ज्येष्ठ गोमंतकीय कलासमीक्षक, चित्रकार, नाटककार व साहित्यिक गोपालकृष्ण भोबे यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२० गोव्यातील बार्देश तालुक्यातील नेरूल येथे झाला.
February 17, 2024
हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. त्यांचा जन्म १९१६ रोजी जालंधर येथे झाला. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते.
December 28, 2017
इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
June 27, 2022
१९९१ साली चित्रपटसॄष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत १९९०च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिचा जन्म २५ जून १९७४ रोजी झाला. तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है, फिजा, झुबैदा हे चित्रपट विशेष गाजले.
अभिनेत्री करिश्मा कपूर चे टोपणनाव लोलो आहे.हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता रणधीर कपूर तिचे वडील, तर अभिनेत्री बबिता तिची आई आहे. तिची बहीण करीना कपूर हीदेखील हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपिडीया
June 27, 2017
कांचन अधिकारी यांनी अभिनेत्री म्हणून "बाळाचे बाप ब्रम्हचारी‘, "प्रेमासाठी वाट्टेल ते‘ चित्रपटांत काम केले. त्यांनी दिग्दर्शित केलेली पहिली मालिका "दामिनी‘ दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रिय ठरली. तब्बल आठ वर्षे ती नंबर वन होती. त्यानंतर त्यांनी "चोरावर मोर‘, "उचापती‘ अशा काही मराठी मालिकांबरोबरच हिंदीतील "सब कुछ हो सकता है‘, "हसी वो फसी‘, "अभी तो मैं जवॉं हूँ‘ अशा काही मालिकांचे दिग्दर्शन केले. मराठी व हिंदी मिळून तब्बल पाच हजारांहून अधिक एपिसोड्स त्यांनी दिग्दर्शित केले. "मानिनी‘, "दोघांत तिसरा आता सगळे विसरा‘, "बाप रे बाप डोक्याूला ताप‘, "तुक्याड तुकविला नाग्या नाचविला‘, "मोकळा श्वाास‘ आणि "हुतूतू‘ या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. "मानिनी‘ या चित्रपटाचे तब्बल बारा दिवस दुबईत चित्रीकरण झाले. दुबईत चित्रित झालेला हा पहिला मराठी चित्रपट. त्यांनी दिग्दर्शित केलेला "किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी‘ हा चित्रपट खूपच प्रेक्षकांना भावला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 23, 2017
गदिमांना १० भाषा येत होत्या. मराठीमधील लावणी या प्रकाराला त्यांनी एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी १५७ मराठी चित्रपट केले तर २३ हिंदी चित्रपट केले.
December 14, 2021
शिर्डीचे साईबाबा हा मराठी आणि शिरडी के साईबाबा हा हिंदी चित्रपट त्याचप्रमाणे तुफान और दिया, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, लडकी सह्याद्री की, हिरा और पत्थर,सुहाग मराठीत – अमर भूपाळी, वारणेचा वाघ, पिंजरा , झुंज, ज्योतिबाचा नवस, बाळा गाऊ कशी अंगाई, चिकट नवरा वगैरे चित्रपटांत त्यांनी भुमिका केल्या होत्या.
March 13, 2022
दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला. त्यांचा जन्म २ जून १८९० रोजी झाला. पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते एक चतुरस्र् कलाकार होते. कलाव्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मुंबईत १९०८-०९च्या सुमारास फोटोग्राफीचा स्टुडिओ सुरू केला. पुढे केशवराव भोसले, बालगंधर्व यांच्या नाटकांसाठी पडदे रंगवले, इतकेच नव्हे तर त्यांनी ‘गंधर्व कंपनी’ला वेशभूषा, अलंकार, आभूषणे इत्यादींची डिझाइन्सही करून दिली. स्मारक-शिल्पे करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. ज्या काळात चित्रपटनिर्मितीसाठी लागणा-या मूलभूत सुविधा, यंत्रसामग्रीही उपलब्ध नव्हती, त्या काळात बाबूरावांनी चित्रपटनिर्मितीचे साहस केले. १९१७ मध्ये कोल्हापूरला त्यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ स्थापन केली व जवळजवळ २६ चित्रपटांची निर्मिती केली. ‘सावकारी पाश’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. हा चित्रपट चित्रपटनिर्मितीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड समजण्यात येतो. झुंजारराव पवार, व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, अनसूयाबाई आदींनी त्यात भूमिका केल्या होत्या.
बाबूराव हे स्वत: उत्तम इंजिनीअर व संकलक होते. आपल्याला चित्रीकरणासाठी लागणारा हवा तसा कॅमेरा त्यांनी स्वत: बनवून घेतला होता. ते सिनेमाचे पोस्टर, फोटो पाहूनच आपले आगामी सिनेमाविषयीचे मत बनवणार, हे गृहीत धरून बाबूरावांनी आपल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’च्या ‘सिंहगड’ (१९२३) या चित्रपटाची लक्षवेधक पोस्टर्स तयार करून ग्रँट रोडचे ‘नॉव्हेल्टी थिएटर’ असे काही सजवले-नटवले की, त्या काळी अर्धी मुंबई खास ‘नॉव्हेल्टी’ पाहायला तिथे लोटली होती. त्यांचे ‘सिंहगड’चे पोस्टर काळाच्या ओघात नष्ट झाले; पण त्यांच्या ‘सतिसावित्री’, ‘कल्याण खजिना’, ‘सावकारी पाश’ (सर्व मूकपट, काळ : १९२१ ते १९२७), ‘शाहीर रामजोशी’ आदी चित्रपटांची पोस्टर्स, ‘उषा’ चित्रपटांचे बुकलेट आजही पाहायला मिळते, ही सर्व चित्रे म्हणजे दुर्मीळ कलेक्टर्स आयटम्स आहेत. आपल्या स्टुडिओत चित्र रंगवण्यासाठी चित्रफलकाच्या आधारासाठी लागणारा ईझल त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने डिझाइन केला होता. त्या ईझलसमोर एका जागेवर बसून चित्रकर्त्यांला काम करता येई. त्यांनी चित्रफलक वर-खाली करण्यासाठी व कोणत्याही उंचीवर स्थिर करण्यासाठी ईझलमध्ये पायाने दाबण्याच्या पॅडलची व्यवस्था केली होती. अशी सुविधा असलेला ईझल कुठल्याही पेंटरकडे नव्हता. बाबूराव उत्तम मोटार मेकॅनिकही होते. बोलपटांचे आगमन झाल्यावर ध्वनीने, दृश्यकलेवर आक्रमण केले असे समजून बाबूराव पेंटरांनी सिनेउद्योगातून निवृत्ती पत्करली. पण त्याआधी त्यांनी व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, दामले, फत्तेलाल, धायबर असे शिष्योत्तम तयार केले.सतत कलेचा ध्यास आणि नावीन्याचा शोध घेण्यात बाबूरावांनी आपली उभी हयात घालविली. मा.बाबूराव पेंटर यांचे १६ जानेवारी १९५४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ :- इंटरनेट
January 16, 2017
डग इन्सोल यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना २० जुलै १९५० रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्यांनी शेवटचा कसोटी सामना ३० मे १९५७ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला . निवृत्तीनंतर ते ते इंग्लंडच्या क्रिकेट सिलेक्टर्स कमिटीचे चेअरमन होते तसेच १ ऑक्टोबर २००६ मध्ये एक वर्षासाठी एम. सी .सी. चे प्रसिडेंटही होते. ते एम.सी.सी. कमिटीवर २० वर्षाहून अधिक काळ होते.
April 18, 2021
ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते.
March 16, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti