(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक संजय लीला भन्साळी

    भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचा माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी विधू विनोद चोप्राचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला.१९९६ साली त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक बनून खामोशी ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. आज बॉलीवूडमध्ये संजय लीला भन्साळी यांचे मोठे नाव आहे. ऐतिहासिक चित्रपट बनविण्यात त्यांचे नाव आघाडीवर घेतले जाते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • लेखिका वसुंधरा साबळे

    वसुंधरा साबळे या शाहीर साबळे यांच्या कन्या आहेत.

  • श्रेष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते

    कर्वे यांच्या साहाय्याने तयार केलेला सुलभ विश्वकोश (१९४९–५१) सहा भागांत प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (२ खंड, १९४२, १९४७) आणि शास्त्रीय परिभाषा कोश (१९४८) ही याच द्वयीने निर्माण केलेली कोशसंपदा होय. दाते यांनी रा. त्र्यं. देशमुख ह्यांच्या सहकार्याने, १८१० ते १९१७ ह्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यांतील लेखांची, तसेच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकारनामांची सूची महाराष्ट्रीय वाङ्‌मयसूची (१९१९) ह्या नावाने तयार केली. शंकर गणेश दाते ह्यांनी तयार केलेल्या प्रसिद्ध ग्रंथसूचीच्या पूर्वी तशा दिशेने झालेला एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणून ही सूची महत्वाची.

  • भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

    त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने ‘हवाईगंधर्व’ ही पदवी बहाल केली होती. भीमसेन जोशी यांनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

  • चार नटसम्राटांची कावेरी – शांता जोग

    २३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणले होते. संस्थेचा सुवर्णमहोत्सवातला हा प्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी; तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती.

    शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. ’शांता जोग करंडक’ हा एका नाट्यस्पर्धेत बालनाट्याला दिला जाणारा पुरस्कार आहे. ’महाराष्ट्र नाट्यवर्धक मंडळा’ने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेनंतर विजयी एकांकिकेस ’शांता जोग स्मृती करंडक’ दिला जातो.

    शांता जोग यांचा जन्म २ मार्च १९२५ रोजी झाला. शांता जोग यांचे १२ सप्टेंबर १९८० रोजी अपघाती निधन झाले.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ:- इंटरनेट

  • भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी

    नीलम संजीव रेड्डी आणीबाणीत पुन्हा सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाले. जनता पक्षातर्फे ते निवडून आले. राष्ट्रपतिपदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रपतिपदाची शान त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून सांभाळली.

  • ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड

    डेव्हिड यांनी एकूण एकशे दहा चित्रपटांत भूमिका केल्या. बूटपॉलिश (१९५४), चुपके चुपके (१९७५), सत्यम् शिवम् सुंदरम् (१९७८), गोलमाल (१९७९), बातों बातों में (१९७९), खूबसूरत (१९८०) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या.

  • पार्श्वगायक किशोरकुमार

    किशोरदाने आपल्या मिश्किल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमिकांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन व संगीताच्या तालावर थिरकणे या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोर नी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली.

  • वऱ्हाड निघालंय लंडनला – डॉ. लक्ष्मण देशपांडे

    प्रा.डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए.,पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या होत्या. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४३ रोजी झाला. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाट्य-चित्रपट कारकीर्द होती. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामुळे डॉ. देशपांडे यांचा प्रेक्षक-श्रोता जगभर होता. एकूण ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमीतकमी प्रभावी हालचाली हे या एकपात्री प्रयोगाचे खास वैशिष्टय़ होते. मराठवाडय़ाच्या ग्रामीण जीवन शैलीशी एकरूप असलेले आणि अस्सल व्यक्तिरेखा असणारा हा प्रयोग केवळ मराठवाडय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विविध देशांतील मराठी नाटय़रसिकांना भावला. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा नोंद घेण्यात आलेले लक्ष्मण देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८० मध्ये झाली. डॉ. देशपांडे यांनी 'वऱ्हाड' लंडन, अमेरिका, कॅनडा, दुबई, मस्कत, ऑस्टेलिया, नायजेरिया, नैरोबी, कतार, कुवेत, थायलंड, सिंगापूर या देशांतही पोहोचवले. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'ने त्यांच्या या कार्याचा १९९६ मध्ये प्रथमत: गौरव केला. आजपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे ३ हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले होते. डॉ. देशपांडे यांनी डॉ. अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री 'नटसम्राट'चे शंभरावर प्रयोग केले. त्यांनी दोन चित्रपटांतही काम केले. स्वेच्छानिवृत्तीनंतर ते परभणीच्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. २००३ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले तर २००४ ला त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शिवाय अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार त्यांना देण्यात आले.

    प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • भजन आणि गझल गायक अनुप जलोटा

    अनुप जलोटा यांनी आकाशवाणी वर कोरस गायक म्हणून करियरला सुरवात केली. मुंबईत आल्यावर त्यांची गाणी हिट झाली आणि त्यांना म्युझिक कंपन्यांकडून गाण्यांची ऑफर मिळाली.