माया खुटेगावकर… अस्सल लावण्यवती नर्तिका… आई–बहिणीच्या मायेच्या पंखाखाली तिची लावणीबहरली…
अस्सल खानदानी लावणी सादर करण्यात मधू कांबीकर यांचा हातखंडा मानला जात असे. मधू कांबीकरांच्या लावणी समूहात रुक्मिणीबाई अंधारे या गायन, अभिनय आणि नृत्य सादर करीत. मधू कांबीकरांप्रमाणेच आपल्या मुलींनीही नावलौकिक मिळवावा, अभिनय, नृत्य अन् गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवावा असं रुक्मिणीबाई यांना नेहमीच वाटत असे. गायन क्षेत्रात विजया तर नृत्यात छाया आणि माया यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आणि अल्पावधीतच विजया-छाया-माया हे नाव लावणी वर्तुळात अदबीनं घेण्यास भाग पडलं.
लातूर गावातल्या खुटेगाव या छोटय़ाशा खेडय़ातून सुरू झालेला हा लावणीचा प्रवास पुढे सातासमुद्रापारही जाऊन पोहचला. आपल्या गावाचं नाव पुढे जगाच्या इतिहासात कोरलं जाईल हे हेरून रुक्मिणीबाईंनी आधीपासूनच आपल्या मुलींची ओळख अंधारे या आडनावाने न करता खुटेगावकर या नावाने करून दिली आणि पुढे विजयासोबतच छाया-माया खुटेगावकर या नावानं त्या जगप्रसिद्ध झाल्या.
छाया खुटेगावकरांचा लावणीचा हा प्रवास फार आधीच सुरू झाला होता, मात्र माया खुटेगावकर ही वयाच्या चौदा वर्षांपर्यंत यापासून वंचित राहिली होती. माया कुटुंबात सर्वात लहान आणि म्हणूनच लावणीपासून तिला दूर ठेवत शिक्षणासाठी पुण्यातील कर्वेनगर इथल्या हॉस्टेलला वेगळं ठेवण्यात आलं होतं. याउलट आपल्या आई आणि बहिणीप्रमाणेच आपणही या क्षेत्रात यावं असं मायाला वाटत असे. अखेर नववीपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचा या क्षेत्रात अपघातानेच श्रीगणेशा झाला. अपघाताने होण्याचं कारण म्हणजे मुंबईत षण्मुखानंद हॉलला लावणीचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि या कार्यक्रमाला एक नृत्यांगना काही कारणास्तव येऊ शिकली नाही. या मुलीची जागा भरून काढण्यासाठी मायाला या कार्यक्रमात घेण्यात आलं आणि इथेच मायाची नाळ लावणीशी जोडली गेली.
छाया आणि मायाचे फोटो काढण्याची संधी मला अनेकदा मिळाली. कालांतराने छायाच्या गुडघ्याच्या दुखण्याने डोकं वर काढलं आणि तिचा नृत्यप्रवासाचा वेग मंदावला. त्यातच ती मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना लावणी विषयाचे धडे देण्यात गुंग झाली. छाया-माया ही जोडी पुढे तुटली. यानंतर मग केवळ मायाचे फोटो काढण्याची संधी वारंवार मिळू लागली. पुणे, सातारा या ठिकाणी मायाचे अनेक कार्यक्रम सातत्याने होऊ लागले. त्यातच ‘नाद करायचा नाय’ या कार्यक्रमाला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. याच कार्यक्रमात मायाचे बॅकस्टेजला काही फोटो मला टिपता आले. मायाचे फोटो काढताना ती फार कमी बोलते. तिला बोलतं केल्यानंतर तिने तिचा जीवनप्रवास हळूहळू उलगडून सांगितला. ‘‘माझे वडील माळकरी होते. त्यांना आईने या क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांचा विरोध झुगारून आईने तिचा प्रवास सुरूच ठेवला. शेवटी आई घर सोडून आम्हा तिघा बहिणींना घेऊन निघून आली.’ माया सांगत होती.
पारंपरिक लावणी सादर करण्यासाठी माया ओळखली जाते. तसंच बैठकीची लावणी, अदाकारीच्या लावणीसाठीही ती प्रसिद्ध आहे. तिच्या कलेला कॅमेराबद्ध करण्यासाठी मी महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिचे कार्यक्रमात फोटो टिपले. कार्यक्रम, ठिकाण आणि तिच्या सादरीकरणावर यानुसार मायाच्या पेहरावात, शृंगारात बदल झालेला दिसला. बैठकीची लावणीसाठी पांढऱया रंगाची साडी, अदाकारीची लावणीसाठी हिरव्या, निळ्या, केशरी रंगाची तर विशेष कार्यक्रमात लाल, गुलाबी रंगाची साडी ती सहसा परिधान करत असल्याचं मला लक्षात आलं. त्यानुसार त्यावरचे दागिने आणि मेकअप, हेअर देखील बदलल्याचं लक्षात आलं. तिच्या याच विविध रूपांना कॅमेराबद्ध करण्यासाठी मी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली.
मायाचे या क्षेत्रातले नेमके गुरू कोण असं तिला विचारलं असता ती सांगते, ‘‘षण्मुखानंद हॉलला झालेल्या कार्यक्रमानंतर छायाताईने अभिनय आणि नृत्य यांचे धडे मला दिले, तर माझ्या आईने आणि पेटीवाले शंकर जावळकर यांनी गायनाचे धडे मला दिले. यानंतर याचं औपचारिक शिक्षण मला मिळावं म्हणून मला आईने साताऱयात एका शिबिरात घातलं. इथे भामिनाबाई आणि इतर गुरूंनी माझ्यावर संस्कार केले. सुरुवातीला छोटय़ा कार्यक्रमातून माझी सुरुवात झाली. नंतर हा प्रवास वेगाने सुरू झाला. या प्रवासात अनेक चढउतार मी पहिले. माझ्या आई आणि बहिणींमुळे मला दुःखाची झळ सोसावी लागली नसली तरीही त्यांच्यामुळे मला याची जाणीव कायम राहिली. आता छायाताई आजारामुळे या क्षेत्रात नाही तर विजयाताई सात वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली. याचं दुःख सांगावं तेवढं कमीच.’’
माया बोलता बोलता भावुक झाली. कलेने मायाला भरभरून दिलं असलं तरीही तिच्या मनाच्या कोपऱयात तिच्या आई आणि बहिणींसाठीची ‘माया’ कायमच असल्याचं तिच्या बोलण्यात दिसून येतं. अनेक भावना मनात दाटल्या असतानाही त्याचा मागमूसही लागू न देता माया तिच्या कंठानं अन् नृत्यानं नेहमीच रसिकमन जिंकत आल्याचं आजवरच्या तिच्या या प्रवासात पाहायला मिळालं आहे.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
pd - January 28, 2019
हेमन्ता कुमार मुखोपाध्याय उर्फ हेमंत कुमार यांना संगीताचे औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते. त्यांचा जन्म १६ जून १९२० रोजी झाला. त्यांचा कुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले. गायनात गती असणाऱ्या हेमंत कुमार यांना साहित्यक्षेत्रात देखिल रस होता.
१९३७ साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणे ह्या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि त्यांच्या मधील कलाकार जन्मास आला. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 'निमोई संन्यासी' ह्या बंगाली चित्रपटासाठी तर 'ईरादा' ह्या हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन मा.हेमंत कुमार यांनी चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांनी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले.
स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी पूर्बोरंग ह्या बंगाली तर आनंदमठ ह्या हिंदी चित्रपटाला संगीत दिले. नागिन चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शित केलेले त्यांची गाणी खूप गाजली. ह्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कारदेखिल मिळाला. गायक म्हणून हेमंत कुमार यांनी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रातील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी गाईली. हेमंत कुमार यांनी मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशेर नीचे ह्या चित्रपटाद्वारे चित्रपटनिर्मीती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स ह्या चित्रपट कंपनीने निर्माण केलेले बीस साल बाद, कोहरा, खामोशी ह्यांसारखे हिंदी चित्रपट त्यांतील गाण्य़ांसकट लोकप्रिय झाले. ह्या सर्व चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शनाची जबाबदारी देखिल हेमंतदांनी यशस्वीपणे संभाळली होती.
हेमंत कुमार यांनी गायलेली मराठी गाणी ही लोकप्रिय झाली. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, ’मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ ही हेमंत कुमार यांची मराठी गाणी खूपच गाजली. हेमंत कुमार यांचे १६ सप्टेंबर १९८९ यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
pd - June 16, 2019
रंगनाथ पठारे हे कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. वैचारिक, समीक्षा आणि अनुवाद असे प्रकारही त्यांनी हाताळले. मात्र, ते रमले कथा-कादंबरीत.
pd - June 1, 2021
दोहपर्व’ कादंबरीवर ‘सिंग्युलॅरिटी’ हा हॉलिवूड चित्रपट तयार झाला. मराठी लेखकाच्या साहित्यकृतीवर बेतलेला हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट ठरला. ‘बटरफ्लाइज ऑफ बिल बेकर’ या रहस्यप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन झणकर यांची कन्या सानिया झणकर यांनी केले होते. चित्रपटाची कथा झणकर यांची होती. हॉलिवूडमधील मॅनहटन महोत्सवात हा चित्रपट उल्लेखनीय ठरला होता.
pd - April 5, 2022
जून १९८४.
ठिकाण: अमृतसर, पंजाब.
शीख धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या हरमिंदर साहिब मंदिराच्या आसपासचं वातावरण जबरदस्त तणावपूर्ण बनलं होतं. शीख दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रावाले आणि त्याच्या सुमारे २०० साथीदारांनी हरमंदिरसाहेबवर अवैधरीतीने कब्जा केला होता आणि त्यांना हिसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने Operation Blue Star चे नियोजन केले होते. पण दहशतवाद्यांची संख्या, त्यांची ठिकाणं याविषयी भारतीय लष्करास फारशी माहिती नव्हती. सुवर्ण मंदिराच्या अवाढव्य परिसरात ठोस माहितीशिवाय जाणे हा मूर्खपणा ठरला असता, पण दहशतवाद्यांनी सुवर्णमंदिराचा सर्व परिसर सील केला असल्याने आत जाण्याचा मार्गच नव्हता. एवढ्यात एक पाकिस्तानी गुप्तहेर सुवर्णमंदिरात शिरला. त्याला आत सहज प्रवेश मिळाला कारण तो अमृतसरमधे गेले ७ महिने गुप्तपणे रहात होता आणि त्याने दहशतवाद्यांचा विश्वास जिंकला होता. रात्री तो बाहेर आला आणि थेट Operation Blue Star चे मेजर जनरल ब्रार यांच्या office मधे पोचला. त्याने दहशतवाद्यांच्या जागा, त्यांची संख्या, एवढंच नव्हे तर सुवर्ण मंदिराचा संपूर्ण नकाशाच ब्रार यांच्याकडे सोपवला. या अमूल्य माहितीच्या आधारेच हे Operation यशस्वी झाले. नंतर समजले की ज्याने ही माहीत पुरवली तो पाकिस्तानी गुप्तहेर नव्हताच, तो होता भारतीय गुप्तहेर संघटना RAW चा अधिकारी ... "अजितकुमार डोभाल "
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे एक अचाट आणि अफाट व्यक्तिमत्त्व आहे. केरळ केडरचे IPS अधिकारी असलेले डोभाल हे प्रथमदर्शनी सामान्य सरकारी अधिकार्यासारखेच दिसतात, पण त्यांच्या डोळ्यातली अद्भुत जरब आणि ऒठांवरचं गूढ हसू पाहताच समजतं की हे काहीतरी वेगळं पाणी आहे. भारताचे सर्वश्रेष्ठ गुप्तहेर असा लौकिक असलेल्या या नावाभोवती गेल्या ४५ वर्षात गूढतेचं एक अद्भुत वलय तयार झालंय ज्यामध्ये असंख्य कथा गुंफल्या आहेत... काही वास्तविक, काही अकल्पित तर काही कल्पनातीत!!
डोभाल सर्वप्रथम १९६४ साली प्रकाशात आले ते त्यांच्या मिझोराममधील यशस्वी कामगिरीमुळे. लालडेंगा याच्या नेतृत्वाखालील मिझो नेशनल फ्रंटने ईशान्य भारतात दहशतवादी कारवाया सुरू केल्या होत्या आणि सरकारच्या चर्चेचे प्रस्ताव ते सतत फेटाळून लावत होते. डोभाल तिकडे गेले आणि लालडेंगाच्या सहा महत्त्वाच्या साथीदारांना आपल्या बाजूस वळवले. लालडेंगा नाक मुठीत धरून शरण आला, एवढंच नव्हे तर सरकारच्या सर्व अटी मान्य करून मुख्य प्रवाहात सामील झाला. एकेकाळी अशक्य वाटणारी ही गोष्ट डोभालांनी लीलया साध्य करून दाखवली. सिक्कीमचे भारतातील विलीनीकरणाचे अत्यंत अवघड कामही त्यांनी अगदी अलवार करून दाखवले.
१९७४ साली अणूस्फोट घडवून भारत एक अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र बनले. पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यानेही अण्वस्त्रे बनवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न सुरू केले. या काळात डोभाल एकदमच गायब झाले. तब्बल ७ वर्षं त्यांचा ठावठिकाणा काही मोजक्या लोकांनाच ठाऊक होता. नंतर समजलं की डोभाल चक्क पाकिस्तानातील लाहोर शहरात रहात होते. या ७ वर्षात त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमात प्रचंड अडथळे आणले आणि सर्व गुपिते भारतीय गुप्तहेरयंत्रणांना पुरवली. या ७ वर्षात एखादी छोटीशी चूकही त्यांच्या जीवावर बेतली असती, पण हा महान देशभक्त आपल्या प्राणांची पर्वा न करता हे अतिधोकादायक काम सतत ७ वर्षे करत राहिला. या काळात त्यांनी पाकिस्तानात RAW चे मजबूत जाळे विणले आणि कसलाही पुरावा मागे न ठेवता भारतात परत आले. ही बातमी सामान्य जनतेपर्यंत पोचली नाही, पण ती सर्व देशांच्या हेरगिरी संघटनांना समजली आणि पाकिस्तानच्या ISI संघटनेची सर्व जगात चांगलीच छी-थू झाली. तेव्हापासून डोभाल हे ISI चे क्रमांक १चे शत्रू बनले.
१९९०च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना सुरूवात झाली होती. हा दहशतवादी आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे हे लक्षात येताच केंद्र सरकारला पुन्हा एकदा डोभाल यांची आठवण झाली. काश्मीरमधील हा धर्माधिष्ठीत दहशतवादी केवळ शस्त्रबळाने चिरडल्यास तात्पुरते यश मिळेल पण त्याचे दूरगामी परिणाम अत्यंत वाईट असतील हे डोभाल यांनी ओळखले आणि एक वेगळीच चाल खेळली. काश्मिरीमधील गावागावातून दहशतवादी संघटनांमधे सहभागी झालेल्या तरुणांवर त्यांनी बारीक नजर ठेवली आणि या तरूणांचा brainwash करण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी सर्व मार्ग वापरले. अशा brainwash केलेल्या तरुणांची एक दहशतवादविरोधी संघटना उभी करून त्यांनी पाकप्रणीत दहशतवादास तोडीसतोड प्रत्युत्तर दिले. दहशतवादी बनलेले हजारो तरूण पुन्हा मुख्य प्रवाहात सामील झाले. पुढे पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या आणि सर्व जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. भारतीय सैन्य, BSF, काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षादले यांच्यामध्ये काटेकोर समन्वय साधून डोभाल यांनी एक अत्यंत कार्यक्षमता यंत्रणा उभी केली. या यंत्रणेचा success rate ९९% आहे, म्हणजे १०० पैकी ९९ दहशतवादी कारवाया या होण्याआधीच थांबवल्या जातात. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे डोभाल याना 'कीर्तीचक्र' हा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार फक्त लष्करी अधिकारी अथवा सैनिकांना मिळतो. गेल्या ७० वर्षात हा पुरस्कार मिळालेले डोभाल हे एकमेव पोलिस अधिकारी आहेत.
२००४ साली वाजपेयी सरकारचा पराभव झाला आणि डोभालांनी निव्रुत्ती घेतली. पण या काळातही RAW, IB, NIA या संघटनांचे प्रमुख त्यांचे मार्गदर्शक घेतच राहिले.
2014 साली मोदी सत्तेवर आले आणि त्यांनी पहिला महत्त्वाचा निर्णय घेतला जो त्यांनी आधीच मनाशी ठरवला होता- अजित डोभाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले.
गेल्या वर्षभरात मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात घेतलेल्या प्रत्येक महत्वाच्या निर्णयावर डोभाल यांची छाप दिसते. भारताचे पाकसंबधाचे सर्व निर्णय डोभालच घेतात असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी सप्टेंबरमधे पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यावेळी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी मोदींनी डोभालांवर सोपवली. डोभालांनी अत्यंत निर्दयपणे कारवाई करून पाक सीमेचा इंचन् ईंच अक्षरशः भाजून काढला. इकडे भारत सर्व जगाला ओरडून सांगत होता की पाकिस्तान आमचं भयंकर नुकसान करतोय, पण वास्तवात मात्र भारताने पाकिस्तानचे चौपट नुकसान केले होते. पाकिस्तानसाठी हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता, कारण भारतानं आम्हाला झोडपलं असं जर त्यांनी जाहीर केलं असतं तर पाकिस्तानात त्यांच्या लष्कराची नाचक्की झाली असती. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराच्या १८ जवानांना मारणाऱ्या मिझो दहशतवाद्यांना म्यानमारच्या सीमेत घुसून मारण्याची जी कारवाई लष्कराने केली त्याचे सूत्रसंचालनही डोभाल यांनीच केले होते. पाकिस्तानविरुद् त्यांनी offensive defense हे धोरण राबवले आहे. आपले संरक्षण मजबूत ठेवायचे आणि शत्रूवर गुप्तपणे सतत वार करत रहायचे अशा या धोरणास मोदींचा पूर्ण पाठिंबा आहे. दाऊदपासून ते हाफिज सईदपर्यंत भारताचे सर्व शत्रू डोभालांना प्रचंड घाबरतात. डोभालांनी NSA पदाची सूत्रे हाती घेताच ISI ने दाऊद आणि हाफिज सईदची सुरक्षा तिपटीने वाढवली असं म्हणतात.
भारतातील सामान्य जनतेस डोभाल यांच्याविषयी फारशी माहिती नाही, पण पाकिस्तानी लष्कर, ISI, सर्व राजकीय पक्ष, इतकंच नव्हे तर जनताही डोभाल यांचा प्रचंड तिरस्कार करते. पाकिस्तानच्या प्रत्येक वृत्तपत्रात डोभाल यांच्या विरोधातील लेख नियमितपणे छापले जातात, इलेक्ट्रॉनिक मेडीयामधे त्यांच्याविरोधात गरळ ऒकली जाते, इतकंच नव्हे तर ट्विटरवर अशी शेकडो पेजेस आहेत ज्यावर केवळ डोभालविरोधातील लिखाणच केले जाते. पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि वजिरीस्तान या भागातील पाकविरोधी दहशतवादी संघटनांचे संचालन डोभाल करतात अशी पाक सरकारची पक्की खात्री आहे. पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलेल्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेचे डोभाल हेच बाप आहेत असं पाकिस्तानातील सामान्य जनतेसही वाटतं. हा माणूस पाकिस्तानात कुठेही काहीही करु शकतो अशी भिती पाकिस्तानला वाटते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना डोभाल यांनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की जर पाकिस्तानने पुन्हा २६/११ सारखा हल्ला केला तर त्यांना कदाचित बलुचिस्तान गमवावा लागेल. या एका वाक्याने संपूर्ण पाकिस्तानात अक्षरशः वादळ निर्माण केले होते. पाकविरोधी सर्व संघटनांचे डोभाल हेच संचालक आहेत हा समज अधिकच ठाम झाला. पण आजवर पाकिस्तानला डोभाल यांच्याविरूद्धचा एकही पुरावा मिळालेला नाही.
भारत आणि पाकिस्तानमधे NSA स्तरावरील बोलणी व्हावीत असा निर्णय मोदी-शरीफ भेटीत काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. शरीफ यांना हा अगदी साधा आणि निरूपद्रवी निर्णय वाटला आणि त्यांनी मोदींसमवेत तो जाहीरही करून टाकला. पण पाकिस्तानात परत जाताच लष्कराबरोबरच त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. डोभालांशी चर्चा करायची आहे हे ऐकून पाकिस्तानचे NSA सरताझ अझीझही पुरते गडबडून गेले. पाक मिडियामधेही या निर्णयाची यथेच्छ खिल्ली उडवण्यात आली. अजित डोभालसमोर सरताज अझीझ टिकूच शकत नाहीत हे सत्य पाक मिडियाने आधीच मान्य केले होते. या चर्चेदरम्यान डोभाल यांना देण्यासाठी तीन डोसीयर पाकने तयार केली होती ज्यामध्ये भारत हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांना कसे प्रोत्साहन देतो याचे पुरावे देण्यात आले होते. गंमत म्हणजे या तीनपैकी एक डोसीयर केवळ डोभालांविषयी होते!!
देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्यभर झटणारा हा महान देशभक्त वयाच्या सत्तरीतही संपूर्ण जोमाने कष्ट करतोय, दहशतवाद रोखण्याचे नवनवीन उपाय शोधून काढतोय, भारतीय हेरसंघटनांना अधिकाधिक मजबूत आणि कार्यक्षम करण्यासाठी जीवाचं रान करतोय.
कसलाही गाजावाजा न करता गेली ५० वर्षे अविरतपणे देशसेवा करणाऱ्या आणि देशाच्या शत्रूंना नामोहरम करणाऱ्या अजितकुमार डोभाल यांना मानाचा मुजरा.
--उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
( श्री. जयंत दामले यांच्या सौजन्याने)
pd - February 25, 2016
सुलक्षणा केवळ गायिकाच नव्हे तर ती एक उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे. आपल्या छोट्याशा अभिनय कारकिर्दीत तिने अमिताभ बच्चन, संजीव कुमार, जितेंद्र, शम्मी कपूर, राजेश खन्ना या अभिनेत्यांसोबत काम केले होते. उलझन, सलांखे, हेराफेरी, खानदान, वक्त की दीवार, दो वक्त की रोटी हे तिचे गाजलेले निवडक सिनेमे आहेत.
pd - July 12, 2017
आज ९ नोव्हेंबर.. आज अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावेचा वाढदिवस.
सुबोध भावे यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९७५ रोजी झाला.
मराठी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता अशी सुबोध भावेची ओळख आहे. मालिका, नाटक आणि सिनेमांमधून त्याने सशक्त भूमिका साकारल्या. ‘अवंतिका’,‘वादळवाट’ आणि सध्या सुरू असलेली ‘का रे दुरावा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत्या. लावणीवर आधारित असलेल्या ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केलेले आहे.
‘बालगंधर्व’ सिनेमातील सुंदर व अप्रतिम भूमिका साकारून सुबोधने सर्वांची मनं जिंकली तर ‘लोकमान्य-एक युगपुरूष’ सिनेमातील त्याने साकारलेल्या लोकमान्यांच्या कणखर भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत त्याने ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळलीय. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटांच्या प्रसिद्धीनंतर सुबोध भावे यशाच्या शिखरावर आरुढ झाला आहे. तो आता एक मल्याळम चित्रपट करणार असल्याचे समजते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांच्या ‘पिन्नेयुम’ या चित्रपटाद्वारे सुबोध मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपिडीया
pd - November 9, 2016
सितारादेवी यांची गेल्या सहा दशकांहून अधिक काळ प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अशी ख्याती राहिली होती. सितारा देवींनी देशविदेशांमध्ये कथ्थक नेले. लोकप्रिय केले आणि कथ्थकला रसिकांच्या मनात कायमसाठी एक उन्नत स्थान त्यांनी मिळवून दिले.
pd - May 10, 2019
शिल्पा शिरोडकरची बहीण नम्रता, शिल्पा व नम्रताची आजी मीनाक्षी शिरोडकर- त्यांनी त्यांच्या तरुणपणी स्क्रीनवर स्वीमिंग सूट घालून मराठी समाजाला चांगलंच हादरवलं होतं. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९७२ रोजी झाला.
सर्वसामान्य स्त्रिया बिकिनीला सरावल्या नसल्या, तरी भारतीय चित्रपटात मात्र बिकिनीचं मुबलक दर्शन घडलं आहे. सर्वप्रथम स्वीमसूट परिधान करण्याचा मान जातो नम्रता शिरोडकरची आजी मीनाक्षी शिरोडकर यांना. त्यांनी ‘ब्रम्हचारी’ या चित्रपटात ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हय्या’ ह्या गाण्यात परिधान केलेला स्वीमसूट रुढार्थाने बिकिनी नसला, तरी त्याने तत्कालीन संस्कृतिरक्षकांच्या मेंदूला झिंझण्या आणल्या होत्या. १९९३ मध्ये तिने मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता.शिवाय मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती पाचव्या स्थानावर राहिली होती. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर काही वर्षे नम्रताने मॉडेलिंग केले आणि नंतर सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला. १९९८ मध्ये नम्रताने सलमान खानसोबत'जब प्यार किसीसे होता है'या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली होती.या सिनेमात तिने छोटेखानी भूमिका साकरली होती.विशेष म्हणजे या सिनेमापूर्वी नम्रताने ‘पूरब की लैला पश्चिम की छैला’हा सिनेमा साइन केला होता.मात्र आजपर्यंत हा सिनेमा रिलीज झालेला नाही.तिच्या यशस्वी सिनेमांच्या यादीत पुकार,वास्तव,हेरा फेरी,अस्तित्व,कच्चे धागे,तेरा मेरा साथ रहे,LOC कारगिल या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडमध्ये अपयश पदरी पडत असल्याचे बघून नम्रताने लग्न करुन इंडस्ट्रीला रामराम ठोकला.२००५ मध्ये दक्षिणेचा सुपरस्टार महेश बाबूसोबत नम्रताने लग्न केले.२००० मध्ये'वामसी'या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तिची भेट महेश बाबूसोबत झाली होती.काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले. महेश बाबू नम्रतापेक्षा वयाने साडे तीन वर्षे लहान आहे. नम्रता सध्या बॉलिवूडच्या लाइमलाइटपासून दूर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
pd - January 23, 2017
हजारिका यांचा सदिया येथे एका शिक्षकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. शिक्षणात उत्तम गती असलेल्या हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.ए. व एम. ए. केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन विषयातील पीएचडी केली. शिकागो विद्यापीठाची त्यांना लिस्ले फेलोशीप मिळाली होती. यात सिनेमाच्या माध्यमातून विकास हा विषय त्यांनी निवड होता. अमेरिकेतील नामवंत गायक पॉल रॉबेसन यांच्या ‘ओल्ड मॅन रिव्हर’चे त्यांनी हिंदीत ‘गंगा बेहती हो’ असे रुपांतरण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखालील ‘एरा बतार सूर’ हा चित्रपट १९५६ साली प्रदर्शित झाला व तेव्हापासून त्यांची कारकीर्द यशोशिखराच्या दिशेने सुरू झाली. ईशान्य भारतातील एक नामांकित गायक, दिग्दर्शक म्हणून त्यांना आगळे स्थान होते.
अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांनीच ‘मेरा धरम, मेरी मॉं’ हा पहिला रंगीत चित्रपट दिग्दर्शित केला. ‘एक पल’ या हिंदी चित्रपटात हजारिकांना संधी मिळाली व त्या संधीचे सोने करीत असंख्य पुरस्कार त्यांनी पटकावले. ‘लोहित किनारे’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेमधूनही ते रसिकांपर्यंत पोहोचले होते. कल्पना लाजमी यांनी सदर मालिका दिग्दर्शित केली होती. ‘गांधी टू हिटलर’ या चित्रपटाची गाणी व संगीत त्यांनी स्वत: लिहिले होते. महात्मा गांधीजींचे प्रख्यात ‘वैष्णव जन’ हे भजनही मा.भूपेन हजारिका यांनी म्हटले आहे. कवी, पत्रकार, गायक, संगीतकार, गीतकार, चित्रपट निर्माते आणि लेखक आदी सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला नावलौकिक निर्माण केला. मा.हजारिका यांनी लोकसंगीताचा वापर करून त्यावरील रचनांनी देशात आपला चाहता वर्ग निर्माण केला. डॉ. हजारिका केवळ संगीत व साहित्यातील तज्ज्ञ नव्हते तर ते मोठे नट व दिग्दर्शक होते. ब्रम्हपुत्रेचा कवी अशी त्यांना उपमा दिलेली होती. ‘दिल हुम हुम करे’ आणि ‘ओ गंगा बेहती हो’ या त्यांच्या गाण्यांनी कोट्यवधी भारतीयांना मोहीत केले. ‘जाजोबार’ म्हणजे (आश्च‘र्यचकित करणार) असे स्वत: संबोधत असत. शब्दाचे सौंदर्य ते आपल्या गाण्यातून मांडत होते.
लहानपणापासून मी आदिवासींचे संगीत ऐकत होतो. त्यातील तालाने मला विकसित केले. मात्र संगीताची शिकवण मी आईकडून घेतली. ती माझ्यासाठी गाणी म्हणत असे. तिच्या रचना मी ‘रुदाली’ चित्रपटात वापरल्या. वयाच्या १२ व्या वर्षी आसामी चित्रपट ‘इंद्रमालती’ मध्ये बिश्वर नियोज नोजोवान’ हे गीत गायले होते, असे हजारिका यांनी एका आपल्या मुलाखतीत सांगितले होते. १९९२ साली भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भूपेन हजारिका यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मा.भूपेन हजारिका यांचे ५ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
pd - November 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti