(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतीय क्रिकेटपटू सी. एस. नायडू

    ते जेव्हा क्षेत्ररक्षण करण्यास येत असत तेव्हा ते निळी कॅप घालत असत परंतु ते गोलंदाजी करत असताना ते ती कॅप बदलून रंगीत टोपी घालत. फलंदाज म्हणून ते बिग हिटर होते , त्यांनी मारलेला उतुंग षटकार साईट स्क्रीनवर अनेकवेळा आदळत असे. मला आठवतंय त्यांना सुमारे २२ वर्षांपूर्वी मी पत्र लिहिले होते , त्यांचे उत्तर आले अर्थात ते पत्र त्यांच्या कुटूंबातील कोणीतरी लिहिले होते आणि पत्राखालील स्वाक्षरी मात्र त्यांची होती.

  • संगीतकार एस.एन.त्रिपाठी

    श्रीनाथ त्रिपाठी उर्फ एस.एन.त्रिपाठी यांची धार्मिक आणि पौराणिक चित्रपट अधिक संख्येने वाट्याला येऊन देखील सातत्याने श्रवणीय गाणी देणारे संगीतकार म्हणून ओळख होती.

    त्यांचा जन्म १४ मार्च १९१३ रोजी झाला. पौराणिक चित्रपट संगीताचा बादशाह म्हणून ते प्रसिद्ध होते.

    एस.एन.त्रिपाठी यांचे आजोबा पंडित गणेशदत्त त्रिपाठी काशी येथील संस्कृत विद्यापीठाचे प्राचार्य, तर वडील पंडित दामोदरदत्त त्रिपाठी हे काशीच्याच सरकारी विद्यापीठाचे प्राचार्य. त्यामुळे श्री नाथजींचं शालेय शिक्षण वाराणसी येथे, बी.एस्सी. झाल्यावर अलाहाबाद विद्यापीठातून संगीतविशारद एन.व्ही. भातखंडें यांच्या विद्यालयातून, संगीत प्रवीण प्रयाग संगीत समितीतून तर लाइट क्लासिकल शिक्षण लखनौ येथील मैना देवींकडे झालं. या शिदोरीवर त्यांनी थेट मुंबई गाठली अन बॉम्बे टॉकीजला येऊन मिळाले. व्हायोलनिस्ट म्हणून पगार होता १००/-.

    त्यांना गायक म्हणून संधी मिळाली ती ‘जीवननैया’ मध्ये. ‘ऐरी दैया लचक लचक चलो..’ हे पहिलं गाणं. चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँझ ऑस्टिन. बाँबे टॉकीज सोडल्यावर पहिला ब्रेक मिळाला संगीत दिग्दर्शनासाठी तो १९४१च्या ‘चंदन’साठी. पहिलं गाणं- ‘नन्हासा दिल देती हूँ..’ हे राजकुमारीबरोबर त्यांनी स्वत: गायलेलं युगलगीत होतं. पण पहिले यश मिळालं १९४३च्या ‘पनघट’मध्ये. प्रथम अभिनय केला ‘रामभक्त हनुमान’मध्ये हनुमानाच्या भूमिकेमध्ये! दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा १९५७चा ‘राम हनुमान युद्ध’.

    मुळात शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या त्रिपाठींनी स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील ‘रानी रूपमती’ (१९५९) आणि ‘संगीतसम्राट तानसेन’ (१९६२) हे महत्त्वाचे चित्रपट. त्यांतील शास्त्रीय संगीताला नौशाद सारख्यांनी देखील दाद दिली. जसा नौशाद यांचा ‘बैजू बावरा’ तसा त्रिपाठींचा ‘तानसेन’. त्यात शास्त्रीय संगीत गायकांनादेखील त्यांनी आग्रहाने गायला बोलावलं. ‘रानी रूपमती’तदेखील त्यांनी तसा प्रयोग केला.

    एस.एन.त्रिपाठी यांनी आपल्या प्रदीर्ध कारकिर्दीत अनेक प्रकारे चित्रपट विश्वात काम केले. संगीत दिग्दर्शक, गायक, नट, कथा आणि पटकथा लेखक आणि निर्माते म्हणून काम केले.

    एस.एन.त्रिपाठी यांची पौराणिक चित्रपटांमधे मात्र मक्तेदारी कुणीच मोडू शकलं नाही. पौराणिक चित्रपट हे तसे पाहिले तर लो बजेटचे. त्यामुळे त्यांचा दर्जाही दुय्यम समजला जायचा. पण तरीही एकेकाळी अशा चित्रपटांची लाटच होती. बी ग्रेडच्या चित्रपटांचं संगीत देऊन एखादा खचून जाईल, पण एस.एन.त्रिपाठी यांनी या चित्रपटांवर आपली अनोखी मोहोर उमटवली. आणि ती ही संगीताच्या सुवर्णयुगात, म्हणजेच एकोणीसशे पन्नासच्या दशकात!

    ‘सप्तसूर तीनग्राम..’ (मन्ना डे), ‘सुधबिसर गयी आज..’ (मन्नाडे-रफी), ‘अब आयी बरखा बहार.’ (मन्नाडे-रफी), ‘टूट गयी रे मनकी बीना..’ (पंढरीनाथ कोल्हापुरे- पूर्णा सेठ), ‘सखी कैसे धरू मैं धीर..’ (लता मंगेशकर), ‘दीपक जलाओ, ज्योती जगाओ..’ (रफी), ‘प्रथमशांतरस जाके..’ (मन्नाडे, मूळ तानसेनची रचना), ‘हे नटराज..’ (महेंद्र कपूर- कमल बारोट, मूळ रचना तानसेन) ही गाणी असलेला ‘संगीतसम्राट तानसेन’ हा कृष्णधवल चित्रपट. त्यातील एक गाणं ‘घिर घिर के आयो रे मेघा.’ हे रंगीत चित्रित केलं होतं. (जसं ‘मुगल-ए-आझम’ १९६० मधील ‘प्यार किया तो डरना क्या..’ हे नौशादचं गाणं. पन्नास वर्षांनी संपूर्ण ‘मुघल-ए-आझम’ डिजिटली कलर्ड झाला. तर ‘संगीतसम्राट तानसेन’ विस्मृतीत गेला.)

    ‘रानी रूपमती’ या रूपमती आणि सुलतान बाजबहादूर यांची प्रेमकहाणी मांडणाऱ्या चित्रपटातदेखील अव्वल शास्त्रीय बाज असलेली गाणी होती- ‘बात चलत नई चुनरी रंग डारी..’ (कृष्णराव चोणकर- रफी), ‘उडम् जा माया कमलसे..’ (मन्नाडे), ‘सुन बगीयां में बुलबुल बोले..’ (लता मंगेशकर). या चित्रपटातीलच ‘आ लौट के आजा मेरे मीत..’, ‘संगीतसम्राट तानसेन’मधील ‘झूमती चली हवा..’ अथवा ‘पिया मिलन की आस रे..’ (लता- पिया मिलन की आस- १९६१) या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाण्यांचं संगीत देताना शास्त्रीय बाज सांभाळला होता. कदाचित ही त्यांची शास्त्रीय संगीताची बैठकच तत्कालीन सामाजिक आधुनिक चित्रपटांसाठी मर्यादा ठरली असावी.

    १९४१ ते १९८५ अशी पंचेचाळीस वर्षांची कारकीर्द (‘चंदन’ ते ‘महासती तुलसी’) असूनही तसे चित्रपट अभावानेच मिळाले. उत्तम गुणवत्तेला योग्य कोंदण लाभणं, हा नशिबाचा भाग. जे लक्ष्मी-प्यारेंना लाभलं. ‘सती-सावित्री’, ‘हरिश्चंद्र तारामती’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘पारसमणी’, ‘आया तूफान’ वगैरे चित्रपटांबरोबर ताराचंद बडजात्यांचा ‘दोस्ती’ मिळणं हे नशीब. त्या संधीची उत्तम गुणवत्तेशी सांगड घालून त्यांनी कुठल्या कुठे झेप घेतली.

    अशी कित्येक लोकप्रिय गाणी देणारे त्रिपाठी चित्रपटाच्या ग्रेडची पर्वा न करता या क्षेत्रात भरपूर रमले. सव्वाशे ते दीडशे चित्रपटात विविध भूमिका त्यांनी केल्या. ९० वर चित्रपटांचं संगीत, २३ चित्रपटांचं दिग्दर्शन, त्यातील काही स्वनिर्मित, कथा-पटकथा-संवादलेखक, गायक, अभिनेता अशा विविध भूमिकांतून वावरले.

    एस.एन.त्रिपाठी यांचे २८ मार्च १९८८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ प्रभाकर बोकील

    संगीतकार एस.एन.त्रिपाठी यांची गाणी.

    https://www.youtube.com/watch?v=aXX-84r5Eg4
    https://www.youtube.com/watch?v=jRcgvNN5L80&list=PLoYmSmY92nUwKTlCcsqskIxMoktpV987A&index=3
    https://www.youtube.com/watch?v=ThuSY1LVJnw

  • जयललिता उर्फ अम्मा

    तामिळनाडूमधील अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात जयललिता जन्माला आल्या. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मैसूर मध्ये झाला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. कोमल वल्ली असे त्यांचे खरे नाव.

    मात्र, त्यांची आई प्रेमाने त्यांना 'अम्मो' या नावाने हाक मारत. वय अवघं दोन वर्षांचं असताना वडिलांचं निधन झालं आणि जयललितांच्या आईने कर्नाटक सोडून बंगळुरू गाठलं.जयललितांना कधीही चित्रपटात येण्याची इच्छा नव्हती. पण नाइलाजाने त्यांना चित्रपटांत यावे लागले. जयललितांच्या आईची दुसरी बहीण अमबुजावल्ली यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत आणले. सुरुवातीला त्यांनी लहान-लहान ड्रामा कंपनीत अभिनय केला त्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे मोर्चा वळवला.

    काही वर्षांनंतर जयललिताही मद्रासला गेल्या आणि त्यांनी प्रसिद्ध भारतनाट्यम गुरू वैजूवूर बीरमैया पिल्लई यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले. मायलापूरच्या एका ऑडिटोरियममध्ये जयललितांचा कार्यक्रम झाला त्यावेळी तत्कालीन सुपरस्टार शिवाजी गणेशन त्यांच्यावर भलतेच इम्प्रेस झाले. त्यांनी जयललिताला चित्रपटात अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार १५ वर्षांच्या असताना त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली व जयललिता यांनी १७ व्या वर्षी लीड अॅक्ट्रेस म्हणून ‘वेनिरा अडाई’ हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.

    पहिल्या चित्रपटानंतर जयललिता यांना अनेक प्रकारच्या ऑफर यायला सुरुवात झाली होती. पण जयललितांना शिक्षण सुरू ठेऊन वकील बनायचे होते. त्यांच्या आईचीही तशीच इच्छा होती. पण घरची आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी अभिनय करण्याखेरीज दुसरा पर्याय जयललितांकडे नव्हता. अभिनयाच्या कामाच्या मोबदल्यात त्यांना लगेचच पैसे मिळायचे. त्यानंतर चित्रपट हेच जयललिता यांचे करियर बनले. त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांत अभिनय केला. त्या दक्षिणेतील सुपस्टार बनल्या होत्या. शर्मिला टागोर यांच्याशी त्यांची तुलना होऊ लागली होती. त्या काळातील फेमस ब्रँड लक्सने त्यांना साईन केले. राजकारणात सक्रिय होईपर्यंत जयललिता हे तमीळ चित्रपटसृष्टीत आघाडीचं नाव होतं.

    राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता तरुणपणात त्या काळच्या लोकप्रिय नायिका होत्या.जयललिता यांनी हिंदी चित्रपट इज्जत मध्येही काम केलं होतं. या चित्रपटात जयललितांसोबत धर्मेंद्र यांनी काम केलं. जयललिता यांनी एमजीआर यांच्यासोबत जवळपास २८ चित्रपटांत काम केलं आहे. जयललिता या शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जात. जयललिता या AIADMKचे संस्थापक एमजी रामचंद्रन ऊर्फ एमजीआर यांच्या जवळच्या समजल्या जायच्या. जयललिता यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकत एमजीआर यांच्यासोबत सक्रिय राजकारणात प्रवेश केला.एम. करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष फुटल्यानंतर एमजीआर यांनी AIADMK या पक्षाची स्थापना केली. एमजीआर यांनी १९८३ साली जयललिता यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली आणि त्यांना राज्यसभेवर पाठवलं.

    एमजीआर आणि जयललिता यांच्यात मतभेदाच्या अनेक बातम्या आल्या. त्यानंतर जयललिता यांनी १९८४ मध्ये AIADMK या पक्षाचं प्रचार अभियानाचं नेतृत्व केलं.एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी मजबूतपणे पक्षाची कमान सांभाळली आणि १९९१ मध्ये निवडणूक जिंकून त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. १९९६ च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तरीही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम राहिला. जयललिता यांनी १९९१, १९९६, २००२, २००६, २०११, २०१४ आणि २०१५ ला तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होते. जयललिता यांचे ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=2yN-YJHQvq8

  • भारतीय अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक व निर्माता आशुतोष गोवारीकर

    आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले. पुढे तो 'होली', 'गूँज', 'कभी हां कभी ना', 'सलीम लंगडे पे मत रो' सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला त्यांचा 'पहला नशा' हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या 'बाजी'च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे 'लगान' हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता. आणि 'लगान' ने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ते दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेले.

    आशुतोष गोवारीकर यांनी २००१ मध्ये 'लगान' तयार केला. त्यानंतर भारतात क्रीडाविषयक चित्रपटांची लाट आली. आशुतोष गोवारीकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. १९९८ सालच्या सरकारनामा ह्या मराठी चित्रपटामध्ये त्याने भूमिका केली होती. बॉलिवूडमधील दिग्दर्शनासाठी त्याला आजवर फिल्मफेअर सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००१ मध्ये लगानला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट व २००८ मध्ये जोधा अकबर या चित्रपटाला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार व फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • क्रीडा दिन

    आज २९ ऑगस्ट हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस त्यामुळेच देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेले या महान हॉकीपटूचा जन्म दिवस आपल्या देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

    मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलहाबाद येथे झाला. भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. ड्रिबिलींगमधील त्यांचे कर्तृत्व एवढे भन्नाट होते की, चेंडू लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्या स्टिककडे आकर्षित होतो असाच साऱ्यांचा समज व्हायचा.

    ध्यानसिंग सोमेश्वरसिंह बैस हे त्यांचे पूर्ण नाव. मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले. मेजर ध्यानचंद यांचे शिक्षण फक्त ६ वी पर्यंतच. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. त्यानंतर ध्यानचंद यांचा भाऊ रूप सिंग यानेही आपल्या ध्यानचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत हॉकीमध्ये आवड निर्माण केली. हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता.

    ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. १९२६ च्या न्युझीलंड दौ-यात एकूण २१ सामने खेळणा-या भारतीय संघातर्फे १९२ गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. १९२८ साली झालेल्या ऑल्मपिक हॉकीत भारत अजिंक्य ठरला. स्पर्धेच्या पाच सामन्यात भारतावर एकही गोल झाला नव्हता. उलट भारताने २९ गोल केले होते. या स्पर्धेचे हिरो होते ध्यानचंद. १९२८ च्या ऑमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात नॅदरलेंड विरुद्ध ३-० अशा जिंकलेल्या सामन्यात, ३ पैकी दोन गोल ध्यानचंद होते. १९३२ च्या लॉस एन्जलीस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेस तर २३ - १ अशा फरकाने भारताने हरवले. हा उच्चांक २००३ पर्यंत अबाधित होता. त्यातील ध्यानचंदने ८ गोल केलेले होते.

    हंगेरी विरुद्ध ४-०, अमेरिका ७-०, जपान ९-० असा प्रवास करत फ्रान्स विरुद्ध १०-० असा जिंकला तर जर्मनी विरुद्ध ८-१ असा जिंकला. त्यांनी भारताला १९२८, १९३२ व १९३६ मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले. १९३६ मधील भारत-जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीत ध्यानचंद यांच्या याच नजाकतीने अगदी जर्मनीचा हुकूमशहा अॅनडाल्फ हिटलर यांनाही वेड लावले होते. त्यांच्या या असामान्य कौशल्याने भारावलेल्या हिटलर यांनी त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ‘ऑफर’ दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती. मात्र, ध्यानचंद यांनी तो फेटाळून लावला होता.

    ध्यानचंद आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळले. भारत सरकारने ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवले होते. मेजर ध्यानचंद यांचे ३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले. हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • आसामी संगीताचे पितामह भूपेन हजारिका

    हजारिका यांचा सदिया येथे एका शिक्षकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. शिक्षणात उत्तम गती असलेल्या हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.ए. व एम. ए. केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन विषयातील पीएचडी केली. शिकागो विद्यापीठाची त्यांना लिस्ले फेलोशीप मिळाली होती. यात सिनेमाच्या माध्यमातून विकास हा विषय त्यांनी निवड होता. अमेरिकेतील नामवंत गायक पॉल रॉबेसन यांच्या ‘ओल्ड मॅन रिव्हर’चे त्यांनी हिंदीत ‘गंगा बेहती हो’ असे रुपांतरण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखालील ‘एरा बतार सूर’ हा चित्रपट १९५६ साली प्रदर्शित झाला व तेव्हापासून त्यांची कारकीर्द यशोशिखराच्या दिशेने सुरू झाली. ईशान्य भारतातील एक नामांकित गायक, दिग्दर्शक म्हणून त्यांना आगळे स्थान होते.

    अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांनीच ‘मेरा धरम, मेरी मॉं’ हा पहिला रंगीत चित्रपट दिग्दर्शित केला. ‘एक पल’ या हिंदी चित्रपटात हजारिकांना संधी मिळाली व त्या संधीचे सोने करीत असंख्य पुरस्कार त्यांनी पटकावले. ‘लोहित किनारे’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेमधूनही ते रसिकांपर्यंत पोहोचले होते. कल्पना लाजमी यांनी सदर मालिका दिग्दर्शित केली होती. ‘गांधी टू हिटलर’ या चित्रपटाची गाणी व संगीत त्यांनी स्वत: लिहिले होते. महात्मा गांधीजींचे प्रख्यात ‘वैष्णव जन’ हे भजनही मा.भूपेन हजारिका यांनी म्हटले आहे. कवी, पत्रकार, गायक, संगीतकार, गीतकार, चित्रपट निर्माते आणि लेखक आदी सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला नावलौकिक निर्माण केला. मा.हजारिका यांनी लोकसंगीताचा वापर करून त्यावरील रचनांनी देशात आपला चाहता वर्ग निर्माण केला. डॉ. हजारिका केवळ संगीत व साहित्यातील तज्ज्ञ नव्हते तर ते मोठे नट व दिग्दर्शक होते. ब्रम्हपुत्रेचा कवी अशी त्यांना उपमा दिलेली होती. ‘दिल हुम हुम करे’ आणि ‘ओ गंगा बेहती हो’ या त्यांच्या गाण्यांनी कोट्यवधी भारतीयांना मोहीत केले. ‘जाजोबार’ म्हणजे (आश्च‘र्यचकित करणार) असे स्वत: संबोधत असत. शब्दाचे सौंदर्य ते आपल्या गाण्यातून मांडत होते.

    लहानपणापासून मी आदिवासींचे संगीत ऐकत होतो. त्यातील तालाने मला विकसित केले. मात्र संगीताची शिकवण मी आईकडून घेतली. ती माझ्यासाठी गाणी म्हणत असे. तिच्या रचना मी ‘रुदाली’ चित्रपटात वापरल्या. वयाच्या १२ व्या वर्षी आसामी चित्रपट ‘इंद्रमालती’ मध्ये बिश्वर नियोज नोजोवान’ हे गीत गायले होते, असे हजारिका यांनी एका आपल्या मुलाखतीत सांगितले होते. १९९२ साली भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भूपेन हजारिका यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मा.भूपेन हजारिका यांचे ५ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • त्यांच्या प्रतिभेला सलाम !!

    १९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीचं वातावरण होतं.

    त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी साहीर लुधियानवी मंचावर आले. ते म्हणाले- "अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।"

    पु.ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलावलं. आणि म्हणाले, "साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही". असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.

    मग साहीरजींनी तो शेर ऐकवला -

    "एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
    एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
    रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी।
    सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,
    खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?
    अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,
    रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।"

    आणि साहीरजींचा शेवटचा "जी" पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांचं पूर्ण मराठी रुपांतर झालं होतं.

    "एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
    एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी
    ओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी
    सेजेशी समई मी लावू कशाला?
    जुळत्या जीवालागी जळती कशाला?
    अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,
    रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी".

    ह्यातील 'झुंझुरता' ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा.

    आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु.ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.

  • नामवंत व्हायोलीनवादक श्रीधर पार्सेकर

    श्रीधर पार्सेकर हे व्हायोलीन जगतातील मूलभूत कला-सौंदर्य मूल्यांचा शोध घेणारे प्रतिभावंत होते. श्रीधर पार्सेकर यांनी १९४८ मध्ये, व्हायोलीन हे वाद्य शिकू इच्छिणाऱ्या साठी ‘स्वरनिनाद’ ही पुस्तिका लिहिली होती. ‘पार्सेकर आणि व्हायोलीन’ यात अभेदच होता, असे ‘पुलं’म्हणत असत.

  • अभिनेत्री रीना रॉय

    रीना रॉय यांचे खरे नाव रुपा सिंह. तिचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी मुंबई येथे झाला. रीना यांचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीना रॉय यांच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही, चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते रीनाची आई आणि आपली चारी अपत्ये सोडून चेन्नईला निघून गेले. आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने वयाच्या केवळ १३ व्या वर्षी आपल्या चेहऱ्यावर मेकअप चढवला मात्र तिने यासाठी कधीही आपल्या परिवाराला दोष दिला नाही वा आपण कुटुंबाच्या चरितार्थासाठी हे काम करतोय याची कबुली दिली नाही. ती एक जबाबदार मुलगी होती, प्रेमळ बहिण होती मात्र ती व्यवहारी तरुणी खचितच नव्हती !रॉय यांनी स्टुडीओचे उंबरठे झिझवून स्क्रीन टेस्ट देण्याचा सपाटा लावला आणि सौदर्य बी.आर.इशारांनी बरोबर हेरले. मात्र रीना रॉय यांची सुरुवात फारच वाईट झाली.

    बी.आर. इशारांनी त्यांना एकदम दोन चित्रपटासाठी साईन केले होते. त्यांचा ‘नई दुनिया नए लोग’ हा सिनेमा आधी फ्लोअरवर गेला, त्यात रीना रॉय यांचा नायक होता डेनि डेन्ग्झोपा! या सिनेमाची आठवण अशीही आहे की यात रेल्वेचा एक सीन होता, सारे युनिट बेंगलोरजवळील जंगलात होते आणि हा सीन महत्वाचा होता. रेल्वे दिवसातून एकदाच तिथून जायची.त्यामुळे सीन चुकला तर रिटेकसाठी दुसरा दिवस उजडायचा. दोनेक दिवस असेच गेले, तिसऱ्या दिवशी बी.आर.इशारा वैतागले ते म्हणाले आता माझे पैसे संपलेत आणि एका शॉटसाठी सगळे युनिट जंगलात आणायचे मला परवडत नाही तेंव्हा आता चूक न करता तू शॉट दिला तर माझ्यावर उपकार होतील. रीना रॉय यांचे वय तेंव्हा फक्त १४ वर्षांचे होते !

    मात्र इथे ती परत संवाद विसरली, रेल्वे आणि निघून गेली. सीन तसाच राहून गेला आणि पुढे जाऊन सिनेमाही डब्यात गेला. हा सिनेमा रिलीज झालाच नाही. त्या दिवशी रीना मात्र हमसून हमसून रडली. तिने पुन्हा असं चुकायचे नाही हा निश्चय मनोमनी केला तो थेट वर दिलेल्या ‘आशा’तल्या प्रसंगापर्यंत पाळला ! याच बी.आर.इशारा यांचा १९७३ मध्ये आलेला ‘जरुरत’ या सिनेमात असेच दृश्य होते ज्यात अस्ताला जाणारया सूर्याचे दृश्य सीनच्या पार्श्वभूमीला होते. या सिनेमात तिचा नायक होता तरणाबांड देखणा (पण ठोकळा) नायक विजय अरोरा !

    इथे तिने सूर्यास्त नेमका पकडला आणि तिची गाडी रांकेला लागली. पडद्यावर आलेला ‘जरुरत’ हा रीनाचा पहिला सिनेमा ठरला होता. या सिनेमातील बोल्ड दृश्यामुळे नंतर रीना ‘जरुरत गर्ल’ या नावाने प्रसिद्ध झाली होती. जरुरतमुळे तिच्या नावापुढे रॉय कायमचे चिकटले. राजपूत रीनाचे बंगालीकरण झाले, मात्र तिने तेच नाव रिअल लाईफमध्येही धारण केले कारण तिला तिच्या बालपणीच्या कटू आठवणी विसरायच्या असाव्यात….

    रीनाच्या सुरुवातीच्या काळात समीक्षक तिची तुलना आशा पारेखशी करायचे, रीनाला ते पटत नसे. आशा पारेख आणि माला सिन्हा नंबर रेसमध्ये कधीही वर जाऊ शकल्या नाहीत मात्र त्यांची शिडी वापरून अनेक ठोकळे अभिनेते आपला सिनेमा हिट करण्यात यशस्वी ठरले होते त्यामुळे रीनाला त्यांच्यासोबत आपली तुलना मान्य नसे. खरे तर लुक आणि गेटअपची जाण तिला रेखाने करून दिली. तिचा कपाळावरचा केसांचा महिरप आणि धनुष्याकृती मासोळी डोळे याचा योग्य वापर कसा करायचा याचे धडे तिला रेखाने दिले. मात्र रीनाला स्वतःची इमेज आणि करीअर यांची गंभीरता सुरुवातीला नव्हती, केवळ अर्थार्जन ह्या हेतूने तिने बी आणि सी ग्रेडचे ढीगभर सिनेमे तिने केले. या काळात ओ.पी. रल्हान सारखा जाणता निर्माता दिग्दर्शक तिच्या सौंदर्याला भूलला होता आणि तिच्या सोबत खेटे मारत होता.तेंव्हा त्यांचा राजेंद्रकुमार अभिनित ‘तलाश’ तिकीटबारीवर सुपरहिट झाला होता. पण रीनाला लफडेबाजीत रस नव्हता. तिला शोध होता आयुष्याच्या जोडीदाराचा….

    रीनाला करिअरच्या सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरे जावे लागले होते. ‘मिलाप’, ‘जंगल में मंगल’ आणि ‘उम्रकैद’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते. मात्र १९७६ साली रिलीज झालेल्या राजकुमार कोहलीच्या ‘नागिन’ या सिनेमामुळे रीना यशोशिखरावर पोहोचली. या सिनेमातील अभिनयासाठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. नागीन नंतर कोहलीने तिला ‘जानी दुश्मन’, ‘मुकाबला’, ‘बदले की आग’ आणि ‘राजतिलक’ या मल्टीस्टारकास्ट सिनेमात रिपीट केले. राजकुमार कोहली आणि रीनाचे हे कॉम्बिनेशन हिट ठरले.

    त्यानंतर जे. ओमप्रकाशच्या १९७७ मध्ये आलेल्या ‘अपनापन’ या सिनेमासाठी रीनाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी देखील तिला ‘आशा’ व ‘अर्पण’ मध्ये रिपीट केले. १९८० मध्ये आलेल्या ‘आशा’साठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. आपल्या करिअरमध्ये रीनाने जवळपास शंभरहून अधिक सिनेमांमध्ये काम केले. नागिन, कालिचरण, जानी दुश्मन, प्यासा सावन, अर्पण, आशा, धर्म काटा, सौ दिन सास के, आदमी खिलौना है, हे रीनाचे गाजलेले सिनेमे आहेत. रीनाची पडद्यावरची जोडी शत्रुघ्नखालोखाल सुनील दत्त आणि जितेंद्रसोबत जास्त जमली. राजेशखन्ना आणि अमिताभसोबत मेन रोलमध्ये तिचे सिनेमे कमी आले त्यामुळे नंबर गेममध्ये ती मागे राहिली. त्या उलट रेखा आणि हेमामालिनी यांचे चित्रपट अमिताभ, राजेश आणि धर्मेंद्र यांच्यासोबत जास्त आले आणि तितकेच हिट झाले. पण तरीही रीना त्यांच्या पुढे टिकून होती, ती केवळ तिच्या वेगळ्या आयडेंटीटीमुळे ! आज सोनाक्षीदेखील स्पर्धेत टिकून आहे ते केवळ इंतर अभिनेत्रीपेक्षा तिच्यात असणारया वेगळेपणामुळे. हाही एक योगायोग म्हणावा लागेल.

    बॉलिवूडमध्ये यशस्वी घौडदौड सुरु असताना रीनाचे अफेअर अभिनेता शत्रुघ्न सिन्हाबरोबर होते. दोघांची करिअरची सुरुवात एकाच काळात झाली होती. दोघांनी बरेच दिवस एकत्र डेट केले. १९७५ मध्ये रीनाचा सुनीलदत्तसोबतचा ‘जख्मी’ हिट झाला तर याच वर्षीच्या सुभाष घईच्या ‘कालीचरण’ने एकाच वेळी अनेकांना जीवदान दिले. यात स्वतः सुभाष घई, शत्रुघ्न, रीना आणि अजित यांना संजीवनी मिळाली. कालीचरण हिट झाल्याने घईंनी १९७८ मध्ये रीना -शत्रुघ्न यांची सुपरहिट ठरलेली जोडी रिपीट केली आणि गॉसिपला ऊत आला. दरम्यानच्या काळात रीनाचे जितेंद्रसोबतचे ‘प्यासा-सावन’, ‘बदलते रिश्ते’, हिट झाले होते. ‘अपनापन’, ‘आशा’ आणि ‘अर्पण’मध्येही तिचा नायक जितेंद्र होता मात्र रीनाने शत्रू वगळता आपले नाव कोणाबरोबर जोडले जाणार नाही याची काळजी घेतली. जितु आणि सुनीलदत्त दोघेही विवाहित होते त्यामुळे तिचे काम अधिक सुकर झाले. याच काळात विवाहित असलेल्या धर्मेंद्र आणि हेमाचा रोमान्स रंगात आला होता, तरअमिताभ विवाहित असूनही रेखाने त्याच्या आयुष्यात पुन्हा एन्ट्री घेतली होती. जुलै १९८० मध्ये रीना लंडनला असताना शत्रुघ्नने रीनाला वाऱ्यावर सोडले आणि पूनमबरोबर लग्न करुन सगळ्यांना चकित केले. याच दिवसात धर्मेंद्रने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हेमाशी लग्न केले. शत्रुघ्नच्या लग्नाची बातमी रीनाला मोठा धक्का देणारी होती. इतकेच नाही तर मुंबईला परतल्यानंतर रीनाने म्हटले होते, की माझ्या गैरहजेरीत शत्रुघ्नला लग्न करण्याची काय गरज होती ? ती बरेच वर्ष शत्रुघ्न यांच्यावर नाराज होती. मात्र शत्रुघ्नने ‘एनिथिंग बट खामोश : द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी’ या त्याच्या बायोपिक पुस्तकात विवाहोत्तर काळात देखील तो रीनाला भेटत असल्याचा उल्लेख करून तिच्याशी अफेअर असल्याची मनमोकळी कबुली दिली आहे.

    बॉलिवूडमध्ये ज्यावेळी रीना रॉयचे करिअर यशस्वी होते, त्यावेळी त्यांचे अफेअर शत्रुघ्न सिन्हासोबत चालू होते. जेव्हा रीनाला दोघांच्या लग्नाविषयी माहित झाले तेव्हा ती भडकली आणि तिने भारतात येऊन शत्रुघ्न सिन्हाला याचे उत्तर मागितले होते. लग्नानंतर अनेक वर्षे ते रीना रॉयला भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत का झाला याचे उत्तर या पुस्तकात देणे शत्रुघ्नने टाळले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी तिच्या इंग्लंड दौऱ्याच्यावेळेस ओळख झाली होती, मात्र तिने बारकाईने विचार न करता त्याच्याशी १९८३ मध्ये निकाह लावला. खरे तर ह्या निर्णयामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले अन तीही संपली. तिला चुकीची जाणीव होऊ लागल्यावर रुपेरी पडदा पुन्हा खुणावू लागला.मात्र मोहसीनचे लोढणे तिच्या गळ्यात पडले त्याला घेऊन ती पुन्हा मुंबईला आली. यापाई मोहसीनखानला त्याच्या ९ वर्षाच्या क्रिकेट करिअरला अलविदा करावे लागले. १९९२ ते १९९७ या पाच वर्षात त्याला तेरा चित्रपट मिळाले मात्र ऐकही सिनेमा चालला नाही. शेवटी त्याने रीनासह गाशा गुंडाळला आणि तो परत पाकिस्तानला गेला. या काळात जे.ओमप्रकाशनी तिला पुन्हा हात दिला आणि त्यांचा ‘आदमी खिलौना है’ने तिची थोडीफार पत राखली, या व्यतिरिक्त तिने केलेले या ५ वर्षातले सर्व दहाही चित्रपट दणकून पडले. या दरम्यान तिचे आणि मोहसीनचे खटके उडू लागले. तिने पाकिस्तानात गेल्यावर त्याच्याशी तलाक घेतला. मात्र तिला तिच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीची ‘सनम’ची कस्टडी मिळाली नाही. सैरभैर झालेली रीना आईकडे परत आली आणि पुन्हा बॉलीवूडमध्ये रिएन्ट्रीसाठी ती प्रयत्न करू लागली.

    अजय देवगणच्या ‘गैर’ आणि अभिषेक बच्चनच्या ‘रीफ्युजी’त तिला भूमिका मिळाल्या आणि तिच्या पदरात आणखी सिनेमे पडणार असे वाटत असतानाच तिच्यातल्या आईने उचल खाल्ली. तिने मोहसीनला परत संपर्क केला, त्यानेही तिच्याशी तलाक नंतर दुसरा निकाह लावला नव्हता. रीनाने आपल्या मुलीवरच्या प्रेमापायी मोहसिनबरोबर कराची येथे पुन्हा एकदा निकाह केला आणि तिच्यातली आई सुखावली. मात्र आईच्या ममतेमुळे तिच्यातल्या अभिनेत्रीवर पुन्हा अन्याय झाला….यानंतर मोहसीन आणि रीनाने आपले संबंध न ताणता एकमेकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला मात्र आपले नाते न तोडता त्यांनी हा निर्णय घेतला. रीना आपल्या मुलीला घेऊन भारतात परत आली तर तिकडे पाकिस्तानमध्ये मोहसीन अजूनही एकटाच आहे. आपल्या टीनएजमध्ये कुटुंबासाठी जगलेली रीना तिच्या तारुण्यात शत्रुघ्नसाठी जगली, तो तिच्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिने जणू काही स्वतःवर सूड उगवावा तसा निर्णय घेतला आणि आपल्या शानदार करिअरचे मातेरे केले.तिथून पुढे ती पूर्ण सावरल्यासारखी कधी वाटलीच नाही. ती दमदार पुनरागमन करेल असे वाटत असतानाच तिच्यातल्या ‘आई’ने तिच्यातल्या हीरोईनवर मात केली. सुखाचा काठोकाठ भरलेला प्याला तिच्या ओठी कधी आलाच नाही. संघर्ष मात्र अविरतपणे तिच्या नशिबी आला आणि तो ती करत राहिली.

    रीना रॉय यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=3GEFsCLf-vA

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ समीर गायकवाड

  • भारताचे माजी तेज गोलंदाज रमाकांत देसाई उर्फ ‘टायनी’ देसाई

    रमाकांत देसाई हलकाच रनअप घेऊन क्रीझपाशी आल्यावर आपली करामत दाखवत असत. हनीफ मोहम्मद यांच्यासारख्या नावाजलेल्या फलंदाजाला एकाच मालिकेत देसाईंनी चार वेळा तंबूत धाडले होते. १९६०-६१च्या त्या मालिकेत पाकिस्तानच्या गोटात देसाईंनी खळबळ उडविली होती. एवढेच नव्हे तर हनीफ यांना ‘देसाईंचा बकरा’ म्हणून हिणवले जाऊ लागले.