(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शिष्यप्रिय गुरू

    बीड येथे गुरूलिंग सोनवणे नामक सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक आहेत. ते शिरूरकासार (बीड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत होते. दरवर्षी नियमितपणे शासनाच्या चित्रकला परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट करत असत.

    मी आठवीत असताना चित्रकलेची आवड लक्षात घेऊन सरांनी मला परीक्षेस बसवले. बीड येथील मल्टिपर्पज शाळेत या परीक्षा होत. राहण्याची सोय तर नाही. मग सरांच्या बीड येथील घराशिवाय पर्याय नव्हता. तीन-चार दिवस वीस-पंचवीस मुले त्यांच्या घरी मोफत राहण्यासाठी असत. त्यांच्या अर्धांगिनी आनंदाने मुलांना जेवू घालत. अशावेळी गरीब विद्यार्थ्यांचा खर्च सर स्वत: करत असत. मुले परीक्षा देत. घरी जात. रंग, डीश, ब्रश, कागद हा कमी पडला की सोनवणे सर ते मोफत पुरवत असत. मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी सतत धडपडत असत.

    त्यांची दोन्ही मुले वैद्यकीय क्षेत्रात आहेत. त्यांचा चित्रसंग्रह अप्रतिम आहे. आमच्यासह अनेक मुले त्यांच्यामुळे संस्कारशील झाली. आमचे हस्ताक्षर आणि चित्र यावर त्यांचीच छाया आहे. आमच्या वडिलांशी ते सातत्याने संपर्क करत. आदरभाव जोपासत. मुलांची प्रगती आणि अडचणी याविषयी बोलत.

    असे गुरू भेटणे प्रत्येकाचे भाग्यच असते. विद्यार्थीदशेत असताना त्यांचे महत्त्व कळाले नाही; पण आज नतमस्तक होतोय.

    आज सरांचे सर्व विद्यार्थी नावारूपास आले आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. उतारवयात त्यांना चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा! त्यांचे आमच्या आयुष्यात येणे कलाटणी देणारेच आहे!

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, बीड

  • नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर

    नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. एका मागोमाग एक असे त्यांचे ७५ पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपूल नाट्यलेखन केले.

  • सुप्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर

    मो.ग.रांगणेकर यांनी अनेक नाटके लिहिली , दिग्दर्शित केली. त्यांनी संगीत अमृत , अलंकार , आले देवाजीच्या मना. संगीत आशीर्वाद , कन्यादान , संगीत कुलवधू , लिलाव , भेटला दिली ओसरी , हेही दिवस जातील हे नाटक त्यांनी सहलेखक म्ह्णून वसंत सबनीस आणि ग.दि . माडगूळकर याना घेऊन केले. अशी त्यांनी अनेक नाटके लिहिली .

  • लिला नायडू

    भारतीय पिता आणि आयरिश मातेपोटी जन्मलेल्या लिला नायडू यांनी १९५४ साली 'मिस इंडिया' हा बहुमान पटकावला होता. 'व्होग' नियतकालिकानेही जगातील पाच सौंदर्यवताइपैकी एक असा त्यांचा उल्लेख केला होता.

    त्यांचे पिता, डॉ. रामैय्या नायडू एक ख्यातनाम अणु संशोधक होते तर आई स्विस मुळाची भारतीय संस्कृतीची (Indology)अभ्यासिका होती – त्यांच्या कडूनच लीला नायडू यांना भारतीय आणि युरोपियन मिश्रित सौंदर्याचा वारसा मिळाला होता! त्यामुळेच त्यांच्या सौंदर्यातील वेगळेपणा हा त्या काळच्या हिरोइन्स (नर्गिस, मीना कुमारी इ.) मध्ये उठून दिसायचा.

    बलराज साहनी यांच्या 'अनुराधा' चित्रपटापासून नायडू यांनी १९६० मध्ये चित्रपटातील कारकिर्दीस प्रारंभ केला होता. बॉलीवूड मध्ये लीला नायडू सारखे आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या नायिका फारच कमी पहावयास मिळतील. "वोग" (Vogue ) सारख्या आंतरराष्ट्रीय आणि ख्यातनाम मासिकाने १९५०-६० च्या दशकात या आकर्षक आणि डौलदार व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्रीचा समावेश "जगातील १० अति सुंदर" महिलांमध्ये उगाचच केला नव्हता!

    हृषीकेश मुखर्जी यांनी डायरेक्ट केलेला "अनुराधा" हा लीला नायडू यांचा बॉलीवूड मधील पहिला चित्रपट! या चित्रपटात त्यांनी अशा एकाकी पडलेल्या पत्नीची भूमिका अतिशय उठावदार पणे केली कि जी आपले सारे गानविश्वातील करिअर आपल्या डॉक्टर पतीकरता (बलराज सहानी) करिता सोडून देते. या चित्रपटाची गणना एका महान बॉलीवूड चित्रपटांमध्ये होते.

    पंडित रविशंकर यांनी दिलेले अतिश्रवणीय संगीत (जाने कैसे सपनोमे, कैसे दिन बीते इ. गाणी) आणि बलराज सहानी यांचा दमदार अभिनय ह्या "अनुराधा" या चित्रपटाच्या इतर जमेच्या बाजू! या चित्रपटाला १९६१ चा भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि बर्लिन आंतराराष्ट्रीय फिल्मोत्सव पुरस्कार मिळाला!

    "येह रास्ते हैं प्यारके" हा त्यांचा अजून एक गाजलेला चित्रपट (१९६३)! ह्या चित्रपटाची कथा त्या वेळच्या गाजलेल्या "नानावटी प्रेमप्रकरण" यावर आधारित होती. ह्या चित्रपटात सुनील दत्त, रेहमान आणि लीला नायडू यांनी हा प्रेमाचा त्रिकोण अतिशय समर्थपणे साकारला आहे. खरे तर, ही अपारंपारिक भूमिका स्वीकारावयास त्या वेळच्या कोणत्याही प्रसिद्ध नायिका तयार नव्हत्या. पण लीला नायडू यांचा दाखविलेला धीटपणा त्यांच्या चांगलाच उपयोगी पडला आणि हा चित्रपट हिट ठरला!

    जेम्स आईव्हरी यांचा "The householder" (१९६३) आणि श्याम बेनेगल यांचा "त्रिकाल" (१९८५) हे लीला नायडू यांचे इतर गाजलेले चित्रपट! श्याम बेनेगल तर लीला नायडू यांच्या अभिनया बद्दल म्हणतात "It was a sheer haunting experience to work with Leela Naidu, who breethed innocence and serenity in her performance!”

    परंतु, इतक्या प्रतिभाशाली अभिनेत्रीला केवळ बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट मिळाले - कदाचित त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि तेजस्वी प्रतिभा त्यांच्या प्रगतीआड आली असावी!

    लीला नायडू यांचे वैयक्तिक आयुष्य तितके सुखकारक नव्हते. त्यांचे दोनदा लग्न आणि घटस्फोट झाले - टिक्की ओबेरॉय (ओबेरॉय हॉटेल्स चे मालक) आणि डोम मोरास (कवी आणि लेखक) यांच्याबरोबर! त्यांनी आपल्या जीवनाची शेवटची काही वर्षे एकाकीपाणेच घालविली. या एकटेपणात त्यांना जे. कृष्णमुर्ती यांच्या शिकवणुकीची खूप साथ मिळाली.

    लीला नायडू यांचे २८ जुलै २००९ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट

    सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी एक जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. त्यांचा जन्म १३ जून १९५१ रोजी झाला. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, चार दिवस प्रेमाचे, मोरुची मावशी अशा एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. नाटकांच्या तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारे निर्माते म्हणून सुधीर भट नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचे सुरुवातीला मोरुची मावशी हे नाटक प्रचंड गाजले. ‘ती फुलराणी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ या नाटकांना सुध्दा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. मराठी नाटक सातासमुद्रापार युरोप, अमेरिकेत नेण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या नाटकांना परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला.

    जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन, नाटकांचे परदेश दौरे, नवे विषय हाताळणे आणि नाट्यप्रयोगांचे विक्रम ही त्यांची वैशिष्ट्ये होती. नटांची अत्यंत काळजी घेणारे, इंटिरियर डिझायनिंग करणारे, उत्तम खवय्ये आणि तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालणारे म्हणून भट प्रसिद्ध होते. "मोरूची मावशी‘ हे नाटक प्रचंड गाजले. मात्र, "गांधी विरुद्ध गांधी‘ या नाटकाने व्यवसायात त्यांना खोट दिली. पण ते कधीच मागे हटले नाहीत. विजय चव्हाण, सुनील बर्वे, प्रशांत दामले यांची कारकीर्दही त्यांनी उभी केली.

    सुधीर भट यांचे निधन १४ नोव्हेंबर २०१३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ संगीतकार तिमिर बरन

    संगीतकार म्हणून तिमिर बरन हे कलकत्ता येथील न्यू थिएटर्सच्या तीन संगीत दिग्दर्शकांपैकी (आरसी बोरल आणि पंकज मलिक) एक होते. त्यांनी १९३५ मध्ये न्यू थिएटर्सच्या देवदास चित्रपटासाठी संगीत दिले. के एल सहगल यांनी गायलेले “बालम आओ बसो मोरे मन में” आणि के सी डे यांनी गायलेले “मत भूल मुसाफिर” ही या चित्रपटातील गाणी आजही प्रसिद्ध आहेत.

  • अष्टपैलू अभिनेते निळू फुले

    आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांनी नाट्य-चित्रसृष्टीवर कायमस्वरूपी ठसा उमटवणारे गंभीर प्रवृतीचे अभिनेते निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ रोजी पुणे येथे झाला.

    निलकांत कृष्णाजी फुले उर्फ निळूभाऊ सुरवातीच्या काळात वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात माळीकाम करत असत. हे पिढीजात काम करताना त्यांना मनापासून आनंद मिळत होता. याच क्षेत्रात करिअर करायचा त्यांचा विचार होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळं त्यांना नर्सरी उघडता आली नाही. तेव्हा मिळणाऱ्या ८० रुपये पगारातले दहा रुपये निळूभाऊ राष्ट्रसेवा दलाला देत होते.

    १९५७ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवादलासाठी येऱ्यागबाळ्याचे काम नोहे हे नाटक लिहिलं. या नाटकामुळं निळूभाऊंचे नाव झालं. मग त्यांनी माळीकाम सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

    राम नगरकरांसोबत त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची हे वगनाट्य गाजवलं. महाराष्ट्रभरात या दोघांचे नाव झालं. अनंत मानेंच्या एक गाव बारा भानगडी या तमाशापटात निळूभाऊंना सिनेमातील पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या झेले अण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली.

    पुढं १९७२ मध्ये निळूभाऊंनी विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर या नाटकात काम केले आणि या नाटकानं इतिहास घडवला. त्यांना स्वतःलाही बाइंडर आणि दळवींच्या सूर्यास्तमधले अप्पाजी या भूमिका विशेष आवडायच्या. अप्पाजी ही भूमिका तात्त्विक दृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील मूल्यांशी साधर्म्य सांगणारी होती, म्हणूनही असेल.

    बाइंडर नंतर तेंडुलकरांच्याच सामनामध्ये निळूभाऊंना हिंदूराव धोंडे पाटील साकारण्याची संधी मिळाली.शांतारामबापूंच्या पिंजरामुळं डॉ. श्रीराम लागूंचं मोठं नाव झालं होतं. सामनात निळूभाऊंचा सामना त्यांच्याशीच होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग लाभला.

    वास्तविक पिंजरात निळूभाऊ होतेच. त्यांची भूमिका छोटी होती. मात्र, मास्तरांकडं पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती, की हे केवळ निळूभाऊच करू जाणे. मास्तर म्हणजे डॉ. लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकावतात, हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटातील एक हायपॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती डॉ. लागूंना तेव्हाच आली होती. त्यामुळं सामना करताना दोघांनाही मजा आली. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि या साखरसम्राटांकडून सुरू झालेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावी होता. तेंडुलकरांनी हिंदूरावची भूमिका जबरदस्त लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी पुन्हा एकदा समर्थपणे न्याय दिला.

    सामना चित्रपटानंतर निळूभाऊंकडं अशाच पद्धतीच्या भूमिकांची रांग लागली. सगळेच चित्रपट काही एवढे दर्जेदार नसायचे. निळूभाऊंचाही पोटापाण्याचा व्यवसाय असल्यानं येतील त्या भूमिका कराव्या लागायच्या. बहुतेक वेळा टिपिकल खलनायक रंगवावा लागे. त्यात मग नायिकेच्या पदराला हात घालण्याचा प्रसंग अनेक वेळा यायचा. एरवी अत्यंत सच्छिल असलेल्या निळूभाऊंना वारंवार नायिकेवर बलात्कार करण्याचा सीन शूट करावा लागायचा. मराठी सिनेमांतल्या नायिकाही त्याच त्या असायच्या. कोल्हापुरातल्या मुक्कामात शेवटी ते वैतागून दिग्दर्शकाला म्हणाले, अरे, गेल्या तीन सिनेमांत मी तेच करतोय आणि बाईही तीच. निदान या खेपेला बाई तरी बदला...

    एक किस्सा सांगतात की एका मराठी कलाकाराने निळूभाऊंना घरी जेवायला बोलावलं होतं. त्या वेळी त्या कलावंताच्या आईनं, असल्या नालायक माणसाला मी जेवायला वाढणार नाही, असं म्हणून त्यांना जेवणही नाकारलं होतं. ही त्यांच्या भूमिकेची ताकद होती.

    त्यांच्या या नेहमीच्या पठडीतून बाहेर काढून, त्यांना एकदम प्रोटॅगनिस्टची भूमिका देण्यासाठी पुन्हा जब्बार पटेल धावून आले. अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांवर आधारित सिंहासन या चित्रपटात दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळूभाऊंच्या वाट्याला आली. सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ राहून, सिंहासनाचा सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका निळूभाऊंनी समरसून केली. या चित्रपटाचा शेवट मंत्रालयाच्या बाहेर खदाखदा हसत सुटलेल्या दिगूवर होतो. निळूभाऊंनी त्या हसण्यात त्या व्यवस्थेविषयीची सर्व प्रतिक्रिया एवढी टोकदारपणे व्यक्त केली होती, की तो चेहरा आजही डोळ्यांसमोरून हलत नाही.

    जब्बार पटेलांच्या बहुतेक सिनेमांत निळू फुले असायचेच. मग तो जैत रे जैत असो, की एक होता विदूषक असो.

    निळू फुले यांनी थोडे-फार हिंदी सिनेमेही केले. 'कुली'मध्ये ते अमिताभसमोर तेवढ्याच ताकदीनं उभे राहिले. महेश भटच्या 'सारांश'मध्येही त्यांना खलनायक साकारायला मिळाला. पण निळू फुले हिंदीत फार रमले नाहीत. त्यांना आपल्या गावरान मराठी सिनेमांचा ठसकाच अधिक भावत असावा.

    निळू फुले यांच्या व्यक्तित्वाचा आणखी एक विशेष म्हणजे ते निव्वळ अभिनेते नव्हते. त्याहीपलीकडं जाणारी,खऱ्या आयुष्यातली माणूस नावाची एक वास्तववादी भूमिका ते अगदी समरसून जगत होते. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेविषयी त्यांना कळवळा होता. शबनम, झब्बा अशा साध्या वेषात एरवी ते तसेही कार्यकर्ताच वाटत. राष्ट्रसेवा दल, डॉ राममनोहर लोहिया यांच्या विचारांची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध उपक्रमांना, संघटनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे.

    निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, 'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे.

    निळू फुले यांचे १३ जुलै २००९ रोजी निधन झाले.

    निळू फुले यांची कारकीर्द

    गाजलेली लोकनाट्ये

    कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.

    गाजलेले मराठी चित्रपट

    अजब तुझे सरकार, आई (नवीन), आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मानसा परीस मेंढरं बरी, मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सामना, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्या नार्या जिंदाबाद, हळदी कुंकू, हीच खरी दौलत.

    गाजलेले हिंदी चित्रपट

    कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के
    गाजलेली नाटकं, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर

    १९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले.

  • सरदार आबासाहेब मुजुमदार

    आबासाहेब मुजुमदार हे स्व तः उत्ताम सतारवादक होते. तंतूवाद्यावर त्यांंची हुकूमत होती. ते केवळ पाच मिनीटांत तंबोरा लावत असत. ब्रिटीश कालावधीत ते फर्स्ट क्लास सरदार होते. त्या काळात सरदार, इनामदार, जहागिरदार या सर्वांचा मतदार संघ होता. आबासाहेब मुजुमदार त्यााचे प्रतिनिधित्वी करत.

  • बॅटमॅन, जेम्स बाँड कॉमिक्सच्या माध्यमातुन प्रसिध्द करणारे डग्लस माँच

    डग्लस माँच हे प्रामुख्याने ओळखले जातात, ते त्यांनी लिहिलेल्या ‘बॅटमॅन’च्या कथांबद्दल! ‘बॅटमॅन’ व्यतिरिक्त, मून नाइट हा सुपरहिरो, ब्लॅक मास्क हा सुपरव्हिलन, डेथलॉकसारखा सायबॉर्ग, इलेक्ट्रिक वॉरिअर हा रोबॉट, सिक्स फ्रॉम सीरिअस हे विश्वातल्या आकाशगंगांमधले एजंट्स आणि मास्टर ऑफ कुंग फू अशा त्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत व्यक्तिरेखांची दुनिया डीसी कॉमिक्स आणि मार्व्हल कॉमिक्समधून बच्चेकंपनीचं वर्षांनुवर्षं मनोरंजन करत राहिली.