‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० ऑगस्ट १९६६ रोजी रंगभूमीवर आणले. पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या रंगभूमीवर सादर केला गेला होता.
मिथुन चक्रवर्ती यांनी बी.एस.सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून अभिनयाचे अधिकृत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. करिअरच्या सुरूवातीला ऍक्शन आणि डान्ससाठी मिथुन चक्रवर्ती यांची खास ओळख निर्माण झाली होती. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांनी खऱ्या अर्थाने डान्सिंग स्टार बनवले. तर मृगया या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होतो. मिथुन चक्रवर्ती यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन फिल्म फेयर पुरस्कार, दोन स्टारडस्ट पुरस्कार आणि एक स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाला आहे. ८० च्या दशकात डिस्को डान्स हा नृत्य प्रकार त्यांनीच लोकप्रिय केला. आपल्या आगळ्या-वेगळ्या डान्स शैलीमुळे ते आजही लोकप्रिय आहेत.
सुरक्षा, तराना, हम पांच, शौकीन, वारदात, डिस्को डान्सर, प्यार झुकता नही, डान्स-डान्स यांसारख्या चित्रपटात त्यांनी प्रमुख नायकाची भूमिका साकारली आहे. १९९० मध्ये आलेल्या ‘अग्नि पथ’ चित्रपटातील दक्षिणात्य व्यक्तीची त्यांची भूमिका आजही कौतुकास्पद वाटते. मिथुन चक्रवर्ती यांचा १९९५ मध्ये आलेला ‘जल्लाद’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेने त्यांनी लोकांच्या मनात आपले वेगळे स्थान बनवले. तर २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘गुरू’ चित्रपटातील एडिटरची भूमिकाही देखील उल्लेखनिय होती.
मिथुन चक्रवर्ती यांनी वीर, गोलमाल ३, हाऊसफुल २, ओह माय गॉड, खिलाडी ७८६, कांची, किक आणि हवाईजादा यांसारख्या चित्रपट केले आहेत. मोठय़ा पडद्याप्रमाणेच छोटय़ा पडद्यावरील डान्स शो डान्स इंडिया डान्समध्ये ते ग्रँडमास्टर रूपाने लोकांपुढे आले. मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदीसह बंगाली, उडिया आणि भोजपूरी चित्रपटात काम केले.
केवळ चित्रपट अभिनेता म्हणून नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक आणि राज्यसभा सदस्य अशी मिथुन चक्रवर्ती यांची ओळख आहे. १९८२ साली त्यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी लग्न केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मद्रासमधल्या त्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या उपाहारापर्यंतच्या खेळातच टिकाकारांची तोंडे गप्प झाली होती. दिलिप सरदेसाईसोबत फारुख इंजिनिअर सलामीला आला होता आणी सलामीच्या पहिल्याच डावात त्याने वेस्ली हॉल, चार्ली ग्रिफिथ, दस्तुरखुद्द सोबर्स आणी लान्स गिब्ज ह्यांचे डोळे पांढरे केले होते. उपाहारावेळी तो ९४ धावांवर नाबाद होता आणी संघाच्या धावा होत्या बिनबाद १२५.
पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक श्री.पु.भागवत यांचा जन्म २७ डिसेंबर १९२३ रोजी झाला. मौज प्रकाशनच्या मौज(साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक.१९५० ते २००७ या काळात मौज या संस्थेला स्वतःची प्रेस व फाउंड्री मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
खटाव वाडीतील त्यांच्या कार्यालयामधून ही संस्था कार्यरत असत. मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड भागवतांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या. मौज प्रकाशनच्या मौज (साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक अशी त्यांची ख्याती झाली.
प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती अश्या माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाबळेश्वर येथे ३१ जानेवारी १९८७ रोजी पार पडलेल्या तिसर्याा मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष पद भागवत यांनी भुषविले होते.. श्री.पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री..पु. भागवत पुरस्कार देते. श्री.पु.भागवत यांचे २१ ऑगस्ट २००७ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
महानुभाव पंथ प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांची ओळख करून देणे तसेच मानवी मूल्याणा नवसंजीवनी देण्यासाठी स्वामींची ओळख करून देने अत्यावश्यक आहे
भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ डॉक्टर मा.कमलाबाई सोहोनी (जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ज्ञ) यांची आज पुण्यतिथी
त्यांचा जन्म १८ जुलै १९११ रोजी झाला.
दुर्गाबाई भागवत आणि कमलाबाई सोहोनी. दोघी सख्या बहिणी. मोठया दुर्गाबाईने साहित्यविश्व व्यापले तर धाकटया कमळाबाईने अवघे विज्ञानविश्व आपलेसे केले. या दोघी बहिणी अहमदनगरला आत्या सीताबाई भागवत यांच्याबरोबर राहून शिकत असताना, पंचक्रोशीतल्या मुली खेळायला त्यांना हाक मारीत ती 'दुर्गाकमळा' या जोडनावाने. मग त्यांतील एखादीला जरी बोलवायचे झाले तरीही 'दुर्गाकमळा' अशी दुपेडी हाकच येई. त्यांचा उल्लेखही 'दुर्गाकमळा' असाच केला जाई. बहिणींचे हे अद्वैत अखेरपर्यंत टिकले. त्यांनी निरेवर पण संशोधन केले होते.
इंग्रजांच्या अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. इसवी सन १९३३ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बी.एस्सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी वर्तमानपत्रातीत जाहिरातीनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स'मध्ये अर्ज केला. टाटांनी १९११ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई.
प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या, परंतु संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांनी 'मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही' असे कमलाबाईंना कळविले. कमलाबाई श्री. रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व 'मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही,आणि इथे राहून मी संशोधन करून एम.एस्सी. होणारच.' असे ठामपणे सांगितले. श्री. रामन यांनी कमलाबाईंच्या हट्टास्तव त्यांना एका वर्षासाठी प्रवेश दिला. मग वर्षभर कमलाबाईंनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. वर्षअखेर रामन त्यांना म्हणाले. तुमची निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते की, यापुढे संस्थेत फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा.
१९३७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या 'स्प्रिंगर रिसर्च' आणि 'सर मंगलदास नथूभाई' या शिष्यवृत्त्या मिळवून कमला सोहोनी इंग्लंडला गेल्या. तिथे केंब्रिजमधील जगप्रसिद्ध सर विल्यम डन लॅबॉरेटरीचे डायरेक्टर, नोबेल पारितोषिकविजेते सर फ़्रेड्रिक गॉलन्ड हॉपकिन्स यांना भेटून, संस्थेत प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी 'माझ्या प्रयोगशाळेतील सर्व जागा भरल्या आहेत, तुलाच जागा मोकळी दिसली तर सांग' असे सांगितले. कुणाचीच ओळख नसल्याने बाई हताश झाल्या, तेव्हाच तेथील एक शास्त्रज्ञ डॉक्टर रिक्टर यांनी त्यांना आपली जागा देऊ केली. दिवसा त्या जागेवर, सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत, बाई काम करीत, आणि रात्री डो. रिक्टर. पहिले सत्र संपायला केवळ दोन-तीन दिवस बाकी असताना कमलाबाईंनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला आणि 'प्राणिमात्रांप्रमाणे सर्व वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया 'सायटोक्रोन-सी'च्या मध्यस्थीने एन्झाइम्समुळे होतात, हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन सादर करून १९३९ साली केंब्रिज विद्यापीठाची विद्यावाचस्पती(पीएच्.डी.)ही पदवी संपादन केली. इतरांचे प्रबंध हजार-पंधराशे पानांचे असताना, कमलाबाईंचा प्रबंध अवघ्या ४० पानांचा होता आणि तो त्यांनी त्यावेळी एका व्याख्यानाद्वारे सभागृहापुढे ठेवला.
त्यानंतर अनेक शास्त्रज्ञाच्या आग्रहाला बळी पडून पुढील संशोधनासाठी इंग्लंडमध्ये न राहाता, डॉ कमलाबाई मायभूमीच्या प्रेमाने भारतात परत आल्या. दिल्लीच्या 'लेडी हार्डिंग्ज कॉलेज' व पुढे मुंबईच्या (रॉयल) इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स' या संस्थेत त्यांनी काम केले. मुंबईच्या याच संस्थेच्या निदेशक म्हणून त्या निवृत्त झाल्या. 'लेडी हार्डिंग्ज कॉइलेजमधली जीवरसायनशास्त्राच्या प्राध्यापकाची त्यांची नोकरी, डॉ. हॉपकिन्स यांच्या सूचनेनुसार १९३८ सालापासून कमलाबाईंकरिता राखून ठेवण्यात आली होती. इंग्लंडहून आल्यावर १९३९ मध्ये, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्या आपल्या नोकरीवर रूजू झाल्या. सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते २९ एप्रिल १९६० रोजी मिळालं आणि विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठीचा शेवटचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना १९९७ मध्ये मिळाला. दरम्यान, त्यांनी परदेशात आणि देशातही संशोधनाचं महत्त्वाचं काम केलं. त्यांच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी आपलं सारं आयुष्य अन्नभेसळी विरोधातच काम करण्यात व्यतीत केलं. मा.कमलाबाईंनी प्रत्येक ठिकाणी आपला प्रथम क्रमांक कायम राखला. कसलीही प्रसिद्धीची हाव नाही. आयुष्यभर ज्ञानार्जन आणि विद्यार्थ्यांना प्रेमाने ज्ञान देणं यात त्या रमल्या. सरकारी नोकरीतही त्यांनी देशहित पाहिलं. कुणाचाही दबाव सहन न करता उत्तम काम केलं.
मा.कमलाबाई सोहोनी यांचे ८ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले. मा.कमलाबाई सोहोनी यांना आदरांजली.
-- संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- वसुमती धुरू/ Wikepedia
आज ख्यातनाम अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा वाढदिवस.
शर्मिला टागोर यांचा जन्म ८ डिसेंबर १९४६ रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला. एका हिंदू बंगाली कुटुंबात शर्मिला टागोर यांचे वडील गितेन्द्रनाथ टागोर एल्गिन मिल्स चे महाप्रबंधक होते. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून हिंदी सिनेमात अभिनयाला सुरुवात केली. १९५९ सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटा पासून आपले फिल्मी करियरची सुरवात केली. शर्मिला टागोर बॉलिवूड मध्ये अनेक ट्रेंड सुरु करणारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सिनेमांत पहिल्यांदा बिकिनी शॉट देणारी पहिली अभिनेत्री म्हणूनसुध्दा त्यांना ओळखले जाते. १९६० मध्ये शर्मिला टागोर यांनी बिकनी घालून बॉलीवूड मध्ये हलचल उडवून दिली. मंसूर अली खान पत्तोडी व शर्मिला टागोर यांची प्रेम कहाणी १९५९ पासून होती या दोघांनी १९६८ च्या डिसेंबर मध्ये लग्न केले. असे सांगितले जाते की १९६७ मध्ये नवाब पत्तोडी यांची आई साजिदा सुल्तान शर्मिलाला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. तेव्हा शर्मिला यांचा बहुचर्चित 'एन इव्हिनिंग इन पेरिस' सिनेमा प्रदर्शित होणार होता. या शर्मिला यांनी बिकिनी परिधान केली होती. शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर मुंबईमध्ये ठिक-ठिकाणी लागले होते. शर्मिला यांना नवीब पत्तोडी यांच्या आई मुंबईला येणार याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर लागलेले बिकिनी पोस्टर्स काढून टाकण्यास सांगितले होते. शर्मिला यांना भिती वाटत होती, की हे पोस्टर्स पाहून नवाब पटौदी यांची आई नाराज होऊ नये. नवीब पत्तोडी व शर्मिला टागोर यांची जोडी त्या काळी बॉलिवुड ची एक आकर्षक और आदर्श जोडी मानले जात होते. लग्नानंतर शर्मिला टागोर यांनी आपले नाव आयशा सुलतान ठेवले. शर्मिला टागोर यांच्या आराधना या चित्रपटाला फिल्मफेयर सर्वश्रेष्ट अभिनेत्री अवार्ड व मासूस या चित्रपटाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार ने सम्मानित केले. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांची जोडीला बॉलिवुडची सफल जोडी मानले जाते. दोघांनी ६ सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले ते आराधना, सफर, अमर प्रेम, छोटी बहू, दाग और आविष्कार. शर्मिला टागोर सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष होत्या. या पदावर कार्यरत असताना आजच्या काळात होणा-या अंगप्रदर्शनावर त्यांनी चिंता व्यक्त केली होती. राजेश खन्ना यांच्यासोबत आराधना हा शर्मिला यांचा बहुचर्चित सिनेमा होता. बेशरम सिनेमात अमिताभ सोबत काम केले होते. शर्मिला टागोर यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षपद भूषवले आहे. आज शर्मिला टागोर चित्रपटापासून लांब असल्या तरी सामाजिक कार्या मध्ये त्यांचे खूप काम आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट.
अनुप जलोटा यांनी आकाशवाणी वर कोरस गायक म्हणून करियरला सुरवात केली. मुंबईत आल्यावर त्यांची गाणी हिट झाली आणि त्यांना म्युझिक कंपन्यांकडून गाण्यांची ऑफर मिळाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भारतीय जनता पार्टी यांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. भाजपाचे खूप मोठे नेते विनयला व्यक्तिशः ओळखत होते पण विनयनं एका पैश्याचाही स्वार्थ कधी साधला नाही. गाणं शिकवणं आणि प्रिटींगची कामं या दोन व्यवसायातूनच त्यानं चरितार्थ चालवला.
एस.एच.बिहारी यांचे पूर्ण नाव शमशूल हुदा बिहारी. आपल्या या रोमँटिक गीतलेखनाने तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे एस. एच. बिहारी यांचा जन्म बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील अरा येथे. लहानपणापासूनच त्यांना भाषेचे प्रचंड वेड. त्या वेडातून त्यांनी हिंदी, उर्दू आणि बंगाली भाषांवर प्रभुत्व मिळवले. पण भाषेइतकेच एस. एच. बिहारी यांना फुटबॉलचेही वेड होते. कोलकात्याच्या मोहन बगानकडून तरुणपणी ते फुटबॉल खेळायचे. फुटबॉल खेळत असताना पायांच्या लयबद्ध हालचालीबरोबरच बिहारी यांच्या मनात शब्दांचा मेळा भरायचा. पुढे या काव्यप्रतिभेला गीतांचा आयाम लाभला आणि एस. एच. बिहारी नामक गीतकार जन्माला आला. पोटापाण्यासाठी मुंबईला आल्यानंतर बिहारी यांनी काही काळ रबराच्या कारखान्यात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम पाहिले, परंतु गीतलेखनाचे वेड काही स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातच राजा मेहंदी अली खान यांच्याशी बिहारी यांची मैत्री झाली. खान साहेबांनी त्यांना निर्माते-दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांच्याकडे पाठवले. मुखर्जींनी बिहारी यांच्याकडे साशंकतेने पाहिले आणि त्यांनी प्रश्न विचारला, ‘क्या बेचते हो?’ या पठ्ठ्याने तत्काळ उत्तर दिले, ‘दिल के टुकडे बेचता हूँ।’ बिहारींच्या उत्तराने मुखर्जी प्रभावित झाले. त्या वेळी मुखर्जी ‘शर्त’ चित्रपट बनवत होते. त्यांनी विनाशर्त ‘शर्त’च्या गीतलेखनाची जबाबदारी बिहारींवर टाकली. ना ये चाँद होगा, मोहब्बत में मेरी तरह, देखो वो चाँद चुपके या त्यांच्या गाण्याला हेमंतकुमार यांच्या संगीताचा साज लाभला आणि ‘शर्त’मुळे एस. एच. बिहारी हे नाव रसिकांच्या कानात रुजले. ‘शर्त’च्या आधी संगीतकार अनिल विश्वास यांनी बिहारी यांना संधी दिली होती. मात्र शर्तमधल्या मधाळ व प्रेमरसयुक्त गाण्यांनी बिहारींना नाव मिळवून दिले. त्यानंतर मात्र बिहारी यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर बिहारी यांच्या गीतांची लय आणि ओपी यांचा ठेका यांचे सूर जुळले आणि रसिकांच्या भेटीला आली रसाळ, रोमँटिक अविस्मरणीय गाणी. काश्मीर की कली, ये रात फिर ना आयेगी, सावन की घटा, मोहब्बत जिंदगी है, किस्मत, प्राण जाए पर वचन ना जाए, एक मुसाफिर एक हसीना आदी चित्रपटांतील गाणी ओपी-बिहारी कॉम्बिनेशनची काही उदाहरणे. त्या वेळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकाराबरोबरही बिहारींचे सूर चांगले जुळले. कौन है जो सपनों मे आया, कहाँ चल दिये इधर तो आओ, उनसे मिली नजर (झुक गया आसमान) ही काही गाणी. ये चाँद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आँखे, कोई राज है इनमें गहरा... काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्यातही उठून दिसणारी शर्मिला टागोर आणि तिच्या सौंदर्याने भारावलेला शम्मी कपूर. जोडीला ओ. पी. नय्यरचे ठेकेबाज संगीत. या गाण्याने एका पिढीला अक्षरश: वेड लावले. शर्मिला टागोरच्या त्या काळच्या सौंदर्याचे एवढे अचूक आणि लयबद्ध वर्णन करणार्यान या गाण्याचे शब्द होते गीतकार एस.एच.बिहारी यांचे. रोमान्स, इश्क, मोहब्बत या प्रेमाच्या भावनांना शब्दरूपी उपमा आणि अलंकाराने सजवून त्याचे लयबद्ध काव्य तयार करणे, ही मा.बिहारी यांची खासियत होती. इशारो इशारों मे दिल देनेवाले (काश्मीर की कली) मधून येणारा प्रेमाविष्कार ये चाँद सा रोशन चेहरा अशा स्तुतीवर येऊन बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी (एक मुसाफिर एक हसीना) या वळणावर कसा स्थिरावतो, हे बिहारींच्या मधाळ शब्दांत ऐकण्याचा आनंद विरळाच. मै शायद आप के लिए अजनबी हूँ (ये रात फिर ना आयेगी)मधला अनोळखी भाव, किसी ना किसी से कभी ना कभी(काश्मीर की कली)मधला दुर्दम्य आशावाद, जरा होले होले चलो मेरे साजना (सावन की घटा)मधले आर्जव, उनसे मिली नजर के मेरे होश उड गये (झुक गया आसमान)मधली सर्वस्व हरपल्याची भावना, चाहे लाख तूफान आये (प्यार झुकता नही)मधला वज्रनिर्धार, हैरान हूँ आपकी झुल्फों को देखकर (जबाब हम देंगे)मधले कौतुक, चैन से हमको कभी आपने जीने ना दिया (प्राण जाए पर वचन ना जाए)मधला विरक्त भाव, लाखो है यहाँ दिलवाले (किस्मत)मधले नैराश्य, कजरा मोहब्बतवाला अखियों मे किसने डाला (किस्मत)मधला प्रफुल्लित भाव, यही वो जगह है (ये रात फिर ना आयेगी)मधला आठवणींचा धांडोळा, कौन है जो सपनों मे आया (झुक गया आसमान)मधला स्वप्नवाद, तुमसे मिलकर ना जाने क्यो (प्यार झुकता नही)मधला स्मृतिगंध आणि प्यार हमारा अमर रहेगा (मुद्दत)मधला आशावाद, असा विविध नवरसांनी युक्त शब्दांचा मळा एस. एच. बिहारी यांनी फुलवला होता. एस.एच.बिहारी यांचे निधन २५ फेब्रुवारी १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / http://www.shbihari.com
मा.एस.एच.बिहारी यांची वेब साईट. http://www.shbihari.com
Copyright © 2025 | Marathisrushti