‘कोई दिल में है’, ‘कहानी घर घर की’ या हिंदी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला आणि ‘स्माईल प्लीज’ या व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकातून रसिक मन जिंकलेला मोहक चेहरा म्हणजे पूर्वा गोखले. अभिनयसंपन्न गुणी कलाकार म्हणून ओळख असलेल्या या गोड चेहऱयाच्या अभिनेत्रीनं आपला वेगळा रसिक वर्ग तयार करण्यात यश मिळवलं आहे.
ठाण्यातल्या होली क्रॉस विद्यालयातून शालेय शिक्षण, तर मुंबईतल्या वझे-केळकर विद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेली पूर्वा खरं तर अभिनय क्षेत्रात पुढे करीअर करील असं कोणालाही वाटलं नव्हतं. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर सीएचं शिक्षण पूर्ण करत असलेल्या पूर्वाला पुढे इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आपण पूर्ण केलेल्या शिक्षणाला धरूनच करीअर करायचं होतं. मात्र तिच्यात दडलेल्या कलेनं तिचा प्रवास वेगळ्या उंचीवर नेला. पूर्वाश्रमीच्या पूर्वा गुप्तेवर अभिनयाचे संस्कार होण्यात तिच्या आईचा मोठा वाटा असल्याचं ती सांगते. आईच्या आग्रहाखातर पूर्वाने शाळा-कॉलेजमध्ये असताना अभिनय केला होता. तसंच आंतरबँकांच्या स्पर्धा, विविध संस्थांनी आयोजित केलेल्या स्पर्धा, सीकेपी संस्थेच्या स्पर्धा या सगळ्या स्पर्धांत पूर्वा नियमित भाग घेत असे.
1999 साली झी मराठीवरील ‘रिमझिम’ या मालिकेतून तिचा अभिनय क्षेत्राचा श्रीगणेशा झाला. मालिकेला मिळालेल्या विशेष यशानंतर तिने छोटय़ा पडद्यावर एकापाठोपाठ एक अशा अनेक मालिकांमध्ये अभिनय सादर करत आपला एक रसिक वर्गच तयार केला. सध्या सुरू असलेल्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत पूर्वाने सईबाईची भूमिका साकारली होती. ऐतिहासिक मालिकेत काम करण्याचा हा पूर्वाचा पहिलाच अनुभव असल्याचं ती सांगते. मात्र तिच्या कलाकृतीतून तिचा हा अभिनय किती सक्षम आहे हे तिने अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिले. पूर्वाने अभिनयाच्या जोरावर घराघरांत प्रवेश मिळवला असला तरीही तिला चेहरा मिळाला तो ‘कुलवधू’ या विशेष लोकप्रिय ठरलेल्या मालिकेमुळे. अनेक तगडय़ा कलाकारांनी समृद्ध असलेल्या या मालिकेत सुबोध भावे या ज्येष्ठ कलाकारासोबत तिने अभिनय केला होता.
मराठी मालिकांची ही शृंखला सुरू असतानाच तिने हिंदी मालिकांतही अभिनय सादर करत आपलं वेगळं अस्तित्वच निर्माण केलं होतं. बालाजी प्रॉडक्शनच्या मालिकांतून पूर्वाला अभिनयाची वेगळी शिदोरी मिळाल्याचे ती सांगते. ‘कोई दिल में है’, ‘कहानी घर घर की’ या हिंदी मालिका तसेच ‘बुंदें’ या हिंदी अल्बममध्ये पूर्वा झळकली अन् तिच्या करीअरचा ग्राफ उंचच उंच गेला. मराठी आणि हिंदी मालिकांच्या जोडीने मधल्या काळात ‘स्माईल प्लीज’ या व्यावसायिक नाटकांतूनही तिने अभिनय सादर केला होता. मराठी रंगभूमी आणि छोटय़ा पडद्यावर अभिनयाचा दांडगा अनुभव पाठीशी असलेल्या पूर्वाने छोटय़ा पडद्यावरील टेलिफिल्ममध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. नृत्यकलेसोबतच तिला ऍरोबिक्सचेही उत्तम ज्ञान असून महाविद्यालयीन काळात पूर्वाने काही काळ ऍरोबिक ट्रेनर म्हणून काम केलं होतं. गुणी अभिनेत्री म्हणून पूर्वा गोखलेचा चेहरा सर्वांनाच परिचयाचा असून ‘मन उधाण वाऱयाचे’ आणि ‘आराधना’ या मालिकांतून पूर्वा पुढे सतत रसिकांना भेटत राहिली.
अनेक मराठी आणि हिंदी मालिकांतून पूर्वा गोखलेचा एक वेगळा चेहरा प्रेक्षकांसमोर आला आहे. याच गुणी अभिनेत्रीचं एक वेगळं फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली. नवरात्रीचे नऊ रंग आणि कलावती यावर आधारित असलेल्या फोटोशूटसंबंधित पूर्वाशी बोलून आम्ही शूटचं सगळं नियोजन केलं. या शूटची गरज लक्षात घेऊन पांढऱया रंगाची साडी अन् त्यावरचा शृंगार लक्षात घेण्यात आला होता. पांढऱया रंगाची साडी, त्यावरील दागिने आणि त्याला अनुसरून मेकअप आणि हेअर हे सारं काही ठरलं आणि पूर्वाचे पारंपरिक वेशभूषेतले काही फोटो मी कॅमेराबद्ध केले, तर त्यानंतर याच पांढऱया रंगाला धरून पूर्वाचे वेस्टर्न आऊटफिटमध्ये काही फोटो टिपायचे असं आम्ही ठरवलं. पांढऱया फ्रेश रंगाच्या या वेस्टर्न आऊटफिटमध्ये ही मार्ंनग ग्लोरी चांगलीच खुलली आणि तिच्या चेहऱयावरचे हेच हसरे भाव कॅमेऱयात बंदिस्त करण्यात मला यश आलं. रॅमरंट लायटिंगच्या जोडीने ब्युटी लायटिंग या प्रकाराची प्रकाश योजना करून हे फोटोशूट पार पडलं होतं. कॉस्च्यूम डिझायनर, ज्वेलरी डिझायनर, फॅशन स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट आणि असिस्टंट अशा तब्बल 19 जणांचा ताफा या छायाचित्रणाच्या वेळी होता.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनादेवी यांनी आपल्या गाण्याची तालीम गिरीजा शंकर चक्रवर्ती यांच्या कडून घेतली. नंतर त्यांनी रामपूर -सहसवास घराण्याचे उस्ताद मुश्ताक हुसेन खान आणि बनारस घराण्याच्या रसूलन बाई यांच्या कडे गाण्याचे शिक्षण घेतले.
मुंबईतल्या अत्यंत गरीब आणि बकाल भागात बालपण घालवल्याने त्यांनी दारिद्र्य आणि ससेहोलपट जवळून पाहिली आणि आपल्या विशिष्ट भाषेतून त्यांनी ते दलितांचं आयुष्य शब्दबद्ध केलं.
दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला.कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा ‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले॰ हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले॰ या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली॰ केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले॰ मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले॰ त्यांनी पृथ्वीची ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी दोन्ही टोके गाठली॰ ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली॰ या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली॰ ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला ! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता.
या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे॰ त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले॰ विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे॰ या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत॰ ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला॰ एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले॰ हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते॰ दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती॰ या Blurb ला प्रा॰ मं॰ वि॰ राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.
२० एप्रिल १९९९ रोजी मा.कमलाबाई ओगले यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- प्रकाश चान्दे
दूरदर्शन सारख्या कौटुंबिक माध्यमाच्या प्रेक्षकांना काय रुचेल, पचेल याचा विचार करून, अनेक कथासंग्रह वाचून, त्यातून निवडलेल्या कथांचं नाटयीकरण, पटकथा-संवादासह स्वत: लिहून काढत बसलेले ते असायचे ते.. दुस-या दिवशी, त्या पटकथेचं कॅमेरा स्क्रिप्ट तयार झालं की मग कथेला साजेशी पात्रयोजना, त्यासाठी संपर्क साधणे वगरे.. तिस-या दिवशी दुपारी वाचन. संध्याकाळी कॅमे-याच्या अंदाजानं हालचालींचं नियोजन.. आणि लगेच पुढल्या दिवशी कलागारांत चित्रीकरण, असा त्यांना घटनाक्रम वर्षानुवर्ष होता.
क्षितीची ‘दामिनी’ आणि ‘वादळवाट’ या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिचा जन्म १ जानेवारी १९८३ रोजी झाला. तसेच तिने ‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा हिंदी मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे. त्याचबरोबर क्षितीने ‘संशय कल्लोळ’, ‘माई’ असे चित्रपटदेखील केले आहेत. तर ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातल्या तिच्या अभिनयाचेही अनेकांनी कौतूक केले. नाटक, मालिका, चित्रपट यांमुळे क्षितीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. जेष्ठ अभिनेते अनंत जोग हे क्षिती जोगचे वडिल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti