(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा

    विनायक दामोधर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्‌गुरु आदी १५ ते १६ चित्रपटांत, आणि तरुणपणी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या. बेबी नंदा यांनी १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला.

    कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले. सदाशिव जे रावकवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरुन जा, हंसा वाडकरसोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते. व्ही. शांताराम यांच्या तुफान और दिया या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा मोठा ब्रेक मिळाला. १९६५ पासून नंतर पुढे त्यांच्या यशाची घौडदौड वाढतच गेली. १९५७मध्ये आलेल्या `भाभी` सिनेमातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर एवार्डसाठी नामांकन मिळालं होतं. मात्र या पुरस्कारांमध्ये लॉबिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप करत त्यांनी रोखठोक भाष्य केलं होतं. राज कपूर, शशी कपूर, देवानंद, मनोजकुमार, अशा गाजलेल्या अभिनेत्यांसोबत त्यांचे अनेक सिनेमे हिट झाले. कानून, ऑंचल, मेहंदी लगी मेरे हाथ, जब जब फुल खिले, जोरू का गुलाम अशा अनेक हिट सिनेमांची नोंद बेबी नंदा यांच्या नावावर आहे. मा.नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • संगीतकार चित्रगुप्त

    चित्रगुप्त यांचे संपूर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. त्यांनी एम. ए. (इकॉनॉमिक्स) ही पदवी घेऊन काही काळ प्राध्यापक म्हणून देखील काम केले. त्यांना संगीत व काव्य या क्षेत्रात रुची असल्यामुळे ते नशीब आजमाविण्यासाठी मुंबईत आले व अतिशय कष्ट करून एस. एन. त्रिपाठी यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केले. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू झाली. चित्रगुप्त यांनी एकूण ८२८ गाणी केली. मा.चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून गाणी लिहून घेतली. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व या कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली.

    एव्हीएम या दक्षिणेकडच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. लता मंगेशकर, महमंद रफी, आशा भोसले, तलत मेहमूद, मुकेश तसंच मन्नाडे इत्यादी गायकांच्या माध्यमातून त्यांनी सुरेल गाणी दिली. परंतु त्यांच्या वाटय़ाला सगळेच ‘बी’ ग्रेड सिनेमे आले. एकाही मोठय़ा हीरोचा चित्रपट (दिलीप, देव, राज कपूर) त्यांना मिळाला नाही. संगीत चांगले असूनसुद्धा त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळाला नाही. परंतु एकटय़ा चित्रगुप्तांनी आपल्या संगीताच्या जोरावर ‘बी’ ग्रेड सिनेमांना तारून नेले. ‘बी’ ग्रेड सिनेमाचे निर्माते चित्रगुप्त यांच्या संगीतावर अतिशय खूश असत. कारण अशा चित्रपटांमध्ये चांगली गाणी असल्यामुळे ते चित्रपट यशस्वी होत असत.

    भारत भूषण, चंद्रशेखर, अजित, सुनील दत्त, राजेंद्रकुमार हे त्यांच्या चित्रपटाचे नायक होते. तर कुमकुम, फरियाल, शकिला, श्यामा, माला सिन्हा, नंदा, मीनाकुमारी या नायिका होत्या. खऱ्या अर्थाने १९५७-१९६७ हे दशक चित्रपट संगीताच्या दृष्टीने भरभराटीचे होते. चित्रपट जरी चालले नसले तरी चित्रपटातील गाणी ही सतत रेडिओवर वाजत असत व लोकप्रिय होत असत. चित्रगुप्त यांचे निधन १४ जानेवारी १९९१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    चित्रगुप्त यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=CB52wfw846U

  • `कालनिर्णय’ दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले जयंत साळगावकर

    जयंत साळगावकरांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९२९ रोजी मालवण येथे झाला. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचे परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून `कालनिर्णय’ ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका म्हणून ख्याती मिळविली. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या दिनदर्शिकेचे संस्थापक आहेत. `कालनिर्णय’ आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणूनही प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले. एकटय़ा मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा खप ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे. कालनिर्णयच्या खपाचा विक्रम प्रस्थापित करून त्यांनी आपल्यातील कल्पक उद्योजकाचे कौशल्य सिद्ध केले. एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. साळगावकर हे महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार होते. जयंत साळगावकर यांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करुन लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत होते. ते मुंबईतील प्रसिध्द श्री सिद्धिविनायक मंदिराचे माजी ट्रस्टी व आयुर्विद्यावर्धिनी या आयुर्वेदिक संशोधन करणार्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. मुंबई मराठी साहित्य संघ व इतिहास संशोधन मंडळ या संस्थांचे ते अध्यक्ष होते. १९८३ साली झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. तसेच मुंबई येथे झालेल्या ७४ व्या नाटय़संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. `सुंदरमठ, देवा तूचि गणेशु’ ही पुस्तके व धर्म-शास्त्रीय निर्णय या ग्रंथाचे संपादन व लेखन त्यांनी केले. जयंत साळगावकर यांचे २० ऑगस्ट २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • पुण्याचे भूषण असलेले बालगंधर्व रंगमंदिर

    आज पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे बालगंधर्व रंगमंदिर सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. पुण्यातील रसिकांची दाद प्रत्येक कलाकारासाठी एक अलंकार असतो. त्यात पुन्हा बालगंधर्व रंगमंदिरातील दाद म्हणजे कलाकारांच्या कलेचे सार्थक झाल्यासारखे असते. पुण्यात दाद मिळाली की जगात कुठेही दाद मिळवता येते, असे अनेक कलाकार आवर्जून सांगत असतात, हीच खरी पुण्याची व पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराची खासीयत आहे.

    बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श राज्यातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात जपला गेला आहे. स्वातंत्र्या नंतर स्वतंत्र रंगमंदिराच्या उभारणीला प्राधान्य देणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली होती. संगीत रंगभूमीसाठी आपले जीवन वेचणारे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी साकारण्यात आलेल्या या रंगमंदिराचे भूमिपूजन ८ सप्टेंबर १९६२ रोजी बालगंधर्व यांनीच केले होते. बालगंधर्व रंगमंदिराचे बांधकाम १९६६ मध्ये सुरू झाले. १५ जुलै १९६७ रोजी बालगंधर्व यांची प्राणज्योत मालवली. पु. ल. देशपांडे यांनी या रंगमंदिराची रचना सर्वोत्तम असावी यासाठी कष्ट घेतले होते. ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडून पुलंनी ‘स्वयंवर’मधील रुक्मिणीच्या वेशातील आणि पुरुष वेशातील अशी बालगंधर्व यांची दोन मोठय़ा आकारातील तैलचित्रे करून घेतली. विशेष म्हणजे बालगंधर्वाच्या नाटकात वापरण्यात आलेला ऑर्गनही रंगमंदिरात तैलचित्रांखाली ठेवण्यात आला आहे. कलाकार, रसिक प्रेक्षक, तंत्रज्ञ यांच्या सोयीचा विचार करून ऐसपैस, सर्वोत्तम ध्वनिव्यवस्था आणि प्रशस्त रंगमंचासह नेपथ्य सामानाची गाडी रंगमंचावर उतरविण्याची सोय करण्यापासून ते कुरकुरणाऱ्या मुलांचा व्यत्यय येणार नाही यासाठी ‘ग्लासबॉक्स’ची सोय करण्यापर्यंतचा विचार मा.पुलंनी केला आणि त्या काळी एक उत्कृष्ट रंगमंदिर साकारले गेले. मा.बी. जी. शिर्के यांनी या रंगमंदिराच्या बांधकामाची जबाबदारी घेऊन अवघ्या पंधरा लाखात बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी केली.

    बालगंधर्व यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २६ जून १९६८ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले होते. तेव्हाचे महापौर मा.ना. ग. गोरे व मा.पु. ल. देशपांडे यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम नेटका होईल याकडे लक्ष दिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आचार्य अत्रे उपस्थित राहू शकले नाहीत. पण, ‘मराठा’तील अत्रे यांच्या अग्रलेखाचे वाचन ना. ग. गोरे यांनी केले होते. पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार या दिग्गज कलाकारांनी नांदी सादर केली होती.

    तर, दुसऱ्या दिवशी ‘एकच प्याला’ नाटकाचा प्रयोग सादर झाला होता. तेव्हापासून हे रंगमंदिर पुणेकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. या रंगमंदिरामध्ये नाटकाचा प्रयोग करण्याचा आनंद आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविण्यासाठी रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार आसुसलेला असतो. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रयोग करणे ही जणू कलाकाराच्या जीवनातील भाग्याची गोष्ट असते.

    बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी या परिसराचे वर्णन करीत नेमके निरीक्षण आपल्या ओघवत्या शैलीत मांडणाऱ्या पु.ल. देशपांडे यांचे भाषण गाजले होते. पुलं म्हणाले होते, इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातील स्त्री म्हणजे झाशीची राणी आहे आणि आतल्या बाजूला देऊस्करांनी चितारलेला स्त्री वेशातील पुरुष म्हणजे गंधर्व आहेत. अर्धनारी नटेश्वराची दोन रूपं जिथं आहेत तिथं हे नटेश्वराचे मंदिर उभारलं जातंय, ही आनंदाची गोष्ट आहे. अलीकडे ‘नटेश्वर’ आहे, पलीकडे ‘ओंकारेश्वर’ आहे; मधून जीवनाची सरिता वाहतीये. आमचे महापौर त्याच्यावर पूल टाकणार आहेत. माझी विनंती आहे, की हा पूल एकतर्फी असू द्या.. ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • प्रा. नरहर कुरुंदकर

    कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षात त्यांनी अनेकवेळा कॉलेजला दांडी मारून आपला वेळ हैदराबादमधील स्टेट लायब्ररीमध्ये घालवू लागले . त्यांनी तेथे इतिहास , संस्कृती , धर्म , तत्वज्ञान , साहित्य, राजकारण , आणि अर्थशास्त्र ह्या विषयाचे प्रचंड वाचन केले.

  • दत्ता नाईक उर्फ एन. दत्ता

    बाबूराव नाईक ऊर्फ एन. दत्ता यांचे नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते.

  • मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर

    मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले.

    वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. अरूण पौडवाल, अनिल मोहिले, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांनी त्यांच्या गीतांना चाली दिल्या असून सुलोचना चव्हाण, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, मोहम्मद रफी, हेमंतकुमार, आशा भोसले अशा नामवंत गायकांनी गायली आहेत. मा.वंदना विटणकर यांचा पहिला विवाह चित्रकार चंद्रकांत विटणकर यांच्याशी झाला होता. मा.चंद्रकांत विटणकरांच्या निधनानंतर १९८६ साली त्यांनी किशोर पनवेलकर यांच्याशी पुनर्विवाह केला होता. मा. वंदना विटणकर यांचे ३१ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    वंदना विटणकर यांची लोकप्रिय गीते
    खेळ कुणाला दैवाचा कळला
    नाते जुळले मनाशी
    मी प्रेम नगरचा राजा
    परिकथेतील राजकुमारा
    राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली गं
    आज तुजसाठी या पावलांना
    अधिर याद तुझी जाळीतसे रे दिलवरा
    हा रुसवा सोड सखे
    हे मना आज कोणी
    अगं पोरी संबाल दर्याला
    तुझे सर्वरंगी रूप
    शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
    खेळ तुझा न्यारा

    वंदना विटणकर यांची गाणी.
    https://www.youtube.com/playlist?list=PLaCDrs1IYilKCKh6uyiYOpD8YNSoGomFo

  • गुलजार

    हिंदी चित्रपटसृष्टीवर गेली अनेक वर्षे कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये आपला अमीट छटा उमटवणाऱ्या गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९४३ रोजी झाला.

    गुलजार यांचे खरे नाव संपूर्णासिंह कालरा! चित्रपटसृष्टीत नाव चमकण्यापूर्वी संपूर्णानंद सिंह कालरा हे मोटार मेकॅनिक होते. गुलजार यांनी आयुष्यभर शायरीवर प्रेम केले, जीवतोड केले, शायरीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, रात्ररात्र जागून काढल्या. खाजगी आयुष्यात वादळं आलीत, तरी गुलजार यांनी शायरी कधीच थांबवली नाही. स्वत:च्या बायकोपेक्षाही त्यांनी शायरीवर जास्त प्रेम केलं. उच्च कोटीची, प्रचंड भावनाप्रधान असलेली शायरी त्यांनी लिहिली. लोकजीवनाशी जुळलेल्या वैविध्यांनी नटलेल्या रचना गुलजार यांनी रचल्या.

    लेखक, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपला खास ठसा मा.गुलजार यांनी चित्रपटसृष्टीत उमटवला. गुलजार यांनी बिमल रॉय यांच्या १९६२ सालच्या ‘बंदिनी’ पासून सिनेकारकीर्दीला प्रारंभ केला होता. बिमल रॉय हेच त्यांचे गुरू! संपूर्णानंदाचा गुलजार कसा झाला? याची कहानी रंजकच आहे. ‘मेरे साजनऽ है उस पार...’वाले ख्यातनाम संगीतकार सचिनदेव बर्मन एकदा मोटार मेकॅनिक असलेल्या संपूर्णानंदाकडे गाडी सुधरविण्यासाठी आले होते. संपूर्णानंदाशी बोलता बोलता त्याच्यात दडलेला शायर आणि त्याची विलक्षण प्रतिभा सचिनदांनी हेरली. सचिनदा तेव्हा बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’साठी काम करीत होते. बंदिनीचे गीतकार शैलेंद्र होते. मात्र, या चित्रपटातील एका दृश्यावर शैलेंद्र यांचे कोणतेच गीत बिमल रॉय यांना हजम होत नव्हते. अशा स्थितीत सचिनदांना संपूर्णानंदाची आठवण आली आणि संपूर्णानंदाची बिमल रॉय यांच्याशी भेट घालून देण्याचा निश्चतय त्यांनी केला. परंतु, अडचण अशी होती की, बिमलदा कुणाचेही म्हणणे सहजतेने कधीच स्वीकारत नव्हते. सचिनदांनाही आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडण्यापूर्वी दहादा विचार करावा लागत असे. ‘‘जे होईल, ते होईल, पाहू पुढची पुढं,’’ म्हणत त्यांनी संपूर्णानंदाची भेट बिमल रॉय यांच्याशी घालून दिली व आश्चनर्य म्हणजे, संपूर्णानंदामधील प्रतिभा पाहून ते देखील प्रभावित झाले आणि ‘बंदिनी’चे गाणे संपूर्णानंदांना मिळाले. ‘मोरा गोरा अंग लई ले... मोहे श्याम रंग देई दे, छुप जाऊंगी रात ही मे, मोहे पी का रंग देई दे...’ हे गाणं संपूर्णानंदानं रचलं आणि हे गाणं एवढं हिट झालं की, ते रसिकांच्या ओठी आजही आहे. लतादीदींनी स्वरबद्ध केलेलं हे गीत आणि एस.डींनी चढवलेला संगीतसाज, यामुळं हे गाणं अधिकच नटलं. हे गाणं हिट होताच संपूर्णानंद रातोरात हिट झाले व ‘गुलजार’ हे नाव देशभरात पोहोचलं. यानंतर गुलजार यांना बिमल रॉय यांनी आपला सहायक बनविले. म्हणून गुलजार हे बिमल रॉय यांना आपला गुरू मानतात.

    बिमल रॉय यांच्या मृत्यूनंतर गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी यांच्यासोबत काम केले. ही जोडी चित्रपटसृष्टीत यशस्वी जोड्यांपैकीच एक महत्त्वाची जोडी आहे. हृषीकेशदांसाठी गुलजार यांनी सर्वप्रथम संवाद ‘आनंद’साठी लिहिलेत. ‘आनंद’साठी गुलजार यांना सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा फिल्मफेअर मिळाला होता. या चित्रपटातलं मुकेश यांच्या आवाजातलं राजेश-अमिताभ या दोन सुपरस्टार्सवर चित्रित ‘मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने...’ गुलजार यांच्या कलमातूनच रचलं गेलं होतं. हृषीदांसोबत गुलजार यांनी बावर्ची, गुड्डी, मिली, नमक हराम, गोलमाल, अभिमान यांसारखे चित्रपट केलेत. मात्र, या जोडीला नजर लागली. नंतर दोघांमध्ये मतभेद झालेत व ‘यापुढे सोबत काम करायचे नाही,’ असा निर्णय त्यांनी घेतला. गुलजार यांनी स्वतंत्र मार्ग निवडला. त्यांनी स्वत: चित्रपट निर्मिती करायला प्रारंभ केला. स्वत:च्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गुलजार स्वत:च लिहायचे.

    संजीव कुमार आणि जया भादुरी हे दोघेही त्यांचे आवडीचे कलावंत! या दोघांच्या सुंदर अभिनयाने नटलेला ‘कोशिश’ हा गुलजार यांचाच चित्रपट होता. ‘कोशिश’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. संजीव कुमार यांच्यासोबत गुलजार यांनी ‘आँधी’, ‘मौसम’, ‘कोशिश’, ‘परिचय’, ‘अंगूर’, ‘नमकीन’ असे चित्रपट केले. याशिवाय त्यांनी जितेंद्र, विनोद खन्ना, अमोल पालेकर, नसिरुद्दिन शहा आदी कलांवतांसोबतही चित्रपट बनविले. ‘परिचय’मध्ये ‘जम्पिंग जॅक’ जितेंद्रला त्यांनी घेतले, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. जितेंद्र यांची इमेज पाहता ते गंभीर अभिनय करूच शकणार नाही, असा सर्वांचाच कयास होता. गुलजार यांनी या सर्व कयासांना दूर सारत जितेंद्रला गंभीर भूमिका करायला लावली व जितेंद्र यांनी गंभीर तसेच सुंदर अभिनयाचा ‘परिचय’ देताना भूमिकेचं सोनं करून टाकलं. ‘मुसाफिर हू यारो, न घर है ना ठिकाणा...’ हे गाणे अजूनही तोंडावर आहे.

    ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारी यांच्याशी गुलजार यांचं नातं भावनात्मक होतं. मीनाकुमारीने मृत्यूपूर्वी आपल्या सर्व डायऱ्या आणि शायरी गुलजार यांना सोपविली होती. गुलजार यांनी त्यावर संपादकीय संस्कार करून तिची शायरी प्रकाशित करण्याचे पुण्याचे काम केले. ‘बेनझीर’ चित्रपटाच्या सेटवर मीनाकुमारीशी त्यांची भेट झाली होती. तेव्हा गुलजार हे बिमल रॉय यांचे सहायक होते. गुलजार यांनी मीनाकुमारीला ‘मेरे अपने’मध्ये झळकवले होते. मीनाकुमारीने १९७२ साली जीवनयात्रा संपविली होती. मात्र, मीनाकुमारीच्या आठवणींनी ते आजही व्याकुळच होतात. ‘कोई होता जिसको अपना, हम अपना कहलाते यारो...पास न सही दूर ही होता, लेकिन होता कोई अपना...हे ‘मेरे अपने’तलं गुलजार यांचं गीत भावदर्द जागवतात.

    १९८८ साली ‘मिर्झा गालिब’ व ९३ साली ‘किरदार’ या छोट्या पडद्यावरील मालिका त्यांनीच केल्या होत्या. ‘चौरस रात (लघुकथा संग्रह)’, ‘जानम’ (कवितासंग्रह ) एक बूंद चॉंद (कवितासंग्रह), रावी पार (कथासंग्रह), रात चॉंद और मै, रात पश्मीने की, खराशें आदी त्यांची प्रमुख पुस्तके आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतले गुलजार यांचे योगदान वाघाचे आहे आणि त्यांना ‘भारतीय शायरीचं विद्यापीठ’चं म्हणायला हवं! चित्रपटाकडून ते आता त्याच्या पहिल्या प्रेमाकडे- साहित्याकडे वळले आहेत. केवळ स्वत:च्या लेखनापाशी न थांबता ते आता दुसऱ्यांच्या साहित्यातही लक्ष घालता आहे. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेचा अनुवाद केला आहे. ते लेखक म्हणून जगत नसतात आणि माणूस म्हणून जगत असतो तेव्हाही आनंदानं जगतो.

    सत्तरीच्या आसपास तो कॉम्प्युटर शिकले आणि आता ते रोज इंटरनेट वापरतात. भल्या सकाळी टेनिस खेळण्याचा त्यांचा ‘हेल्दी’ क्रम गेली तीस वर्षे अखंड चालू आहे. त्यांना उत्तमोत्तम खाण्यापिण्याची आवड आहे. डायबेटिसमुळे बंगाली मिठाई खाता येत नाही, हे त्यांचे दु:ख आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट
    https://www.youtube.com/watch?v=F3hX-yNPb2E

  • प्रख्यात मल्ल गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव

    अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणा-या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते.

  • अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार पांडुरंग दादोबा तर्खडकर

    संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली.