(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नीना गुप्ता

    बोल्ड अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांची ओळख आहे. यें नजदीकिया, मंडी, उत्सयव, डॅडी, तेरे संग आणि’ दिल से दिया वचन या‍ चित्रपटासह काही सीरियल्स मध्ये नीना गुप्ता यांनी काम केले आहे.

      July 4, 2017


  • कवी सूर्यकांत रामचंद्र खांडेकर

    कवी सूर्यकांत रामचंद्र खांडेकर

    कवि सूर्यकांत खांडेकर हे या मागील पिढीतील तसे नावारूपाला आलेले कवी. त्यांचा जन्म २ एप्रिल १९२६ रोजी झाला. कवि सूर्यकांत खांडेकर हे मितभाषी. म्हणजे वर्गात शिकविण्यापुरते बोलणारे असे शिक्षक. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे कसदार कविता लिहिणारे कवी. त्या काळातील बहुतेक साऱ्या वाङ्मयीन नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रकाशित होत असत. कालांतराने ते रयत शिक्षण संस्थेच्या कीर्ती महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक झाले. कवी मा.सूर्यकांत खांडेकर हे शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे भाचे. त्यातूनच त्यांनी मराठी पोवाडा वाङ्मयाचा इतिहास लिहिला आणि बराच खडतर काळ गेल्यावर तो शिवाजी विद्यापीठाकडून प्रकाशित करण्यात आला. 'सावली' आणि 'पानफुल' ‘छुमछुम’ (बालकविता) हे त्यांचे रसिकांच्या पसंतीस उतरलेले काव्यसंग्रह. त्याच्या कविता बालभारतीच्या पुस्तकात पण आहेत. मा.सूर्यकांत खांडेकर यांनी पाच एक मराठी चित्रपटांना गाणीही लिहिली.

    'या फुलाच्या गंधकोषी...' या एकाच गाण्याने ते सर्वत्र प्रसिद्ध झाले.
    'सावली सूर्याची' हे आत्मकथन कवि मा.सूर्यकांत खांडेकर यांच्या पत्नी मा.अनुराधा खांडेकर यांनी लिहिले आहे. हे आत्मकथन आपणास एका काळातील एका नगरीची जशी सांस्कृतिक ओळख करून देते, तसेच ते आपणास एका सकस सहभावाची सात्विक ओळख करून देते. मा.सूर्यकांत खांडेकर यांचे १५ जून १९७९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सूर्यकांत खांडेकर यांची काही गाणी
    उतरली सांज ही धरेवरी
    गोड तुझी बासरी श्रीहरी
    त्या फुलांच्या गंधकोषी
    सहज सख्या एकटाच
    https://www.youtube.com/watch?v=R-exzGL7ouQ

    https://www.youtube.com/watch?v=WEmY-HxMC7M

    https://www.youtube.com/watch?v=1lQ_JvY7z4k

    त्या फुलांच्या गंधकोषी. मा.सूर्यकांत खांडेकर यांचे हे गाणं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलंय आणि संगीतही त्यांचंच आहे. कवी सूर्यकांत खांडेकर यांनी आपल्या या काव्यातुन मानवाच्या मनामध्ये परमेश्वराच्या अस्तित्वाचा शोध, अनंत काळापासुन सुरु आहे त्याचं अतिशय सुरेख वर्णन केले आहे. परमेश्वराचं हेच ते रूप असे मात्र कुणीही ठामपणे सांगत नाही, पण त्याचं अस्तित्व आपण सर्वजण मान्य करीत असतो. मग हा ईश्वर कुठे आहे, कसा आहे, कोणत्या रुपात आहे याचा शोध सर्वजण आपापल्या परीने घेत असतात.

    त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का

    त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का
    त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का
    त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का
    गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का

    मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का
    वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का
    जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का
    आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का

      April 15, 2018


  • प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर

    काही दिवसांपूर्वी हा अवलिया, याने ज्या पद्धतीने ठरवलं होतं अगदी त्याच पद्धतीने “गेला”. त्यांचा देह त्यांचा मुलगा आदित्यने नांदेडच्या मेडिकल कॉलेजला “दान” केला. भेटायला घरी गेलो तेंव्हा त्यांच्या पश्चात घरातलं वातावरण “सुतकी” नव्हतं तर कारुण्य पण प्रसन्न होतं. यातच सगळं आलं.

      August 23, 2019


  • बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर

    राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर यांना स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर यांचा जन्म ११ डिसेंबर १९२५ रोजी झाला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत.

    आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे. जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार, गदिमा पुरस्कार, बालसेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. राजा मंगळवेढेकर यांचे १ एप्रिल २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    गीतकार म्हणून राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेली गाणी
    असावा सुंदर चॉकलेटचा
    उर्मिले त्रिवार वंदन तुला
    कोणास ठाऊक कसा
    सती तू दिव्यरूप मैथिली

      October 29, 2019


  • इटालियन शिक्षणतज्ञ मारीया माँटेसरी

    आपले मुल साडे तीन वर्षाचे झाले की आता माँटेसरीत घालणार असे म्हणतो, माँटेसरी हे नाव एका महान व्यक्तीचे आहे हे खूप कमी जणाना माहित असेल.

    शाळा प्रवेशाच्या आधीच्या या शिक्षणाची पद्धती शोधून तिची मांडणी करणाऱ्या व त्याचेही 'विज्ञान बनवणाऱ्या बालमानस-तज्ज्ञ मारीया माँटेसरी. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १८७० रोजी झाला.

    माँटेसरी यांचे कार्य इतके महान आहे की लहान मुलांच्या शाळेला आता जगभर सर्वत्र 'माँटेसरी' असेच म्हटले जाते.
    माँटेसरी यांचा इटलीत शेअरवेल या गावात झाला. वडिलांच्या वारंवार वेगवेगळ्या शहरांमध्ये बदल्या होत राहिल्याने मारीयाचे शिक्षणसुद्धा वेगवेगळया शहरांत होत राहिले. कधी फ्लॉरेन्स तर कधी रोम अशी त्यांची भटकंती चालू होती. त्यांना गणिताची विशेष गोडी व गतीही होती. त्यामुळे सुरुवातीला मा.मारीयानी इंजिनियर होण्याचे ठरवले. पण पुढे त्यांना वनस्पतीशास्त्रात गोडी वाटू लागली. नंतर त्यांना वैद्यकशास्त्राचे आकर्षण वाटले व त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.

    मतिमंद मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करतानाच त्यांचे तिथल्याच एका वैज्ञानिकाबरोबर प्रेमसंबंध जुळले व विवाहबाह्य संबंधांतूनच त्यांना मुलगा झाला. पण त्याला सोबत ठेवणे अशक्य होते. त्यातच त्यांच्या प्रियकरानेही दगा दिला. या साऱ्याचा बालमनावर कसा व किती परिणाम होतो, हे मारीयांनी स्वत:च्या घरातच पाहिले व त्यातूनच बालकांसाठी शिक्षणपद्धती कशी असावी, याचे संशोधन त्यांनी सुरू केले. बालमानसशास्त्र व त्यांचे शिक्षण, विशेषत: बौद्धिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांसाठी विशेष शिक्षण पद्धती याविषयात माँटेसरी विविध विद्यापीठे व संस्था यामध्ये भाषणे देऊ लागल्या. विसावे शतक सुरू होत असताना त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता.

    शिशुशिक्षणाची त्या पुरस्कर्ती होत्या. त्यासाठी त्यांनी नवीन तंत्र व उद्योग शोधून काढली. मुलांचे खेळ व छंद यांवर त्यांचे मानसशास्त्र अवलंबून होते. अभ्यासाने मुलांना शीण न येता त्यांचा मानसिक विकास साधला जातो. असे त्यांचे म्हणणे होते. बालमनावर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना शिकवताना काय पद्धती अवलंबावी व कोणती पथ्ये पाळावीत, याबद्दल माँटेसरींनी काही सूत्रे तयार केली. आजही ती वापरली जात आहेत. माँटेसरी शिक्षण पद्धतीच्या शिक्षण-प्रशिक्षणाचा पहिला वर्ग माँटेसरींनी १९०९ साली उघडला. माँटेसरीची शिक्षणविषयक कल्पना वस्तुनिष्ठतेवर उभारली होती. तीमध्ये जीवनशक्तीचा आविष्कार हे प्रमुख तत्त्व होते. पहिल्या जागतिक महायुद्धांनंतर माँटेसरीं यांनी स्थापन केलेली इटलीतील संस्था बंद पडली. नंतर माँटेसरी अमेरिकेत गेल्या. त्यांनी न्यूयॉर्क येथे माँटेसरी शिक्षक–प्रशिक्षण महाविद्यालय स्थापन केले व ते एलिनार पार्कहर्स्ट यांच्यावर सोपविले.

    शाळेत जाण्याचे वय होण्यापूर्वी बालकांना केवळ आपल्या वयोगटातील मुलांमध्ये मिसळता यावे व त्यांना सामुहिक सहजीवनाचा सराव व्हावा, म्हणून माँटेसरींनी अनेक खेळ, गीते, नृत्य प्रकार तयार केले. तीच बालगीते आजही वापरली जात आहेत. मा.माँटेसरी १९४० मध्ये भारतातही आल्या होत्या. त्यांनी मद्रासमध्ये चर्चासत्रे घेतली होती.

    उतरत्या वयातही झपाटल्यासारख्या त्या जगभर फिरत राहिल्या. नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीन वेळा त्यांचे नामांकन झाले. मात्र अखेरपर्यंत त्यांना ते मिळाले नाहीच. मा.माँटेसरी यांची काही उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे (१) द माइंड, (२) द डिस्‌कव्हरी ऑफ द चाइल्ड, (३) माँटेसरी मेथड (१९१२) (४) डॉ. माँटेसरीज ओन हँडबुक (१९१४) (५) द अँडव्हान्स्‌ड माँटेसरी मेथड (१९१७). मा.माँटेसरी यांचे ६ मे १९५२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 8, 2017


  • बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबला वादक पद्मविभूषण किशन महाराज

    किशन महाराज बनारस घराण्याच्या कंठे महाराजांचे शिष्य होते. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. त्यांच्या योगदाना बद्दल भारत सरकारने त्यांना १९७३ साली पद्मश्री आणि त्यानंतर २००२ साली त्यांना पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले होते. त्यांना काशी विद्यापीठ आणि रवींद्र विद्यापीठातर्फे डॉक्टरेट ही उपाधीही देण्यात आली होती.

    किशन महाराज यांचे ४ मे २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 3, 2017


  • गीतकार आणि शायर शकील बदायूँनी

    ‘शकील’ शब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत.

    त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक. नुसते समीक्षक नव्हे, तर ‘नातगो’ शायर. (‘नात’ म्हणजे हजरत महंमद यांचे प्रशंसागीत.ते लिहिणारा कवी). वडिलांनी या ‘नन्ना मुन्ना राही’ शकीलला अरबी, फार्सी, ऊदरू, हिंदी सगळ्या भाषा शिकण्यासाठी मौलवी अब्दुल गफार, मौलवी अब्दुल रहमान, बाबू रामचंद्र या त्यावेळच्या ज्ञानवंतांना पाचारण केले होते. त्यातूनच पुढे शकील ज्या अलीगढ विद्यापीठात गेले, तेथे अहसन मारहरवीसारखे प्राध्यापक शिकवायला आणि मजाजसारखे सहाध्यायी होते.

    शायरीचे काही धडे त्यांनी प्रथम काकांकडे, नंतर जिगर मुरादाबादींकडे गिरविले. काळाप्रमाणे राग बदलावा, हे शकील यांना चांगलेच समजत होते. कॉलेजमध्ये असतानाच ते कविसंमेलनात गाजत होते. रुबाबदार शकीलजींना गळाही तितकाच गोड लाभला होता. एका कविसंमेलनात दस्तूरखुद्द नौशाद उपस्थित होते. त्यांनी मुंबईचे निमंत्रण दिले आणि ‘झुले मे पवन के आई बहार’ असेच झाले.

    शकील अहमदचे नाव भारतात चित्रपटाद्वारे ‘शकील बदायूँनी’ म्हणून झगमगू लागले. ‘दर्द’ हा त्यांचा पहिला चित्रपट आणि त्यांनी लिहिलेले ‘अफसाना लिख रही हूँ’ गाणार्याा उमादेवी ऊर्फ टुणटुणचाही पहिलाच चित्रपट होता. शकील यांचा चित्रपटसृष्टीतील एक विक्रम आजही तसाच आहे. तो म्हणजे सलग तीन वर्षे (१९६१ ते ६३) फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मा.शकील बदायूँनी यांचे २० एप्रिल १९७० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    शकील बदायूँनी यांची काही गाणी.

    https://www.youtube.com/watch?v=vAF6-xX5-MA

    https://www.youtube.com/watch?v=IQsJt6-8S7w

    https://www.youtube.com/watch?v=q3k_pI8MSbM

      April 20, 2017


  • लिटल चॅम्प प्रथमेश लघाटे

    गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील "आरवली" हे गाव!!! मुंबईहुन गोव्याकडे जाताना चिपळुण हुन सुमारे ३१ किमी तर संगमेश्वर च्या अगोदर १६ किमी वर लागणारे आरवली गावाची २००८-२००९ नंतर नवीन ओळख तयार झाली.... गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यावर अंगावरची रोगराई पळुन जाते अस म्हणतात.... एका अर्थाने गावाची तीच परंपरा, तीच ओळख कायम ठेवणारा एक "मोदक" या गावात जन्माला आला.... आता गरम पाण्यात अंघोळ न करता आपल्या अजोड सुरेल गळ्यांने सुरांची बरसात करुन रसिकांना न्हाऊ घालणारा प्रथमेश उमेश लघाटे याच गावात २९ सप्टेंबर १९९४ साली जन्माला आला.....!!

    सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या या गावात पुर्वी मनोरंजनाची कोणतीही साधने ऊपलब्ध नव्हती.... तेंव्हा या गावातील ब्राह्मण वाडीतील ३०/३५ घरातील मंडळी रात्री गप्पा मारणे, पत्ते खेळण्यासाठी एकत्र जमा व्हायचे. या एकत्र येण्यातुनच कै. विष्णू विनायक लघाटे यांनी भजनाची संकल्पना मांडली.... आणि दर गुरुवारची भजन परंपरा सुरु झाली. साल होते १९२५!!! आजपर्यंत हि परंपरा यशस्वीपणे सुरु आहे. ह्या भजन परंपरेतुनच महाराष्ट्राला एक ऊमदा गायक मिळेल ह्याची ह्या भजनी मंडळींना स्वप्नात देखील कल्पना आली नसेल. ह्या परंपरेतुन प्रथमेशला बालपणीच गायनाची गोडी लागली. प्रथमेशच्या घरच्यांनी मग त्याच्या गायनाची आवड लक्षात घेऊन त्याला श्री सतिश कुंटे यांच्याकडे गायन वर्गासाठी पाठवले. प्रथमेशचा कल शास्त्रीय गायनाकडे होताच. त्यामुळे त्याला शिक्षण घेताना फार अडथळे आले नाहीत. पुढे २००८/०९ साली झी मराठी ह्या वाहिनीवर "सारेगमप" ची घोषणा झाली... आणि प्रथमेश पाय आपोआप तिकडे वळले.... त्यांने पहिल्या भागापासुनच आपलं स्वत:च असं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

    बाबुजी आणि गदिमांचे गीतरामायण पुर्वी घरी थांबुन रेडिओ ला कान लाऊन ऐकायचे, पुढे दुरदर्शनच्या काळात रामायण, महाभारत या मालिकांच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य असायचे.... झी सारेगमप (लिटल चॅम्प्स) च्या वेळी हा अनुभव पुन्हा आला..... यात सिंहाचा वाटा होता तो प्रथमेशचा!!! तोच या पर्वाचा विजेता ठरेल अशी रसिक वर्गाला अपेक्षा होती... निकाल मात्र वेगळाच लागला(त्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच) परंतु रसिकांची मनं जिंकुन खरा विजेता ठरला तो प्रथमेशच!!!

    आपल्या गावावर निस्सिम प्रेम करणारा प्रथमेश सध्या पुण्यात राहुन संगीत विषयात MA करतोय. मात्र त्याची गावची ओढ, गावावरचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. तो गावात असेल त्या दिवशी योगायोगाने गुरुवार असेल तर तो भजनाला हमखास हजर असतो.

    प्रथमेशचा गळा हि त्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला परमेश्वराकडुन मिळालेली एक विलक्षण भेट आहे. या गळ्यातून सुरांची अखंड बरसात होत राहो. प्रथमेशला अमाप यश, किर्ती, सन्मान मिळो हिच आजच्या शुभदिनी परमेशाकडे प्रार्थना!!!

    WhatsApp वरील संगीत संगीत व फक्त संगीत या ग्रुपवरुन..

      September 29, 2016


  • युवा हार्मोनियम वादक सिद्धेश बिचोलकर

    देशातील एकमेव जलतरंग वादनासाठीची CCRTC स्कॉलरशिप सिद्धेशला मिळाली आहे.

      October 20, 2021


  • कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे

    कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.

      May 9, 2019