शिर्डीचे साईबाबा हा मराठी आणि शिरडी के साईबाबा हा हिंदी चित्रपट त्याचप्रमाणे तुफान और दिया, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, लडकी सह्याद्री की, हिरा और पत्थर,सुहाग मराठीत – अमर भूपाळी, वारणेचा वाघ, पिंजरा , झुंज, ज्योतिबाचा नवस, बाळा गाऊ कशी अंगाई, चिकट नवरा वगैरे चित्रपटांत त्यांनी भुमिका केल्या होत्या.
March 13, 2022
श्याम बेनेगल यांनी चित्रपट सृष्टीत भरीव योगदान दिले आहे. आजही अशाप्रकारचे योगदान देण्यामध्ये सक्रिय आहेत. त्यांनीच स्मिता पाटील यांची ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘मंडी’ चित्रपटासाठी निवड केली होती.
December 14, 2021
आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.
अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅ्व्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला. नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते.
विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती.
‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅणन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.
‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले. आपल्या समुहा तर्फे विनय आपटे यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांची गाजलेली नाटके
रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.
गाजलेले चित्रपट
एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.
June 17, 2019
ज्या काळात पार्वतीकुमार, गोपीकृष्ण, रोशनकुमारी यांच्यासारखी नर्तक मंडळी सिनेमाकडे वळली त्या काळात दमयंती जोशी यांनी कथक नृत्यसाधनेची विशुद्ध कास धरली आणि त्यामध्ये नवनवीन प्रयोग सिद्ध केले. नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म ५ डिसेंबर १९२८ रोजी झाला. दमयंती जोशी यांनी कथक नृत्यप्रकारास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली, तर भरतनाट्यम हा नृत्यप्रकार दक्षिणेतून मुंबईत येऊन रुजण्यास त्या कारणीभूत झाल्या. बालपणापासून नृत्याचीच ओढ असलेल्या दमयंती जोशी यांचा जन्म मुंबईतल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला. सुरवातीचे नृत्य शिक्षण सीताराम प्रसाद यांच्याकडे घेतले.
दमयंती जोशी यांना वयाच्या चौथ्या वर्षी मादाम मेनका या नृत्यांगनेने आपली वारसदार म्हणून पंखाखाली घेतले. हे सगळे १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत घडत होते ह्या पार्श्वभूमीवर अजूनच जास्त महत्वाचे आहे. मादाम मेनका या पारंपारिकरित्या नृत्याच्या घराण्यातून आलेल्या नव्हत्या पण कथ्थक शिकलेल्या होत्या आणि मणिपुरी, कुचिपुडी अश्याही अनेक शैलींचाही त्यांनी अभ्यास केला होता. अनेक शैलींना आपल्या बॅलेमधे एकत्र करण्याचे प्रयोग मेनका जोशी यांनी केले. त्याचे संस्कार घेऊन दमयंती जोशींनीही पुढे बरेच महत्वाचे यशस्वी प्रयोग केले. या सगळ्यात त्यांना पूर्णपणे साथ देणारी त्यांची आई वत्सलाबाई जोशी यांचेही योगदान महत्वाचे होते.
भारतीय नृत्य विदेशात पोहचवण्याचे श्रेय दमयंती जोशी यांना जाते. त्यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. मा.दमयंती जोशी यांचे निधन १९ सप्टेंबर २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 7, 2019
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी मौज साप्ताहिक आणि सत्यकथे मधून ‘ तुकाराम शेंगदाणे ‘ या नावाने त्यांनी लेखन केले.. त्यांचे ‘ तुकाराम शेंगदाणे ‘ हे नाव आणि लेखन त्यावेळी खूपच गाजले. १९५१ ते १९५३ या काळात त्यांचे इंग्लंडमध्ये वास्तव्य होते . त्यांनी भारतीय परराष्ट्रीय हायकमिशनच्या परराष्ट्र खात्यात नोकरी केली. त्यानंतर ज्ञानेश्वर नाडकर्णी पत्रकारितेत स्थिरावले .
May 30, 2021
अंगद म्हसकर… एक गुणी आणि वास्तववादी कलावंत… रंगमंचावरून प्रवेश करून त्याने स्वत:चा पाया किती पक्का आहे हे कधीच दाखवून दिलंय….
साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. दिग्दर्शक विजू मानेचा मला फोन आला. मराठी इंडस्ट्रीत येऊ पाहत असलेल्या एका फिमेल मॉडेलचं फोटोशूट करण्यासाठीचा तो फोन होता. ठरल्याप्रमाणे आम्ही स्टुडिओत भेटलो आणि शूटला सुरुवातही केली. त्या मॉडेलचं शूट संपल्यावर विजूसोबत एक सडपातळ बांध्याचा, निळ्या-घाऱया डोळ्यांचा, हसऱया चेहऱयाचा आणि चेहऱयावर विलक्षण तेज असलेला मुलगा होता. विजूने ओळख करून दिली. फोटोशूट संपल्यावर विजूचे आणि या नुकत्याच भेटलेल्या मुलाचे काही फोटो मी स्टुडिओत टिपले. ही मैत्री इथेच संपली नाही. पुढे नियमित भेटीगाठी झाल्या. या नव्या मुलाचा आणि इंडस्ट्रीत काही करू पाहत असलेल्या कलाकाराचा प्रवास पुढे रंगमंच ते छोटा पडदा आणि नंतर थेट रुपेरी पडदा असा वेगाने होताना मला पाहायला मिळाला. अंगद म्हसकर या तरुणानं अल्पावधीतच आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. मोजक्या पण अर्थपूर्ण भूमिका चोख निभावणारा कलाकार म्हणून त्याने आपली ख्यातीच निर्माण केली.
अभिनयाचा श्रीगणेशा करण्याआधी अंगदने स्वतःवर विशेष मेहनत घेतली होती. नियमित व्यायामाच्या सरावाने त्याने चांगली शरीरयष्टी कमावली. अभिनयाचे वेगळे धडे गिरवले. या सिनेसृष्टीतल्या प्रवासात अंगदला अनेक गुरू भेटले. अनिवाश नारकर यांना अंगद अगदी जवळचा मित्र मानतो. तर कै. मोहन वाघ यांना तो आपले व्यावसायिक गुरू मानतो. तर त्याचे दुसरे व्यावसायिक गुरू म्हणजे दिग्दर्शक वामन केंद्रे. गॉडफादर नितीन सरदेसाई यांच्यामुळे त्याला अभिनयाची वेगळी शिस्तच लागल्याचं तो मानतो. ‘गारंबीचा बापू’ हे अंगदचं गाजलेलं नाटक. याखेरीज ‘ती फुलराणी’, ‘रणांगण’, ‘ऑल द बेस्ट’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘गिधाडे’, ‘तिन्ही सांज’ या नाटकांतून अंगदने रसिकमन जिंकलं. ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘मड्डम सासू दड्डम सून’, ‘गुंतता हृदय हे’, ‘तू तिथे मी’, ‘हृदयी प्रीत जागते’, या महाराष्ट्रभर गाजलेल्या मालिकांत अंगदची महत्त्वाची भूमिका होती. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘मुंबई पुणे मुंबई-2’ या चित्रपटांत अंगदने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. ‘बायोस्कोप’ या सिनेमातील ‘एक होता काऊ’ या लघुपटात स्पृहा जोशीसोबतची अंगदची भूमिका विशेष गाजली.
अंगदचं फोटोशूट करण्यासाठी त्याकाळी गाजलेल्या एका मालिकेत त्याची असलेली कॉर्पोरेट प्रतिमा आम्ही लक्षात घेतली आणि याच प्रतिमेला धरून काहीतरी वेगळ शूट करायचं असं आमचं ठरलं. कॉर्पोरेट प्रतिमेला धरून अंगदचा पेहराव ठरवण्यात आला. ब्लेझर लूकमध्ये अंगद फारच सुंदर दिसत होता. स्टुडिओत त्याचं या लूकमधलं एक फोटोशूट केलं. यानंतर या शूटला विरोधाभास वाटेल असं एक शूट करायचं आमचं ठरलं. या शूटसाठी आम्ही थेट एका गॅरेजमध्ये गेलो.
माझा मित्र दिगंबर यादव याचं अवाढव्य मोठं गॅरेज या शूटसाठी आम्हाला उपलब्ध झालं. इथे मला हवं असलेलं सारं काही होतं. जुन्या मोटारी, त्यांचे पार्टस् तसंच त्याची अवजारं हे सारं काही होतं. सुरुवातीला ब्लेझर घातलेल्या अंगदचे इथल्या जुन्या मोटारींच्या बॅकग्राऊंडला काही फोटो मी टिपले तर यानंतर एक जुनी सायकल आमच्या नजरेस पडली. ही सायकल हातात घेऊन जात असलेल्या अंगदचे काही फोटो टिपले. अंगदचा ब्लेझरमधल्या पेहरावामुळे हवा असलेला विरोधाभास निर्माण करता आला तसंच त्याच्या हातात एक हेल्मेट देऊन आम्ही त्यात आणखी मजा आणण्याचा प्रयत्न केला.
साधारणपणे पाच ते सहा तास अंगदचं शूट सुरू होतं. या शूटवर अंगद म्हणाला, ‘यातलं लायटिंग आणि ओव्हरऑल एक्स्प्रेशन फारच सुंदर आहेत. माझ्या आयुष्यातलं हे फारच लक्षात राहणारं शूट तर आहेच; परंतु ही कल्पना मुळातच फार सुरेख आहे आणि हे शूट झाल्यानंतर मला असं जाणवलं की हे समाज प्रबोधनासाठीही अत्यंत उपयोगी पडेल. यासाठी की, सध्याच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सायकल हे अत्यंत उत्तम साधन आहे. वाहने चालवताना सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. मग ते कोणतेही वाहन असो आणि माझ्या हातात असलेलं हे हेल्मेट त्यांचं प्रातिनिधित्व करत आहे.’ त्याच्या या विधानाने मी भारावूनच गेलो. अंगद जे करतो त्या प्रत्येक कृतीमागे त्याचा असा एक स्वतंत्र विचार असतो. तो विचार त्याला पटला तर आणि तरच तो पुढचं पाऊल उचलतो. हाच गुण कदाचित त्याचा कलाकृती निवडण्यामागेही असावा आणि म्हणूनच मोजक्या परंतु चोख भूमिका निभावण्यात अंगदचा नेहमीच हातखंडा राहिला आहे.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
March 18, 2019
ज्यांच्या कथांवर अनेक मराठी आणि 'बीवी ओ बीवी' हा हिंदी चित्रपट निघाला, ते प्रा.प्रभाकर तामणे यांनी 'पुनर्मीलन', 'रात्र कधी संपू नये', 'जीवनचक्र' आदी कादंबऱ्या पण लिहिल्या पण प्रा.प्रभाकर तामणे गाजले ते विनोदी कथाकार म्हणून. मा.प्रभाकर ताम्हणे यांचे ७ मार्च २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 15, 2017
१९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी “गांधारी हनगल’ या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली. मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या.
July 21, 2021
बीना रॉय या मूळ लखनौच्या होत्या व त्यांनी १९५१ मध्ये ‘काली घटा’ या चित्रपटातील भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. बीना रॉय यांचा जन्म ४ जुन १९३८ रोजी झाला. त्यावेळी किशोर साहू हे त्यांचे सहकलाकार होते. त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
बीना रॉय यांचा विवाह चित्रपट निर्माते व अभिनेते राज कपूर यांचे मेहुणे प्रेमनाथ यांच्याशी झाला व त्या कपूर घराण्याचा भाग बनल्या. बीना रॉय व प्रेमनाथ यांनी काही चित्रपटात एकत्र काम केले होते, त्यात औरत चा समावेश होता विवाहानंतर या दोघांनी पी.एन.फिल्मस ही कंपनी काढली होती.
शगुफा हा त्यांच्या या कंपनीचा पहिला चित्रपट होता. समुंदर व वतन हे आणखी दोन चित्रपट त्यांनी काढले पण ते चालले नाहीत. बीना राय यांनी प्रदीपकुमार समवेत केलेले चित्रपट गाजले होते. अनारकली, ताज महल, घुंगट हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले होते. बीना रॉय यांचे ६ डिसेंबर २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 9, 2019
आज ६ नोव्हेंबर.. आज हिंदी चित्रसृष्टीतील सशक्त अभिनेता म्हणून ज्यांना ओळखलेजाते अशा संजीव कुमार यांची पुण्यतिथी
जन्म: ९ जुलै १९३८
संजीव कुमार या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले श्री हरिहर जरीवाला या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली. सुमारे २५ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी १५० पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 'दस्तक’ आणि ‘कोशिश’ या चित्रपटांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. या शिवाय सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणूनही तीन फिल्मफेअर पुरस्कारांनीही संजीव कुमार यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी १९६० साली आलेल्या ‘हम हिंदुस्तानी’या चित्रपटात केवळ दोन मिनिटांच्या भूमिकेतून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत स्टारडम ही संकल्पना त्याकाळात नुकतीच रुजू झालेली होती. राजेश खन्ना हा बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार समोर आला. तर‘एंग्री यंग मॅन’च्या रूपात अमिताभ बच्चनने सामान्य माणसांच्या समस्या आणि संघर्षाला वाचा फोडली. आणि त्यांच्याही आधी देव आनंद या पहिल्या स्टाइल गुरुचा बॉलीवूडमध्ये समावेश झाला होता. अशा संक्रमणाच्या काळात संजीव कुमार या सर्वांपेक्षा वेगळे ठरत, शांतपणे आपल्या मार्गाने जात आपल्या एका वेगळ्या स्थानी जाऊन पोचले. व्यावसायिक आणि ‘ऑफ बीट’ चित्रपटातील भेद मिटवून आपला वेगळा प्रेक्षक बनवित आपले स्थान पक्के करत होते. अभिनयाच्या बळावर त्यांनी आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला जो नेहमीच त्यांच्या वेगळ्या भूमिकांतील चित्रपटाची प्रतीक्षा करणारा होता. कोशिश’ चित्रपटापासून त्यांची गुलजारशी जोडी जमली. या जोडीने अनेक चांगले चित्रपट दिले. ‘कोशिश’ मध्ये त्यांनी एका मूक-बधिर व्यक्तीची केलेल्या भूमिकेमुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी हे सिद्ध करून दाखविले की अभिनयासाठी संवादांची आवश्यकता नसते. केवळ डोळे आणि चेह-याच्या हावभावावरून त्यांनी जोरदार अभिनय करून दाखविला. कोशिश, परिचय, मौसम, आँधी, नमकीन आणि अँगूर हे त्यांचे उत्कृष्ट चित्रपट आहेत. संजीव कुमार यांनी कुठल्याही भूमिकेला त्यांनी कमी न लेखता त्यात प्राण ओतले. मग ती कोशिशमधली मुक-बधिराची भूमिका असो, 'अँगूर'मधला कॉमिक डबल रोल, 'शोले'चा लाचार ठाकुर असो किंवा 'आँधी'मधल्या महत्त्वाकांक्षी पत्नीचा लो प्रोफाइल पती. हिंदी चित्रपटात पहिल्यांदा संजीव कुमार यांनी 'नया दिन नई रात’एकाच चित्रपटात नऊ रसांची संकल्पना स्पष्ट करणा-या नऊ भूमिका केल्या. पडद्यावर आपली प्रत्येक भूमिका शब्दशः जगणा-या या कलाकाराचे व्यक्तीगत आयुष्य मात्र दुःखद होते. हेमा मालिनीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने संजीवकुमार नंतर एकाकीच राहिले.
आपण ५० वर्षांपेक्षा जास्त जगूच शकणार नाही या गोष्टीची त्यांना पूर्ण खात्री होती. कारण त्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये कुणाही पुरुष ५० वर्षांपेक्षा जास्त जगू शकला नव्हता. संजीव कुमार यांचे ६ नोव्हेंबर १९८५ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 6, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti