(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • द क्रॉकडाइल हंटर स्टीव्ह आयर्विन

    अमेरिका, ब्रिटन आणि जगभरातील एकूण १३० देशांमध्ये स्टीव्हला ‘क्रोकोडाइल हंटर’ म्हणून याच कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख मिळाली. ‘द क्रोकोडाइल हंटर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या काळात ५० कोटी लोकांपर्यंत स्टीव्ह आणि त्याच्या कुटुंबाचे कार्य पोहचले.

  • सहकारमहर्षी कल्लाप्पा आवाडे

    आवाडे यांनी आजन्म यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्या विचारांचा पाठपुरावा केला. तसेच त्यांनी वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ आणि विखे-पाटील यांना अभिप्रेत असलेली सहकार संस्कृती निष्ठेने जपून संस्थात्मक कार्यातून परिसर विकास घडवून आणला.

  • टायरच्या रबरी ट्युबचा शोध शोध लावणारे स्कॉटिश संशोधक जॉन बॉईड डनलॉप

    १८८८ मध्ये डनलॉप कंपनीने पोकळी रबरी धावा (न्युमॅटिक टायर्स) ची कल्पना अस्तित्वात आणली. त्यामुळे मोटारींना टायर ट्यूब बसविणे शक्य झाले.

  • एका कलाकाराची छबी

    मिशी ठेवणार्‍या एका कालाकराने हॉलीवूडमधे प्रवेश केला.  तीन वर्षात ऑस्कर नामांकन व तीन गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवले. पहिल्या  हॉलीवुडपटात  उत्कृष्ट  दिग्दर्शकाबरोबर व प्रसिद्द  नटासोबत  काम  करून त्याने  आपली  भूमिका  अजरामर  केली.  हाताने पत्र लिहीण्याच्या व पोस्टमने पत्र पोचवण्याच्या काळात, त्याला आलेल्या प्रेमपत्रांची व मागण्यांची संख्या होती एक महिन्यात ३०००! सुरुवातीची कारकीर्द इजिप्त मधे अरेबिक चित्रपटात घडवलेला व पुढे इंग्रजी येत असल्याच्या गुणावर हॉलिवुड्चा झालेला हा थोर कलाकार म्हणजे ‘ओमर शरीफ’. तरुणींच्या दिलाची धडकन ‘ओमर शरीफ’.

  • पं. भीमसेन जोशी – थोडक्यात जीवनप्रवास

    भीमसेन जोशी म्हणजे 'गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.

    पं.भीमसेन जोशी थोडक्यात जीवनप्रवास.

    • कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील गदग येथे ४ फेब्रुवारी १९२२ रोजी जन्म. १६ भावंडांमध्ये सर्वात थोरले.
    • वडिल गुरुराज जोशी हे शिक्षक तर आजोबा त्या वेळचे प्रसिद्ध गायक.
    • घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकाकडून समाधान न झाल्याने ११ व्या वर्षी गुरूच्या शोधात घर सोडले.
    • विजापूर, धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी भटकंती.
    • ग्वाल्हेर येथे माधव संगीत शाळेत शिक्षण.
    • जालंधर येथून वडिलांनी पुन्हा घरी आणल्यानंतर १९३६ पासून धारवाड येथे सवाई गंधर्व यांच्याकडून संगीतशिक्षण.
    • वयाच्या १९ व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम.
    • २२ व्या वर्षी कानडी आणि हिंदी भक्तीगीतांच्या त्यांच्या पहिल्या ध्वनीफित एचएमव्ही तर्फे प्रकाशन.
    • १९४३ मध्ये मुंबई आकाशवाणी येथे नोकरी.
    • समीक्षकांबरोबरच सर्वसामान्यांचीही भरभरून दाद.
    • उत्स्फूर्तता, अचूक सूर लावणे, लांबलचक पल्लेदार ताना वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीचीखास वैशिष्ट्ये.
    • शुद्ध कल्याण, मियाँ की तोडी, पुरिया धनश्री, मुलतानी, भिमपलास, दरबारी आणि रामकली हे विशेष आवडते राग.
    • गुरूंना श्रद्धांजली म्हणून १९५३ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवाची पुण्यात सुरुवात.

    -- संजीव वेलणकर, पुणे
    ९४२२३०१७३३

  • शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

    खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबई येथे झाला.

    श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. ते एमएस ऑर्थोपेडीक ( MS Orthopaedic) आहेत. वडील एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ समाजकार्य केले. त्यानंतर २०१४ मध्ये थेट लोकसभेच्या रिंगणात उतरून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. आपल्या साडेसहा वर्षांच्या काळात श्रीकांत शिंदे यांनी अनेक संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

    २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ३ लाख ४४ हजार ३४३ इतके मताधिक्य मिळवून विजय मिळवला.

    गेल्या साडेसहा वर्षांच्या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात चांगला जम बसवला आहे.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • गोड चेहऱ्याचा अभिनेता अरविंद स्वामी

    कधीच प्रसिद्धीसाठी काम न करणारा अभिनेता म्हणून अरविंद स्वामी यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जून १९७० रोजी झाला.

    कॉलेज करताना पॉकेटमनी म्हणून मॉडेलिंग करत असताना मणीरत्नम यांची नजर अरविंद स्वामी यांच्यावर पडली. मणिरत्नमच्या रोजा चित्रपटाच्या माध्यमातून अरविंद स्वामीने १९९२ मध्ये बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. आणि एका रात्रीत अरविंद स्वामी स्टार बनले. १९९५ मध्ये त्यांनी केलेल्या बॉम्बे चित्रपटानेही तुफान कमाई केली. यानंतरही त्यांनी चित्रपटाची वाट न धरता शिक्षण पूर्ण केले. चित्रपटात येण्याचे कधी ठरवले नसल्याने अरविंद पुढील शिक्षणासाठी विदेशात निघून गेले.

    अरविंद स्वामी यांनी २००० साली आलेला राजा को रानी से प्यार हो गया हा शेवटचा चित्रपट केला त्यानंतर २००८ पर्यंत अरविंद स्वामी यांनी एकही चित्रपट साईनही केला नाही. मणीरत्नम यांनी अरविंदला पून्हा चित्रपचटात खेचून आणले आणि २०१३ मध्ये एक चित्रपट बनविला २०१५ साली मोहन राजा यांच्या थनी ओरुवन या चित्रपटात अरविंदने खलनायकाची भूमिका केली. अरविंद स्वामी यांनी १५ वर्षानंतर बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक तनुज भरमार यांच्या 'डीअर डॅड' चित्रपटातून पुनरागमन केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशा

    १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती १९७१ च्या भारत-पाक युद्धात झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली. या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले.

  • हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक, अभिनेते, संगीत रचनाकार छोटा गंधर्व

    हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक, अभिनेते, संगीत रचनाकार छोटा गंधर्व यांचा जन्म १० मार्च १९१८ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळच्या भाडळी या गावी झाला.

    छोटा गंधर्व यांचे खरे नाव सौदागर नागनाथ गोरे. छोटा गंधर्व यांनी १० वर्षे वयाचे असताना ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती. वसंतराव गोइत्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळे येथील गायनशिक्षक पाध्येबुवा ह्यांनी छोटा गंधर्व यांना आरंभी गाणे शिकवले. सवाई गंधर्वांचीही थोडीशी तालीम मिळाली. कृष्णराव गोेरे, कृष्णराव शेंडे, मा. दीनानाथ ह्यांचाही काही सहवास आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. मात्र १९३९ साली ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ ह्यांचा गंडा बांधून सौदागर त्यांच्याकडे शिकू लागले. हे लाहोरकडचे उत्कृष्ट गवई तेव्हा मुंबईत राहत होते. पुढे १९४४-४५ साली ते कोल्हापूरला असताना भूर्जीखाँ यांच्याकडे गाणे शिकले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागर नागनाथ गोरे यांना 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत.

    आपल्या गायकीने अर्धशतकाहून अधिक काळ रंगभूमी गाजविणारे स्वरराज छोटा गंधर्व हे त्यांच्या दातृत्वासाठी सर्वपरिचित होते, १९४३ मधे त्यांनी काही कलाकारांसह 'कलाविकास' ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली. संगीत सौभद्रातील तसेच 'सुवर्णतुले'तला कृष्ण, 'संगीत मानापमाना'तील 'धैर्यधर', 'मृच्छकटिका'तील 'चारुदत्त', 'संशयकल्लोळ' मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली.

    पठ्ठे बापूराव या चित्रपटासाठी त्यांनी गण, आणि मुंबई नगरी ग बडी बांका, ही लावणी गायली होती. गणराजाला करु मुजरा, हा आणखी एक गण गायला. नंतर मात्र चित्रपटासाठी कधीच गायन केले नाही. आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या छोटा गंधर्व यांना आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला. छोटा गंधर्व यांचे ३१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=0ImJWo4RBZI

  • गीता दत्त

    आपण या गायिकेच्या आवाजाचे थोडक्यात विश्लेषण करायला घेऊ. तिच्या सुरवातीच्या गीतांत थोडा बंगाली स्पर्श जाणवतो. गीता दत्तच्या आवाजात विस्तीर्ण भावनापटांची प्रतीती येते.