२००१ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला तर त्यांना ‘ सर ‘ हा किताब देखील मिळाला आहे. नायपॉल यांचे लिखाण नेहमीच वादग्रस्त ठरले त्यांनी अनेक पुस्तके लिहिली परंतु त्यांचे खाजगी आयुष्य देखील वादग्रस्तच राहिले.
वासुदेव गायतोंडे हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले अमूर्ततावादी चित्रकार होते. अमूर्त घटनांना दृश्यरुप देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९२४ रोजी नागपूर येथे झाला.
झेन फिलॉसॉफी आणि आध्यात्मिक शिकवणुकीने प्रेरित झालेले ख्यातकिर्त, मराठमोळे भारतीय वासुदेव गायतोंडे यांचा गोव्यातील एका खेडेगावात जन्म झाला. त्यांचे घरातील टोपणनाव ‘बाळ’ होते आणि मित्रांमध्ये ‘गाय’ ह्या नावाने ते प्रसिद्ध होते.
म्हापसा शहराजवळील उस्कुई गावचे हे मूळ कुटुंब. गायतोंडे यांचे वडील बोल्टन प्रेसमध्ये सहाय्यक व्यवस्थापक होते. त्यांच्या वडिलांचे प्रेसशी संबंधित काम असूनही विज्ञानापासून कायद्यापर्यंत आणि ज्योतिषापासून आयुर्वेदापर्यंत त्यांचा दांडगा अभ्यास होता. घरातच ग्रंथसंग्रह असल्याने वासुदेवास वाचनाची गोडी लहानपणीच लागली. गायतोंडे कुटुंबातील कुणीतरी एक गावातील देवळाच्या भिंतींवर चित्रे काढायचा. ते बघून छोट्या वासुदेवास चित्र काढावेसे वाटू लागले. त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. वासुदेव गायतोंडे मुंबईत सुरुवातीला महापालिका शाळेत शिकले व नंतर गोखले हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. त्यांचे चित्रे काढणे चालूच होते. थोड्याच दिवसांत ते मुंबईतील कलाप्रदर्शनांना हजेरी लावू लागले. घरून ह्या संदर्भात त्यांना प्रोत्साहन मिळाले नाही.‘वाटेल त्या’ मुलांबरोबर मिसळायला त्यांना परवानगी नसे, त्यामुळे लहानपणापासून आपसूकच ते एकटे होत गेले.
त्यांनी १९४३ मध्ये एका खाजगी आर्ट स्कूलमध्ये नाव दाखल केले व त्या तयारीमुळे १९४५ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना थेट तिसर्याख वर्षात प्रवेश मिळाला. जे.जे.च्या भव्य परिसराचा त्यांच्यावर चांगला परिणाम झाला. जगन्नाथ अहिवासी हे त्यांना रचनाचित्र शिकवत. अडूरकर पेन्सिल ड्रॉइंग आणि भोंसुले मास्तर जलरंगचित्रण व व्यक्तिचित्र शिकवत. अहिवासी आणि भोंसुले मास्तरांचे गायतोंडे हे लाडके विद्यार्थी होते.
आर्ट स्कूलच्या काळातच गायतोंडे यांनी बौद्ध वाङ्मय, जपानी चित्रकला, मृद्पात्रे (पॉटरी), कविता यांचाही अभ्यास या काळात केला. निसर्गदत्त महाराज, रमण महर्षी, सोयरोबानाथ अंबिये, संतवाङ्मय, कला, साहित्य, तत्त्वज्ञान असे विविध विषय त्यांच्या वाचनात होते. त्या काळात जे.जे.च्या पटांगणात दरवर्षी जे. कृष्णमूर्ती हे तत्त्वज्ञ आपली प्रवचने देण्यास येत. ह्या प्रवचनांचा फार मोठा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला.
गायतोंडे यांना १९४८ मध्ये जे.जे.मधून पदविका मिळाली व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे फेलोशिपही मिळाली. त्यांनी १९४९/५० या काळात जे.जे.मध्ये साहाय्यक शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी केलेली ही एकमेव नोकरी होती. काही मतभेद होऊन त्यांनी १९५० मध्ये ही नोकरी सोडली व पूर्णवेळ चित्रकार म्हणून जगण्यास सुरुवात केली.
हुसेन, सूझा, रझा, आरा, गाडे आणि बाकरे ह्यांनी १९४८ मध्ये ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ स्थापन केला. नंतर गायतोंडे त्यात सहभागी झाले. ह्या ग्रूपतर्फे १९४९ मध्ये भरवलेल्या समूह प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर काही चित्रकारांनी ‘बॉम्बे ग्रूप’ स्थापन केला, त्यातही गायतोंडे होते. ह्या ग्रूपचीही काही प्रदर्शने झाली. ह्या साऱ्यांत होणाऱ्या कलाविषयक चर्चा, वादविवादांत गायतोंड्यांचा सक्रिय सहभाग असे आणि त्यांच्या मताला सहकलाकारांमध्ये मान होता.
मुंबईत १९५७/५८ मध्ये वॉर्डन रोडवर भुलाभाई देसाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट सुरू झाली. संगीत, चित्रकला, नाट्यक्षेत्रातील कलाकारांच्या कलासाधनेसाठी इथे उत्तम वातावरण होते आणि कलावंतांना तिथे अतिशय स्वस्तात स्टूडिओ मिळण्याची सोय होती. गायतोंडे यांनी तिथे काम करण्यास सुरुवात केली. ह्या इन्स्टिट्यूटसमोरच्या बाकावर बसून समुद्राकडे पाहत गायतोंडे तासन्तास चिंतन करत. नाट्य, नृत्य, चित्र अशा सर्व कलांमध्ये काहीतरी नवीन करू पाहणार्याह कलाकारांचा इथे राबता असे आणि परस्परांत संवादही असे. गायतोंडे इथेच अल्काझी, विजया मेहता इत्यादींच्या संपर्कात आले.
१९६४ साली मिळालेल्या रॉकफेलर शिष्यवृत्तीद्वारे गायतोंडे न्यूयॉर्कला गेले. तिथे त्यांनी अमेरिकेतील विविध चित्रशैलींचा अभ्यास केला. त्यानंतर ते जपानला गेले. जपानमध्ये त्यांच्यावर झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला.१९७२ मध्ये ते भारतात परतले आणि शेवटपर्यंत त्यांनी दिल्लीत वास्तव्य केले.
दिल्लीत १९७४ च्या आसपास त्यांची ओळख ममता सरन ह्या चित्रकर्तीशी झाली. त्यांची मैत्री आणि सोबत गायतोंडेंना अखेरपर्यंत लाभली. ममता यांनी त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली. ते १९९७ ते २००१ ह्या काळात ममताबरोबर गुडगाव येथे एकत्र राहिले. अॅरबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजेच अमूर्त कला त्यांनी आत्मसाद केली होती आणि त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. कलाविश्वात गायतोंडे या नावाचं तयार झालेलं गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. वर्ष २०१५ मध्ये क्रिस्टी या सुप्रसिद्ध संस्थेने मुंबईत वासुदेव गायतोंडे यांच्या ऑईल पेंटिंगचा लिलाव केला होता.मार्च २०२१ मध्ये चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांनी पुन्हा एकदा रेकॉर्ड बनवले.१९६१ साली बनविलेले त्यांची एक निळ्या रंगाची ऑईल पेंटिंग्स ३९.९८ कोटी रुपये म्हणजेच ५५ लाख अमेरिकन डॉलर्सना विकली गेली.
हे कोणत्याही भारतीय कलाकाराच्या आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रांपैकी एक ठरले आहे. वासुदेव गायतोंडे यांनी स्वत: चा विक्रम मोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये गायतोंडे यांनी १९७४ मध्ये तयार केलेली ऑईल पेंटिंग सुमारे ३६ कोटींमध्ये विकली गेली होती. जेव्हा जग कोरोना साथीच्या विरुद्ध लढा देत होते, तेव्हा ही किमया त्यांच्या चित्रानं साधली होती.
सतीश नाईक यांनी 'गायतोंडे' हा मराठीत ग्रंथ संपादित केला आहे. सतीश नाईक यांनी संपादित केलेल्या 'गायतोंडे' या ग्रंथाचे जानेवारी २०१६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. गायतोंडे यांच्यावरील एक इंग्लिश पुस्तक 'सोनाटा ऑफ सॉलिट्युड: वासुदेव संतू गायतोंडे या नावाने आहे. दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना दरवर्षी ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ राज्य शासन प्रदान करते. वासुदेव गायतोंडे यांचे १० ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सतीश नाईक/ नितीन दादरावाला/दीपक घारे
लवासा विरोधी आंदोलन, पश्चिम घाट संवर्धन, भूसंपादन कायदा, शाश्वत विकास, लोकाधिकाराच्या चळवळी ते अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात आंदोलनात तसेच आम आदमी पार्टीच्या स्थापनेत सक्रिय सहभागी राहिलेले आहेत.
‘आदिबंध आणि स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबरी’ या विषयासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. पाच राज्य पुरस्कार, ‘मसाप’चे सहा पुरस्कार, बहिणाबाई प्रतिष्ठान, काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे.
मराठी मालिकांमध्ये विविध कामं केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला जगतापने रौद्र सिनेमातून पदार्पण केले. एप्रिलमध्ये रौद्र हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातल्या उर्मिलाच्या कामाचं कौतुक झालं होतं. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आयोजीत ७ व्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये उर्मिलाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.
काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती.
सवड मिळताच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत. आवश्यकता वाटल्यास त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत घेऊन येत. त्यांच्या या छंदामुळे पश्चिम घाटातील नद्या आणि पाणवठे यात लिम्नॉक्निडा इण्डिका या जलव्याल प्राणीसंघातील जलपुष्प गणातील प्राण्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले. त्यापूर्वी पश्चिघम घाटात या जलपुष्पाचे अस्तित्व कोणासही ठाऊक नव्हते. तांबी, वेण्णा, धोम येथील धरणांमध्येही हे प्राणी आढळून आले. त्यावर ‘नेचर’ या प्रख्यात नियतकालिकात त्यांचा संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाला.
संगीतकार रोशन यांचा पुत्र, अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांची ही ओळख. घरात संगीताचे वातावरण. त्यामुळे लहानपणीच त्यांना संगीताचे बाळकडू मिळाले. पुढे विनोदवीर मेहमूद यांनी राजेश यांना ‘कुंवारा बाप’ मध्ये संधी दिली. त्यांचा जन्म २४ मे १९५५ रोजी झाला. स्वतंत्र संगीतकार म्हणून राजेश यांचा हा पहिलाच चित्रपट. यातील गाणी चांगलीच गाजली. यातले ‘आ री निंदिया आ’ हे गीत आजही रसिकप्रिय आहे. त्यानंतर आलेल्या ‘ज्युली ’मध्ये मात्र राजेश रोशन यांनी कमाल केली. यातले ‘भूल गया सब कुछ, याद नहीं अब कु छ ’ हे किशोर-लताचे गाणे आजही भान हरवायला लावते, तर ‘माय हार्ट इज बीटिंग’ ऐेकल्यानंतर मन प्रसन्न होते. रसिकांचा ‘मूड’ एकदम फ्रेश करणारे संगीत हा राजेश रोशन यांचा विशेष पैलू. एक रास्ता है जिंदगी (काला पत्थर ), परदेसिया (मि. नटवरलाल ), अंग्रेजी में कहते हैं कि (खुद्दार), सारा जमाना (याराना ), बाहें तेरी खुशबू के (काला पत्थर), तुज संग प्रीत लगाई (कामचोर), दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है (आखिर क्यों ), घर से निकलते ही (पापा कहते हैं ), जाती हूं मैं (करन अर्जुन ), हंसते हंसते (खून भरी मांग ), कहो ना प्यार है ही त्यांच्या प्रसन्न शैलीतील गाण्यांची काही उदाहरणे.
गायकाच्या प्रतिभेचा समर्पक वापर करण्यात राजेश रोशन नेहमीच यशस्वी ठरले आहेत. ‘दो और दो पांच’ मध्ये किशोरकुमार यांच्या आवाजातील ‘तूने अभी देखा नहीं’ हे गाणे राजेश रोशन यांच्या संगीतप्रतिभेची चुणूक दाखवणारे आहे. ‘खेल’मध्ये आशा भोसले यांच्याकडून ‘इडली डू’ हे कॅब्रे साँग आणि तेच गाणे भजन स्वरूपात गाऊन घेण्याचा अफलातून प्रयोग केवळ राजेश रोशनच करू जाणे. ‘इन्कार’ मधले त्यांचे ‘मुंगडा मुंगडा’ हे कॅब्रे साँगही असेच आपल्याला रिफ्रेश करणारे, ठेका धरायला लावणारे. ‘लूटमार’ मधले आशातार्इंच्या आवाजातले ‘जब छाये मेरा जादू’ हे गाणेही असेच. ‘कामचोर’ मधल्या त्यांच्या संगीताने नटलेल्या ‘तुमसे बढकर दुनिया में’ या गाण्यातला गोडवा तर मधाहून मधुर. ‘दूसरा आदमी’ मधल्या ‘चल कहीं दूर’ या साडेसहा मिनिटांच्या गाण्यात लता- किशोर- रफीच्या आवाजाचा वापर एकदम कर्णमधुर. ‘याराना’ मधल्या ‘भोले ओ भोले’ मधला निरागसपणा त्यांच्या संगीताने अधिकच खुलतो, तर ‘छूकर मेरे मन को’ मधला भाव मनाला चांगलाच भावतो. ‘खट्टा मीठा’ मधले ‘थोडा है थोडे की जरूरत है’ असेच काळजाला भिडणारे. ‘जुर्म’ मधले ‘जब कोई बात’ हे गाणेही मनाला वेगळा आधार देणारे. ‘खेल’ मधल्या ‘खत लिखना है’ गाण्यातून तिची आणि त्याची अगतिकता राजेश रोशनच्या संगीतामुळे आपल्यालाही अगतिक करते. बासरी, तबला, दिलरुबा, सारंगी, बोंगो, कोंगो, ट्रम्पेट, सॅक्सोफोन आदी वाद्यांचा उत्कृष्ट मेळ, त्यातून निर्माण होणारी उत्तम सुरावट, सहज ओठावर येतील अशा चाली, पार्श्वगायकांच्या आवाजाचा योग्य वापर ही राजेश रोशन यांच्या संगीताची वैशिष्ट्ये. अलीकडच्या काळात कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश आणि काइट्स या चित्रपटांतील संगीताने तरुणाईची मने जिंकणारा राजेश रोशन हा एक विरळाच संगीतकार. काळानुरूप परंतु अभिरुचिपूर्ण, सातत्याने फ्रेश करणारे संगीत देण्यात राजेश रोशन यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राजेश रोशन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=rU0PCK5mFbU
अमोल पालेकर आणि झरिना वहाब यांच्या अभिनयानं सजलेला 'घरोंदा' हा हिंदी सिनेमा अनेकांच्या आजही स्मरणात आहे. तिचा जन्म १७ जुलै १९५९ रोजी झाला. चितचोर हा चित्रपट ही खूप गाजला होता. त्यातली अल्लड, लग्नाळू वयातली झरिना वहाब यांनी काम अप्रतिम केले होते. ‘चितचोर’ चित्रपटात नायिकेची भूमिका करून एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या झरिना वहाब हिने तिच्यापेक्षा सहा वर्षाने लहान असलेल्या आदित्य पांचोलीशी लग्न केलं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
एक अभिनेत्री, शास्त्रीय नृत्यांगना, कर्नाटकी गायिका, नृत्य प्रशिक्षक व राजकारणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वैजयंती माला यांनी वयाच्या १३ व्या वर्षी तामिळ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. एम डी रमन व वसु़ंधरादेवी हे त्यांचे आईवडिल. पापाकुट्टी (अर्थ लहान मुलगी) या नावाने ती ओळखली जात असे.
वैजयंती माला यांची आई तमिळ चित्रपटांतील एकेकाळची एक आघाडीची नायिका होती. ७ वर्षांची असल्यापासुन मा.वैजयंती माला यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात ती पारंगत झाली.
त्यांचे कौटुंबिक परिचित दिग्दर्शक एम डी रमन वझकई या तमिळ चित्रपटासाठी एका नव्या अभिनेत्रीच्या शोधात होते. त्या दरम्यान वैजयंतीमालाला त्यांनी नृत्य करतांना पाहिले व ते प्रभावित झाले. मात्र वैजयंतीमाला यांना त्यांच्या चित्रपटात संधी देण्यापुर्वी त्यांना तिच्या आजीचे, यदुगिरी देवी यांचे मन वळवावे लागले होते. कारण तिच्या शिक्षण व नृत्यावर याचा परिणाम होईल असे आजीचे मत होते.
वयाच्या सोहाव्या वर्षी अभिनय केलेला वैजयंतीमाला यांचा हा पहिलाच चित्रपट आर्थिकद्रुष्ट्या यशस्वी ठरल्याने याच चित्रपटाचा तेलगु मधे जीवितम या शीर्षकाने रिमेक करण्यात आला. नायिकेच्या भुमिकेसाठी पुन्हा वैजयंतीमालाची यांचीच निवड करण्यात आली. हा चित्रपट देखील यशस्वी झाला. १९५१ मध्ये आलेल्या 'बहार' या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
१९५४ मध्ये रिलीज झालेला नागिन हा सिनेमा त्यांच्या करिअरमधील पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. 'देवदास' हा सिनेमा वैजयंती माला यांच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. विमल राय दिग्दर्शित या सिनेमात वैजयंती माला यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९५८ मध्ये पडद्यावर झळकलेल्या 'साधना' या सिनेमातील भूमिकेसाठी वैजयंती माला यांना त्यांच्या करिअरमधील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
देवदास, नया दौर, मधुमती, गंगा जमुना, लीडर, आम्रपाली, गंवार, लीडर, सुरज, संगम, पैगाम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी त्यांना ओळखले जाते. त्या गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगणा आहेत. एकामागून एक हिट सिनेमे देणा-या वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये आपल्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसह काम केले आहे.
दिलीप कुमार, राजकपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, सुनील दत्त या अभिनेत्यांसोबत ऑन स्क्रिन त्यांची जोडी चांगली जमली होती. ‘संगम‘चे चित्रीकरण चालू असतांना एकदा वैजयंतीमालाचा वाढदिवस आला॰ राजने एक मोठा केक आणून त्यावर एकच मोठी मेणबत्ती लावली॰ सर्वांच्या प्रश्नार्थक नजरांना राजने हा वैजयंतीमालाचा RK मधील पहिलाच वाढदिवस आहे; तिचे येथे आणखी भरपूर वाढदिवस होवोत, मग मेणबत्यांची संख्या वाढत जाईल, असे सांगितले.
१९६८ मध्ये वैजयंती माला यांनी डॉ. चमनलाल बाली यांच्यासह लग्न केले. लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करणे बंद केले. १९६९ मध्ये रिलीज झालेला 'प्रिन्स' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये हिंदीसह तेलगू, तामिळ आणि बांग्ला या भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला.
वैजयंती माला यांना संगीत नाटक अॅकाडमी व पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ४८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे अध्यक्षपद भुषविले तर लोकसभा सदस्य म्हणुन त्यांनी काही काळ काम पाहिले. सन २००७ मधे बॉंडींग नावाने तिचे आत्मचरित्र प्रकाशित झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-दिव्य मराठी
Copyright © 2025 | Marathisrushti