रणबीर कपूर हा हिंदी चित्रपटसुष्ट्रीतील नव्या पिढीचा कलाकार म्हणून ओळखला जातो. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ रोजी झाला. रणबीरचे शिक्षण माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठले आणि न्यू यॉर्कच्या 'लि स्ट्रॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट'मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'साँवरीया' चित्रपटात सर्वप्रथम भूमिका केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची तारीफही झाली आणि त्याला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
२००९ मध्ये 'वेक अप सिड' आणि 'अजब प्रेम की गजब कहाणी' या चित्रपटांसाठी त्याने समीक्षकांचा सर्वोत्तम अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. रणबीरने आतापर्यंत पाचवेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले आहे. सावरियाँ, बचना ऐ हसीनो, रॉकेट सिंग, वेक अप सिड, रॉकस्टार, राजनीती, बर्फी असे अनेक हिट चित्रपट त्याने दिले. केवळ अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंग यांचा वारसदार आणि राज कपूर यांचा नातू म्हणून न वावरता रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आघाडी घेत आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलाय.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 28, 2017
अंगद म्हसकर… एक गुणी आणि वास्तववादी कलावंत… रंगमंचावरून प्रवेश करून त्याने स्वत:चा पाया किती पक्का आहे हे कधीच दाखवून दिलंय….
साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. दिग्दर्शक विजू मानेचा मला फोन आला. मराठी इंडस्ट्रीत येऊ पाहत असलेल्या एका फिमेल मॉडेलचं फोटोशूट करण्यासाठीचा तो फोन होता. ठरल्याप्रमाणे आम्ही स्टुडिओत भेटलो आणि शूटला सुरुवातही केली. त्या मॉडेलचं शूट संपल्यावर विजूसोबत एक सडपातळ बांध्याचा, निळ्या-घाऱया डोळ्यांचा, हसऱया चेहऱयाचा आणि चेहऱयावर विलक्षण तेज असलेला मुलगा होता. विजूने ओळख करून दिली. फोटोशूट संपल्यावर विजूचे आणि या नुकत्याच भेटलेल्या मुलाचे काही फोटो मी स्टुडिओत टिपले. ही मैत्री इथेच संपली नाही. पुढे नियमित भेटीगाठी झाल्या. या नव्या मुलाचा आणि इंडस्ट्रीत काही करू पाहत असलेल्या कलाकाराचा प्रवास पुढे रंगमंच ते छोटा पडदा आणि नंतर थेट रुपेरी पडदा असा वेगाने होताना मला पाहायला मिळाला. अंगद म्हसकर या तरुणानं अल्पावधीतच आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. मोजक्या पण अर्थपूर्ण भूमिका चोख निभावणारा कलाकार म्हणून त्याने आपली ख्यातीच निर्माण केली.
अभिनयाचा श्रीगणेशा करण्याआधी अंगदने स्वतःवर विशेष मेहनत घेतली होती. नियमित व्यायामाच्या सरावाने त्याने चांगली शरीरयष्टी कमावली. अभिनयाचे वेगळे धडे गिरवले. या सिनेसृष्टीतल्या प्रवासात अंगदला अनेक गुरू भेटले. अनिवाश नारकर यांना अंगद अगदी जवळचा मित्र मानतो. तर कै. मोहन वाघ यांना तो आपले व्यावसायिक गुरू मानतो. तर त्याचे दुसरे व्यावसायिक गुरू म्हणजे दिग्दर्शक वामन केंद्रे. गॉडफादर नितीन सरदेसाई यांच्यामुळे त्याला अभिनयाची वेगळी शिस्तच लागल्याचं तो मानतो. ‘गारंबीचा बापू’ हे अंगदचं गाजलेलं नाटक. याखेरीज ‘ती फुलराणी’, ‘रणांगण’, ‘ऑल द बेस्ट’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘गिधाडे’, ‘तिन्ही सांज’ या नाटकांतून अंगदने रसिकमन जिंकलं. ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘मड्डम सासू दड्डम सून’, ‘गुंतता हृदय हे’, ‘तू तिथे मी’, ‘हृदयी प्रीत जागते’, या महाराष्ट्रभर गाजलेल्या मालिकांत अंगदची महत्त्वाची भूमिका होती. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘मुंबई पुणे मुंबई-2’ या चित्रपटांत अंगदने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. ‘बायोस्कोप’ या सिनेमातील ‘एक होता काऊ’ या लघुपटात स्पृहा जोशीसोबतची अंगदची भूमिका विशेष गाजली.
अंगदचं फोटोशूट करण्यासाठी त्याकाळी गाजलेल्या एका मालिकेत त्याची असलेली कॉर्पोरेट प्रतिमा आम्ही लक्षात घेतली आणि याच प्रतिमेला धरून काहीतरी वेगळ शूट करायचं असं आमचं ठरलं. कॉर्पोरेट प्रतिमेला धरून अंगदचा पेहराव ठरवण्यात आला. ब्लेझर लूकमध्ये अंगद फारच सुंदर दिसत होता. स्टुडिओत त्याचं या लूकमधलं एक फोटोशूट केलं. यानंतर या शूटला विरोधाभास वाटेल असं एक शूट करायचं आमचं ठरलं. या शूटसाठी आम्ही थेट एका गॅरेजमध्ये गेलो.
माझा मित्र दिगंबर यादव याचं अवाढव्य मोठं गॅरेज या शूटसाठी आम्हाला उपलब्ध झालं. इथे मला हवं असलेलं सारं काही होतं. जुन्या मोटारी, त्यांचे पार्टस् तसंच त्याची अवजारं हे सारं काही होतं. सुरुवातीला ब्लेझर घातलेल्या अंगदचे इथल्या जुन्या मोटारींच्या बॅकग्राऊंडला काही फोटो मी टिपले तर यानंतर एक जुनी सायकल आमच्या नजरेस पडली. ही सायकल हातात घेऊन जात असलेल्या अंगदचे काही फोटो टिपले. अंगदचा ब्लेझरमधल्या पेहरावामुळे हवा असलेला विरोधाभास निर्माण करता आला तसंच त्याच्या हातात एक हेल्मेट देऊन आम्ही त्यात आणखी मजा आणण्याचा प्रयत्न केला.
साधारणपणे पाच ते सहा तास अंगदचं शूट सुरू होतं. या शूटवर अंगद म्हणाला, ‘यातलं लायटिंग आणि ओव्हरऑल एक्स्प्रेशन फारच सुंदर आहेत. माझ्या आयुष्यातलं हे फारच लक्षात राहणारं शूट तर आहेच; परंतु ही कल्पना मुळातच फार सुरेख आहे आणि हे शूट झाल्यानंतर मला असं जाणवलं की हे समाज प्रबोधनासाठीही अत्यंत उपयोगी पडेल. यासाठी की, सध्याच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सायकल हे अत्यंत उत्तम साधन आहे. वाहने चालवताना सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. मग ते कोणतेही वाहन असो आणि माझ्या हातात असलेलं हे हेल्मेट त्यांचं प्रातिनिधित्व करत आहे.’ त्याच्या या विधानाने मी भारावूनच गेलो. अंगद जे करतो त्या प्रत्येक कृतीमागे त्याचा असा एक स्वतंत्र विचार असतो. तो विचार त्याला पटला तर आणि तरच तो पुढचं पाऊल उचलतो. हाच गुण कदाचित त्याचा कलाकृती निवडण्यामागेही असावा आणि म्हणूनच मोजक्या परंतु चोख भूमिका निभावण्यात अंगदचा नेहमीच हातखंडा राहिला आहे.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
March 18, 2019
निखिल बॅनर्जी यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी जन्म १४ ऑक्टोबर १९३४ रोजी झाला. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरु केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची आवड पाहून वडिलांनी त्यांना मुश्ताक अली खान ह्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांच्याकडे निखिलजी काही आठवडेच शिकले. त्यांचे प्रमुख गुरु म्हणजे मैहर चे अलाउद्दीन खान.
अल्ला उद्दीन खान साहेबांनी निखील बॅनर्जी यांची गुणवत्ता पाहून अतिशय कठीण अशा प्रकारे त्यांच्याकडून रियाज करून घेतला. फक्त हाताची तयारी व तांत्रिक क्षमताच नव्हे तर त्याहून पलीकडील सांगीतिक ज्ञान निखील बॅनर्जी यांना त्यांच्याकडून मिळाले. यामुळे निखीलजींनी आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र वादनशैली निर्माण केली. अल्लौद्दिन खान यांच्यानंतर निखील बॅनर्जी यांनी व सरोदवादक उस्ताद अली अकबर खान तसेच त्यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले.
मैहर घराण्यातून शिक्षण घेतल्यानंतर निखिलजींनी उस्ताद अली अकबर खान ह्यांच्याबरोबर जुगलबंदी चे कार्यक्रम केले. तसेच आकाशवाणी वर सुध्धा ते नियमित वादन करत असत. त्यांचे भारतभर कार्यक्रम होऊ लागले. त्यांनी अनेक पहिला परदेश दौरे केले. ध्वनिमुद्रनापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमांवर त्यांचा भर असायचा. निखिलजींनी आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी वादन शैली निर्माण केली. त्यांच्या शैलीत गाण्यातील गेयता आणि सतार वादनातील तंतकारी अंग ह्याचा मिलाफ दिसतो. स्वर आणि ताल ह्या दोन्ही अंगांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. परंतु त्यांनी त्यांच्या वादनात नेहमीच सौंदर्य आणि भावपूर्णतेला महत्त्व दिलेले आढळते.
सुरेख संयमी आलाप, भावपूर्ण राग विस्तार, सुरेख तिहाया, स्पष्ट-वेगवान ताना, छूट तानांवरील प्रभुत्व, लयकारी ह्यामुळे त्यांच्या शैलीत संपूर्णत्व होते. त्यांचा भर पारंपारिक राग व मैहर घराण्याचे खास राग इत्यादींवर असायचा. तसेच ते अहिरी, कौशिकी, श्याम केदार इ. अनेक अपारंपरिक रागही वाजवत असत. मनोमंजरी, हेम-ललत इ. राग त्यांनी तयार केल्याचे मानले जाते. भारत सरकाने निखिल बॅनर्जी यांना १९६८ साली पद्मश्री पुरस्कार व १९८६ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. १९७४ साली निखिल बॅनर्जी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. निखिल बॅनर्जी हे सर्वकालीन सर्वोत्तम सतार वादकांमधील एक म्हणून गणले जातात. मा.निखिल बॅनर्जी यांचे २७ जानेवारी १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. मराठी विकिपीडिया
November 6, 2017
शाळेत असताना त्यांना क्रिकेटची खूप आवड होती तशी नाटकांचीपण आवड होती. ते उत्तम लेग स्पिनर होते , उत्तम फलंदाजही होते. कॉलजमध्ये गेल्यावर त्यांना वाटले कॉलजमध्येपण क्रिकेट खेळता येईल. परंतु त्यावेळी त्यांना नाटकांच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. त्यात त्यांना बक्षीस मिळाले. त्याच्या मते त्यांच्या आयुष्यात हाच एक टर्नीग पॉईंट ठरला की ते क्रिकेटकडून अभिनयाकडे वळले. डिग्री मिळण्याच्या आधीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत त्यांनी सुमारे १५० एकांकिकांमधून काम केले ५० च्या वर नाटके केली.
July 14, 2021
बादशाह खान ‘फ्रंटियर’वर म्हणजे, तत्कालीन ब्रिटिश इंडियाच्या सीमेवर राहून पख्तुनिस्तानात हे अहिंसेचे काम करत होते. म्हणून ते पुढे ‘फ्रंटियर गांधी’ किंवा ‘सरहद्द गांधी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते गांधीजींचे अनुयायी नव्हते, तर एकाच विचाराने प्रेरित झालेले सहकारी होते. गांधीजी तर म्हणत असत की, त्या प्रांतात अहिंसेचे व्रत स्वीकारणे व अमलात आणणे, हे भारतात सत्याग्रही होण्यापेक्षा कठीण आहे! गांधीजींच्या आणि बादशाह खान यांच्यात २१ वर्षांचे अंतर होते. गांधीजी मोठे आणि बादशाह खान त्यांना सहकारी मानण्यापेक्षा गुरुस्थानी मानत. आयुष्याचा प्रत्येक क्षण लोकसेवेसाठी खर्च व्हायला हवा, असे व्रत दोघांनी घेतले होते. दोन्ही ‘गांधींचा’ फाळणीला विरोध होता आणि हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन-पारशी हे सर्व एकाच मानवजातीचे आहेत आणि त्यांच्यात भेदाभेद, गैरसमज व शत्रुत्व असणे हे अनैसर्गिक आहे, असे त्यांचे मत होते.
June 3, 2022
त्यांच्या पुस्तकांमध्ये कोकणातील निसर्ग केंद्रस्थानी होता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३५ रोजी गुहागरमध्ये झाला. पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातून मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या त्या माजी अध्यक्षा आणि गेली सुमारे वीस वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहात होत्या. डॉ. दीक्षित यांनी ‘प्राचीन मराठी वाङ्मयातून दिसणारे स्त्री दर्शन’ या विषयावर पीएचडी प्राप्त केली होती. त्यांना चार राज्य पुरस्कार, भा. रा. तांबे पारितोषिक, ना. धों. ताम्हनकर पारितोषिक, वा. ल. कुळकर्णी पारितोषिक, दि. के. बेडेकर पारितोषिक आणि मसाप पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. बालसाहित्याशिवाय त्यांनी विविध विषयांवर संशोधनपर लेखन केले. ‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
डॉ. दीक्षित यांची विविध विषयांवरील सुमारे ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये ‘अंतरीचे धावे’, ‘बहाद्दर बल्लू’, ‘मुके मित्र’, ‘मैत्री मोलाची’ ‘आजोबांचं घर’, ‘आनंदयोगिनी’, ‘कोकण - विविध दिशा आणि दर्शन’, ‘गंमत गाव’, ‘गाणारं झाड’, ‘घर आमचं कोकणातलं’, ‘चंदनवेल’, ‘नाच रे मोरया’ ‘पंख नवे’, ‘पोपटाचं झाड’ आदी पुस्तके आहेत. ‘फुलांना मिळाले रंग’ हे बालनाट्य त्यांनी लिहिले. ‘स्वामी अपरान्ताचा’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. डॉ. लीला गणेश दीक्षित यांचे १३ ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 4, 2019
सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात त्यांचे खूप मोठे मोलाचे योगदान होते.
November 21, 2021
नाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना ‘ कानून ‘ ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी , तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्ह्णून ‘फिल्मफेअर’ पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतमहोत्सवनिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना पारितोषीक देण्यात आले.
June 23, 2021
बाबा कदम यांचे खरे नाव वीरसेन आनंद कदम होते. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांच्या कथा, कादंबर्यानत मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इ. हमखास असे. त्यांची `अजिंक्यतारा' कथा रेसकोर्सच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या बालपणातच वडिलांचे निधन झाले. प्राथमिक शिक्षण वसतिगृहात राहून झाले. स्वावलंबी जीवनाचे धडे त्यांनी आश्रमातच घेतले. इथेच त्यांची चित्रकलेशी ओळख झाली. पुढे ते राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाले. याच काळात बाळ गजबरांचाही परिचय झाल्याने चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढे त्यांनी एस. टी. महामंडळात काही काळ सेवाही करतानाच शिक्षणाची ओढ त्यांना गप्प बसू देत नव्हती. ते १९५४ मध्ये एल.एल.बी.झाले. फौजदारी वकील डी.एस.खांडेकर यांच्याकडे ते काम करु लागले १९५९ साली ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. १९५९ ते १९८७ पर्यंत सरकारी वकील म्हणून २८ वर्षे काम करुन ते १९८७ साली सेवानिवृत्त झाले. याच त्यांच्या न्यायालयीन कामकाजाचाही त्यांच्या लेखनावर प्रभाव पडलेला दिसतो. १९६५ साली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. `प्रलय' याच कादंबरीवर पुढे `देवा शपथ खरं सांगेन' हा चित्रपटही निघाला. १९६६ ला इन्साफ या कादंबरीवर ही `अधिकार' हा चित्रपट निघाला.
भालु, सन्ना, ज्योतिबाचा नवस, पाच नाजूक बोटे, बिनधास्त, गर्लफ्रेंड, डेझर्ट क्वीन, डार्लिंन, निष्पाप बळी, गजरा, बॉंबे पोलीस, रमी, ज्वालामुखी, दगा, न्याय, रिवॉर्ड अशा सुमारे ८० च्या आसपास कादंबर्यास त्यांनी लिहिल्या. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हात लिहिता राहिला. व्यक्तिचित्रण करणार्याय लेखमाला ही त्यांनी वृत्तपत्रातून चालविल्या. कोणत्याही वेळी, कुठेही असतांना माझ्याजवळ लिखाणाची वही जवळ असते. एकटाकी लिखाण करतो अगदी न्यायालयात एखादा तास मिळाला की, मी लिहित बसायचो, शेवट जास्तीत जास्त प्रभावी कसा होईल याबाबत मनात संघर्ष सुरु होतो. हातात एखादा घेतलेली कादंबरी संपल्याशिवाय खाली ठेवायला मला नको वाटते, असे ते सांगतात. त्यामुळेच त्यांच्या कादंबर्यां च्या तीन-तीन प्रती सार्वजनिक ग्रंथालयात घेऊन देखील वाचकांची मागणी पुरविणे ग्रंथपालांना अशक्य होते. विषयातही विविधता असल्याने कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या. सन्ना ही सिखसेकापू तरुणीवरील, अजिंक्य ही रेसवरील, राजधानी ही संस्थानिकांवरील `शोभा' ही वेश्येवरील, वसंतदादा व शालिनीताईंच्या जीवनावरील `निर्मला' पद्मा चव्हाण यांच्यावरील `अभिनेत्री' बापू बिरु वाटेगांवकरांच्या जीवनावर `दगा' स्वत:च्या बालपणाच्या आठवणीवर `शाळा सुटली पाटी फुटली' अशा कितीतरी वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लिहिले. लिहितांनाही त्यांनी आपल्या मनातला कलाकार जपला. निसर्ग जसा आहे तसाच चित्रित करण्याचा माझा प्रयत्न असतो असे ते म्हणतात. नवरा-बायको ह्या पु.ल.देशपांडे यांच्या कथेवरील चित्रपटातही त्यांनी काम केलं. शिकारीचा छंद ही त्यांनी जोपासला. लाखेपासून पक्षी बनवणे व फौंटनपेनापासून विमाने बनविण्याचा रिकामपणातील उद्योग करत असत. तीन हजार चित्रांचा चित्रकार वाचकांच्या मनातही रंगाची उधळण करीतच राहिला. बाबा कदम यांचे निधन ९ ऑक्टोबर २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विजय बक्षी
May 4, 2017
तलम, तरल, रेशमी आवाजाचा गायक तलत महमूद यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२४ रोजी झाला.
तलत या नावातच एक तलम, तरल, रेशमी अनुभव मिळतो. तलत यांचा दु:खाचा आवाज होता. त्याही पेक्षा आपल्या मनातल्या प्रत्येकच नाजूक, तरल भावनेचा तो आवाज होता. तलत यांच्या आवाजाला मर्यादा होत्या. तरी देखील जगभरातल्या चाहत्यांचा विचार केला तर या सर्व गायकांपेक्षा तलतच्या चाहत्यांची संख्या काकणभर जास्तच भरेल. कारण बाकी सर्व आवाज हे गायकांचे होते पण तलत यांचा आवाज हा सर्वसामान्य माणसाचा होता. त्यामुळे सानुनासीक, किंचीत कापरा आवाज ही त्याची मर्यादा न ठरता तोच त्यांचा सर्वोत्तम गुण ठरला. त्याच्या आवाजाचा टोन हा सर्व गाण्यांसाठी सारखाच राहीला. सुरुवातीच्या काळात तलत महमूद पार्श्वगायक म्हणून नव्हे तर गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात होते. त्यांना त्या काळी प्रतिसैगल म्हणूनच ओळखत होते. तलत अगदी लहानपणापासूनच सैगलचा वेडा होते. लखनौतील सनातनी वृत्तीच्या त्यांच्या वडिलांना हे गाण्याचे वेड बिलकुल पसंत नव्हते. तलत मात्र सैगलची गाणी, गझला पाठ करायचा व हुबेहूब सैगलप्रमाणे गायचे. मुकेश, रफीच्या सुरुवातीच्या जमान्यातील हे तलत स्वत:च्या चाहत्यांचा एक वर्ग निर्माण करू शकले. मुळात तलत हे एक गझलगायक होते.
गझल व गीत ही दोन्ही भावगीतेच व तलत हा भावपूर्ण आवाजात गाणारा गायक. गझल गाताना कवीच्या मूळ शब्दांची संगत तो कधीच सोडत नसे. तेथे तडजोड नव्हती. आपल्या येथील जगजितसिंग, राजेंद्र मेहता ह्या गझल गायकांनी पाकिस्तानी गझलगायक मेहदी हसनची शैली उचलली आहे. याच मेहदी हसनला ‘पाकिस्तानचा तलत महमूद’ म्हणून ओळखायचे. तलतचा आवाज हा मुळातच निर्मळ प्रीतीचा आवाज होता. वासनेचा लवलेशही त्यात दिसत नसे. अभिनेता म्हणूनही त्यांनी एकुण १३ चित्रपटात काम केलं. त्यापैकी नऊ चित्रपटात त्यांनी नायकाची भुमिका केली. "दिल-ए-नादान", " एक गांव की कहानी", "लालारुख" आणि "सोने की चिडीया" ही त्यातली काही नावे. मा.तलत महमूद यांनी दोन मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली. त्यापैकी "पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटातले "यश हे अमृत झाले" हे गाणे लोकप्रिय ठरले. तलत यांच्या गाण्यामध्ये मधुरतेबरोबरच शोकात्मतेचाही सूर होता. तलत यांनी बॉलीवूड मध्ये जवळपास सर्वच संगीतकारांकडे सारखेच काम केले. त्यांचे उर्दु उच्चार हे इतर कुठल्याही गायकापेक्षा जास्त स्वच्छ होते. मजरुह सुलतानपूरी, साहीर यांचे सुरवातीच्या काळातले खास उर्दू काव्य, त्याला खरा न्याय तलतनेच दिला.
"शाम-ए-गम़ की कसम" हे त्याचेच एक उदाहरण आहे. तलत महमूद यांनी एकूण ७४७ गाणी गायली ज्यात ४८१ फिल्मी आणि तब्बल २६६ गैरफिल्मी गीतांचा समावेश आहे. एकूण २९३ चित्रपटांसाठी पार्श्वगायन त्यांनी केले. तरीही एकाही चित्रपटासाठी त्यांना पार्श्वगायनाचा फिल्मफेअर पुरस्कार काही मिळाला नाही. काही संगीतकारांनी त्याच्यातील मधुरतेला झुकते माप दिले, तर काहींनी शोकात्मतेला. शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, अनिल बिश्वास, या संगीतकारांनी तलत यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसविले व सामान्य लोकांना त्याची गाणी गुणगुणायला लावली. भारत सरकारने त्यांना पद्मभुषण देऊन गौरवले होते. तलत महमूद यांचे ९ मे १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
तलत महमूद यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=QL9alA089fs
https://www.youtube.com/watch?v=DJcXtkNEHkM
तलत महमूद व लता मंगेशकर यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=p3H5VbLNhpA
May 9, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti