आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी.
मराठी साहित्य आणि नाटय़सृष्टीत मोलाचं योगदान केलेल्या राम गणेश गडकरींची ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटकं, तर ‘वाग्वैजयंती’ हा काव्यसंग्रह आजही रसिकांवर गारुड घालत आहे. याच गडकरींचा मराठी धागा पुढे कायम राखत आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी.
जुईचा चेहरा फोटोजेनिक आहे. जुईचे फोटोशूट करण्याचा योग अनेकदा आला. फोटोशूटपूर्वी आणि शूटदरम्यान जुईशी तिच्या अभिनयातल्या अनुभवांबद्दल आम्ही बोलतो. जुई अभिनय क्षेत्रात कशी आली याविषयी तिच्याशी गप्पा मारत असताना ती भरभरून बोलते. अनेक गोड – कटू अनुभव ती सांगते. सहायक दिग्दर्शकाच्या भूमिकेतून तिने या इंडस्ट्रीत प्रवेश केला खरा. मात्र पुढे तिने अभिनयात यावं यासाठी तिच्या सहकाऱयांनी आणि विशेषतः तिच्या आईने तिला प्रोत्साहन दिले. जुई या क्षेत्रात येण्यापूर्वी तिला मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राज्याध्यक्ष यांचं. गौतमजींनी योग्य वेळी आणि योग्य लोकांशी ओळख करून दिल्याने जुईचा प्रवास पुढे सुखकर झाल्याचं ती सांगते. ‘बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे’ या एकापाठोपाठ एक मालिकांतून जुईचा चेहरा दिसू लागला, तर पुढे ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील ‘कल्याणी’ हे पात्र महाराष्ट्रभर चांगलंच गाजलं. कलर्स मराठीवरील ‘सरस्वती’ या मालिकेतूनही जुईने रसिक मनावर मोहिनी घातली.
राम गणेश गडकरींचा इतिहास आणि जुईच्या त्याकाळी सुरू असलेल्या मालिका हे लक्षात घेऊन आम्ही जुईचं पारंपरिक वेशभूषेत फोटोशूट करायचं ठरवलं. यासाठी लाल रंगाची साडी आम्ही निवडली होती. पारंपरिक वेशभूषा, कपाळावर सजलेली चंद्रकोर टिकली, नाकात पिटुकली नथ, अंबाडय़ावर लगडलेला गजरा, दागिन्यांचा देखणा साज असा मराठमोळा शृंगार केलेल्या जुईचं मोहक रूप मी कॅमेराबद्ध करत होतो.
पोर्ट्रेट टिपताना त्या व्यक्तीची चांगली बाजू, डोळ्यातली चमक आणि चेहऱयावरचे भाव हे प्रत्येक वेळी महत्त्वाचं असतं. अनेकदा ही आपली बाजू कलाकारांना माहीत असते, तर काही वेळा व्यक्तीचा चेहरा बघताच क्षणी छायाचित्रकाराला त्या व्यक्तीच्या प्रिफरेबल साईडचा अंदाज येतो. जुईच्याही बाबतीत जुईची एक बाजू फोटोसाठी जास्त चांगली आहे. जुईचे फोटो टिपत असताना जुईच्या स्मितहास्यामुळे तिच्या गालावर हलकीशी खळी पडत असल्याचं मला ध्यानात आलं, तर तिच्या डोळ्यांजवळही दोन नैसर्गिक रेषा असल्याचं मला लक्षात आलं. हीच बाब हेरून जुईचा प्राधान्य असलेल्या बाजूने फोटो टिपायचे मी ठरवलं. जुईचे मोहक स्मितहास्य यावेळी मला कॅमेराबद्ध करता आलं.
जुईचे अनेकदा पारंपरिक वेशभूषेत छायाचित्र टिपल्यानंतर साधारण वर्षभराने तिचं एका मॉडर्न लूकमध्ये फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं. तिचा हा लुक कुठे अनैसर्गिक वाटणार नाही ना, तसंच तिची प्रतिमा यातून वेगळी निर्माण नाही ना होणार याची काळजी आम्ही घेतली. पहिल्या शूटसाठी हिरव्या रंगाचा वन पीस तिने परिधान केला. या कॉस्च्यूमची गरज असलेली वेशभूषा आणि मेकअप आम्ही करून घेतला.
