डीडी हे त्यांचे टोपण नाव.....
दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्याा डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९१७ रोजी पुण्याजवळ कोंडुर येथे झाला. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे त्यांना मासिक २०रूपये पगार मिळत असे. त्यानंतर दत्त डावजेकरांनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे साहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले.
मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली झाले. १९४३ साली माझं बाळ ह्या चित्रपटात. त्यापाठोपाठ डावजेकरांचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें. या चित्रपटात लताने पहिल्यांदाच हिंदीतले पार्श्वगायन केले. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. त्यांनी आपकी अदालत ह्या वसंत जोगळेकरांचा आणि कैदी गोवलकोंडा का / प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथच्या हिंदी-इंग्रजी चित्रपटाच्या संगीतरचना केल्या. दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थँक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले.
डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. दत्ता डावजेकर हे भारतात तयार झालेल्या पहिल्या सिंथेसायझरचेही जनक आहे, हे मात्र अनेकांना ठाऊक नसेल. केरसी यांनी पहिला सिंथेसायझर भारतात आणला होता. दत्ता डावजेकर यांचे १९ सप्टेंबर २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 22, 2017
मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. शास्त्रीय संगीताची तालीम मोहम्मद रफी यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे 'गाँव की गोरी' या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपट क्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चे दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शीर्षक गीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अॅ्वॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली. रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं. शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ. 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तीही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. चित्रपटसृष्टीत सगळय़ांत गाजलेला दुरावा म्हणजे मा.लता मंगेशकर व मा.मोहमद रफी यांच्यातील साठच्या दशकातील दुरावा मानतात. मानधनावरून एका बैठकीत काही वाद होऊन रफी यांनी ‘ये महारानी (लता) जैसा चाहेगी वैसा ही होगा’ अशी कॉमेंट केल्याने केल्याने लताजींना खूप राग आला व त्यानंतर जवळपास पाच-सहा वर्षे दोघांमध्ये दुरावा होता. लता व रफी यांनी युगलगीते गाणे बंद केल्यावर दोन गट पडले. त्या काळचे काही नायक, शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, प्रदीपकुमार इ. हे मोहमद रफी यांचा आग्रह धरायचे, लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या दुराव्याचे पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. पण 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ यांच्या यशामध्ये मो. रफी यांचा खूप मोठा वाटा होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल मा.रफी यांना आपला गुरु मानायचे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सुरुवातीला संगीतकार म्हणून प्रोत्साहन देण्यात ज्या दोन व्यक्ती समोर होत्या त्यातील पहिले म्हणजे ‘रफी साहेब’ तर दुसऱ्या गानकोकिळा ‘लतादीदी’. रफी साहेबांनी आपल्या हिंदी चित्रपट संगीतातील सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबतच गायलेले आहे. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत मा.रफीजीनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत. रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.*मा.मोहम्मद रफी* यांचे ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार बाळासाहेबांना भेटायला गेले. त्यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देत असल्याचं बाळासाहेबांना सांगितलं. बाळासाहेब म्हणाले, मग शिवसेना उमेदवारी देणार नाही. मध्येच शरद पवार म्हणाले, ‘पण भाजपाचं काय?’ बाळासाहेब म्हणाले, ‘कमळाबाईची चिंता नको करू, कमळाबाईला कसं पटवायचं ते मला माहिती आहे,’ असा शब्द बाळासाहेबांनी दिला. सुप्रिया सुळे बिनविरोध निवडून आल्या.
June 30, 2022
रणबीर कपूर हा हिंदी चित्रपटसुष्ट्रीतील नव्या पिढीचा कलाकार म्हणून ओळखला जातो. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ रोजी झाला. रणबीरचे शिक्षण माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठले आणि न्यू यॉर्कच्या 'लि स्ट्रॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट'मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'साँवरीया' चित्रपटात सर्वप्रथम भूमिका केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची तारीफही झाली आणि त्याला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
२००९ मध्ये 'वेक अप सिड' आणि 'अजब प्रेम की गजब कहाणी' या चित्रपटांसाठी त्याने समीक्षकांचा सर्वोत्तम अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. रणबीरने आतापर्यंत पाचवेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले आहे. सावरियाँ, बचना ऐ हसीनो, रॉकेट सिंग, वेक अप सिड, रॉकस्टार, राजनीती, बर्फी असे अनेक हिट चित्रपट त्याने दिले. केवळ अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंग यांचा वारसदार आणि राज कपूर यांचा नातू म्हणून न वावरता रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आघाडी घेत आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलाय.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 28, 2017
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर… खास लावणीचा शृंगार, नखरे… कॅमेऱयाने टिपलेल्या तिच्या अदा…
कारभारी दमानं’, ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘झाल्या तिन्हीसांजा’ अशा अनेक लावण्यांनी अवघ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर सातासमुद्रापार संपूर्ण जगावरही भुरळ पाडली. महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार म्हणून ओळखली जाणारी लावणी ही केवळ नृत्यकलेतून सादर न करता ती आपल्या अदाकारीने अन् गोड गळ्याने गाऊन सादर करणारी लावणीसम्राज्ञी म्हणजे सुरेखा पुणेकर.
‘लावणी’ या विषयावर फोटो डॉक्युमेंटरी करण्याचं काम सुमारे दहा वर्षांपूर्वी मी सुरू केलं. या कामाची गरज म्हणून तेव्हा आघाडीच्या कलाकारांना, कलावतींना भेटण्याची, त्यांची कला समजून घेऊन ही माहिती सचित्र टिपण्याची मोहीमच मी सुरू केली. यासाठी अवघा महाराष्ट्र पालथा घालत असतानाच गावागावांत रात्री उशिरापर्यंत, किंबहुना रात्री उशिरा सुरू होणाऱया तमाशा आणि लावण्या कॅमेराबद्ध करण्याचं वेड मला लागलं होतं. हे सुरू असतानाच या कलेला आपला श्वास मानणाऱया सुरेखाची ओळख मला अप्रत्यक्ष होती. मात्र प्रत्यक्ष झाली ते पुण्यातल्या बालगंधर्व नाटय़गृहातल्या एका लावणी शोच्या निमित्तानं. ‘लास्य’ रसाचे दर्शन घडविणारी लावणी. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी सादर करणाऱया कलावतीचा एक शृंगार असतो. या शृंगारात स्त्रीने नेसलेलं रूपड़ं साडीचं वस्त्र, अंगावर भरजरी दागिने, कपाळावर असलेली टिकली, हाताला लावला जाणारा लाल रंगाचा अल्टा, कंबरपट्टा, हाताच्या दंडावर असलेले दागिने आणि कलावंताचं देखणं रूपडं या साऱयाचा उल्लेख करता येईल. हाच शृंगार कॅमेराबद्ध करण्याविषयी मी सुरेखाबरोबर फोनवर बोललो.
थोडय़ाच वेळात आतून आवाज आला आणि सुरेखाची नि माझी भेट झाली. सुरेखाची मूलभूत तयारी झाली होती. आता तिचा शृंगार सुरू होता. हा शृंगार टिपण्यासाठीची माझी लगबग सुरू झाली. शो सुरू व्हायला थोडासा अवधी होता. वरवरच्या गप्पा झाल्या आणि थोडय़ाच वेळात सुरेखा खुलली. मेकअप रूममध्ये काही मोजके फोटो टिपून मी स्टेजवरचं सुरेखाचं नृत्य, तिची अदा अन् गायन टिपण्यासाठी स्टेजसमोर गेलो. यावेळी मला सुरेखाचे अनेक कॅण्डिड टिपता आले.
काही दिवसांनंतर पुन्हा सुरेखाचे फोटो टिपण्यासाठी मी ठाण्यातल्या गडकरी रंगायतनला गेलो. शोला बराच वेळ होता. मी मेकअप रूममध्ये फोटो टिपत होतो अन् सुरेखा तिचा जीवन प्रवास हळूहळू उलगडून सांगत होती. सुरेखाचे वडील सोंगाडय़ाचं काम करत, तर कधी तमाशात गायन, नृत्य सादर करत. त्या काळी तमाशात वा लावणीच्या फडात स्त्रिया नृत्य सादर करीत नसत आणि म्हणूनच सुरेखाची आई तमाशात गायन, अभिनय सादर करत असे, तर आईचे आईवडील हेदेखील नृत्य, गायन आणि अभिनयात पारंगत असल्याचं सुरेखा सांगते. आईचं घर स्मशानभूमीजवळ होतं. वडिलांकडची परिस्थितीही जेमतेम. वडील पुणे रेल्वे स्टेशनवर दिवसा हमालीच काम करत अन् रात्री कला सादर करण्यासाठी लावणी अन् तमाशाच्या फडात जात. नंतर तिच्या आईवडिलांनी तमाशाचा फड सुरू केला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून सुरेखाचा हा प्रवास सुरू झाला. शाळेची पायरी ती कधीच चढली नाही. ‘‘माझ्या पाच पोरींपैकी एकीचा तरी तमाशाचा फड असेल अन् ती त्याची मालकीण होईल’’ हे तिच्या बाबांनी लहानपणी रंगवलेलं स्वप्न अखेर १९८६ साली पूर्ण झालं. तिच्या बहिणीसोबत ‘लता-सुरेखा पुणेकर’ नावाने स्वतःचा फड सुरू केला. पुढे चार वर्षे तो चालला.
त्यानंतर १९९८ ला मुंबई येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ‘तुम्हा बघूनी डावा डोळा’ या सुरेखाच्या दिलखेच अदाकारीने रसिकमन जिकलं. त्यानंतर सुरेखाला खऱया अर्थाने प्रसिद्धी मिळाली अन् आर्थिक मानधनही. या शोसाठी दोन लाखांचं मानधन मिळालं. यापूर्वी एकहाती एवढा पैसा बघितलाही नसल्याचं सुरेखाने कबूल केलं. पोटाची खळगी भागवण्यासाठी सुरेखाच्या बैलगाडीतून गावोगाव हिंडण्याच्या प्रवासाला आता खऱया अर्थानं गती मिळाली अन् पुढे बैलगाडी ते विमान आणि नारायणगाव ते न्यूयार्कच्या मेडिसन स्क्वेअर हा तिचा प्रवास केवळ लावणीमुळेच शक्य झाल्याचं सांगताना ती भावुक झाली. इतक्यात शोसाठीची घंटा वाजली अन् आपल्या भावनांना आवर घालत सुरेखा पायात घुंगरू बांधण्यात गुंतली. यावेळी मला तिचे उत्तम कॅण्डिड टिपता आले. कॅमेऱयात मी सुरेखाच्या अनेक भावमुद्रा टिपल्या होत्या, परंतु एकदा रंग चेहऱयावर लागला की, कलाकार त्याच्या भावना, वेदना विसरून त्याच्या कलेत कसा एकरूप होतो अन् क्षणार्धात चेहऱयावर एक वेगळं तेज घेऊन हसऱया चेहऱयानं आपली कला सादर करण्यासाठी कसा सरसावतो याचं जिवंत उदाहरण माझ्या मनाच्या कॅमेऱयात कायमचं बंदिस्त झालं.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
March 9, 2019
आज हार्मोनियम वादक,अभिनेते व संगीतकार,पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक,गोविंदराव टेंबे यांची पुण्यतिथी.
जन्म :- ५ जून १८८१
मा.गोविंदराव टेंबे ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक, होते. त्यांनी ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटात हरिश्चन्द्राची भूमिका करून ते भारतभर गाजलेले नट होते. संगीत नाटकांचे लेखक, ‘मानापमान’ नाटकाचे संगीतकार व त्याच नाटकात धैर्यधराच्या भूमिकेने मराठी रंगभूमि गाजवणारे गायक नट, ‘माझा संगीत विहार’ व ‘माझा जीवन विहार’ या आत्मचरित्रपर रसाळ ग्रंथांचे लेखक अशीही मा. गोविंदराव टेंबे यांची ओळख सांगता येईल. ’अयोध्येचा राजा’, ’अग्निकंकण’, ’मायामच्छिंद्र’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. पेटीचे सूर महाराष्ट्रात कायमचे उमटून ठेवणारे मा.गोविंदराव टेंबे यांची यांची खूप माहिती इंटरनेट वर नाही.
‘माझा जीवन विहार’ या ग्रंथात गोविंदराव टेंबे यांनी आपल्या आयुष्याचा आढावा पुढील शब्दात घेतलेला आहे.
