(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता

    जयललिता उर्फ अम्मा यांचे निधन

    जयललिता यांची माहिती

    जन्म. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी तामिळनाडूमधील अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात जयललिता जन्माला आल्या. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मा.जयललिता नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. कोमलावल्ली (मा.जयललितांचे जुने नाव) जयललितांना कधीही चित्रपटात येण्याची इच्छा नव्हती. पण नाइलाजाने त्यांना चित्रपटांत यावे लागले. जयललितांच्या आईची दुसरी बहीण अमबुजावल्ली यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत आणले. सुरुवातीला त्यांनी लहान-लहान ड्रामा कंपनीत अभिनय केला त्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे मोर्चा वळवला. काही वर्षांनंतर जयललिताही मद्रासला गेल्या आणि त्यांनी प्रसिद्ध भारतनाट्यम गुरू वैजूवूर बीरमैया पिल्लई यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले. मायलापूरच्या एका ऑडिटोरियममध्ये जयललितांचा कार्यक्रम झाला त्यावेळी तत्कालीन सुपरस्टार शिवाजी गणेशन त्यांच्यावर भलतेच इम्प्रेस झाले. त्यांनी जयललिताला चित्रपटात अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार १५ वर्षांच्या असताना त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली व जयललिता यांनी १७ व्या वर्षी लीड अॅक्ट्रेस म्हणून ‘वेनिरा अडाई’ हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.

    पहिल्या चित्रपटानंतर जयललिता यांना अनेक प्रकारच्या ऑफर यायला सुरुवात झाली होती. पण जयललितांना शिक्षण सुरू ठेऊन वकील बनायचे होते. त्यांच्या आईचीही तशीच इच्छा होती.

    पण घरची आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी अभिनय करण्याखेरीज दुसरा पर्याय जयललितांकडे नव्हता. अभिनयाच्या कामाच्या मोबदल्यात त्यांना लगेचच पैसे मिळायचे. त्यानंतर चित्रपट हेच जयललिता यांचे करियर बनले. त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांत अभिनय केला. त्या दक्षिणेतील सुपस्टार बनल्या होत्या. शर्मिला टागोर यांच्याशी त्यांची तुलना होऊ लागली होती. त्या काळातील फेमस ब्रँड लक्सने त्यांना साईन केले. राजकारणात सक्रिय होईपर्यंत जयललिता हे तमीळ चित्रपटसृष्टीत आघाडीचं नाव होतं. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता तरुणपणात त्या काळच्या लोकप्रिय नायिका होत्या.जयललिता यांनी हिंदी चित्रपट इज्जत मध्येही काम केलं होतं. या चित्रपटात जयललितांसोबत धर्मेंद्र यांनी काम केलं. जयललिता यांनी एमजीआर यांच्यासोबत जवळपास २८ चित्रपटांत काम केलं आहे. जयललिता या शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जात. मा.जयललिता या AIADMKचे संस्थापक एमजी रामचंद्रन ऊर्फ एमजीआर यांच्या जवळच्या समजल्या जायच्या. जयललिता यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकत एमजीआर यांच्यासोबत सक्रिय राजकारणात प्रवेश केला.एम. करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष फुटल्यानंतर एमजीआर यांनी AIADMK या पक्षाची स्थापना केली. एमजीआर यांनी १९८३ साली जयललिता यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली आणि त्यांना राज्यसभेवर पाठवलं.एमजीआर आणि जयललिता यांच्यात मतभेदाच्या अनेक बातम्या आल्या. त्यानंतर जयललिता यांनी १९८४ मध्ये AIADMK या पक्षाचं प्रचार अभियानाचं नेतृत्व केलं.एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी मजबूतपणे पक्षाची कमान सांभाळली आणि १९९१ मध्ये निवडणूक जिंकून त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. १९९६ च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तरीही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम राहिला. जयललिता यांनी १९९१, १९९६, २००२, २००६, २०११, २०१४ आणि २०१५ ला तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • जुने शाहीर पठ्ठे बापूराव

    पठ्ठे बापूरावांचे खरे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. पठ्ठे बापूराव यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरे हरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली येथे झाला.

    ग्रामीण भागात गायल्या जाणार्‍या जात्यावरच्या ओव्यां ऐकूनऐकून पठ्ठे बापूराव यांनी त्यात ही नवे बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी ` लोकप्रियता मिळाली. त्याचा परिणाम औंधच्या राजांनी दखल घेऊन पठ्ठे बापूराव यांना आपल्याकडे बोलवून घेतले. पठ्ठे बापूराव यांचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. ब्राह्मण आणि कुलकर्णीपद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरुन तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !! ` ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन `हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागे. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले.

    नंतर हे शाहीर, मुंबईत आले, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुळवडकरांच्या फडातील पवळा, नामचंद पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातत पसरली. १९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी' चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करून स्वत:चा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्याप स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही.

    पठ्ठे बापूराव यांचे २२ डिसेंबर १९४५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • उर्दूतले नामवंत लेखक – के.ए.अब्बास

    ख्वाजा अहमद अब्बास उर्फ के. ए.अब्बास हे हाडाचे पत्रकार होते. उर्दूतले नामवंत लेखक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण निर्माते-दिग्दर्शक कथा-पटकथाकार के. ए.अब्बास यांचा जन्म ७ जून १९१४ रोजी पानीपत, हरियाणा येथे झाला. त्यांनी ४६ वर्षे ‘लास्ट पेज’ हा स्तंभ सुरुवातीला ‘बॉम्बे क्रॉनिकल’ व नंतर ‘ब्लिटज’मध्ये लिहिला. राज कपूर यांचे व आर. के. फिल्म्सचे लाडके लेखक कथा-पटकथाकार म्हणून के.ए.अब्बास यांची ओळख होती. १९५१ साली ‘आवारा’ या सिनेमाची पटकथा आणि संवाद अब्बास यांची होते. पुढे अब्बास यांनी श्री ४२०’, ‘जागते रहो’, मेरा नाम जोकर, बॉबी चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या होत्या. आपल्या पटकथांनी एक वेगळा विचार मांडणारे आणि समाजातील विषमतेला अधोरेखित करणारी स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. के. ए.अब्बास यांनी शंभरच्या वर पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं आहे.

    व्ही.शांताराम यांचा ‘डॉ. कोटनीस की अमर कहाणी’ हा चित्रपट अब्बास यांच्या ‘And One Did Not Come Back’ च्या कथेवर बेतला होता. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चित्रपट करियरची सुरवात ख्वाजा अहमद अब्बास यांच्या निर्देशनाखाली बनलेली सात हिंदुस्तानी मधल्या सात कलाकाराच्या पैकी एका कलाकाराच्या स्वरुपात केली होती. के. ए.अब्बास यांच्या शहर और सपना या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने १९६९ साली के. ए.अब्बास यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. के. ए.अब्बास यांचे इतर चित्रपट ‘धरती के लाल’, ‘शहर और सपना’, ‘दो बूंद पानी’, सात हिंदुस्तानी, नया संसार, नीचानगर, शहर और सपना, धरती के लाल, परदेसी. अभिनेता शाहिद कपूरचे ते पणजोबा होत. के. ए.अब्बास यांचे १ जून १९८७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • अभिनेते व नाटककार विष्णु हरी औंधकर

    बालवयातच त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळीत स्त्रीपार्ट करण्यासाठी प्रवेश केला. तेथे त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘शिवसंभव’, ‘कांचनगडची मोहना’ इत्यादी नाटकांतून कामे केली. त्याच वेळेस दादासाहेब फाळके ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटात भूमिका करण्यासाठी ते नट मंडळी शोधत होते. त्यांच्या नजरेत औंधकर आले व त्यांनी औंधकर यांना आपल्या चित्रपटात भूमिका दिली.

  • चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने

    राजा नेने यांनी आपल्या कामाची सुरवात प्रभात फिल्म कंपनी पासून केली. त्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९१२ रोजी झाला. व्ही शांताराम यांनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडल्यावर दामले-फत्तेलाल यांचे सहकारी दिग्दर्शक राजा नेने यांनी रामशास्त्री चित्रपट हा हिंदी-मराठी दिग्दर्शित केला. रामशास्त्री अर्धा तयार झाल्यावर राजा नेने यांनी १९४३ नोव्हेंबरमध्ये प्रभात कंपनी सोडली. नंतर राजा नेने यांनी पहिली तारीख या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. राजा नेने यांचे निधन २१ फेब्रुवारी १९७५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बारकोडचे सहसंशोधक जॉर्ज लॉरर

    आयबीएम कंपनीत काम करीत असताना जॉजॅ लॉरर यांनी युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड म्हणजे बारकोड विकसित केले होते. हा बारकोड वाचण्यासाठी लागणारा स्कॅनरही त्यांनी विकसित केला.

  • गझल किंग जगजित सिंह

    जगजीत सिंह यांच्या वडिलांनी त्यांचे गायनातील गुण हेरून त्यांना पं. छगनलाल शर्मा यांच्याकडे पाठविले. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला. त्यांच्याकडे गायनाचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर उस्ताद जमाल खान यांच्याकडे सहा वर्षे खयाल, ठुमरी आणि द्रुपद हे गायनप्रकार पक्के करून घेतले. त्यांनी केवळ गझल गायनाबरोबरच शास्त्रीय संगीत, भक्तीसंगीत आणि लोकसंगीतातही मौलिक योगदान दिले आहे. १९७० मध्ये चित्रा यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्यावर ७० ते ८० च्या दशकात या दांपत्याने गझलविश्वामत प्रचंड प्रसिद्धी मिळविली होती. या दशकात या दांपत्याच्या गझला घराघरात पोहोचल्या होत्या. हृदयाला भिडणार्याो गझला ही त्यांची खाशियत होती. त्यांच्या पत्नी चित्रा सिंग या सुद्धा प्रसिद्ध गझल गायक होत्या. त्यांनी पत्नी चित्रा सिंग हिच्यासह मैफिली सादर करून गझल रसिकांच्या हृदयात जागा मिळविली होती. १९७६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘अनफरगेटेबल’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजतागायत त्यांच्या नावावर ‘आईना’, ‘चिराग’, ‘कहकशॉं’ असे जवळपास ८० अल्बम आहेत. मेहंदी हसन, नूर जहॉं, बेगम अख्तर आणि तलत महमूद या गझलांच्या चमचमत्या दुनियेत ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने है’, ‘ओठोंसे छू लो तुम’ अशी अविस्मरणीय गझलांनी जगजीत सिंह यांनी आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले. त्यानंतर ‘अर्थ’, ‘प्रेमगीत’, ‘सरफरोश’, ‘तरकीब’ अशा अनेक चित्रपटांनाही त्यांनी आवाज दिला होता. प्रसिद्ध कवी गुलजार यांच्या काव्यांना मिर्झा गालिब यांच्या ढंगात पेश करत अक्षरश: तेव्हाच्या पिढीला वेड लावले. गजल आणि शायरीचा जनक मिर्झा गालिब सर्वसामान्यांच्या घराघरात मनामनात पोहोचवला. दुसरा महत्त्वपूर्ण अल्बम म्हणजे ‘संवेदना’ माजी पंतप्रधान अटलजींच्या शब्दांना स्वरसाज. शब्दांनाही मंत्राचे सामर्थ्य बहाल करण्याची ताकद लाभलेले कवि अटलबिहारी वाजपेयी यांच्या लेखणीतून साकारलेल्या शब्दांना जगजित सिंग यांनी गेय रूप दिले. मुळात अटलजींच्या कविता गेय रूपात आणणे अवघड काम, पण ते जगजित सिंग यांनी लिलया पेलले. अटलजींचे शब्द, जगजित सिंग यांचा आवाज अमिताभ आणि गुलजार यांच्या दमदार प्रस्तावना अशा सुरेल संगमातून एक अजरामर काव्य रसिकांना अस्वादता आले. ‘क्या खोया क्या पाया’ हे त्यातील गीत रसिकांना खूपच भावले. त्यांनी केवळ उर्दू आणि हिंदी भाषांतच गझला गायिल्या नाहीत तर पंजाबी, बंगाली, गुजराती, सिंधी आणि नेपाळी भाषांतूनही गाणी गायिली आहेत. जगजित सिंह यांच्या मेरी जिंदगी किसी और की..., मेरा नाम का कोई और है..., होशवालों को खबर क्या... अशा गझल खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी सरफरोश, तरकीब या हिंदी चित्रपटांमध्ये गझल गायली होती. भारत सरकारने त्यांच्या या सांस्कृतिक योगदानाची दखल घेऊन २००३ मध्ये त्यांना पद्मभूषण किताबाने गौरवांकित केले होते.

    जगजित सिंह यांचे १० ऑक्टोबर २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • क्रांतिकारक मंगल पांडे

    ३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. “मर्दहो, उठा !” अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, “आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!”

  • प्रसिद्ध क्रांतिकारक उमाजी नाईक

    उमाजी खंडोबाचा भक्त होते. त्यांच्या पत्रावर ‘खंडोबा प्रसन्न’ असे शीर्षक दिसते. त्यांचा भाऊ आमृता याने सत्तू बेरडाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला (१८२४-२५). या लुटीमध्ये उमाजींची भूमिका महत्त्वाची होती.

  • समाजसेविका ताराबाई मोडक

    शिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर इ.स. १९३९ पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. १९४६ ते १९५१ अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते.