जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला. अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़ हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. वडील छापखान्यात नोकरीला होते .
प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे (बेबी)शकुंतला सिनेमात आल्या. इ.स. १९५४ साली बसर्गे (गडहिंग्लज तालुका) येथील इनामदार असलेले श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रभात फिल्म कंपनीच्या ‘दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़ त्यानंतर १९४४ मध्ये ‘रामशास्त्री’ या चित्रपटात काम केले़ त्यानंतर मायाबाजार, सीता स्वयंवर, मी दारू सोडली, अबोली, सपना, परदेस, आदींसह सुमारे साठ चित्रपटांत त्यांनी काम केले़.
बेबी शकुंतला यांनी यानंतर ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांतही अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी पाटील, बिमल रॉय आणि बी. आर. चोप्रा यांच्यासारख्या दिग्दशर्कांनी आपल्या चित्रपटात बेबी शकुंतला यांना दिलेली संधी त्यांच्यातील अभिनयक्षमतेचा सन्मान करणारी होती. बेबी शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी. पाटील, किशोर शाहू, बिमल रॉय, व्ही. शांताराम, केदार शर्मा, बिमल रॉय आणि बी.आर. चोप्रा यांच्या सारख्या नामवंत दिग्दशर्कांच्या हाताखाली काम केले होते. बेबी शकुंतला यांच्या ’अबोली’ आणि ’चिमणीपाखरे’ या चित्रपटांतील भूमिका अविस्मरणीय आहेत.
पी.एल अरोरा यांनी काढलेल्या ’परदेस’मध्ये बेबी शकुंतला या मधुबालाबरोबर सहनायिका होत्या. किशोरकुमारची नायिका म्हणून त्या ’फरेब’ आणि ’लहरें’मध्ये चमकल्या. अप्रतिम सौंदर्य आणि शालीन अभिनय हे बेबी शकुंतला यांचे वैशिष्ट्य होते. मनात आणले असते तर त्या आणखी कित्येक वर्षे चित्रपटसृष्टी गाजवीत राहिल्या असत्या. पण सुमारे १०० चित्रपटांत कामे करून त्यांनी विवाहानंतर वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी चित्रपट संन्यास घेतला. बेबी शकुंतला यांचे निधन १८ जानेवारी २०१५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट
November 17, 2018
सुरैया हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका स्वप्निल, सुरेल काळाचं मोरपंखी प्रतीक होतं. त्यांचा जन्म १५ जून १९२९ रोजी झाला. ४० आणि ५० च्या दशकात सुरैय्या या प्रचंड लोकप्रिय अशी गायिका/अभिनेत्री होत्या.
June 21, 2019
त्यांनी १९८० मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत तूने मुझे बुलाया शेरा वालिए, १९८३ मध्ये आशा भोसले यांच्यासह चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, दो घूंट पिला के साकिया, हुए हैं कुछ ऐसे वो हमने पराए यासारखी अजराअमर गाणी गायली आहेत. यानंतर त्यांनी आपल्या भजनांनी बरंच नाव कमावलं.
January 22, 2022
पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला.
February 16, 2022
व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट.
August 8, 2009
त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात म्युझिक ॲरेंजर म्हणून काम करणाऱ्या भिडे यांनी कालांतराने चित्रपटांना स्वतंत्रपणे संगीत देण्यास सुरुवात केली.
April 4, 2022
मुंबई महापालिकेत वंदे मातरम् हे देशभक्तीपर गीत गायले जावे यासाठी त्यांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे त्यांना शिक्षाही भोगावी लागली. भिवंडी येथील मुस्लिमबहुल भागात शिवजयंती मिरवणूक निघावी, मलंग गडावरील बंदी दूर व्हावी यासाठीही त्यांनी आंदोलने केली होती.
February 23, 2022
जन्म.२९ ऑक्टोबर १९६६
साठच्या दशकात सुनील मेहता यांचे वडील अनिल मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापन केली. १९७६ साली वडील अनिल मेहता यांनी पुण्यात स्थापन केलेल्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या प्रकाशन संस्थेची सगळी सूत्रे १९८६ साली सुनील मेहता यांच्याकडे आली.
पारंपारिक प्रकाशन व्यवसायाचे डिजिटायजेशन करण्याचे श्रेय हे सुनील मेहतांना जाते. हिंदी, बंगाली, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील पुस्तकांचे मराठी अनुवाद त्यांनी प्रकाशित केले. कोरियन आणि जपानी भाषेतील पुस्तकांचे मराठी आणि इंग्रजी अनुवादही प्रकाशन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
सर्व प्रकारच्या श्रेणीली दर्जेदार डिजिटल पुस्तके प्रकाशित करणारे असे मेहता पब्लिशिंग हे एकमात्र पब्लिशिंग हाऊस आहे. एकट्या महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात त्यांनी इंग्रजी पुस्तकांचा व्यवसाय वाढवला. मराठी वाचकांना परदेशी भाषांमधील पुस्तके वाचण्यास मिळावी म्हणून त्यांनी परदेशी भाषांमधील अनेक पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित केले होते.
रणजित देसाई, वि.स. खांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, व.पु. काळे, शिवाजी सावंत, शांता शेळके, शंकर पाटील अशा दिग्गजांची पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली. रविंद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, अरूण शौरी, गुलजार, किरण बेदी, अरूंधती रॉय, सचिन तेंडुलकर, शोभा डे यांचीही पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.
मराठीतील दर्जेदार पुस्तकांच्या प्रकाशनासोबतच विविध भाषांमधील पुस्तकांचे अनुवाद मराठीत आणणाऱ्या सुनील मेहता यांनी संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले होते. अनेक आंतरराष्ट्रीय, नामांकित जेफ्री आर्चर, मायकल क्रायटन, फ्रेडरिक फोरसाइथ, रॉबिन कुक, ऍलिस्टर मॅक्लीन, जॉन ग्रिशॅम, इयान फ्लेमिंग, डॅन ब्राऊन, डेबोरा एलिस, ली चाइल्ड झुम्पा लाहिरी यांचे साहित्य मराठीत आणण्यातत्यांचे मोठे योगदान आहे. तर तस्लिमा नासरीन, सुधा मूर्ती, अरुण शौरी, खुशवंत सिंग, चेतन भगत, एस. एल. भैरप्पा, शिवराम कारंथ, गुलजार, दीप्ती नवल, अरुंधती रॉय, ओशो, किरण बेदी अशा लेखकांचे साहित्य त्यांनी मराठीत नावारूपाला आणले. टीबीसी या अभिनव संकल्पनेतून त्यांनी हे अनुवाद मराठी वाचकांपर्यंत पोहचविले. नाशिक येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात त्यांनी ‘मेहता साहित्योत्सव’चा अभिनव प्रयोग राबविला, ज्यात साहित्यिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र स्टॉल घेऊन वाचक आणि लेखकांचा संवाद घडवण्यात आला. त्यांनी अनेक प्रकाशनाचे कार्यक्रम आयोजित केले. २०१२ मध्ये नॉर्वे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एकमेव मराठी प्रकाशक म्हणून मेहता यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.
सुनील मेहता यांनी मराठीत सर्वप्रथम इ-बुक्सचा प्रयोग यशस्वीरित्या राबवला. मेहता पब्लिशिंग हाऊसची दीडहजारहून अधिक पुस्तके इ-बुक स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहेत.
सुनील मेहता यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
January 13, 2022
बीड येथे गुरूलिंग सोनवणे नामक सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक आहेत. ते शिरूरकासार (बीड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत होते. दरवर्षी नियमितपणे शासनाच्या चित्रकला परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट करत असत.
मी आठवीत असताना चित्रकलेची आवड लक्षात घेऊन सरांनी मला परीक्षेस बसवले. बीड येथील मल्टिपर्पज शाळेत या परीक्षा होत. राहण्याची सोय तर नाही. मग सरांच्या बीड येथील घराशिवाय पर्याय नव्हता. तीन-चार दिवस वीस-पंचवीस मुले त्यांच्या घरी मोफत राहण्यासाठी असत. त्यांच्या अर्धांगिनी आनंदाने मुलांना जेवू घालत. अशावेळी गरीब विद्यार्थ्यांचा खर्च सर स्वत: करत असत. मुले परीक्षा देत. घरी जात. रंग, डीश, ब्रश, कागद हा कमी पडला की सोनवणे सर ते मोफत पुरवत असत. मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी सतत धडपडत असत.
त्यांची दोन्ही मुले वैद्यकीय क्षेत्रात आहेत. त्यांचा चित्रसंग्रह अप्रतिम आहे. आमच्यासह अनेक मुले त्यांच्यामुळे संस्कारशील झाली. आमचे हस्ताक्षर आणि चित्र यावर त्यांचीच छाया आहे. आमच्या वडिलांशी ते सातत्याने संपर्क करत. आदरभाव जोपासत. मुलांची प्रगती आणि अडचणी याविषयी बोलत.
असे गुरू भेटणे प्रत्येकाचे भाग्यच असते. विद्यार्थीदशेत असताना त्यांचे महत्त्व कळाले नाही; पण आज नतमस्तक होतोय.
आज सरांचे सर्व विद्यार्थी नावारूपास आले आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. उतारवयात त्यांना चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा! त्यांचे आमच्या आयुष्यात येणे कलाटणी देणारेच आहे!
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
November 7, 2016
गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. ख्यातनाम गझल गायक गुलाम अली यांचा जन्म ५ डिसेंबर १९४० रोजी झाला. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत व्यग्र असे व्यक्तिमत्त्व होते.
गुलाम अली यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांचे वडील त्यांना पहाटे पाच वाजता उठवायचे. नाही उठले तर काठीने मारून उठवायचे. का, तर बडे गुलाम अली खाँचे नाव खराब होऊ नये. तेव्हा ते पाच वर्षांचे होते. बरेच दिवस गेल्यावर एके दिवशी बडे गुलाम अली खाँ त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या वडलांच्या असंख्य बिनत्यांची आबरू ठेवण्यासाठी गुलाम अली यांना ‘काहीतरी गा’ असे म्हणाले. त्यांनी धीर करून ‘सैयाँ बोलो तनिक मोसे रहियो न जाए’ ही ठुमरी गायली. गाणं संपताच बडे गुलाम यांनी पंधरा वर्षांच्या छोट्या गुलामला मिठी मारली आणि त्यांना आपला गंडा बांधला.
तथापि, बडे गुलाम खरोखरीच अतिशय व्यग्र असल्याने त्यांचे तीन बंधू बरकत अली खाँ, मुबारक अली खाँ आणि अमानत अली खाँ यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. १९६० साली गुलाम अली यांनी लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर त्यांना गझल गायक म्हणून भारत, पाकिस्तान व जगात अमाप लोकप्रियता मिळाली. गुलाम अलीजी एक मेहबूब गजल गायक आहेत. पाकिस्तानातील गजलचे बादशहा मेहदी हसन यांच्या नंतरच्या पुढच्या पिढीचे आणि समर्थ गजल गायक आहेत. त्यांच्या ‘चुपके चुपके’ने तीन दशकांपूर्वी लावलेले वेड अद्याप ओसरायला तयार नाही.
हिंदुस्थानी ठुमरी गायकीची शैली गजलच्या फॉर्मसाठी यशस्वीपणे वापरणाऱ्या गुलाम अली यांनी शेकडो गजला गायल्या आहेत. त्यातील एक निवडणे हे इतर गजलांवर अन्याय केल्याशिवाय शक्य नाही. गुलाम अली व आशा भोसले यांचा मिराज ए गझल हा अल्बम फारच सुंदर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 9, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti