त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे संकलन केले होते व एक उत्कृष्ट संकलक म्हणून नावलौकिक मिळविला होता. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक दादा कोंडके, कमलाकर तोरणे, अण्णासाहेब देऊळगावकर, जब्बार पडेल, महेश कोठारे आदींच्या चित्रपटांचे संकलन वैद्य यांनी केले होते.
१९४४ मध्ये राजेन्द्र कृष्ण पटकथा लेखक गीतकार होण्यासाठी मुंबईत आले. त्यांचा जन्म ६ जून १९१९ रोजी झाला. गीतकार म्हणून पहिला चित्रपट १९४७ सालचा जंजीर चित्रपट होता. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर, कृष्णन गाणे सुनो सुनो हो दुनीयावालो बापू की ये अमर कहानी लिहिले. गाणे मोहम्मद रफी यांनी गायले होते.
राजेंद्र कृष्ण यांना तामिळ सह अनेक भाषा येत होत्या, त्यांनी एव्हीएम स्टुडिओ साठी १८ चित्रपटांसाठी स्क्रिप्ट लिहिले. राजेंद्र कृष्ण यांनी सी.रामचंद्र, शंकर-जयकिशन, मदन मोहन, हेमंत कुमार, सज्जाद हुसेन, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन, एस मोहिंदर, चित्रगुप्त यांच्यासह अनेक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले.
राजेंद्र कृष्ण हे हिंदी सिनेमातील सर्वात श्रीमंत कवी, लेखक मानले जातात. कारण त्यांनी घोड्यांच्या शर्यतीत सेहचाळीस लाख रुपयाचा जॅकपॉट जिंकला होता. की जी सत्तरच्या दशकातील दरम्यान एक प्रचंड रक्कम मानली जात होती. मा. राजेंद्र कृष्ण यांचे २३ सप्टेंबर १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकी पिडीया
राजेंद्र कृष्ण यांची काही गाणी.
आजकी मुलाकात बस इतना
यु हसरतो के दाग
तुम्ही मेरे मंदीर
आसु समझ के
कौन आये मेरे मन के द्वारे.
४० वर्षाच्या कारकिर्दीत त्याच्या नावावर ११ गिनीज रेकॉर्ड आहेत आणि २१ एमी अवॉर्ड्स. २०१५ च्या फोर्ब्सच्या यादीत सर्वात श्रीमंत सेलेब्रेटी म्ह्णून नाव होते. त्याचे १२ महिन्याचे उत्पन्न होते ६३ मिलियन डॉलर .
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. माधव जूलियन मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. मा.माधव जूलियन हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते.
गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले.
सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती. २९ नोव्हेंबर १९३९ रोजी माधव ज्युलियन यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ विकिपीडीया
ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेले थॉमस त्यांच्या आयुष्याची शेवटची पंचावन्न वर्षे भारतातच राहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केलेल्या थॉमस कँडी यांनी भावाच्या मदतीने कॅप्टन मोल्सवर्थचे अर्धवट राहिलेले इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे काम पूर्ण केले.
अमजद खान, अमरीश पुरी यांच्यानंतर चे सर्वात खतरनाक वाटणारे हिंदी - मराठी चित्रपटातील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांना आपल्या वडिलांचा व्यवसाय असतानाही, मात्र शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचा जन्म ११ मे १९५० रोजी अहमदनगर येथे झाला. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात नाट्य स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता. "हॅंडस् अप', हे त्यांचे अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे यांच्या समवेतचे पहिले व्यावसायिक नाटक रंगमंचावर आले आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. या नाटकातल्या यशानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. याच नाटकातली त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक आणि निर्माते गोविंद निहलानी यांनी त्यांना "अर्धसत्य' या चित्रपटात ओम पुरी यांच्या समवेत भूमिका दिली होती. या चित्रपटातली त्यांनी केलेली बेरक्या आणि धूर्त, कटकारस्थानी "रामा शेट्टी'ची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या समर्थ अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडले.
१९९१ मध्ये "सडक' या चित्रपटात त्यांनी तृतीय पंथियाची केलेली भूमिका गाजली होती. याच भूमिकेबद्दल त्यांना "फिल्मफेअर' पुरस्कारही मिळाला होता. रंगभूमीवरच्या नाटकात त्यांना भूमिका करणे विशेष आवडत असले, तरीही चित्रपटाच्या व्यवसायात गर्क झाल्यामुळे, पुढे त्यांना मोजक्याच नाटकात भूमिका करता आल्या. सदाशिव अमरापूरकर म्हणजे दुष्ट खलनायक असा शिक्का त्यांच्यावर बसला. पुराना मंदिर, नासूर, मुद्दत, विरू दादा, जवानी, फरिश्ते, या चित्रपटातल्या त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. अभिनेता धर्मेंद्र यांच्याबरोबर त्यांनी हुकूमत या चित्रपटात पहिला खलनायक रंगवला होता. त्यानंतर त्यांनी याच अभिनेत्याबरोबर अनेक चित्रपटात खलनायकाच्या हुकमी भूमिका केल्या. विविध प्रकारच्या खलनायकाच्या भूमिका रंगवणाऱ्या अमरापूरकर यांनी स्वत:ला त्याच चौकटीत अडकवून मात्र घेतले नाही. उत्तम चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, असा लौकिकही त्यांनी मिळवला.
हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, ओरिया यासह अन्य भाषातल्या ३०० च्या वर चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘अर्धसत्य’, ‘सडक’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कारही त्यांनी प्राप्त केले होते. अहमदनगरच्या स्नेहालय, लोकशाही प्रबोधन व्यासपीठ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सामाजिक कृतज्ञता निधी, अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यासह अनेक संस्थात ते सक्रिय होते. या संस्थांना त्यांनी आर्थिक मदतही केली होती. मा.सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
जगजीत सिंह यांच्या वडिलांनी त्यांचे गायनातील गुण हेरून त्यांना पं. छगनलाल शर्मा यांच्याकडे पाठविले. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला. त्यांच्याकडे गायनाचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर उस्ताद जमाल खान यांच्याकडे सहा वर्षे खयाल, ठुमरी आणि द्रुपद हे गायनप्रकार पक्के करून घेतले. त्यांनी केवळ गझल गायनाबरोबरच शास्त्रीय संगीत, भक्तीसंगीत आणि लोकसंगीतातही मौलिक योगदान दिले आहे. १९७० मध्ये चित्रा यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्यावर ७० ते ८० च्या दशकात या दांपत्याने गझलविश्वामत प्रचंड प्रसिद्धी मिळविली होती. या दशकात या दांपत्याच्या गझला घराघरात पोहोचल्या होत्या. हृदयाला भिडणार्याो गझला ही त्यांची खाशियत होती. त्यांच्या पत्नी चित्रा सिंग या सुद्धा प्रसिद्ध गझल गायक होत्या. त्यांनी पत्नी चित्रा सिंग हिच्यासह मैफिली सादर करून गझल रसिकांच्या हृदयात जागा मिळविली होती. १९७६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘अनफरगेटेबल’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजतागायत त्यांच्या नावावर ‘आईना’, ‘चिराग’, ‘कहकशॉं’ असे जवळपास ८० अल्बम आहेत. मेहंदी हसन, नूर जहॉं, बेगम अख्तर आणि तलत महमूद या गझलांच्या चमचमत्या दुनियेत ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने है’, ‘ओठोंसे छू लो तुम’ अशी अविस्मरणीय गझलांनी जगजीत सिंह यांनी आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले. त्यानंतर ‘अर्थ’, ‘प्रेमगीत’, ‘सरफरोश’, ‘तरकीब’ अशा अनेक चित्रपटांनाही त्यांनी आवाज दिला होता. प्रसिद्ध कवी गुलजार यांच्या काव्यांना मिर्झा गालिब यांच्या ढंगात पेश करत अक्षरश: तेव्हाच्या पिढीला वेड लावले. गजल आणि शायरीचा जनक मिर्झा गालिब सर्वसामान्यांच्या घराघरात मनामनात पोहोचवला. दुसरा महत्त्वपूर्ण अल्बम म्हणजे ‘संवेदना’ माजी पंतप्रधान अटलजींच्या शब्दांना स्वरसाज. शब्दांनाही मंत्राचे सामर्थ्य बहाल करण्याची ताकद लाभलेले कवि अटलबिहारी वाजपेयी यांच्या लेखणीतून साकारलेल्या शब्दांना जगजित सिंग यांनी गेय रूप दिले. मुळात अटलजींच्या कविता गेय रूपात आणणे अवघड काम, पण ते जगजित सिंग यांनी लिलया पेलले. अटलजींचे शब्द, जगजित सिंग यांचा आवाज अमिताभ आणि गुलजार यांच्या दमदार प्रस्तावना अशा सुरेल संगमातून एक अजरामर काव्य रसिकांना अस्वादता आले. ‘क्या खोया क्या पाया’ हे त्यातील गीत रसिकांना खूपच भावले. त्यांनी केवळ उर्दू आणि हिंदी भाषांतच गझला गायिल्या नाहीत तर पंजाबी, बंगाली, गुजराती, सिंधी आणि नेपाळी भाषांतूनही गाणी गायिली आहेत. जगजित सिंह यांच्या मेरी जिंदगी किसी और की..., मेरा नाम का कोई और है..., होशवालों को खबर क्या... अशा गझल खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी सरफरोश, तरकीब या हिंदी चित्रपटांमध्ये गझल गायली होती. भारत सरकारने त्यांच्या या सांस्कृतिक योगदानाची दखल घेऊन २००३ मध्ये त्यांना पद्मभूषण किताबाने गौरवांकित केले होते.
जगजित सिंह यांचे १० ऑक्टोबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. हजारच्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तारलेलं आहे. अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते. अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यांची उलाढाल करतोय.
सुरेश वाडकर यांना लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५५ रोजी झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, तसेच ‘पतियाळा’ घराण्याची तालीम घेतली. त्यांनी पार्श्वनाथ डिग्रजकर यांच्याकडून ही प्राथमिक गायनाचे शिक्षण व सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले.
१९७६ साली सूर-सिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्या मधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. १९७६ नंतर सुरेश वाडकर यांनी चित्रपटांमध्ये गायला सुरुवात केली होती. त्यानंतर जयदेवांनी चाली बांधलेल्या गमन या हिंदी चित्रपटातील सीनेमें जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले.
‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. प्रेमरोग, सदमा या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने मराठी व अनेक हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. सुरेश वाडकर यांची पत्नी पद्मा वाडकर याही गायिका आहेत. या दोघांनीही गायकीच्या जगात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केले आहे. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात. सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार किळाले आहेत.
कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणा-या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही सुरेश वाडकर यांना मिळाला आहे. तसेच २०१९ मध्ये सुरेश वाडकर यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
सुरेश वाडकर यांनी गायलेली काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=-KTx-FJE3Y0
https://www.youtube.com/watch?v=2JXDLvxIF0Q
https://www.youtube.com/watch?v=2JXDLvxIF0Q
https://www.youtube.com/watch?v=_hfck-AakUg
सुरेश वाडकर यांनी गायलेली काही मराठी गाणी
https://www.youtube.com/watch?v=7H4CU8vHuys
https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE
गोविंदराव टेंबे अगदी बालवयातच ते संगीताकडे आकर्षित झाले. ते बहुतांशी स्व:शिक्षित पेटी वादक होते. गोविंदराव देवल क्लबला स्व:ताच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जडणघडणीचे श्रेय देत असत. त्यांचा जन्म ५ जून १८८१ रोजी कोल्हापूर येथे झाला. गोविंदरावांनी भास्करबुवा बखले यांच्याकडून कला आत्मसात केली. जयपूर घराण्याचे अल्लादिया ख़ाँ यांच्याकडून वास्तविक त्यांनी कधीच शिक्षा घेतली नाही पण तरीही गोविंदराव ख़ाँसाहेबांना आपला गुरु मानत. गोविंदराव भास्करबुवा बखले यांना साथ द्यायचे आणि बहुतांशी पेटीचा एकपात्री प्रयोग ही करायचे. गोविंदरावांनी संगीत दिलेल्या संगीत मानापमान नाटकातील पदे आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटालासुद्धा संगीत दिले. काही वर्षांनी त्यांनी स्वत:ची शिवराज नाटक मंडळी सुरु केली. त्यांनी स्वत: नाटके आणि त्यातील पदे लिहिली. मा.गोविंदराव टेंबे उत्कृष्ठ टेनिसपटु होते व त्यानी सर्कसचे मॅनेजर म्हणूनहि काम केले होते! त्यानी बावीस श्रुति वाजवता येतील अशी पेटीहि बनवली होती. ’पटवर्धन’ हे त्यांच्या एका नाटकाचे नाव. त्यातील ’तारिणी नववसनधारिणी’ हे पद अजूनहि लोकप्रिय आहे. चंद्रिका हि जणू, शूर मी वंदिले सारख्या उत्तमोत्तम गाण्यांना त्यांनी संगीत दिले. ना.सी. फडके यांनी तर त्यांना मराठी नाट्यसंगीताचा शिल्पकार म्हटले होते. बालगंधर्व मा.गोविंदराव टेंबे यांना गुरु मानायचे. गोविंदरावांनी ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटात हरिश्चन्द्राची भूमिका केली होती. गोविंदराव टेंबे यांनी खूप लिखाण केले होते. माझा संगीत व्यासंग हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतील एक उत्कृष्ठ पुस्तक आहे. ‘माझा जीवन विहार’ या आपल्या पुस्तकात गोविंदराव टेंबे यांनी आपल्या आयुष्याचा आढावा पुढील शब्दात घेतलेला आहे.
” मी आज यावेळी माझ्या आयुष्याचा आढावा घेत असतांना मला असे दिसून येत आहे की लाभ, हानि, सुख, दुःख, यशापयश इत्यादी महत्वाच्या प्रसंगापासून तो नित्याच्या क्षुल्लक गोष्टीपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाच्या शैल शिखरावरून मी निराशेच्या खोल गर्तेत आदळायचे आणि अचानक तेथून पुन्हा मला कोणीतरी अज्ञात शक्तीने शिखरावर आणून बसवायचे, अशा सतत अनुभवांमुळे बुद्धीच्या टोचणीविरुद्ध देखील माझा परमेश्वरावरील विश्वास अढळ राहिला आहे. आचारात मी नास्तिकातला नास्तिक आहे आणि विचारामध्ये भावी पिढीच्याही पुढे आहे. मात्र पुरातन आचार विचारांना केवळ पुरातन म्हणून लाथाडायचे ही माझी वृत्ती नाही. परमेश्वर आहे की नाही, या विषयीची मी पंचाईत करत नाही. पण तो मजेने मला खाली पाडतो, माझी धडपड पाहतो आणि मी हताश झाल्यावर कारुण्याच्या एका कटाक्षाने मला वर काढतो ही एकच भावना माझ्यात दृढमूल झालेली आहे, आणि कोणत्याही कारणाने ती मुळातून यत्किंचितही सुटलेली नाही. अर्थात या विश्वासामुळे मी कोणत्याच गोष्टीचा विधीनिषेध मानीत आलो नाही. जे जे प्राप्त होईल ते ते भोगायचे; त्याच्या परिणामाचा विचार करावयाचा नाही — मग तो परिणाम इष्ट असो वा अनिष्ट असो. यामुळे कोणाचेही बरे केले हा अहंभाव नाही व कोणाचे वाईट व्हावे व माझे बरे व्हावे ही आतून रुखरुखही नाही. मनात आलेली गोष्ट योग्यच असणार तेव्हा ती करायची; मग ती बरी असो के वाईट असो. वाईट असेल तर त्यातून ईश्वरेच्छेने आपोआप मुक्तता होईलच; तोपर्यंत ती मला मानवतेच. चांगल्या वस्तूला मी मुकलो तर त्याहीपेक्षा अधिक चांगली वस्तू मला मिळणार आहे अशीही खात्री ठेवायची; आणि ती केवळ अंधविश्वासाची खात्री नव्हे, तर अनुभवाची खात्री. या मीमांसेनंतर माझ्या वरवर दिसणा-या बेपर्वा व बेगुमान बेछूट वृत्तीची तरफदारी करण्याचे क्वचितच कारण पडेल. गोविंदराव टेंबे यांचे ९ ऑक्टोबर १९५५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti