आसाम-ईशान्येचा अशांत परिसर, वहीतल्या नोंदी, करुणेचा कलाम, अलकनंदा, हाकुमी, तांदळा, वर्तमान, कोहम्, एकशे अकरावी दुरुस्ती, राजधर्म, सारी माझीच माणसे, मन्वंतर समूहाकडून स्वतःकडे, सडेतोड, सेंटर पेज तारांगण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
२० नोव्हेंबर २०१० रोजी नागपुरात सुरू झालेल्या भारत वि. न्यूझीलंड या कसोटी सामन्याचे समालोचन ऑल इंडिया रेडिओसाठी इंग्रजीतून सुरेश सरैया यांनी केले तेव्हा त्यांचे कसोटी समालोचनाचे शतक पूर्ण झाले. यापूर्वी त्यांनी दीडशेहून अधिक एदिसांचे (एकदिवसीय सामन्यांचे) समालोचन केलेले आहे, यात चार विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यांचा समावेश आहे. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी समालोचन करण्यास प्रारंभ केला त्याला आता ४० वर्षे उलटून गेली आहेत.
दादासाहेब तोरणे यांनी 'श्री पुंडलिक'ची निर्मिती केली तेव्हा त्यांचे वय होते अवघे बावीस वर्षाचे.
तोरणे कुटुंबिय मूळचे मालवण नजिकच्या कट्टा गावचे. त्या शेजारच्याच सुकळवाड या छोट्याशा गावात १३ एप्रिल १८९० रोजी दादासाहेबांचा जन्म झाला. ते तीन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कट्टा गावात त्यांच्या कुटुंबियांची थोडीफार जमीन आणि राहते घर होते. घरच्या गरिबीमुळे त्यांच्या शाळेची फी भरणे घरच्यांना शक्य नव्हते. म्हणून लहान वयातच दादासाहेबांनी नशीब काढायला मुंबईचा रस्ता धरला. तेथून ते अच्युत कामत यांच्यासोबत कराचीला गेले आणि त्यांनी एका इलेक्ट्रिशनच्या दुकानात नोकरी पत्करली. तेथे सहा महिने उमेदवारी करून ते मुंबईला आले आणि त्यांना ग्रीव्हज कॉटन या प्रसिध्द कंपनीत नोकरी मिळाली. तेथे बढती मिळाल्यानंतर कंपनीने त्यांची बदली कराचीला केली.
काही दिवसातच दादासाहेबांनी बाबूराव पै यांना सोबत घेऊन 'फेमस फिक्चर्स' ही पहिली चित्रपटवितरण संस्था स्थापन केली. 'पाठारे प्रभू ऍमेच्युअर ड्रॅमॅटिक क्लब' या मुंबईतील काही नाट्यरसिक हौशी मंडळींच्या संस्थेने १९०४ साली ऍडव्होकेट कीर्तिकर यांचे 'श्री पुंडलिक' हे नाटक बसविले. पहिल्याच प्रयोगाला १४ वर्षाचे दादासाहेब तोरणे प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. हा प्रयोग पाहून किशोर वयातील दादासाहेब भारून गेले. त्यांनी नाटक मंडळींकडे आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कीर्तिकरांनी स्वतःची 'श्रीपाद नाटक मंडळी' ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या जडणघडणीत तरुण वयातील तोरण्यांनी सक्रीय भाग घेतला आणि आपल्यातील कलागुणांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'श्री पुंडलिक'चे काही प्रयोग झाल्यानंतर 'श्रीपाद नाटक मंडळी'ने दुसरे नाटक करण्याचे ठरवले. भारतातील कलारसिकांना १८९६ पासूनच जगाच्या इतर भागातील चलचित्रणाची चाहूल लागली होती. दादासाहेब तोरणे यांच्या डोक्यातही तो विषय दिवसरात्र घोळत होता.
'श्री पुंडलिक' हे आपल्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास दादासाहेवांनी घेतला. त्यासाठी ते १९०९ पासून हॉलिवूडशी संपर्कात होते. तेथून त्यांनी चित्रपट तयार करण्याविषयीची तांत्रिक माहिती मिळवली आणि खर्चाचा अंदाजही घेतला. दादासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांच्याच नाटक मंडळीत सहभागी असलेल्या ऍडव्होकेट नानासाहेब चित्रे यांनी 'बोर्न अँड शेफर्ड' कंपनीच्या मुंबई कार्यालयातून 'विल्यमसन कायनेमॅटोग्राफ' हा मूव्ही कॅमेरा, त्याला लागणारी फिल्म मिळविली. तसेच जॉन्सन नावाचा एक कॅमेरामनही गाठला.
या कॅमेऱ्यात हालचाली टिपता येत असत. परंतु त्यात आवाजाचे रेकॉर्डींग होत नसे. तोपर्यंत आवाजाच्या रेकॉर्डींगचा शोध लागला नव्हता. म्हणून तोरणे, कीर्तिकर आणि कीर्तिकरांचे एक सहकारी नाडकर्णी या तिघांनी मिळून 'श्री पुंडलिक'चे वेगळे संवादविरहित चित्रणसूत्र (शुटींग स्क्रीप्ट) लिहिले. त्यानंतर त्या स्क्रीप्टनुसार आणि दादासाहेवांच्या दिग्दर्शनाखाली कॅमेरामन जॉन्सन आणि टिपणीस यांनी मुंबईच्या गिरगाव भागातील लॅमिंग्टन रोड, त्रिभुवन रोड आणि गिरगाव बॅक रोड या त्यावेळच्या तुरळक वाहतुक असलेल्या परिसरात शुटींग केले. चित्रपटात स्वतः दादासाहेब, टिपणीस आणि जोशी यांनीही भूमिका केल्या होत्या. शुटींग केलेली फिल्म प्रक्रियेसाठी जहाजाने लंडनला पाठविली गेली आणि तिची डेव्हलप केलेली प्रिंट जहाजानेच परत मुंबईला आणली गेली. असा हा मूळ मराठी नाटकावरून वेगळी चित्रणकथा लिहून केलेला पहिला भारतीय चित्रपट 'श्री पुंडलिक', सँडहर्स्ट रोड, गिरगाव येथील 'कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ' या नानासाहेब चित्रे आणि पुरुषोत्तम राजाराम टिपणीस अशा मराठी माणसाच्या मालकीच्या सिनेमागृहात १८ मे १९१२ ला रुपेरी पडद्यावर झळकला. हा चित्रपट चांगला दोन आठवडे चालला आणि विशेष म्हणजे 'टाईम्स ऑफ इंडिया'ने त्याची चांगली नोंदही घेतली होती. 'टाईम्स ऑफ इंडिया'चे ते जुने अंक पाहून सुप्रसिध्द सिनेलेखक फिरोझ रंगूनवाला यांनी १९६३ साली या साऱ्या इतिहासाची उजळणी केली होती. मात्र भारत सरकारने तिची दखल घेतली नाही.
'श्री पुंडलिक' चित्रपट निघाला त्या काळात सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे सेन्सॉरचे सर्टिफिकेट घेण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित त्यामुळे भारत सरकारच्या दप्तरी या पहिल्या भारतीय चित्रपटाची नोंद झाली नसावी. रंगूनवाला यांच्यापूर्वी सिनेपत्रकार हनीफ शकूर यांनी १९५३ साली सिनेसाप्ताहिक 'स्क्रीन'साठी खुद्द दादासाहेबांकडूनच एक लेख लिहून घेतला होता. सिनेपत्रकार शशिकांत किणीवर यांनीही 'भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे' हे पुस्तक जानेवारी २००७ मध्ये प्रसिध्द केले आहे.
'श्री पुंडलिक'च्या निर्मितीनंतर दादासाहेबांनी चित्रपट दिग्दर्शनाशिवाय, प्रक्षेपण, चित्रपट निर्मिती कंपनीचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, ध्वनिमुद्रण, वितरण व्यवस्था, नव्या स्टुडिओची पध्दतशीर उभारणी असे बहुविध नवे क्षेत्र पूर्णपणे आत्मसात केले. दरम्यान, १९२७ साली हॉलिवूडमध्ये 'जॅझ सिंगर' या पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. त्यापासून स्फूर्ती घेत दादासाहेबांनी ध्वनिमुद्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री पुरविणारी 'मुव्ही कॅमेरा कंपनी' ही स्वतःची कंपनी स्थापन केली आणि हॉलिवूडमधून ऑडिओकेमिक्स हे ध्वनिमुद्रणाचे यंत्र मागवले. त्याचा उपयोग १९३१ साली आर्देशिर इराणी यांच्या 'आलमआरा' या पहिल्या हिंदी तसेच पहिल्या भारतीय बोलपटाच्या निर्मितीसाठी दादासाहेबांच्या तांत्रिक सहाय्याने केला गेला. त्याच वर्षी दादासाहेबांनी 'सरस्वती सिनेटोन' ही स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली आणि पुढच्याच वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांचे दिग्दर्शन आणि नानासाहेब सरपोतदार यांचे संपादन लाभलेला 'शामसुंदर' हा मराठी तसेच हिंदीतील बोलपट काढला.
मराठी 'शामसुंदर' मुंबईच्या 'वेस्ट ऍन्ड' (आताचा 'नाझ') मध्ये सत्तावीस आठवडे चालला. रौप्य महोत्सव साजरा करणारासुध्दा हाच पहिला भारतीय बोलपट! त्यात कृष्णाच्या भूमिकेत बालनट शाहू मोडक आणि राधाच्या भूमिकेत शांता आपटे अशी पात्रयोजना होती. त्याच वर्षी कोल्हापूर येथील 'प्रभात स्टुडिओ'चे 'अयोध्येचा राजा' आणि 'अग्निकंकण' हे दोन्ही बोलपट मराठी व हिंदीतून प्रसारित झाले.
दादासाहेबांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, लोककथेवर आधारित अशा पंचवीस चित्रपटांच्या (मूकपट आणि बोलपट) निर्मितीनंतर १९४२ साली स्वतःची चित्रपट निर्मिती थांबविली. ते पुढेही चित्रपटक्षेत्रात आणखी मोलाचे कार्य करू शकले असते. परंतु त्यांनी ज्याला विश्वासाने आपला स्टुडिओ भाड्याने दिला त्या भाडेकरूने खोट्या कागदपत्रावर स्टुडिओ गहाण ठेऊन पाकिस्तानात पलायन केले. या विश्वासघाताचा धक्का जबरदस्त आणि असह्य होता.
दादासाहेब तोरणे यांचे १९ जानेवारी १९६० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बिल लॉरी हे भक्कम आणि अतिशय चिवट फलंदाज होते. रॉबर्ट ‘बॉबी’ सिम्पसन आणि बिल लॉरी या सलामीच्या जोडीने एक काळ गाजवला. लॉरी नंतर कर्णधार झाले.
आनंद बक्षी यांनी लिहीलेली गाणी आजून ही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. त्यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी झाला.आनंद बक्षी, हे अभ्यासू, परिश्रम घेणारे गीतकार ओळखले जात होते. भगवानदादांची भूमिका असलेला 'भला आदमी' हा चित्रपटापासून गीते लिहण्यास सुरवात केली. हा चित्रपट १९५८ मध्ये प्रदर्शित झाला मात्र त्यापूर्वीच 'शेर-ए-बगदाद आणि 'सिल्व्हर किंग' हे त्यांचे चित्रपट झळकले. शैलेंद्रसारख्या दिग्गज गीतकाराने अनेक निर्मात्यांकडे बक्षी यांच्यासाठी शब्द टाकला तर साहिरसारख्या प्रतिभावंताने बक्षींना वेळोवेळी मार्गदर्शन केले. 'पारसमणी' आणि 'दोस्ती'च्या गाण्यांनी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवणाऱ्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीसह 'मि. एक्स इन बॉम्बे' या चित्रपटासाठी गीते लिहिण्याची संधी आनंद बक्षी यांना मिळाली. यातील 'मेरे मेहबूब कयामत होगी' आणि 'खूबसूरत हसीना' ही गाणी लोकप्रिय झाली. यानंतर 'हिमालय की गोद में' आणि 'जब जब फूल खिले' या कल्याणजी-आनंदजी यांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपटांतील बक्षींनी लिहिलेली गाणी कमालीची गाजली. आशय गर्भ, हलकीफुलकी शब्दकळा, प्रेमगीत, विरहगीत, भजन, कव्वाली, थीम साँग, क्लब डान्स.. सर्व प्रकारची गाणी झटपट लिहून देणारा गीतकार म्हणजे आनंद बक्षी असे समीकरण रूढ झाले! लक्ष्मी-प्यारे यांच्यासोबत त्यांची भट्टी जमली. या जोडीने 'मिलन, आसरा, लुटेरा, आए दिन बहार के, फर्ज, तकदीर, अंजाना, आया सावन झुम के, जीने की राह, जिगरी दोस्त' असे एकापेक्षा एक सुरेल चित्रपट देऊन ६० च्या दशकाची अखेर गाजवली. १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आराधना'ने घडवलेला इतिहास सर्वज्ञात आहे. या प्रतिभावान कवी-गीतकाराची सारी वैशिष्टय़े 'अमर प्रेम'मधील 'चिंगारी कोई भडके', 'कूछ तो लोग कहेंगे', 'ये क्या हुआ', 'रैना बिती जाए', 'बडा नटखट है रे', 'डोली मे बिठाके' या गाण्यांमध्ये होती. लक्ष्मी-प्यारेसोबत त्यांनी ३०२ तर पंचम सोबत ९९ चित्रपट केले. राज कपूर, शक्ति सामंता, मनमोहन देसाई, यश चोप्रा, राज खोसला, सुभाष घई या आघाडीच्या निर्माता-दिग्दर्शकांनी बक्षींकडून शेकडो गाणी लिहून घेतली. आर.के ने 'बॉबी'च्या गाण्यांसाठी स्वत: बक्षी यांच्या घरी जाऊन त्यांना करारबद्ध केले. १९७० चे दशकही बक्षींचेच होते. 'आन मिलो सजना, गीत, हमजोली, कटी पतंग, खिलौना, द ट्रेन, दुश्मन, हरे राम हरे कृष्ण, हाथी मेरे साथी, अपना देश, नमक हराम, शोले, ज्यूली, सरगम' 'कर्ज, एक दुजे के लिये, हीरो, आशा, रॉकी, बेताब, लव्ह स्टोरी, अलग अलग..' या चित्रपटांद्वारे १९८०च्या दशकातही बक्षी आघाडीवर राहिले. तरुण पिढी ला आवडणारी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'दिल तो पागल है', 'ताल', 'मोहब्बते', 'गदर' या चित्रपटांतील गाणी मा.आनंद बक्षी यांनी लिहलेली आहेत. नवीन पिढीतील संगीतकारांशीही त्यांचे सूर जुळले होते आनंद बक्षी यांनी साडेतीन हजार च्या वर गाणी लिहली. गीतकारासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी पाच वेळा पटकावला तर याच पुरस्कारासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ४० नामांकने त्यांना लाभली. मा.आनंद बक्षी यांचे ३० मार्च २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आनंद बक्षी यांची काही गाणी.
आनेसे उसके आई बहार.
मेरे दिवाने भी दवा नही.
अच्छा तो हम चलते है.
चुपके से दिल दे.
दिल क्या करे.
हम तुम एक कमेरे मे बंद हो.
चिंगारी कोई धडके.
आज मोसम बडा.
मै शायर तो नही.
दो मसताने.
https://youtu.be/O10DveYR4TE
https://youtu.be/mXkHKmuSf1Q
लहुजींनी महात्मा फुले यांच्या दलित घरात सर्वतोपरी सहकार्य केले. म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (१८४८). लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्ध झाला (१८५५). तो पुढे ना. वि. जोशीकृत पुणे वर्णन (पुरवणी अंक २) यात छापण्यात आला.
असे हे आमचे गोविंद काका. बाबांना दिलेल्या शपथेला ध्यानात ठेऊन गोविंदकाकांचे कार्य आजही अविरत सुरु आहे. म्हणूनच लोक बिरादरीच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्याला म्हणजेच आमच्या गोविंदकाकांना ‘बिरादरी’ चा सलाम!!
दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. त्यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱयांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही कलात्मक असायची. मा.बिमल रॉय यांच्या चित्रपटात संवेदनशील नातेसंबंध आणि समाजातील उपेक्षित वर्गांचे चित्रण असायचे. मा.बिमल रॉय यांनी एक तरुण फिल्ममेकर म्हणून त्याकाळी अनेकांना प्रेरणा दिली. गुलजार यांना मा.बिमल रॉय यांनी त्यांच्या "बंदिनी' या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांनी लिहिलेले "मोरा गोरा अंग लै ले..' हे नूतन यांच्यावर चित्रित झालेले गाणे सुपरहिट ठरले. बिमल रॉय स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.बलराज सहानी यांची दो बिघा जमींन बद्दल एक आठवण सांगितली जाते.
बलराज सहानी हे त्या काळातले एक उच्चविद्याभूषित होते. कलकत्त्यात ते तेव्हा प्राध्यापकी करत. इंग्लंडवरून शिकून आल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व हे साहेबी होतं. बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं त्यांना कळल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले व आपल्याला या चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतक-याचं, एका रिक्षावाल्याचं होतं. बलराज सहानी यांना सुटाबुटात पाहून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज सहानी यांनाही आपली चूक कळून आली. त्यानंतर या भूमिकेसाठीच्या पोषाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका-मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचाही सराव केला. या सा-या गोष्टीचा अभ्यास करून मग ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. त्यांना त्या लुकमध्ये पाहिल्यावर मग बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देऊ केली. कलाकाराच्या प्रभावापुढे न झुकणारे असे ते दिग्दर्शक व आपल्या दिग्दर्शकाच्या समाधानासाठी प्रचंड कष्ट घेणारे ते कलाकार आता सापडणं मुश्कीलच.
बिमल रॉय हे त्या काळातले एकमेव असे दिग्दर्शक होते ज्यांच्या घरी दिलीप कुमार स्वत: कथा ऐकायला येत असे. एरवी सर्वच दिग्दर्शकांना दिलीप कुमार आपल्या घरी बोलावत अस्त. बिमल रॉय यांनी मात्र कधीही फोन केला तर ते लागलीच त्यांच्या घरी येत असत. दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वात प्रभावी व्यक्तिरेखा म्हणजे देवदास हा चित्रपट होय असे दिलीप कुमार स्वत:च म्हणत आहे. भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ अशी अनेक चित्ररत्ने रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात. बिमल रॉय यांचे ८ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बिमल रॉय यांच्या काही कलाकृतीची माहिती :
दो बिघा जमींन
साल:- १९५३ या चित्रपटाची प्रेरणा त्यांना बायसिकल थिव्ह्स या चित्रपटावरून आली होती. एक अल्पभूधारक असा शेतकरी, त्याच्याकडे केवळ दोन बिघा जमीन असते. या गावात त्याला अनेक संकटांचा सामन करावा लागतो. याच गावातला एक सावकार एका मिल मालकाबरोबर मिळून या गावात एक मिल बनवण्यासाठी जमीन मिळवून देण्याचं कारस्थान करतो. त्याचाही त्रास या शेतक-याला होतो. या शेतक-याला आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरात यावं लागतं.
त्यानंतर त्याच्या आयुष्यात काय होतं. त्याच्या जमिनीचं काय होतं? याची कथा या चित्रपटातून पाहायला मिळते. बलराज सहानी व निरुपा रॉय यांच्या अभिनयासाठीही हा चित्रपट आठवणीत आहे. अगदी साधेपणाने कथा सांगण्याचं बिमलदांचं कौशल्यही या चित्रपटातून पाहायला मिळतं. त्या काळात या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते.
देवदास
साल:-१९५५
शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या देवदास या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती बिमल रॉय यांनी केली. आपल्या लहानपणीच्या प्रेमासाठी नंतर दारूच्या आहारी गेलेल्या व स्वत:च्या जीवनाचा नाश केलेला नायक या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.
दिलीप कुमार, वैजंयती माला व सुचित्रा सेन यांच्या विलक्षण अभिनयासाठीही हा चित्रपट ओळखला जातो. एक ठाकूर आपल्या जीवनाचं कशा प्रकारे पतन करून घेतो हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असलं तरी समाज व व्यक्तिस्वातंत्र्य या महत्त्वाच्या गोष्टीकडेही हा चित्रपट लक्ष वेधतो. आपल्या विलक्षण शैलीच्या जोरावर बिलदांच्या या चित्रपटालाही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. याच चित्रपटाचा रिमेक नंतर शाहरुख खान याला घेऊन संजय लीला भन्साली यांनी केला होता.
मधुमती
साल:-१९५८
या चित्रपटात एका पुनर्जन्मावरच्या प्रेमावरची कथा सांगण्यात आली होती. एका निर्जन जागी गेलेल्या एका इंजिनीअरला आपल्या पुनर्जन्माच्या प्रेमाची कथा आठवते व त्यानंतर त्यांच्या जीवनात काय काय उलथापालथी होतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.
फ्लॅशबॅक व वर्तमानाचा सुरेख वापर करून मांडण्यात आलेली ही कथा लोकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाबरोबरच या चित्रपटातली गाणीही गाजली. तब्बल बारा गाण्यांचा या चित्रपटात समावेश होता. ही गाणी आजही तितकीच अवीट गोडीची आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी व पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. शाहरुख खानने नंतर याच चित्रपटावर आधारित ओम शांती ओम या चित्रपटाची निर्मिती केली होती. तोही प्रचंड यशस्वी ठरला होता.
सुजाता
साल:-१९५९
जातीप्रथेच्या संदर्भात अनेक माध्यमातून चर्चा होत असते. असे असले तरी भारतात ती एक मोठी समस्या आहे. याच विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती बिमलदांनी केली होती. एका ब्राह्मण मुलाचे दुस-या जातीतल्या मुलीशी प्रेम होते. त्यानंतर समाज त्यांच्या या प्रेमाकडे कसा पाहतो. त्यांच्यापुढे कोण कोणती आव्हानं येतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. या चित्रपटातल्या नूतन यांच्या जबरदस्त अशा अभिनयामुळेही हा चित्रपट गाजला होता.
बंदिनी
सर्वसामान्य भारतीय स्त्रीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात दिल्या गेलेल्या योगदानाची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नूतन यांचा दमदार अभिनय लोकांपुढे आला. अशोक कुमार व त्या वेळी नवोदित असलेल्या धर्मेद्र यानेही यात चांगली भूमिका केली होती. संपूर्णपणे स्त्रीप्रधान असलेला हा चित्रपट त्या काळातला एक क्रांतिकारी चित्रपट म्हणून गणला गेला. या चित्रपटानेही प्रचंड यश मिळवले. बिमलदा यांचे चित्रपट पाहून त्याकाळी भारतीय चित्रपटांची उंची किती होती हे दाखवणारे आहेत. आज जागतिक सिनेमाचं कौतुक करणाऱ्यांनाही हे चित्रपट आपलेसे वाटतील यात शंका नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पं.विभव नागेशकरांनी श्रीमती झरीन दारुवाला शर्मा, पं. डी. के. दातार, श्री.रोहिणी भाटे, पं. बुद्धादित्य मुखर्जी, पं. शिवकुमार शर्मा, पं.जसराज, पं. भिमसेन जोशी, पं.विश्वमोहन भट, प.हरीप्रसाद चौरसिया यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ दिली आणि संगीतक्षेत्रात श्रोत्यांच्या मनात नाव कमाविले. त्यांनी प्रतिष्ठीत अशा श्रीमती गिरीजाबाई केळकर समारोह (फोंडा, गोवा), केसरबाई केरकर महोत्सव (भोपाळ), उ.अल्लादिया खान स्मृती दिन समारोह(चेंबुर), पंडीत ओंकारनाथ फेस्टिवल (जामनगर), लक्ष्मीबाई जाधव समारोह (चेंबुर) स्वरानंद (दहीसर-मुंबई), पेशकर फाऊंडेशन (मुंबई),सप्तक (नाशीक) अनेक कार्यक्रमात तबला वादन केले आहे.
दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी झाला. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवलं. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला.
१९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे मा.दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’ मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छोडो छोडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. नाट्यगीतांप्रमाणे शास्त्रोक्त संगीतही मा.दीनानाथ उत्तम प्रकारे, स्वतःच्या स्वतंत्र व कल्पक वळणाने गात असत. त्यांनी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग प्रथम आणला, असे मानले जाते. त्यांनी मैफली गाजवल्या, संगीत समारोहांत स्वतःचे स्थान सिद्ध केले. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून निराळे. सुंदर गाणे रसिकांना ऐकवले. मा.रामकृष्णबुवा वझे ह्यांचे ते गंडाबंद शागीर्द होत; तथापि इतर अनेकांची गायकी आत्मसात करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली घडवली. श्रीमत् शंकराचार्यांनी दीनानाथांना ‘संगीत रत्न’ म्हणून गौरवले. सारंगीवादन, कथ्थक नृत्य, संस्कृत साहित्य, शिकार हे त्यांचे आवडते छंद होते. १९३४ मध्ये ’बलवंत पिक्चर कॉर्पोरेशन’ काढून त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.
कृष्णार्जुन युद्ध हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी अर्जुनाची भूमिका केली. त्यांची ‘सुहास्य तुझे मनासि मोही’ यासारखी या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर ही दीनानाथ व त्यांच्या द्वितीय पत्नी श्रीमती (ऊर्फ माई) यांची अपत्ये होत. या सर्वांच्या गळ्यात ‘दीनानाथांचा सूर’ आहे. दीनानाथांना श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले. दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. १९२२ साली इंदूर असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता. दीनानाथांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा व ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग-स्वर कसे तेच आहेत वगैरे छाननी त्यांनी या ग्रंथात केली होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झाले. प्रसिद्ध क्रिकेटपटू सी. के. नायडू हे मास्टर दीनानाथांचे खास मित्र. मास्टर दीनानाथ हे सी. के. नायडू यांची क्रिकेटची मॅच बघायला यायचे, तर नायडू हे मास्टर दीनानाथांची नाटके पाहायला येत. मा. मास्टर दीनानाथ यांचे २४ एप्रिल १९४२ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा. मास्टर दीनानाथ यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti