(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे

    स्विट्झर्लंडमधील माउंट टिटिलिस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नांवावर जमा आहे.

      November 9, 2021


  • अभिनेता पुष्कर श्रोत्री

    सिनेसृष्टीतील ‘हॅप्पी गो लकी’ अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. सिनेमा असो, नाटक, मालिका किंवा सूत्रसंचालन ह्या सर्व आघाड्या तो लिलया पार पाडतो. विनोदी अभिनेता म्हणून तो प्रसिध्द आहे. पुष्कर श्रोत्रीने आजवर पंचवीस हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले आहे. मुख्यत्वे विनोदी भूमिकांसाठी तो ओळखला जातो. हापूस, एक डाव धोबीपछाड, झेंडा, मोरया, अ पेइंग घोस्ट, कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील त्याचा अभिनय रसिकांना वाखाणला आहे. रेगे या चित्रपटातून त्याने रंगवलेला इन्स्पेक्टर त्याच्या अभिनयाची दुसरी गंभीर बाजूही दाखवून जातो. ह्या भूमिकेसाठी त्याला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. हिंदीमधील मुन्नाभाई एम.बी.बी.एस. आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील त्याचे प्राध्यापक डॉक्टरचे पात्रही रसिकांच्या आजही लक्षात आहे.

    पुष्कर श्रोत्री याने दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलेले ‘हसवाफसवी’ या नाटकाचे प्रयोग पण गाजवले आहेत. त्यातील त्याच्या सहा वेगवेगळ्या भूमिका एकदम अप्रतिंम आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचा कोणताही पारितोषिक वितरण सोहळा असो किंवा कॉमेडी शो, सध्या एक मराठी कलावंताने सर्वदूर हे क्षेत्र व्यापले आहे. तो म्हणजे पुष्कर श्रोत्री. पुष्कर श्रोत्री याने आजपर्यंत अनेक महत्वाच्या मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. टी,व्ही वरील फू बाई फू , स्मार्ट सूनबाई हे त्याचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाले होते. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘सावज’, ‘भूल’, ‘सांजसावल्या’, ‘अवंतिका’, ‘वादळवाट’, ‘अभिलाषा’, ‘दौलत’, ‘अर्धांगिनी’, ‘व्हील स्मार्ट सुनबाई’, ‘टिकल ते पोलीटिकल’, आदि मालिका पण त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झाले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 2, 2017


  • जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी

    १९८०च्या दशकात प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी एका संगीत समारंभात जयपुर-अत्रौली घराण्याचे मल्लिकार्जुन मन्सूर यांचे गाणे ऐकले आणि त्या मंत्रमुग्ध झाल्या आणि काही वर्षांनंतर त्यांचे पुत्र आणि शिष्य राजशेखर मन्सूर यांना भेटल्या आणि त्यांना गाणे शिकवण्याची विनंती केली. हे शिकणे पुढे दहा वर्षे चालले.

      June 18, 2022


  • कवी कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत

    कवी केशवसुत म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी…

      November 7, 2016


  • पखवाजवादक शंकरबापू आपेगावकर

    शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव या छोट्या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता. शंकरबापू आपेगावकर हे राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक होते. ते वारकरी प्रकारचे सुद्धा पखवाजवादन करीत. त्यांचा १९८६ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. शंकरबापू आपेगावकर यांचे मूळ नाव शंकर शिंदे होते.शंकरबापू आपेगावकर यांचा मुलगा उद्धवबापू आपेगावकर हे ही पखवाजवादक आहे.शंकरबापू आपेगावकर यांचे निधन ९ जानेवारी २००४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट

      January 11, 2017


  • रवि शंकर

    सतारवादनातील श्रेष्ठतम वादक रवि शंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन पोषण केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले.

    १९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचीत झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडिल शिक्षण १९४४ पर्यंत चालले. १९३९ साली अमदावाद शहरात प्रथम खुली मैफल केली.

    १९४५ सालापासूनच रविशंकराच्या साङ्गीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट धरत्री के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहासे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले. १९४९ साली रवि शंकर दिल्लीच्या ऑल इन्डिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रूजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृन्द चेम्बर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. १९५० ते १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपु त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपुर संसार) या चित्रपटांना संगीत दिले.

    यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी चित्रपटांस संगीत दिले. १९६२ साली पन्डित रवि शंकर यांनी किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, मुंबई व १९६७ साली किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, लॉस ऍन्जलेस स्थापन केली. रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत.

    १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार जॉर्ज हॅरि यांच्या सोबत जॅझ, अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीत अशा विविध प्रवाहांवर काम केले. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत नेक कार्यक्रम केले. यात एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे. १९६५ साली बीटलसच्या जॉर्ज हॅरि यांनी सतार शिकण्यास सुरूवात केली.

    या काळात त्यांचे हॅरि यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. जॉर्ज हॅरि हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. मा.रवि शंकर यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 9, 2019


  • आग्रा घराण्याचे गायक पं.दिनकर कैकिणी

    वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला.

    त्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैय्याज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ.स. १९४३ मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.

    त्यांनी १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. इ.स. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवन च्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य पदी नियुक्त होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता. १९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.

    कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या, 'मीरा' (१९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले, तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले.

    त्यांनी बंदिशींवर 'रागरंग' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुदिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. मा.कैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या. त्यांचे धाकटे पुत्र योगेश साम्सी हे नामवंत तबला वादक असून त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत. सुप्रसिध्द गायक पं. दिनकर कैकिणी यांचे सुपुत्र असलेले योगेश सम्सी यांनी उस्ताद अल्लारखॉं यांचेकडे २३ वर्षे तबल्याची तालीम घेतली आहे. आजवर अनेक ज्येष्ठ गायकांना यशस्वी साथ संगत केली आहे. तसेच अनेकवेळा स्वतंत्र तबदा वादनाचे कार्यक्रमही केले आहेत.पं.दिनकर कैकिणी यांचे २३ जानेवारी २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 23, 2017


  • विनोदी नट राम नगरकर

    राम नगरकर हे नाव आपल्यापुढे आलं ते एक नट म्हणून. तेही एक विनोदी नट म्हणून प्रख्यात अभिनेते राम नगरकर यांनी मराठी रंगभूमी आणि असंख्य चित्रपटांमधून लाखो रसिकांना खळखळून हसविले. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९३० रोजी झाला. ‘रामनगरी’ हे त्यांच्या आत्मकथनाचे धम्माल विनोदी पुस्तकही खूप गाजले. महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांनी या पुस्तकाला पुरस्कार देऊन गौरविले. ‘रामनगरी’ ला पुलंची प्रस्तावना आहे. त्यामुळेच हे पुस्तक तमाम मराठी जनतेने डोक्यावर घेतले. या पुस्तकावरून ‘रामनगरी’ या हिंदी सिनेमाचीही निर्मिती झाली होती व त्यात अमोल पालेकर हे प्रमुख भूमिकेत होते. हे सर्व होत असताना ‘रामनगरी’ हा एकपात्री कार्यक्रम १९८० साली मा.राम नगरकर यांनी सुरु केला. याचे देशविदेशात एक हजाराहून जास्त प्रयोग केले. त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा नेहमीच पाहायला मिळाला. स्वतःची थट्टा-मस्करी करणाऱ्या या कलावंताने आपल्या अदाकारीने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.‘‘ दादा कोंडके, निळू फुले हे नगरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. १९९५ साली मा.राम नगरकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव वंदन नगरकर यांच्यातील कलागुण ओळखून ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ ला पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. त्यांनीही रामनगरीचे असंख्य प्रयोग केले आहेत. रामनगरी हे राम नगरकर यांचे आत्मचरित्र खूपच गाजले आहे.

    राम नगरकर यांचे ८ जून १९९५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      June 8, 2017


  • ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव

    ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव यांचे निधन झाले..

    आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला.अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारातही त्यांनी चौफेर मुशाफिरी केली होती. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. मा. आनंद यादव यांना यादव यांच्या नटरंग कादंबरीवरून चित्रपटनिर्मिती झाली होती. मा.आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या ’संतसूर्य तुकाराम’ या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर देखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.
    मा.आनंद यादव यांनी सुमारे ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. आनंद यादव यांची साहित्यसंपदा : अ९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह, साहित्याची निर्मिती प्रक्रिया, ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या, ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव, ग्राम संस्कृती,मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती, मराठी लघुनिबंधाचा इतिहास, कलेचे कातडे, साहित्यिकाचा गाव, आदिताल, सैनिक हो, तुमच्यासाठी, शेवटची लढाई, आत्मचरित्र मीमांसा, झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल, गोतावळा, भय, माउली, नटरंग, भूमिकन्या, उखडलेली झाडं, झाडवाटा, स्पर्शकमळे, माळावरची मैना, पाणभवरे, डवरणी, खळाळ, मळ्याची माती, मातीखालची माती, माय-लेकरं, एकलकोंडा, घरजावई, उगवती मने, लोकसखा ज्ञानेश्वनर, संतसूर्य तुकाराम.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 30, 2016


  • दिग्दर्शक व पटकथाकार चेतन आनंद

    चेतन आनंद दिग्दर्शित हिमालय फिल्म्सचा ‘हकिकत’ (१९६४) हा आपल्याकडचा सर्वोत्तम युद्धपट मानला जातो. १९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चेतन आनंद यांनी ‘हकिकत’ घडवला आणि रसिकांना प्रचंड भावला देखील.

      July 6, 2017