” मी आज यावेळी माझ्या आयुष्याचा आढावा घेत असतांना मला असे दिसून येत आहे की लाभ, हानि, सुख, दुःख, यशापयश इत्यादी महत्वाच्या प्रसंगापासून तो नित्याच्या क्षुल्लक गोष्टीपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाच्या शैल शिखरावरून मी निराशेच्या खोल गर्तेत आदळायचे आणि अचानक तेथून पुन्हा मला कोणीतरी अज्ञात शक्तीने शिखरावर आणून बसवायचे, अशा सतत अनुभवांमुळे बुद्धीच्या टोचणीविरुद्ध देखील माझा परमेश्वरावरील विश्वास अढळ राहिला आहे. आचारात मी नास्तिकातला नास्तिक आहे आणि विचारामध्ये भावी पिढीच्याही पुढे आहे. मात्र पुरातन आचार विचारांना केवळ पुरातन म्हणून लाथाडायचे ही माझी वृत्ती नाही. परमेश्वर आहे की नाही, या विषयीची मी पंचाईत करत नाही. पण तो मजेने मला खाली पाडतो, माझी धडपड पाहतो आणि मी हताश झाल्यावर कारुण्याच्या एका कटाक्षाने मला वर काढतो ही एकच भावना माझ्यात दृढमूल झालेली आहे, आणि कोणत्याही कारणाने ती मुळातून यत्किंचितही सुटलेली नाही. अर्थात या विश्वासामुळे मी कोणत्याच गोष्टीचा विधीनिषेध मानीत आलो नाही. जे जे प्राप्त होईल ते ते भोगायचे; त्याच्या परिणामाचा विचार करावयाचा नाही — मग तो परिणाम इष्ट असो वा अनिष्ट असो. यामुळे कोणाचेही बरे केले हा अहंभाव नाही व कोणाचे वाईट व्हावे व माझे बरे व्हावे ही आतून रुखरुखही नाही. मनात आलेली गोष्ट योग्यच असणार तेव्हा ती करायची; मग ती बरी असो के वाईट असो. वाईट असेल तर त्यातून ईश्वरेच्छेने आपोआप मुक्तता होईलच; तोपर्यंत ती मला मानवतेच. चांगल्या वस्तूला मी मुकलो तर त्याहीपेक्षा अधिक चांगली वस्तू मला मिळणार आहे अशीही खात्री ठेवायची ; आणि ती केवळ अंधविश्वासाची खात्री नव्हे, तर अनुभवाची खात्री. या मीमांसेनंतर माझ्या वरवर दिसणा-या बेपर्वा व बेगुमान बेछूट वृत्तीची तरफदारी करण्याचे क्वचितच कारण पडेल. मा.गोविंदराव टेंबे यांचे ९ ऑक्टोबर १९५५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.गोविंदराव टेंबेयांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- स. ह. मोडक
October 9, 2016
लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. लक्ष्मण शास्त्री जोशी यांची ओळख मुख्यत: `मराठी विश्वकोषाचे शिल्पकार' अशी असली, तरी ती ओळख अपुरी म्हणावी लागले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते थोर स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू धर्माचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, अशी अनेक विशेषणे तर्कतीर्थांच्या नावापुढे लावणे शक्य आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे बिरुद म्हणजे त्यांना मिळालेली `तर्कतीर्थ' ही पदवी!
हिंदू धर्माच्या अभ्यासासाठी ते वयाच्या चौदाव्या वर्षी घराबाहेर पडले आणि सातारा जिह्यातील कृष्णाकाठच्या वाई येथे स्थायिक झाले. त्यांच्या तारुण्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात होती. त्या काळातील संवेदनशील तरुणांच्या ज्या भावना असत, त्याच भावना तर्कतीर्थांच्याही होत्या. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत सक्रीय सहभाग घेतला. वयाच्या २९व्या वर्षी, म्हणजे १९३२ साली त्यांना तुरुंगात जावं लागलं. या वयापर्यंत तर्कतीर्थांनी संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवलं होतं. हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. चारही वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलायला लागले होते. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. आचार्य विनोबा भावे जेव्हा केवलानंद सरस्वती यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाई येथे मुक्कामाला होते, तेव्हा तर्कतीर्थांचा विनोबाजींबरोबरचा सहवास वाढला. विनोबाजींनी त्यांना इंग्रजी शिकविले. त्याच दरम्यान एक घटना घडली. महात्मा गांधींचे पुत्र देवीदास यांचा सी. राजगोपालाचारी (स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल) यांच्या मुलीशी आंतरजातीय विवाह करण्याचा मनोदय होता. पण हिंदू पंडितांचा त्याला विरोध होता. हा पेच सोडविण्यासाठी तर्कतीर्थांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या तर्कबुद्धीची चुणूक दाखवून असे विवाह हिंदू धर्माविरुद्ध नाहीत हे पटवून दिले. त्यामुळे गांधीजींनी खूश होऊन त्यांनाच लठाचे विधी करण्याचा मान दिला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तर्कतीर्थांना अनेक पुरोगामी बुद्धिवाद्यांचा सहवास लाभला. एम. एन. रॉय हे त्यांपैकीच एक. १९५१ साली सरदार वल्लबभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. जीर्णोद्धारानंतर मंदिर अस्पृश्यांसहित सर्वांना खुले करण्यात येणार होते. नेमके याच गोष्टीमुळे काशीच्या कर्मठ पंडितांनी मूर्ती प्रतिष्ठापनेचे धार्मिक विधी करण्यास नकार दिला. या काळातही तर्कतीर्थांनी आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने पंडितांना पटवून दिले की, असे करण्यात कोणताही धर्मलोप नाही, उलट हाच खरा हिंदू धर्माचा विचार आहे.
१९५१ साली त्यांनी पुणे विद्यापीठात सहा प्रदीर्घ व्याख्याने दिली. त्या व्याख्यानांवर आधारीत `वैदिक संस्कृतीचा विकास' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथाद्वारे त्यांनी भारतीयांना वैदिक धर्मावर आधारीत जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. भौतिक सुख आणि अध्यात्म यांच्या कात्रीत भारतीय समाज सापडला आहे. त्यामुळे तो गोंधळलाही आहे, असे त्यांनी अतिशय तर्कशुद्ध रितीने प्रतिपादन केले. हा ग्रंथ अतिशय प्रभावी झाला. १९५५ साली या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. अर्थातच त्यांचे विचार काही कर्मठ पंडितांना पटण्यासारखे नव्हते. त्यामुळे तर्कतीर्थांना अशा तथाकथित पंडितांच्या वर्तुळात स्थान नव्हते. पण महाराष्ट्राचे द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण यांनी मात्र तर्कतीर्थांच्या विचारांवर संपूर्ण विश्वास टाकला. १९६० साली दोन अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम तर्कतिर्थांवर सोपविण्यात आले. पहिला म्हणजे मराठी `विश्वकोषा'ची निर्मिती, तर दुसरा `धर्मकोषा'ची निर्मिती. ही दोन्ही कामे अतिशय अवघड अशी होती. `विश्वकोष' आणि `धर्मकोष' यांसारख्या ग्रंथांची निर्मिती करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले, त्याचे कारणही तसेच होते. त्यांनी त्याआधीसुद्धा अनेक महाकाय ग्रंथ लिहिले होते.
`शुद्धिसर्वस्वम्' हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ संस्कृत भाषेत होता, आणि तो १९३४ साली प्रकाशित झाला. त्याच वर्षी त्यांनी `धर्ममोक्ष' या ग्रंथाचे अठराशे पानांचे सहा अध्याय लिहिले. `हिंदू धर्माची समीक्षा', `वैदिक संस्कृतीचा विकास', `आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा', इत्यादी अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेतील साहित्य समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांनी अठरा प्रमुख उपनिषदांचे मराठीत भाषांतरही केले. प्राचीन वैदिक धर्माचे समर्थक असूनही तर्कतीर्थ यांना वास्तवाचे भान होते. आधुनिक शास्त्रे, इंग्रजी भाषा, भारताची औद्योगिक प्रगती यांबाबत त्यांचे विचार अतिशय पुरोगामी होते. त्यामुळे तर्कतीर्थ हे अनेक जणांचे प्रेरणा स्थान राहिले. भारत सरकारने तर्कतीर्थांना १९७६ साली `पद्मभूषण', तर १९९२ साली `पद्मविभूषण' पुरस्कार देऊन गौरव केला होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी यांचे २७ मे १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 27, 2017
आत्म निर्भर हा शब्द कोव्हीड साथीने आपल्यात रुजवला.पण ही संकल्पना ४०वर्षांपूर्वीच यांनी विशाखापट्टणम जिल्ह्यातील ५०हून अधिक खेडी आत्मनिर्भर करुन ही कल्पना वास्तवात येऊ शकते याचा भक्कम पुरावा दिला होता. अमेरिकेत संशोधन किंवा नोकरीची संधी सोडून मायभूमीत परतून देशसेवा करण्याचा पर्याय निवडल्याबाबत त्यांनी जराही खंत नव्हती. कारण त्यांचे ध्येय पक्के होते. दृष्टी ठाम होती, त्यामुळेच ते असामान्य होते.
June 9, 2022
१९४७ मध्ये गरीबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कुंकवाचा धनी या १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका प्रथमच केली.
October 25, 2021
पाकिस्तान लाहोर इथे जन्मलेल्या सुरैय्याने शास्त्रिय संगिताचे धडे घेतले नव्हते तरिही तिच्या कारकिर्दित तिने गायलेल्या अनेक गाण्यांनी खळबळ माजवली होती. त्यांचा जन्म १५ जुन १९२९ रोजी झाला. लहानपणी शाळेच्या सुट्टीत सुरैय्या अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत असे. अशाच एका सुट्टीत ती आपले मामा (एम. हुजूर) यांच्याबरोबर सुभाष स्टुडिओ मध्ये शुटिंग पहायला गेली होती. एम. हुजूर हे चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याचे काम करत असत. तेव्हा सुभाष स्टुडिओ मध्ये 'ताजमहल' चे शुटींग सुरू असताना एका बाल कलाकाराची आवश्यकता होती. दिग्दर्शक नानुभाई वकिल यांनी सुरैय्याचं नाव सुचवलं आणि ते पात्रं तिथे रंगून शॉट ओके सुद्धा झाला. गायिका म्हणून वर येण्यासाठी सुरैय्याला संगितकार नौशाद यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.. अशाच एका बालगीत कार्यक्रमात गाताना त्यांनी तिचं गाणं ऑल इंडिया रेडिओवर ऐकलं आणि तिच्याकडून आपल्या 'शारदा' या चित्रपटात अभिनेत्री मेहताबसाठी "पंछी जा, पीछे रहा है बचपन मेरा उसको जा के ला.....'' हे गाणं गाऊन घेतलं ... सुरैय्या त्यावेळी अवघी १३ वर्षांची होती, पण तिचा परिपक्व आवाज तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या मेहताबला मात्रं तंतोतंत सूट झाला. असं म्हणतात की हे गाणं रेकॉर्ड करताना सुरैय्याला माईकपर्यंत पोहोचता यावं यासाठी तिच्याकडून हे गाणं खुर्चित उभं करून गाऊन घेतलं गेलं. १९४३ ते १९४६ च्या दरम्यान सुरैय्याने अनेक चित्रपटांत सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले. त्यातले विशेष उल्लेखनिय म्हणजे अनमोल घडी, फूल, दर्द इ. पण अभिनेत्री म्हणून पहीली संधी तिला मिळाली ती 'तदबिर' या सिनेमात. सुरैय्याने अनेक गाणी सुद्धा गायली, परंतू के. एल. सहगल यांच्या बरोबरच्या 'परवाना' या चित्रपटातल्या ४ सोलो गाण्यांनी तिची खरी ओळख "गायिका-अभिनेत्री" अशी नव्याने करून दिली. मा.देव आनंदबरोबरची सुरैय्याची जोडी त्याकाळी भरपूर गाजली. एका चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी बोट उलटण्याच्या दृश्यात देव आनंदने तिचे प्राण वाचवले, एकिकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर अनेक मान्यवर आणि दिग्गज मंडळी सुरैय्याशी लग्नं करण्यास उत्सुक असूनही, दुसरीकडे देव आनंद बरोबरच्या प्रेमभंगानंतर सुरैय्याने कधीही विवाह न करण्याचा निर्णय घेतला. १९४९- ५० च्या दरम्यान सुरैय्याचे चित्रपट भरपूर गाजले आणि ती सर्वात जास्त मानधन घेणारी नायिका बनली. प्यार की जीत, बडी बहन, दिल्लगी हे ते चित्रपट.. असं म्हणतात की बॉलिवूडमध्ये तरूण्-तरूणिंच्या हृदयाचा ठेका सर्वात जास्त चुकवणारा अभिनेता म्हणजे राजेश खन्ना, पण त्याच्या तोडीचंच वेड नव रूणाईमध्ये त्याकाळी सुरैय्यानेही निर्माण केलं होतं. तिच्या 'शमा' या चित्रपटातील गाणी गाजली.. सुरैय्याचा शेवटचा चित्रपट म्हणजे रूस्तम सोहराब. मा.सुरैय्या यांचे ३१ जानेवारी २००४ यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुरैय्याची काही गाणी
* धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम..... (शमा)
* जब तुम ही नहीं अपने, दुनिया ही बेगानी है ......(परवाना)
* ओ दूर जाने वाले वादा न भूल जाना.... (प्यार की जीत)
* तेरे नैनों ने चोरी किया, मोरा छोटा सा जिया, परदेसिया.... (प्यार की जीत)
January 31, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti