(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ अभिनेत्री रत्नमाला

    दादा कोंडकेंच्या चित्रपटांनी आईची ही प्रतिमा बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्यारूपाने चित्रपटसृष्टीला दिली. आईच्या रूपातील रत्नमाला यांनी या आईच्या बदललेल्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला, म्हणूनच त्यांनी साकारलेली ही ‘आये’ चित्रपटसृष्टीत अजरामर झाली. किंबहुना रत्नमाला यांचे दादा कोंडकेंची ‘आये’ हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झाले आणि आजतागायत ते तसेच आहे.

      June 22, 2022


  • माजी राज्यसभा खासदार भारतकुमार राऊत

    भारतकुमार राऊत हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दी इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, दी मेट्रोपोलिस ऑन सॅटर्डे, दी पायोनियर अशा मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.

      April 6, 2022


  • ज्येष्ठ संगीतकार रोशन

    हिंदी चित्रपट सृष्टीचा सन १९५० ते १९७०  हा चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्ण काळ मानला जातो. या काळात अनेक प्रथितयश संगीतकारांनी अनमोल अशा गाण्यांची रसिकांवर अगदी बरसात केली. नुसते गाण्यांवर चित्रपट चालण्याचे ते दिवस होते. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांनी याच काळात आपल्या सुमधुर गीतांची देणगी चित्रपट सृष्टीला  दिली.

      April 17, 2020


  • ब्रिटिश अभिनेता पीटर सेलर्स

    पीटर सेलर्स यांनी आपल्या करीयरची सुरुवात स्टेज कलाकार म्हणून किंग्स थिएटर, साउथसी पासून केली.

      July 24, 2021


  • संगीताचे जादूगार ओ. पी. नय्यर

    ओ. पी. नय्यर यांचे पूर्ण नाव ओंकार प्रसाद नय्यर. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२६ रोजी पश्चिम पंजाबमधील लाहोर येथे झाला.

    १९४९ मधे " कनीज" या चित्रा पासून संगीतकार म्हणून कारकीर्द ओ.पी.नी सुरवात केली पण त्यांचे पहिले गीत गाजले ते चंद्रू आत्मा यांचे प्रीतम आन मिलो. ओपीना या गीतसाठी २५ रू इतके प्रचंड मानधन मिळाले. दलसुख पांचोली यांच्या "आसमान" या चित्रा द्वारा ओ.पीं.चे आगमन हिंदी फ़िल्म संगीताच्या मंचावर झाले खरे पण या चित्रपटासकट " बाज" व "छम छमा छम" हे त्यांचे चित्रपट तिकिट बारीवर आडवे झाले. मग निराश हौउन पुन्हा पंजाबला परत जावे व शाळेत मिळाली तर एकाद्या संगीत मास्तराची नोकरी करावी या निर्णयाप्रत ओपी आले. उरलेली पंधराशे रुपये गुरूद्त्त कडे मागण्यासाठी ते गेले तेंव्हा "आपल्या मोठ्या मुलाला दूध पाजायला ही पैसे नाहीत" असे त्यानी गुरूदताला सुनावले. तर त्याने काय करावे त्याने आपला आगामी चित्रपट " आरपार" ओपीना बहाल केला. ओपींकडे काही " सांगितिक मागण्या" गुरूनी केल्या. नय्यर " आरपार" मधून एक नवाच बाज फ़िल्म संगीतात घेउन आले.

    ओपी नय्यर हे चित्रसंगीतातील आद्य " फ़्युजनिस्ट " म्हणून उदयास आले.फ़्युजन करतानाही तालांची बेमालूम सरमिसळ करायची व पुन्हा साडेतीन मिनिटाचे गाणे अ पासून ज्ञ पर्यंत एकसंध करायचे ही त्यांची खास स्पेशालिटी ठरून गेली. ओपीं नी १९५२ ते २००७ य काळात एकूण सुमारे ८० चे वर चित्रपटाना संगीत दिले. इतर भाषेतील चित्राना संगीत दिले. तेलगू भाषेतील " निराजनम " या चित्राच्या संगीताने रेकॉर्ड विक्रीचा उच्चांक केला. मींड, तान, आंदोलन हे हरकतीचे प्रकार सढळपणे वापरणारे संगीतकार म्हणजे ओपी नय्यरच. मुख्य म्हणजे असे गीत नृत्यगीत असायला पाहिजे असे नाही. कवाली, युगलगीत अशा प्रकारच्या गीतातही हरकतींची भरपूर वापर आढळतो.

    खरी ओपी नय्यर खासीयत दिसते ती काश्मिरकी कली, मेरे सनम, एक मुसाफ़िर एक हसीना, फ़ि रवही दिल लाया हु, हमसाया, कही दिन कही रात ,द किलर्स ,हम सब चोर है, सी आयडी ९०९, सावनकी घटा व प्राण जाय पर वचन न जाय ई या चित्रपटातून.

    ओपी ना " रिदम किंग " या नावाने ओळखले जाते तसे मायस्त्रो ऑफ मेलडी असे ही म्हटले जायचे. ओ.पी हे सार् पणे स्वता" ला वेगळाच व श्रेष्ठ संगीतकार मानत. संगीतकार घडवून होत नाही तो निसर्गाने जन्मालाच घालावा लागतो असे ते वारंवार म्हणत.

    सिनेजगतात कॅडिलॉक ही गाडी फ़क्त ओ. पी. नय्यर व व्ही शांताराम यांचेकडेच होती.

    ओ. पी. नय्यर यांचे २८ जानेवारी २००७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 18, 2018


  • ज्येष्ठ कलाकार बलराज साहनी

    ज्येष्ठ कलाकार बलराज सहानी हे एक श्रेष्ठ चित्रपट अभिनेते म्हणून लोकांना माहित आहेत. पण ते एक थोर तत्त्वचिंतक, समाजसेवक होते ही गोष्ट पहात थोड्यांना ज्ञात आहे. बलराज साहनी डाव्या विचारसरणीचे व्यक्ती होते. ते इंडियन पीपुल्स थिएटरशी जोडलेले होते.

    बलराज साहनी यांचा जन्म १ मे १९१३ रोजी झाला. बलराज साहनी यांनी लाहोरच्या सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर सोढी आणि प्रोफेसर बुखारी यांच्या मार्गदर्शनात शेक्सपिअर लिखित नाटकात अभिनय केला. शांती निकेतनमध्ये बर्नाड शॉ यांच्या ‘आर्म्स अँड मॅन’ मध्ये काम केले.

    बलराज साहनी हे एम. ए. झाल्यानंतर ते काही काळ ‘शांतिनिकेतन’मध्ये प्राध्यापक होते. नंतर मात्र, लंडनमध्ये बीबीसीमध्ये नोकरी करून भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय नाटकातच काम केले.

    बलराज साहनी यांनी चित्रपट उद्योगात वयाच्या ३४ व्या वर्षी प्रवेश केला. बलराज साहनी हे चित्रपटसृष्टीतील मातब्बर कलावंत होते. हिंदी चित्रपटांत त्यांनी तब्बल २५ वर्षे काम केले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा ठसा उमटवला. रंगभूमी आणि एकूणच सांस्कृतिक विकासात त्यांनी मोलाची भर घातली.

    देव आनंद अभिनीत ‘बाजी’ चित्रपटाची पटकथा बलराज साहनी यांनी लिहिली. काही वर्षांनंतर चेतन आनंदच्या ‘हकीकत’ मध्ये त्यांनी अभिनयाबरोबरच लेखन आणि निर्मितीतसुद्धा सहकार्य केले. सारांश एवढाच की, हे सगळे शिक्षित लोक होते आणि कोणताही वाद ताणत नव्हते. मा.बलराज साहनी यांचा चेहरा पारंपरिक नायकाचा नव्हता. ते मध्य अवस्थेत अभिनयाशी जोडले गेले होते. जिया सरहदी यांच्या ‘हम लोग’ च्या शूटिंग वेळी त्यांना रोज तुरुंगातून आणावे लागत होते. कारण एका आंदोलनामुळे त्यांना राजकीय बंदी बनवण्यात आले होते. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘धरती के लाल’ मध्ये त्यांनी अभिनय केला होता. मात्र, १९४६ मध्ये जागोजागी दंगे झाल्यामुळे चित्रपटाचे सामान्य प्रदर्शन होऊ शकले नाही. बिमल रॉय यांनी ‘दो बीघा जमीन’ मध्ये त्यांना मुख्य भूमिकेत घेतले. चित्रपटाच्या यशासोबत बलराज यांनासुद्धा खूप प्रशंसा मिळाली. अमिय चक्रवर्ती यांच्या ‘सीमा’ मध्ये त्यांनी गांधीवादी संस्थेच्या प्रमुखाची भूमिका केली होती. या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती. हा चित्रपट शंकर-जयकिशन-शैलेंद्र यांच्या यांच्या गीत व संगीत्नाने आठवणीत राहीला. ‘काबुलीवाला’ मध्येही बलराज यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या कहाणीवर आधारित होता. शांती निकेतनशी जोडलेले असल्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांनी कधी काळी हा चित्रपट पंजाबीमध्ये लिहिण्याची प्रेरणा बलराज यांना दिली होती. मा.बलराज साहनी यांचे अजूनही ‘वक्त’ मधील गाणे ‘ओ मेरी जोहरा जबी, तुझे मालूम नहीं, तू अब तक हैं हंसी और मैं जवां.’ लक्षात आहे.. ते पठाण कुटुंबाच्या उत्सवात गाणे म्हणत आहेत. मा.बलराज साहनी यांचे ‘गरम कोट’, ‘सट्टा बाजार’, ‘सीमा’, ‘लाजवंती’, आणि ‘गर्म हवा’ अविस्मरणीय चित्रपट होते. एमएस सथ्यु यांचा ‘गर्म हवा’ फाळणीवर बनलेला महान चित्रपट होता.

    बलराज साहनी अतिशय संवेदनशील व्यक्ती होते. त्यांची कलात्मक आवड त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक कार्यात दिसून आली. ते स्टार असूनही खूपच सामान्य जीवन जगत होते. राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ मध्ये त्यांनी सावत्र भावाची भूमिका केली होती. तो त्या कुटुंबाचा प्रमुख असतो. राज खोसला एक स्वछंदी व्यक्ती होते. त्यांना लवकर आणि कमी खर्चात काम करणे आवडत नव्हते. त्यांच्यासारखे विविध चित्रपट इतर दिग्दर्शकांनी केले नाहीत.

    पंचवीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत बलराज साहनी यांनी १२५ चित्रपटांत अभिनय केला. बिमल रॉय यांचा "दो बिघा जमीन‘, अमिया चक्रवर्ती यांचा "सीमा‘, राजेंद्रसिंह बेदी यांच्या "गरम कोट‘ या कथेवरील चित्रपट, हेमंत गुप्ता याचा "काबुलीवाला‘, यश चोप्रा यांचा "वक्त‘ यांतील त्यांचा अभिनय अविस्मरणीय आहे. एम. एस. सथ्यू यांचा "गरम हवा‘ या त्यांनी अभिनय केलेल्या शेवटच्या चित्रपटात फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार देणाऱ्या मुस्लिमाचे त्यांचे पात्र अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील. जीवनाचे शेवटचे क्षण त्यांनी अमृतसरच्या पंजाबी कला केंद्रात घालवले. या संस्थेसाठी त्यांनी एक नाटक ‘क्या यह सच है बापू’ लिहिले. मात्र हे ‘अर्श-फर्श’ च्या नावाने सादर करण्यात आले.

    बलराज साहनी यांचे १३ एप्रिल १९७३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      April 13, 2017


  • हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक

    आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. ‘बालगंधर्व’सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे.

      December 20, 2021


  • मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडिता सुहासिनी मुळगावकर

    सुहासिनी मुळगावकर यांनी आपले संगीताचे शिक्षण किशोरी आमोणकर यांच्या कडून घेतले. सुहासिनी मुळगावकर यांनी सौभद्र व मानापमान या जुन्या लोकप्रिय संगीत नाटकांतील भिन्न पात्रांचे संवाद एकटीनेच म्हणून दाखविण्याची नवीनच प्रथा सुरू केली व याचे त्यांनी ५०० हून अधिक प्रयोग केले होते.

      June 13, 2022


  • ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार

    कोल्हापूर येथून शिक्षण घेतल्यानंतर कुलदीप पवार मुंबईत दाखल झाले. तिथे प्रभाकर पणशीकर यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू‘ ह्या नाटकात संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यांची ही भूमिका खूप गाजली देखील.

      June 10, 2022


  • थोरले बाजीराव पेशवे

    एकदाही पराभूत न झालेले जगाच्या इतिहासातील हे एकमेव सेनापती आहेत.

      August 18, 2021