जुईला काही वेगळे कॉस्च्यूम दाखवले, त्यावरचा लूक सांगितला. काही फोटोंचे रेफरन्स दाखवले. जुईला शूट करायची इच्छा होती, परंतु तिची मानसिक तयारी नव्हती हे तिच्या देहबोलीतून समजत होतं. शूटला ती तयार होती, सांगेल तशी पोजेस देत होती, परंतु चेहऱयावर चिंतेचे भाव होते. जुईला यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही काही काळ शूट थांबवलं. कॅमेरा बाजूला ठेवून तिच्याशी बोलून, गप्पा मारून तिला थोडं फ्री करून आम्ही पुन्हा फोटोशूटला सुरुवात केली. नंतर आमच्या समोर आली ती बिनधास्त वावरणारी, मॉडर्न लूकमधली, नेहमीच्या चेहऱयापेक्षा वेगळी, ग्लॅमरस जुई. तिचे वेगवेगळ्या कॉस्च्यूममध्ये नंतर आम्ही शूट केलं. जुई हळूहळू अधिक खुलत गेली आणि मला तिचे हवे तसे फोटो मिळत गेले. जुईचे नंतर काही काळ्या रंगाच्या वन पीसमध्ये आम्ही फोटोशूट केले. या फोटोत ती अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस वाटत होती.
चौकटीत राहून आपला पिढीजात मराठी बाणा जपणारी जुई पारंपरिक वेशभूषेत सुंदर दिसतेच, परंतु आजच्या युगात स्वच्छंद वावरणारी मॉडर्न जुईदेखील कॅमेऱयात तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू शकते हे तिने सिद्ध केलंय. कलाकाराला त्याच्या चेहऱयावर रंग घेऊन वावरताना त्याच्या वैयक्तिक मतापेक्षा त्या रंगांना न्याय देण्यासाठी नेहमी धडपड करावी लागते. ही धडपड अनुभव आणि अभ्यासाच्याच जोरावर करता येऊ शकते हे जुईशी बोलताना, शूट करताना जाणवतं.
धनेश पाटील
अमृता खानविलकर हिची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४ मधील “झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज” या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली.
अतिशय ओघवत्या मराठीत ‘चेंडू टोलवला, पायचीत, त्रिफळाचीत, चौकार, षटकार, सीमापार, पंच’ अशा शब्दांची पेरणी करीत, खेळातील रोमहर्षक घटना तितक्याच रोमहर्षकतेने आवाजात चढ-उतार करीत ते सांगत
राम जोशी (१७६२-१८१२) -
पेशवाईअखेरचा एक मराठी कवि व प्रख्यात लावणीकार.
हा सोलापूरचा राहाणारा यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण व तेथील वृत्त्यंशी जोशी होत. यानें बैराग्यपर व शृंगारपर उत्कृष्ट लावण्या केल्या आहेत.
छंद:शास्त्रावर व 'छंदोमंजरी' नांवाचा त्याचा एक ग्रंथ आहे. याखेरीज मदालसाचंपू व इतर खंडकाव्यें यानें केली आहेत.
मोरोपंताच्या आर्या यानेंच विशेषत: प्रसिद्धीस आणल्या. हा त्या कालांतील लावण्या व पवाडे करणारांचा 'तुरा' होता.
याचें सर्व चरित्र विशेषच होतें. स्वभाव, बुद्धीची तीव्रता विद्वत्ता, आयुष्यक्रम, छंदफंद हे सर्व विशेषच होते.
याच्या बापाचें नांव जगन्नाथ. जोशीबुवाचा वडील भाऊ मुग्दल हा नांवाजलेला व्युत्पन्न शास्त्री व पुराणिक होता.
बुवा लहानपणीं सारा वेळ तमासगिरांच्या बैठकींत बसत व लावण्या म्हणत. याबद्दल भावानें कानउघाडणी केल्यामुळें घरून निघून हे तुळजापुराकडे गेले. तिकडे त्यांनीं काव्य व व्याकरणाचा अभ्यास केला व कुशाग्र बुद्धीमुळें त्यांत पारंगतता संपादली, पण पुन्हां तमाशांचा छंद धरला. सोलापुरास धोंडी शाहीर याच्या आखाडयांत बुवा प्रथम शिरले. विद्वत्तोमुळें यांच्या लावण्या गोड, रसाळ व प्रौढ असत म्हणून त्या लोकांनां फार आवडूं लागल्या. त्यांच्या लावण्यांत ते आपलें नांव व्यंकटपति, राम, कविराय असें घालीत.
पुढें यांच्यावर फिदा होऊन बया नांवाची एक बाई यांच्याजवळ मैत्रीण म्हणून अखेरपर्यत राहिली. बोवांची कवनें ही म्हणून दाखवी. बया प्रमाणेंच चिमा म्हणून दुसरी बाई बुवांजवळ होती. त्यांच्या रहाणीचा थाट मोठा होता. मोरोपंत व चिंतामणराव पटवर्धन सांगलीकर हे बुवांच्या लावण्या आवडीनें ऐकत. पुढें वृद्धपणी हे तमाशे सोडून कथा करूं लागले, त्यांतहि त्यानीं नांव कमावलें.
यांच्या सर्व कवनांत त्यांच्या ''छेकापन्हुती'' ची फार प्रसिद्धि आहे.
बुवा हे पुणें येथें शके १७३० च्या गुढीपाडव्यास वारले.
-- विवेक जोशी
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ रोजी झाला. चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध भूमिका करत असलेले अमोल पालेकर यांचे वडील पोस्टात काम करत असत, आणि आई खाजगी कंपनीत काम करत होती.
खरे तर, पालेकर चित्रकार व्हावयाचे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून फाइन आर्टची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या अमोल पालेकरांच्या अप्रतिम चित्रांची सात प्रदर्शनेही झाली आहेत. पण, सत्यदेव दुबेंच्या रूपात गुरू भेटला आणि यथावकाश त्यांच्यातील चित्रकार अभिनेत्याच्या रूपात दृढ होत गेला. समांतर रंगभूमीवरील निष्ठा, नैतिकता या दुबेंच्या गुणांचा मनोहारी संगम पालेकरांमध्येही झालेला दिसतो. छबिलदास थिएटर चळवळीचा, किंबहुना समांतर रंगभूमीचा इतिहास लिहिला जाईल; तेव्हा त्यातील एक सुवर्ण पान अमोल पालेकरांच्या नावाने लिहिलेले असेलच!
अमोल पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर "अनिकेत" नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली. त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात १९७१ सालच्या शांतता! कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटापसून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते. १९७४ मध्ये अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना "मध्यमवर्गीय" माणसाच्या भूमिका मिळत गेल्या.
गोलमाल चित्रपटासाठी त्यांना १९७९ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. १९८२ मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आला. मराठी चित्रपट आक्रीत पासून अमोल पालेकर यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहेली हा चित्रपट २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही. मराठी बरोबरच कानडी, बंगाली, मल्याळम या भाषांतील अमोल पालेकर यांच्या चित्रपटांना समीक्षकांनी वाखाणले आहे.
दिग्दर्शक म्हणून त्यानी स्त्रियांचे चित्रण अधिक संवेदनशीलपणे केले. भारतीय साहित्यातील अभिजात कथांवर त्याचे काही चित्रपट आधारलेले आहेत. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांतून आधुनिक दृष्टिकोन असतो. बादल सरकार यांचा मोठा प्रभाव पालेकर यांच्यावर आहे. त्यामुळेच त्यांना बगीचे, गॅरेज, कॅन्टीन, इमारतीची गच्ची अशा एरवी अशक्यव मानल्या जाणाऱ्या ठिकाणी नाटक सादर करण्याची प्रेरणा मिळाली असावी. समांतर रंगभूमी जगविण्यासाठी जे जे प्रयत्न झाले, त्यामध्ये पालेकरांच्या या अजोड भूमिकेचीही दखल घ्यावी लागेल.
विजय तेंडुलकरांच्या "शांतता, कोर्ट चालू आहे‘ चे हिंदी रूपांतर "चूप! कोर्ट चालू है‘, मोहन राकेश यांचे "आधे अधुरे‘, गिरीश कार्नाड यांचे "हयवदन‘ या नाटकांतील संस्मरणीय भूमिकांच्या बरोबरीने पालेकरांनी नाट्यदिग्दर्शक म्हणूनही प्रवास सुरू ठेवला होता. बादल सरकार यांचे "वल्लभपूरची दंतकथा‘, "पगला घोडा‘, "जुलूस‘, चिं. त्र्यं. खानोलकरांचे "अवध्य‘, अच्युत वझेंचे "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक‘, महेश एलकुंचवारांचे "वासनाकांड‘ आणि "पार्टी‘, अकिरा कुरोसावा यांचे "राशोमान‘, दिवाकरांच्या नाट्यछटांना त्यांनी दिलेले नाट्यरूप, असे पालेकरांच्या नाट्यसाधनेच्या मार्गातील लक्षणीय टप्पे आहेत. फक्त नाट्यगृहापुरती नाटकाची व्याप्ती न ठेवता नाटक थेट लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी केलेले विविध प्रयोगही अत्यंत महत्त्वाचे आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=5jJIb55qGHg
https://www.youtube.com/watch?v=jibrG5b-IpU
संदीप खरे यांनी इयत्ता चौथीत असताना पहिली कविता केली. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्याने कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९७३ रोजी झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजलेल्या 'उमलते अंकुर' या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली. ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या त्याच्या कवितांसग्रहांची विक्रमी विक्री झाली आहे. त्याने स्वत: स्वरबद्ध केलेल्या तसेच सलिल कुलकर्णी आणि अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या सीडीही अपार लोकप्रियता लाभली आहे.
सलग अनेक वर्षे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असलेला आणि १२०० प्रयोगांजवळ पोहोचलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम तर मराठी भावसंगीतामध्ये एक इतिहास घडवतो आहे. या कार्यक्रमातील गीतांसोबत संदीप करीत असलेल्या गद्य कवितांचे सादरीकरण हे देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले आहे. ‘मी मोर्चा काढला नाही, मी संपही केला नाही’.. ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात’.. ‘लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं’.. ‘दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला’.. ‘डिपाडी डिपांग’.. यांसारख्या कविता आणि लोकप्रिय गीतांमधून कवी संदीप खरे यांनी खरे मराठीत नाव कमवले आहे.
संदीप खरे हे ‘मोबाइल अॅप’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटत असतात. ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या अॅपद्वारे रसिकांना संदीपच्या काही कविता विनाशुल्क तर काही कविता अल्बमच्या माध्यमातून सशुल्क उपलब्ध होणार असून मोबाइल अॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणारा संदीप खरे हे मराठीतील पहिलाच कवी ठरले आहे. जगभरातील मराठी रसिकांमध्ये आणि विशेषत: युवा पिढीमध्ये संदीप खरे यांच्या कविता अत्यंत लोकप्रिय आहेत. पायरसी आणि ‘संदीप खरे’ज वर्ल्ड – ‘गुगल प्ले स्टोअर’वरून हे अॅप विनाशुल्क ‘डाऊनलोड’ करता येऊ शकेल.
https://play.google.com/store/apps/details…
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुरेश हळदणकर यांचा जन्म १८ डिसेंबरला झाला.
सुरेश हळदणकर यांचा जन्म गोमांतकातील. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे दीनानाथ, बालगंधर्व व कृष्णराव यांना गुरुस्थानी मानत.पुण्यातून मुंबईला आल्यावर हळदणकरांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पं. मनहर बर्वे, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गणपतराव देवासकर आदी संगीततज्ञांकडे झाले. दैवयोगाने, त्यांना सुरेल, बारीक परंतु धारदार आवाज प्राप्त झाल्याने त्यांच्या गाण्यात दीनानाथ मास्तरांच्या गाण्यातील तडफदारपणा व बालगंधर्वांच्या गाण्यातील लडिवाळपणा या दोन्ही गोष्टी साधता आल्या व त्यामुळे अनेक वर्षे संगीत रंगभूमीवरून व खासगी मैफलीतून ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. ‘होनाजी बाळा’ या नाटकातील त्यांची भूमिका व विशेष करून त्यातील ‘श्रीरंग कमलकांता’ हे त्यांचे पद गाजले.
एके दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते प्र. के. अत्रे हजर होते. त्या दिवशी ‘श्रीरंगा कमलकांता’ हे त्यांचे पद इतके रंगले, की अत्रे मोहित होऊन अंक संपल्यावर रंगमंचावर आले व सर्व रसिकांच्या समोर पडदा उघडून त्यांनी सुरेश हळदणकरांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुढे ते प्रसिद्धीपासून दूर गेले. तरीसुद्धा त्या अगोदर अनेक वर्षे ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. त्यांनी गायलेल्या काही जुन्या रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्यांतील पदे उदाहरणार्थ, ‘विमल अधर निकटी’, ‘रघुराया गं माझा’, ‘रघुराजा हा माझा विसावा’, ‘श्रीरंगा कमलकांता’, ‘मानिली आपुली’, ‘सुरसुखखनि तू विमला’, ‘पद्मनाभा नारायणा’ ही पदे त्यांना प्रसिद्धी देऊन गेली.
सुरेश हळदणकर यांचे १७ जानेवारी २००० रोजी निधन झाले.
सुरेश हळदणकर यांची काही गाणी.
‘विमल अधर निकटी’
‘रघुराजा हा माझा विसावा’
‘श्रीरंगा कमलकांता’
‘मानिली आपुली’
‘सुरसुखखनि तू विमला’
‘पद्मनाभा नारायणा’
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० ऑगस्ट १९६६ रोजी रंगभूमीवर आणले. पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या रंगभूमीवर सादर केला गेला होता.
गुंटूरमध्ये २३ एप्रिल १९३८ रोजी जन्माला आलेल्या एस.जानकी यांनी वयाच्या १९ वर्षांपासून गाण्यातील कारकीर्दीला सुरुवात केली. एस. जानकी या गेल्या साठ वर्षापासून गात आहे. जानकी यांना दक्षिण भारताची 'सुर कोकिळा म्हणतात. जानकी यांना दक्षिण भारतातील गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. आंध्र प्रदेशच्या त्यांनी आजवर तामीळ, कन्नड, तेलगु मल्याळी या भाषांमध्ये वीस हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
जानकी यांना गायनासाठी चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जानकी यांना गायनासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. पण त्यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. पाच दशकांच्या गायनाच्या कारर्कीदीत सरकारने पुरस्कार देण्यास बराच उशीर केल्याने आपण हा पुरस्कार नाकारत आहोत असे मा.जानकी यांनी म्हटले आहे.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजा फेणाणी यांच्या मध्ये हे सारे गुण आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti