(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सतारवादनातील श्रेष्ठतम वादक रवि शंकर

    रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन पोषण केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले.

      December 11, 2017


  • मराठी संगीत विश्वातील ‘देव’ अशी ओळख असलेले यशवंत देव

    ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव म्हणजे मराठी भावसंगीत परंपरेतील ‘देव’ माणूस; शब्दप्रधान गायकीचे पुरस्कर्ते आणि शब्दसुरांचा सांगाती. त्यांच्या मार्गदर्शनाचा परिसस्पर्श लाभावा म्हणून जुन्या-नव्या पिढीचे गायक प्रतीक्षेत असत.

    जेष्ठ संगीतकार यशवंत देव यांची माहिती.
    त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.

    यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे झाला. आजतागायत अनेक नाटके आणि चित्रपटासाठी गाणी लिहिली, संगीत दिले. त्याचप्रमाणे बालकविता, विडंबन, विनोदी काव्यप्रकारही लिहिले. यशवंत देवांनी हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज संगीतकार अनिल विश्वास यांना आपले गुरू मानले होते. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.

    यशवंत देव जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवीसुद्धा आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. जीवनात ही घडी अशीच राहू दे, श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे, अशी धरा असे गगन कधी दिसेल का?, कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे, तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी, अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात, अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा....अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी, तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत.

    यशवंत देवांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला मा.यशवंत देव यांनी संगीत दिले होते. चिंतनशील कलाकार असणारे यशवंत देव एका फार मोठय़ा सांगीतिक कालखंडाचे साक्षीदार आहेत. स्वत:सोबत अनेकांची कारकीर्द घडताना त्यांनी जवळून पाहिली आहे.

    १९५१ मध्ये ते सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात पुढे येत होती. हे सर्व देवांना जवळून बघायला मिळाले. एच. एम. व्ही. च्या नोकरीने देवांना अनुभवसमृद्ध केले. मा देव साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना लाभला होता. म्हणूनच ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची गाणी विलक्षण गाजली.

    एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नाहीत. तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगतात. त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर. (तेव्हाच्या सुमन हेमाडी!) त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली.

    या गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी होती, हेही देव विशद करताना म्हणतात, ‘गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दांतच ते दडलेले असतात हे जाणवलं. शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य विजेसारखं डोळ्यांसमोर आणि डोक्यात चमकलं!’’ म्हणूनच पुढच्या काळात देवांचं ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असतात. यातूनच ‘शब्दप्रधान गायकीचे उद्गाते’ हे बिरूद त्यांना बहाल झालं.

    'दिवस तुझे हे फुलायचे', 'पाऊस कधीचा पडतो', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'क्षितिजावर खेळ विजेचा' अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, 'प्रिया आज माझी', 'स्वर आले दुरुनी', इ. गीतांचे कवी, 'शब्दप्रधान गायकी', 'रियाजाचा कानमंत्र', 'कृतज्ञतेच्या सरी', 'पत्नीची मुजोरी' अशा अनेक पुस्तकांचे लेखक मा. ‘प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव’ हे अशोक चिटणीस यांनी पुस्तक लिहिले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 31, 2018


  • ज्येष्ठ अभिनेते रवि पटवर्धन

    ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाच्या जमान्यात रवी पटवर्धन यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेत नोकरी करून अभिनय श्रेत्रात पाऊल ठेवले.

      September 6, 2023


  • भारताचे विख्यात ऑफस्पिनर श्रीनिवास राघवन व्यंकटराघवन

    रणजी ट्रॉफी कारकिर्दीत रजिंदर गोयल (६३७) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी ५३० विकेट्स घेतल्या होत्या. तर, प्रथम श्रेणी कारकिर्दीत बिशन बेदी (१५६०) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी १३९० विकेट्स घेतल्या होत्या. केवळ गोलंदाजीतच नव्हे तर वेंकटराघवन फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही सराईत होते.

      April 22, 2022


  • लेखक , पत्रकार अप्पा पेंडसे

    विविधवृत्त ‘, सिनेसाप्ताहिक तारकांमध्ये उपसंपादक, संपादक अशी कामे त्यांनी केली. त्याशिवाय निर्माते दादासाहेब तोरणे , बाबुराव पै, पांडुरंग नाईक , मा. विनायक , बाबुराव पेंढारकर यांच्यासारख्या नामवंत कलाकारांच्या प्रदीर्घ मुलाखती त्यांनाही घेतल्या आणि त्या प्रसिद्ध केल्या.

      July 24, 2021


  • ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री नुतन

    निरागस हास्याच्या, अप्रतिम तरीही साध्या सौंदर्याच्या, आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटसृष्टी परिपूर्ण म्हणून नूतनजी ओळखल्या जात. त्यांचा जन्म ४ जून १९३६ रोजी झाला. नूतन यांचे माहेरचे नाव नूतन समर्थ, सासरचे नाव नूतन बेहल. मिलन चित्रपटातलं 'सावन का महिना', सरस्वती चंद्र चित्रपटातलं 'चंदन सा बदन' , कर्मा चित्रपटातलं 'दिल दिया है जान भी देंगे' सुजाता मधलं "जलते है जिस के लिये", बंदिनी मधलं "मेरे साजन है उस पार" आणि दिल ही तो है मधलं "तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही" ही नूतनजीची गाणी खूप गाजली. ही गाणी...व त्यातलं नूतन यांचे ते साधं तरीही सुंदर दिसण...
    गौतम राजाध्यक्षांसारखा एक मोठा फोटोग्राफर नूतनला जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असे. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगकाठी आणि उंच बांधा. सगळे असून नूतन सगळ्या चित्रपट सृष्टीसाठी नूतन ताईच राहिली. सीमा, पेइंग गेस्ट, बंदिनी, सुजाता, अनाडी ते सौदागर अशा अनेक सिनेमातील यादगार भूमिका करून गेल्या. नूतन यांचा आवाज चांगला होता; आणि स्वत:ची गाणी स्वत: गावीत असे त्यांना मनापासून वाटायचे॰ त्याच्या आईने निर्माण केलेल्या ” छबिली ” या चित्रपटात इच्छा पूर्ण झाली॰ त्याची त्यातील दोन गाणी बरीच लोकप्रिय झाली; त्यामुळेच त्यांनी सुभाष देसाई या निर्मात्याच्या मागे लागून त्याच्या ती नायिकेची भूमिका करत असलेल्या ” छलिया ” चित्रपटातील गाणी आग्रहाने, हट्ट करून गायली॰ नूतन १९५१ साली ‘ मिस इंडिया ‘ या किताबाची मानकरी ठरली होत्या॰ १९७४ मध्ये केंद्र शासनाने त्यांना ‘पद्मश्री ‘ पुरस्कार प्रदान केला. नूतन यांचे २१ फेब्रुवारी १९९१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 4, 2017


  • पहिल्या अभिनेत्री कमलाबाई कामत उर्फ कमलाबाई गोखले

    कमलाबाई यांचे वडील उत्तम किर्तनकार तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवावत. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या. पण घराची हलाखीची अवस्था असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. आणि याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांच्यावर संवाद,संगीत आणि अभिनयाचे धडे त्यांनी गिरवायला सुरुवात केली. याचा पुरेपुर उपयोग पुढे कमलाबाईंना मुकपट तसेच संगीत नाटकांसाठी झाला. भारतीय सिनेसृष्टीची मुहुर्तमेढ रोवली गेली ती २० व्या शतकाच्या आरंभी. त्याकाळी आपल्या समाजात समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचं महत्वपूर्ण साधन म्हणजेच संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, सामान्य माणसाच्या काळजाला भिडणार्यां कथानकांमुळे, नाटकं मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनली होती. पण, त्याकाळी एक उणीव मात्र या नाटकांमध्ये कायमची जाणवायची ती म्हणजे स्त्री पात्रांची. अर्थात स्त्री भुमिकाही त्याकाळी पुरुष साकारत असत. याच काळात म्हणजे १९१३ साली चित्रपट युग सुरु झाले ते राजा हरिश्चंद्र पासून. त्या बोलपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळकेंचा मोहिनी भस्मासुर या मुकपटाचा प्रयोग सुरु झाला होता. आपल्या आगामी बोलपटांमध्ये स्त्री पात्र ही स्त्री कलाकारांनी साकारावीत या मतांचे दादासाहेब फाळके होते. त्याचवेळी कोणीतरी कमला कामत नावाच्या लहान मुलीचं नाव दादासाहेब फाळकेंना सुचवलं.

    फाळकेंच्या मोहिनी भस्मासुर या मुकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंची निवड झाली आणि त्यांच्या रुपानं, रुपेरी पडद्याला एक स्त्री अभिनेत्रीचा, स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला. विशेष म्हणजे मोहिनी भस्मासुर या चित्रपटात कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांची सुद्धा पार्वतीच्या छोट्या भूमिकेसाठी निवड झाली. सर्व स्तरातून या भूमिकेचं स्वागत झालं आणि पुढे कमलाबाईंच्या अभिनयाची कमान ही चढतीच राहिली. पुढे अनेक मुकपटांमधून त्यांनी परिपूर्ण भूमिका साकारुन स्त्री कलाकारांना एकाअर्थी या क्षेत्रात येण्यासाठी हे उदाहरण आपल्या रुपानं ठेवलं असं ही म्हणता येईल. चित्रपटांपेक्षाही तो काळ नाटकांचाच होता. पण अशावेळी संगीत नाटकांतील महत्वपूर्ण अशी किर्लोस्कर कंपनी बंद पडल्यानं, रघुनाथराव गोखले यांनी चित्ताकर्षक नाटक मंडळीची स्थापना केली आणि गद्य नाटके रंगभूमीवर सादर होऊ लागली. या नाटकांमधून कमलाबाईंनी भूमिका साकारल्या पण अशातच रघुनाथरावांचे निधन झाले आणि रामभाऊ गोखले यांच्याकडे चित्ताकर्षकची सूत्रे आली. त्यांनी पुन्हा संगीत आणि पौराणिक नाटकांची निर्मिती सुरु केली. पुंडलिक तसेच मृच्छकटिक ही नाटकं चित्ताकर्षक तर्फे सादर होऊ लागली होती. या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रमुख भुमिका केल्या. त्यामुळे नाट्यसंगीतालाही सुरेल बाज लाभला. त्यावेळेला कमलाबाई यांच्या खाजगी जीवनात मोठे परिवर्तन झाले. चित्ताकर्षकचे मालक राजाभाऊ गोखले यांच्याबरोबर त्या विवाहबद्ध होऊन कमलाबाई गोखले झाल्या.

    पती-पत्नी दोघेही एकाच क्षेत्रातले असल्यानं त्यांचं बिर्हा्डही सतत फिरत राहिलं. पण दुर्दैवाने चित्ताकर्षक मंडळी नुकसानित आल्यानं कंपनीला टाळं लागलं. अनेक प्रश्न भेडसावत होते. पण कमलाबाईंनी हार मानली नाही. त्यांनी मनोहर स्त्री संगीत मंडळी नावाची संस्था स्थापन केली. या काळात फक्त स्त्रियांची नाट्यकंपनी असणं हे कला आणि मनोरंजन सृष्टीसाठी सूचक असं पाऊल होतं आणि या नाट्यकंपनीचं वैशिष्ट्य हेच की स्त्री आणि पुरुषांची पात्र स्त्रियाच सादर करत. या सुमारास नाट्यकलाप्रसाद या नाट्यकंपनीनं अस्पृश्यता निवारण हा सामाजिक प्रश्न रंगभूमीवर आणला, ज्या विषयाचा उच्चार करणंही धाडसाचं होतं, ते उ:शापच्या माध्यमातनं जनतेसमोर आले. कमलाबाईंनी काळाची गरज ओळखुन या नाटकात समर्थपणे भुमिका साकारली. पेशव्यांचा पेशवा या ऐतिहासिक नाटकातली त्यांची आनंदीबाईची भूमिका, सौभद्र मधील सुभद्रा व अर्जुन, मानापमान मधील धैर्यधर (पुरुषपात्र) या व्यक्तिरेखा तर गाजल्याच पण विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नामवंत लेखकांच्या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रत्येक व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करुन दिला.

    तब्बल २०० पेक्षा ही अधिक नाटकं, मुकपट त्यासोबतच कारकिर्दीत ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून नायिका तसेच स्त्रीप्रधान भूमिकांमुळे कमलाबाई गोखले कायमच लक्षात राहतात. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि चाळीस वर्ष या क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल, त्यांचा वयाच्या ७० व्या वर्षी दिलीपकुमार यांच्या हस्ते सत्कार झाला. रिना मोहन या बंगाली दिग्दर्शिकेने हिंदीमध्ये त्यांच्यावर टेलिफिल्मही बनवली. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले व सूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबलावादक होते व चंद्रकांत गोखले यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कलेचा वारसा अभिनयातून आपल्यासमोर आणला आणि विक्रम गोखले यांच्या रुपात आज कमलाबाईंची तिसरी पिढी या क्षेत्रात समर्थपणे कारकिर्द घडवतेय मा.मा.कमलाबाई गोखले यांचे १८ मे १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ सागर मालाडकर

      September 6, 2017


  • सिंफनी झपाटा’ या ऑर्केस्ट्राचे शिल्पकार वसंत खेर

    वसंत खेर यांनी पाटर्नर, डॉ. तुम्हीसुद्धा, आमच्या या घरात आदी नाटकांच्या जाहिरातीही तयार केल्या. ‘मंगलगाणी, दंगलगाणी’, व ‘भले तरी देवू’ हा भक्तीरसपूर्ण कार्यक्रम याची त्यांनी निर्मिती केली. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य, आचार्य अत्रे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूळ आवाजातील भाषणे कॅसेटच्या माध्यमातून त्यांनी रसिकांपर्यंत पोहोचविली.

      April 23, 2022


  • मराठी अभिनेत्री गिरिजा ओक

    मराठी अभिनेत्री गिरिजा ओकचा जन्म २७ डिसेंबर १९८७ रोजी झाला. हिंदी-मराठी चित्रपट तसेच मराठी मालिका आणि नाटक यातून मोजक्याच पण उत्कृष्ट भूमिका सादर करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री गिरिजा ओक ही प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची कन्या. १५ वर्षाची असताना मोठ्या तिने पडद्यावर पदार्पण केले. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे.

    गिरिजा ओक चा विवाह सुरुद गोडबोले बरोबर झाला आहे. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळे मडगुळे' या चित्रपटांत तिने काम केले आहे. 'लज्जा' या झी मराठी वरिल मालिका हि तीची पहीली मालिका होती. जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा सर्व माध्यमात अभिनेत्री गिरीजा ओकने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      December 27, 2018


  • विश्वासराव पेशवे

    विश्वासराव पेशवे हे नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांचा जन्म २ मार्च १७४२ रोजी झाला. नानासाहेब व गोपिकाबाई यांचा पुत्र विश्वासराव पेशवे हे सर्व पेशव्यांत फार सुंदर होते. हे लहानपणापासून राज्यकारभारांत पडला होता व युध्दाच्या मोहिमांवरहि जात असे. निजामावरील सिंदखेडच्या स्वारींत विश्वासराव यांना मुख्य सरदार करून दत्ताजी शिंद्यास याचा कारभारी नेमलें होतें. विश्वासराव व जनकोजी जवळ जवळ सारख्याच वयाचे असल्यानें त्यांच्यांत अखेरपर्यंत मैत्री होती. या मोहिमेंत औरंगाबादेस व शिंदखेडास मराठ्यांनीं निजामाचा सपशेल पराभव केला. या युध्दांत विश्वासराव व जनकोजी या दोघांनींहि चांगला पराक्रम गाजविला. उदगीरच्या लढाईत ही भाउसाहेबांच्याबरोबर विश्वासराव हजर होते, त्यात त्यांनी हत्तीवरून तिरंदाजी उत्तम प्रकारें केली होती. १७५७ मध्येंच नानासाहेबांनीं दहा हजार फौज विश्वासरावाच्या हाताखालीं स्वतंत्र नेमून दिली होती. उदगीरच्या लढाईनंतर भाऊसाहेब पानिपतावर निघाले. भाउसाहेबांनीं दिल्ली शहर आगस्ट १७६० त हस्तगत केलें त्यावेळीं दरबार भरवून त्यांनीं सर्वांकडून विश्वासरावास नजरा करविल्या यावेळी विश्वासरावानें लष्करी दृष्टीनें किल्ल्याची पहाणी केली. या सालचा दसरा कुंजपुर्याास विश्वासरावाच्या नेतृत्वाखालीं मराठ्यांनीं केला. शेवटच्या दिवशी विश्वासराव व भाऊसाहेब आपल्या सैन्याच्या मध्यभागांत प्रथम हत्तींवर बसून लढत होते. १४ जानेवारी १७६१ रोजी सकाळीं ८ वाजतां लढाईस सुरवात झाली. दुपारीं विश्वासराव हत्तींवरून उतरून दिलपाक घोड्यावर बसला. त्याला तिसर्या प्रहरीं छातींत गोळीं लागली व तो तत्काळ गतप्राण झाला. जवळच भाऊसाहेब होते; त्यांनीं रावाचें शव हत्तीवरील अंबारींत ठेवविलें. व ते शेवटच्या निराशेनें शत्रूच्या सैन्यांत घुसले. विश्वासराव पडेपर्यंत मराठ्यांचाच जय होता. तो पडल्यानें भाऊसाहेब खचले व भाऊसाहेब दिसेनासे झाल्यानें मराठी सैन्य फुटलें आणि गिलचे विजयी झाले. विश्वासरावाच्या शवाचा हत्ती सुजाउद्दौल्यानें आपल्याकडे नेला; परंतु अब्दालीनें शव आपल्याकडे मागून घेतलें. अखेर एक लक्ष रू. दंड भरून गणेश वेदांती, काशीराज वगैरे मुत्सद्दयांनीं शव सोडवून आणलें व त्यास आणि भाऊसाहेबांचें शव शोधून काढून त्यासहि अग्नि दिला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      January 14, 2019