(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे

    फिरोजशा मेहता यांच्यानंतर राष्ट्रीय स्थान प्राप्त करणारे दुसरे नेते म्हणजे स. का. पाटील. भारतीय महापौरपदाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणारे ते एकमेव महापौर अशी इतिहासात नोंद आहे.

  • गीतकार, संगीतकार विवेक आपटे

    विवेक आपटे यांनी गेली तीस हून अधिक वर्षे चित्रपट, जाहीराती, जिंगल्स पबल्सीटी कँम्पेन, एकांकिका, नाटके, मालीकांची शिर्षक गीते, चित्रपट गीते असे भरपुर लेखन केले आहे.

  • लेखक जयवंत दळवी

    जयवंत दळवी यांच्या कादंबऱ्या आणि नाटके पाहिली तर मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे त्यात दिसतात.

  • जयललिता उर्फ अम्मा

    तामिळनाडूमधील अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात जयललिता जन्माला आल्या. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मैसूर मध्ये झाला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. कोमल वल्ली असे त्यांचे खरे नाव.

    मात्र, त्यांची आई प्रेमाने त्यांना 'अम्मो' या नावाने हाक मारत. वय अवघं दोन वर्षांचं असताना वडिलांचं निधन झालं आणि जयललितांच्या आईने कर्नाटक सोडून बंगळुरू गाठलं.जयललितांना कधीही चित्रपटात येण्याची इच्छा नव्हती. पण नाइलाजाने त्यांना चित्रपटांत यावे लागले. जयललितांच्या आईची दुसरी बहीण अमबुजावल्ली यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत आणले. सुरुवातीला त्यांनी लहान-लहान ड्रामा कंपनीत अभिनय केला त्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे मोर्चा वळवला.

    काही वर्षांनंतर जयललिताही मद्रासला गेल्या आणि त्यांनी प्रसिद्ध भारतनाट्यम गुरू वैजूवूर बीरमैया पिल्लई यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले. मायलापूरच्या एका ऑडिटोरियममध्ये जयललितांचा कार्यक्रम झाला त्यावेळी तत्कालीन सुपरस्टार शिवाजी गणेशन त्यांच्यावर भलतेच इम्प्रेस झाले. त्यांनी जयललिताला चित्रपटात अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार १५ वर्षांच्या असताना त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली व जयललिता यांनी १७ व्या वर्षी लीड अॅक्ट्रेस म्हणून ‘वेनिरा अडाई’ हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.

    पहिल्या चित्रपटानंतर जयललिता यांना अनेक प्रकारच्या ऑफर यायला सुरुवात झाली होती. पण जयललितांना शिक्षण सुरू ठेऊन वकील बनायचे होते. त्यांच्या आईचीही तशीच इच्छा होती. पण घरची आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी अभिनय करण्याखेरीज दुसरा पर्याय जयललितांकडे नव्हता. अभिनयाच्या कामाच्या मोबदल्यात त्यांना लगेचच पैसे मिळायचे. त्यानंतर चित्रपट हेच जयललिता यांचे करियर बनले. त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांत अभिनय केला. त्या दक्षिणेतील सुपस्टार बनल्या होत्या. शर्मिला टागोर यांच्याशी त्यांची तुलना होऊ लागली होती. त्या काळातील फेमस ब्रँड लक्सने त्यांना साईन केले. राजकारणात सक्रिय होईपर्यंत जयललिता हे तमीळ चित्रपटसृष्टीत आघाडीचं नाव होतं.

    राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता तरुणपणात त्या काळच्या लोकप्रिय नायिका होत्या.जयललिता यांनी हिंदी चित्रपट इज्जत मध्येही काम केलं होतं. या चित्रपटात जयललितांसोबत धर्मेंद्र यांनी काम केलं. जयललिता यांनी एमजीआर यांच्यासोबत जवळपास २८ चित्रपटांत काम केलं आहे. जयललिता या शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जात. जयललिता या AIADMKचे संस्थापक एमजी रामचंद्रन ऊर्फ एमजीआर यांच्या जवळच्या समजल्या जायच्या. जयललिता यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकत एमजीआर यांच्यासोबत सक्रिय राजकारणात प्रवेश केला.एम. करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष फुटल्यानंतर एमजीआर यांनी AIADMK या पक्षाची स्थापना केली. एमजीआर यांनी १९८३ साली जयललिता यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली आणि त्यांना राज्यसभेवर पाठवलं.

    एमजीआर आणि जयललिता यांच्यात मतभेदाच्या अनेक बातम्या आल्या. त्यानंतर जयललिता यांनी १९८४ मध्ये AIADMK या पक्षाचं प्रचार अभियानाचं नेतृत्व केलं.एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी मजबूतपणे पक्षाची कमान सांभाळली आणि १९९१ मध्ये निवडणूक जिंकून त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. १९९६ च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तरीही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम राहिला. जयललिता यांनी १९९१, १९९६, २००२, २००६, २०११, २०१४ आणि २०१५ ला तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होते. जयललिता यांचे ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=2yN-YJHQvq8

  • ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट

    डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही होते. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटत असे.

  • प्रसिद्ध क्रांतिकारक उमाजी नाईक

    उमाजी खंडोबाचा भक्त होते. त्यांच्या पत्रावर ‘खंडोबा प्रसन्न’ असे शीर्षक दिसते. त्यांचा भाऊ आमृता याने सत्तू बेरडाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला (१८२४-२५). या लुटीमध्ये उमाजींची भूमिका महत्त्वाची होती.

  • लेखक अशोक कुमार बैंकर

    त्यांच्या लेखनात गुन्हेगारी थ्रिलर्स, निबंध, साहित्यिक टीका, कथा यांचा समावेश असतो. त्यांचे आठखंडी रामायण विशेष गाजलं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित मालिका आल्या आणि गाजल्या आणि आता फिल्म्स येत आहेत.

  • जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर

    रिओ ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणारी जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर चा जन्म ९ ऑगस्ट १९९३ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला.

    भारताची 'जिमनॅस्ट क्वीन' अशी तिची ओळख असलेल्या दीपा कर्माकरने जेव्हा पहिल्यांदा जिम्नॅस्टिक स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा तिच्याकडे जोडेदेखील नव्हते. वयाच्या सहाव्या वर्षापासून ती जिम्नॅस्टिक कोच बिश्वेशर नंदी यांच्या मार्गदर्शनात ट्रेनिंग घेत आहे. जन्मापासूनच दीपाचे पाय फ्लॅट आहे आणि जिम्नॅस्टिक सारख्या खेळासाठी हे बाधक असतं. असे पाय असणार्यांनना उडी मारल्यानंतर जमिनीवर लँड करताना बॅलेस करण्यात त्रास झेलावा लागतो. परंतू दीपाने अथक परिश्रम आणि अभ्यासाने आपली ही कमी दूर केली. २००७ च्या राष्ट्रीय खेळांमध्ये शानदार प्रदर्शनानंतर दीपाचा उत्साह वाढला आणि ती अधिक अभ्यास करू लागली. दीपाने २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते.

    २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर दिपा कर्माकरच्या नावाची चर्चा सूरू झाली होती. पण, तिला प्रसिद्धी मिळवून दिली ती ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर... शांत, लाजरी, स्वतःच्याच कोशात राहणारी दिपा स्टार बनली. पण, तिने आपले पाय जमिनीवरच ठेवले.

    २०१५ च्या आशियाई जिम्नॅस्टीक्स अजिंक्यपद स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकणा-या दिपाला २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. दुखापतीनंतर ती बराच काळ स्पर्धेपासून दूर होती आणि तिने वर्ल्ड चँलेंज स्पर्धेतील सुवर्णपदकाने कमबॅक केले.

    रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या दीपा कर्माकरने भारताला जिमनॅस्टचे वेड लावलं. तिच्यामुळे जिमनॅस्टीक या खेळाकडे गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं. मागल्या वर्षी संपन्न झालेल्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये तिने प्रोडूनोवा जिम्नॅस्टमध्ये अंतिम पाचामध्ये जागा बनवली आणि आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक संघाने तिला विश्व स्तरीय जिम्नॅस्टच्या पंक्तीत बसवले. दीपा कर्माकरनं आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ७७ हून अधिक पदकांची कमाई केली आहेत आणि त्यात ६७ सुवर्णपदकं आहेत. FIG आर्टिस्टीक जिमनॅस्टीक जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. तिच्या या कामगिरीची दखल 'बार्बी डॉल' या प्रसिद्ध कंपनीनंही घेतली आणि त्यांनी चक्क दीपा कर्माकरच्या रूपाची बार्बी डॉल तयार केली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे

    टीव्ही आणि आकाशवाणीसाठी त्यांनी तब्बल पन्नासच्यावर सुंदर जिंगल्स लिहिल्या. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बन्या बापू’ या मराठी चित्रपटाची सर्व गीते प्रचंड गाजली. ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’, ‘मी कशाला आरशात पाहू गं…’, ‘अरे ले लो भाई चिवडा लेलो’, ‘हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज’ ही चार गाणी उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल यांनी गायलेली, तर संगीत दिले होते ऋषी-राज या संगीतकाराने.

  • अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक – प्रदीप ताम्हाणे

    अत्यंत मृदू आवाज, मवाळ प्रकृतीचे प्रदीप ताम्हाणे भारतीयत्वाने पेटून उठले आणि स्वत: मधील कणखर भारतीयाचे जगाला दर्शन घडवित पावडर कोटींगमधील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची निर्मिती केली. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहे. प्रदीप ताम्हाणेंसारखे देशभक्त उद्योजक हे खऱ्या अर्थाने भारताचं नाव समृद्ध करत आहेत. अशा या मराठमोळ्या उद्योजकाच्या महान कार्यास मानाचा मुजरा आणि खुप खुप शुभेच्छा…!!