(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश

    कवी गिरीश यांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.

    कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली. कवी गिरीश यांचे ०४ डिसेंबर १९७३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • हिंदी सिनेमाचे ‘शोमॅन’ म्हणून ओळखले जाणारे राज कपूर

    पेशावरहून मुंबईत वडिल पृथ्वीराज कपूरसोबत आलेल्या राजकपूर यांना पृथ्वीराजनी सल्ला दिला होता, की त्याने करिअरची सुरुवात खालच्या स्तरावरुन करावी, तरच तो वरिष्ट पातळी गाठू शकेल. वडिलांचा हा सल्ला मानत १७ वर्षीय राज कपूर यांनी ‘रंजीत मुव्हीकॉम’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’ फिल्म प्रॉडक्शनमध्ये ‘स्पॉट बॉय’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

  • सिंहासन’कार अरुण साधू

    अरुण साधू यांनी पत्रकारिता केलीच परंतु त्यांनी स्तंभलेखक ते कथाकार , कादंबरीकार , विज्ञानलेखक , इतिहास लेखक म्हणून भरपूर लेखन केले. १९९५ पासून २००१ पर्यंत ते पुणे विद्यापीठमध्ये वृत्तपत्रविद्या आणि संपादन विभाग येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.

  • ज्येष्ठ दिग्दर्शक रामचंद्र ठाकुर

    रामचंद्र हे ठाकूर हिंदी आणि गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक होते. रामचंद्र ठाकूर यांची खासियत ही होती की ते अकरा भाषा बोलणारे बहुभाषी होते. ते पाली भाषेचे अभ्यासक होते.

  • मराठीतील निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार सुधीर गाडगीळ

    मराठीतील निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार मा.सुधीर गाडगीळ यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९५० रोजी झाला.
    सुधीर गाडगीळ यांनी विविध क्षेत्रातील २८०० हून अधीक नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. या मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्योगपती शंतनु किर्लोस्कर, अभिनेत्री माधुरी दिक्षित, चित्रकार मकबूल फिदा हुसेन, गायक आशा भोसले, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण. यांचा समावेश आहे.

    त्यांच्या मुलाखती म्हणजे मान्यवरांशी मारलेल्या अनौपचारिक दिलखुलास गप्पा असतात. प्रास्ताविक आणि पाहुण्यांची नावं तपासत लाडे लाडे निवेदन करण्याच्या काळात मा.सुधीर गाडगीळ यांनी स्वत:चं मुलाखतकार आणि निवेदक म्हणून हुकमी स्थान निर्माण केलं. त्यासाठी पत्रकारितेतील अनुभवाचा त्यांना खूपच उपयोग झाला. सुधीर गाडगीळ यांची कारकिर्द १९७० च्या सुमारास सुरु झाली. १९७१ मध्ये मुंबईत ‘तेजस्वी’ साप्ताहिक सुरू झाले होते. तिथे ते मुंबईचा ब्युरो इन्चार्ज म्हणून काम करू लागले. कॉमर्समधून पदवी घेतल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रची ऑर्डर हातात असतानाही मा.सुधीर गाडगीळ ‘मनोहर’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम करू लागले.

    १९७३ ते १९८० पर्यंत त्यांनी ‘मनोहर’मध्ये काम केलं. ‘मनोहर’ ही त्यांची शेवटची नोकरी. त्यानंतर मुक्तपत्र कारिता केली. ‘मुलखावेगळी माणसं’ ‘प्रतिमा आणि प्रतिभा’, ‘गजरा’, ‘युवदर्शन’, ‘मुखवटे आणि चेहरे’ असे अनेक दूरदर्शन साठी कार्यक्रम त्यांनी केले. विशेष म्हणजे, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर या मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रकट मुलाखती घेण्याचा मान सुधीर गाडगीळ यांच्या कडे आहे. मा.आशा भोसले यांच्या जाहीर मुलाखती तर ते सलग २७ वर्ष घेत आहेत. जुलै १९८५ मध्ये त्यांनी आशा भोसले यांची पहिल्यांदा मुलाखत घेतली.

    प्रकट मुलाखती घेण्याच्या बाबतीत तर मा.सुधीर गाडगीळ यांच्या नावावर राष्ट्रीय उच्चांक आहे. त्यांनी आतापर्यंत ३ हजार ६८२ प्रकट मुलाखती घेतल्या आहेत. त्यांनी टीव्हीवर घेतलेल्या मुलाखतींवर आधारित ‘मुलखावेगळी माणसं’ असा एकपात्री स्वतंत्र कार्यक्रम केला. पण, तो फक्त परदेशांकरिता. टीव्हीवर त्याच नावाचा कार्यक्रम होता. पण, तो वेगळा होता. तिथे मी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या होत्या आणि इथे त्यांनी घेतलेल्या सगळया माणसांचं मुलखावेगळंपण एकत्र किस्से-कथनाच्या माध्यमातून मांडत होतो.

    अमेरिकेतल्या तर ५१ शहरांमध्ये आठ वेळा जाऊन त्यांनी हा कार्यक्रम केला. दक्षिण पूर्व अमेरिका, मॉरिशस, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, आफ्रिका अशा सर्व ठिकाणी महाराष्ट्र मंडळातून हे कार्यक्रम केले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    सुधीर गाडगीळ यांची माहिती, मुलाखत वाचण्यासाठी
    http://mulakhat.com/sudhir-gadgil/
    http://thinkmaharashtra.com/node/1885

  • स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक पांडुरंग खानखोजे

    स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक – इंग्रजांची जगातून सत्ता उलथवून टाकण्याचे स्वप्न अगदी बालपणापासून पाहणारा एक मुलगा संशोधन करून मेक्सिकोला अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवतो. असा हा स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक म्हणजे पांडुरंग सदाशिव खानखोजे.

  • विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारे

    पुण्यात वडिलांच्या नाटकांतून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या सतीश तारे यांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्त मुशाफिरी केली. ‘ऑल लाइन क्लीअर’ या सस्पेन्स कॉमेडीद्वारे त्यांनी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर प्रथम पदार्पणातच आपली नाममुद्रा उमटविली.

  • कसोटीतील सर्वात अनुभवी पंच स्टीव्ह बकनर

    स्टीव्ह बकनर हे वेस्ट इंडीज अनुभवी पंच. स्टीव्ह बकनर यांनी डिकी बर्ड यांचा विक्रम २००२ मध्ये मागे टाकून २००५ मध्ये कसोटीत १०० सामन्यात पंचगिरी करणारे ते पहिले पंच ठरले होते. बकनर यांनी १९९२, १९९६, १९९९, २००३ व २००७ च्या वर्ल्ड कप फाइनल मध्ये अम्पायरिंग केले होते. हे एक रेकॉर्ड आहे.

  • लघु लिपीचे(shorthand) जनक सर आयझॅक पिटमॅन

    अठराव्या शतकाच्या मध्याला सर आयझॅक पिटमन यांनी विकसित केलेली इंग्रजी लघुलेखन कला अलीकडे झपाट्याने वाढ होत असलेल्या संगणक युगामुळे हळूहळू लोप पावताना दिसत असली, तरी सुमारे पाच दशकांपूर्वी इंग्रजी लघुलेखन व जोडीला टंकलेखन शिकणे हा कित्येक मध्यमवर्गीयांचा झटपट नोकरी मिळवण्याचा सर्वांत स्वस्त व परवडणारा पर्याय होता.

  • ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे

    दिलखुलास आणि प्रसन्न साहित्यिक शं. ना. नवरे यांनी कथा, ललित कथा, नाटक, ललित अशा सर्वच प्रांतांत संचार केला. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. मध्यमवर्गीय घरांतील सुख, दु:ख, वेदना त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांचे लेखन स्वप्नात रंगणार आणि सदैव जीवनावर प्रेम करणारे होते. स्वप्न संपले तर जगण्याचा अर्थच निघून जाईल, असे त्यांचे मत होते शंनांच्या लेखनानं वाचकांना कधी अंतर्मुख केलं तर प्रसंगी रिझवलेही. त्यांचे शंकर नारायण नवरे हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचित होते.

    तरीही त्यांना शंना म्हणून ओळखले जायचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण डोंबिवलीतल्या लोकल बोर्ड शाळेत तर माध्यमिक शिक्षण डोंबिवलीच्या इंग्लिश स्कूलमध्ये आणि दादरच्या किंग जॉर्ज शाळेत झाले.
    १९४५ मध्ये शालांत परीक्षा पास झाल्यावर त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स, सिद्धार्थ कॉलेज आणि पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. १९४९ साली त्यांनी बी.एस्सीची पदवी मिळवली. काही काळ त्यांनी मंत्रालयात शासकीय नोकरीही केली मात्र काही काळानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सामान्य, मध्यमवर्गियांच्या जाणीवा, सुख-दु:खाच्या व्यथा आणि वेदना त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीतून, रंगमंचीय अविष्कारातून समाजासमोर आणल्या. कथा, ललित लेख, नाटक, चित्रपट पटकथा, वृत्तपत्रीय व नियतकालिकांतील स्तंभ अशा विविध माध्यमांतून ‘शन्नां’नी लेखन केले, पण ‘शन्ना’ खऱ्या अर्थाने खुलले आणि रमले ते कथेच्या विश्वात. १९५१ नंतर नवकथेचा बहारीच्या काळात ‘शन्नां’चीही प्रतिभा बहरली. मात्र कोणत्याही एका लेखन प्रकारात ते कधीच अडकून पडले नाहीत. वाचकांना अंतर्मुख करणारी, खुसखुशीत मध्येच हास्याची लकेर, चिमटे घेणारी ‘शन्नां’ची लेखणी तितक्याच ताकदीची रंगमंचीय पात्रे उभी करू शकली.

    शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले. त्यांची अनेक पुस्तके आणि नाटके गाजली आहेत. यामध्ये ‘धुक्यात हरवली वाट’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय’ ही नाटकं गाजलीत तर ‘वारा’, ‘झोपाळा’, ‘मेणाचे पुतळे’, ‘शहाणी सकाळ’ हे कथासंग्रह तसेच ‘निवडुग आणि इंद्रायणी’, ‘संवाद’, ‘सुरुंग’ या कादंबऱ्या गाजल्यात. डोंबिवली गावावर त्यांचे अतोनात प्रेम होते. ‘डोंबिवली भूषण’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होतेच पण ते खऱ्या अर्थाने या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीतील महत्त्वाचा दुवाही होते. डोंबिवलीविषयी त्यांच्या मनातले ममत्व कायम होते त्यामुळेच नातेवाईक तसेच मित्रांनी आग्रह करूनही त्यांनी मुंबईत कायमचे वास्तव्य केले नाही. नोकरीनिमित्त मुंबई ही फक्त त्यांची कर्मभूमीच राहिली.

    डोंबिवलीत झालेल्या २००३ सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. मा.शन्ना नवरे यांचे २५ सप्टेंबर २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट