नागपूर आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असलेले आनंद देशपांडे मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यावर मुंबई केंद्रावर रुजू झाले. सुरुवातीला ‘ऐसी अक्षरे’ आणि ‘शालेय चित्रवाणी’ अशा कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली. मात्र, त्यांनी निर्मिती केलेल्या ‘ज्ञानदीप’ने त्यांना घरांघरात पोहोचवले.
उषा मंगेशकर यांचा जन्म १५ डिसेंबर १९३५ रोजी झाला.
‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न् साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली.
लतादीदी, आशाताई, ह्यांच्या बरोबरीने "उषा मंगेशकर" अशी स्वतंत्र मोहोर उमटविणाऱ्या उषाताईंनी अनेक एकलगीते, द्वंद्वगीत बालगीतं, भक्तीगीतं गायली आहेत आणि ठसकेबाज लावण्याही म्हणल्या आहेत. आरंभीच्या काळात त्यांचा गायनाकडे कल नव्हता. मंगेशकर कुटुंबीय मुंबईत आल्यावर उषाताईंनी मणिपुरी नृत्याचे धडे घेतले. पुढील काळात ‘सुरेल कला केंद्र’च्या कार्यक्रमात गाणे म्हणण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात ‘बैजू बावरा’ चित्रपटातील शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांनी गाजवलेले द्वंद्वगीत त्यांनी गायले. त्यातील शमशाद बेगम यांचा गाण्यातील भाग हा मीनाताई मंगेशकर गायच्या व लतादीदींनी गायलेले शब्द हे उषाताई गायच्या.
उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांचे पट्टशिष्य पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे उषाताईंनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न् साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे.
उषाताई मंगेशकर आणि मीनाताई खर्डीकर या दोघींनी संगीत दिलेला, १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला "पुन्हा एकदा" अल्बम, खूप गाजला होता, झिम्मड घाई, रात बहरली, सोन कंगनी, भिर भिर उडते, मायेच्या माहेरा ही गाणी खूप लोकप्रिय झाली. मीनाताई आणि उषाताई ह्यांचा अजून एक संयुक्त संगीताचा उपक्रम म्हणजे "लोक गणपती" ध्वनिफीत होय. विशेष म्हणजे "बाला मै बैरागन" ही आशाताई भोसले ह्यांच्या स्वरातील गाजलेल्या गाण्यांची ध्वनिफीत, ज्याच संगीत ह्या दोघींनी दिलं होतं. मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली. लतादीदी आणि आशा भोसले यांची असंख्य गाणी रसिकांच्या ओठांवर रुळली आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना "उषाताई" म्हणतात तर आसाममध्ये "उखादिदी" संबोधतात, गुजराथमध्ये "उषाबेन" ह्या सुप्रसिद्ध नावाने त्या लोकप्रिय आहेत.
उषा मंगेशकर यांची मोजकीच गाणी रसिकांना माहीत आहेत. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत. त्यांनी दुरदर्शनसाठी फुलवंती या संगीत नाट्याची निर्मितीसुद्धा केली होती. "पवनाकाठचा धोंडी" "जैत रे जैत ह्या चित्रपटांची निर्मिती उषाताईंनी केलीय.
उषा मंगेशकर यांना मेहंदी ॲवॉर्ड, वेस्ट बंगाल क्रिटिक ॲवॉर्ड, सूरसिंगार ॲवॉर्ड, रोटरी ॲवॉर्ड, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
उषाताई उत्तम चित्रकारसुद्धा आहेत. अगदी लहानपणापासून त्यांना चित्रकलेत रुची होती. कोल्हापूरला चित्रकार बाबूराव पेंटर शेजारी राहायचे. स्वत: माई मंगेशकर यांची चित्रकला उत्तम होती, त्या उत्तम रांगोळ्या काढायच्या. मुंबईत आल्यावर उषाताईंची चित्रकला अभिनेता-निर्माता राज कपूर यांनी पाहिली. त्यांनी उषाताईंची चित्रे कलादिग्दर्शक एम. आर. आचरेकर यांना दाखविली. आचरेकर व उषाताईंची भेट घडविली. आचरेकरांनी त्या चित्रांना दिलखुलास दाद दिली. उषाताईंनी सुर्यकांत मांढरे ह्यांचेकडून पावडर पेंटिंग शिकून घेतले. जलरंग आणि तैलरंग ह्या दोहोंमध्येही उषाताईंनी त्यांची करामत सिद्ध केलीय. पोर्ट्रेट हा तर उषाताईंचा हातचा विषय. त्यांनी चितारलेल्या डोळ्यातील भाव रसिकांना खिळवून ठेवतो. डोळ्यापासून रेखाटनाला प्रारंभ करून अवघं चित्रं भावपूर्ण करण्याचं कसब उषाताईंच्या हातात सामावलं आहे. अनेक पोर्ट्रेट त्यांनी साकारली आहेत. अनेक ध्वनिमुद्रिकांची वेष्टणं उषाताईंच्या कुंचल्यातून साकारलेली आहेत.
२०२० मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना मिळाला होता.
उषा मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
उषा मंगेशकर यांची हिंदी, मराठी गाणी
https://www.youtube.com/watch?v=gaihS2h3p88
https://www.youtube.com/watch?v=pMg_ig8RDnA
https://www.youtube.com/watch?v=o9YgSspKNoA
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ खलनायक प्रेमनाथ मल्होत्रा यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२६ रोजी जबलपुर येथे झाला. प्रेमनाथ यांचे वडील रायसाहेब कर्तारनाथ यांची अशी ईच्छा होती की, प्रेमनाथने लष्करात सामील व्हावं. ते स्वत: ऐकेकाळी रेवा स्टेटचे आय.जी.पी. होते. आपल्या मुलानेही प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन जगावं अशी त्याची भारी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रेमनाथला लष्करात पाठवलं सुध्दा, पण प्रेमनाथची स्वत:ची आवड वेगळीच होती. त्याला मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत उडी घ्यायची होती. एवढयासाठी त्याने सैन्यातून पळ काढला आणि मुंबई गाठली. इथे आल्यावर इंदौरचे एक नातेवाईक पृथ्वीराज कपूर यांच्या नाटक कंपनीतच होते. त्यांचा त्यांनी आश्रय घेतला. पण पृथ्वीराज कपूराना सगळी हकीकत कळल्यानंतर त्यांनी आपला मुलगा राज कपूर यांना सोबत घेऊन प्रेमनाथ यांना घरी जाण्यास सांगितलं. नाराज मनानं प्रेमनाथ घरी परतला. पण इथे एक भलतंच नाटक घडलं.
प्रेमनाथबरोबर आलेल्या राज कपूरने प्रेमनाथची बहीण कृष्णा हिला बघितलं आणि पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. नंतर हे नातं अगदी घटट् झालं. प्रेमनाथने याच नात्याला यशाची पायरी बनविण्याचं ठरवलं. पृथ्वी थिएटर्सच्या 'दीवार' नाटकात प्रेमनाथने ब्रिटीश माणसाची रंगविलेली भूमिका सगळयांना आवडली. ही भूमिका त्याला कपूर घराण्याशी जवळचं नातं जोडलं गेल्यामुळेच मिळाली होती. नंतर राज कपूरच्या 'आग' चित्रपटात 'चित्रकार राजाबाब' ची महत्त्वपुर्ण भूमिका प्रेमनाथला मिळाली. या चित्रपटातली प्रेमनाथची भूमिका खूप गाजली. प्रेमनाथला नायक म्हणून पहिला चित्रपट 'अजित' या नावाने मिळाला होता. यात त्याची नायिका होती मोनिका देसाई. १९५१ साली प्रेमनाथची सात चित्रपट पडद्यावर आले. नंतर त्यांनी अनेक टॉपच्या हिरोईन्सबरोबर काम केले.
हिंदी चित्रपटात प्रेमनाथला एक अशा अभिनेत्याच्या नात्याने ओळखले, जाते ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून राज्य करणारा म्हणून नाही तर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात आपली छाप उमटविली. शोर , अमीर गरीब, रोटी कपडा और मकान या सारख्या चित्रपटात त्यांना अभिनयासाठी फिल्म फेयर अवॉर्डने नावजले गेले. ऐंशीच्या दशकात प्रकृती स्वास्थ्य खालावल्याने प्रेमनाथ यांनी चित्रपटात काम करणे काही अंशी कमी केले. या काळात त्यांच्या कर्ज, क्रोधी, देशप्रेमी यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले. १९८५ मध्ये आलेला हम दोनो हा प्रेमनाथ यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. निर्माता निर्देशक सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांची जोडी. बरीच नावाजली गेली. सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांनी कालीचरण, विश्वनाथ, गौतम गोविंदा, कर्ज, आणि क्रोधी यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. प्रेमनाथ यांचे ३ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी झाला. अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७ मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १९४१ मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते.
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.
गीतकार म्हणून मा. अनंत काणेकर यांनी लिहिलेली गाणी
आता कशाला उद्याची बात
आला खुशीत् समिंदर
एकलेपणाची आग लागली
तू माझी अन् तुझा मीच
दर्यावर डोले माझं
अनंत काणेकर यांचे २२ जानेवारी १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कृष्णा कल्ले यांना १९५८ साली झालेल्या सैगल मेमोरिअलतर्फे होणाऱ्या गायनस्पर्धेत पहिले पारितोषिक आणि गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया ‘ हा मानाचा ‘ किताब मिळाला. कानपूरमध्ये शिक्षण पूर्ण करून त्या लग्नानंतर १९८५ साली मुंबईला आल्या.
अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला.
त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाट्यक्षेत्रातील एक नाव म्हणजे वसंत कानेटकर. वसंत कानेटकर यांचे शिक्षण पुणे व सांगली येथे झाले. त्यांचा जन्म २० मार्च १९२२ रोजी झाला.इंग्रजी विषय घेऊन एम. ए. पदवी मिळविल्यानंतर नाशिक येथे हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात सुमारे २५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. नाटककार म्हणून ओळख असलेल्या कानेटकरांनी सुरुवातीला कथा, कादंबरीपासूनच आपल्या लेखनाला सुरुवात केली. मा.वि. स. खांडेकर यांचा सहवास मिळाल्याने साहित्याचा दर्जेदारपणा कळत नकळत रूजला गेला. नाशिकला आल्यावर कुसुमाग्रजांच्या सहवासातूनही त्यांच्यातील साहित्यिक आणखी फुलत गेला. ३० वर्षांच्या काळात त्यांनी सुमारे चाळीस नाटकं आणि काही एकांकिका रंगभूमीच्या ओटीत घातल्या. प्रेक्षकांची आवडनिवड जाणणारा एक प्रयोगशील नाटककार म्हणून ते लोकप्रिय होते.
वेड्याचं घर उन्हात हे त्यांचे पहिले नाटक म्हणजे मनोविश्लेषणाचा एक नवीन प्रयोग होता. त्यानंतर देवांचं मनोराज्य, प्रेमा तुझा रंग कसा, रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड जाहली, मत्स्यगंधा, हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया, कस्तुरीमृग, वादळ माणसाळतयं, अश्रूंची झाली फुले, मला काही सांगायचयं इ. अनेक नाटके त्यांनी लिहिली. १९८८ मध्ये ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला होता. वसंत कानेटकर यांचे ३१ जानेवारी २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
आज ५ डिसेंबर
आज अभिनेत्री सारिका यांचा वाढदिवस.
जन्म. ५ डिसेंबर १९६०
माहेरचे नाव सारिका ठाकूर. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून बेबी सारिका या नावाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. अभिनेत्री सारिका ने गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन, क्रांति , सत्ते पे सत्ता, रजिया सुलतान , राजतिलक, परजानिया अश्या अनेक चित्रपटात काम केले. सचिन-सारिका या जोडीच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटाला रवींद्र जैन यांच्या गीत-संगीताने चार चाँद लावले. यातील गीत गाता चल ओ साथी, शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम आदी गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. सारिका यांना दोन वेळा नॅशनल अवार्ड पण मिळाले आहेत. लग्नाशिवाय एकत्र राहून कमल हसन व सारिका यांनी १९८० च्या दशकात सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यांना श्रुती व अक्षरा या दोन मुली असून अक्षराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र २००४ साली ते दोघेही वेगळे झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे.
Copyright © 2025 | Marathisrushti