हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९२९ रोजी झाला. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
‘द मॅन हु वुड बी द किंग’, ‘पॅसेज टु इंडिया’ सारख्या चित्रपटांमधून त्यांचे काम जगाने पाहिले. ‘शतरंज के खिलाडी’, ‘मासूम’, ‘गांधी’, ‘दिल’, ‘जब प्यार किसीसे होता है’ सारख्या अनेक बॉलिवूडपटांतून कधी वडिलांच्या, कधी काकांच्या भूमिकेतून समोर आलेले चरित्र अभिनेता सईद जाफरी अशी त्यांची लोभसवाणी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. अभिनेत्री आणि लेखिका मेहरुनिसा (मधुरी जाफरी) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. मात्र १९६५ मध्ये या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मधुरी यांच्यापासून मीरा, झिया आणि सकिना जाफरी अशा तीन मुली असून त्याही अभिनयाच्या क्षेत्रात आहेत.
सईद जाफरी यांनी अनेक सिनेमातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. यात शतरंज के खिलाडी, गांधी, राम तेरी गंगा मैली, दिल, अजुबा, हिना या सिनेमांचा समावेश असून त्यातील त्यांच्या विशेष भूमिका गाजल्या. राज कपूर यांच्या सिनेमांमध्ये सईद जाफरी यांची भूमिकाही नजरेत भरणारी होती. सईद जाफरी यांचे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 21, 2017
हॉलिवूड मधील पहिले भारतीय अभिनेता साबू दस्तगीर यांचा जन्म २७ जानेवारी १९२४ रोजी म्हैसूर जवळ कारापूर येथे झाला.
साबू दस्तगीर यांचा हे हॉलिवूड मधील पहिले भारतीय अभिनेता होते. साबू दस्तगीर हे मैसूरच्या महाराजाच्या महावताचा मुलगा होता. हत्तीशाळा स्वच्छ करीत असताना पाश्चिमात्य चित्रपट निर्देशक रॉबर्ट जे. फ्लॅहर्टीच्या नजरेस पडला व त्याने साबूला आपल्या एलिफंट बॉय या चित्रपटात भूमिका दिली.साबू दस्तगीर यांनी वयाच्या १३व्या वर्षी प्रथम सिनेमात काम केले होते. यानंतर अंदाजे २०-२५ चित्रपटांत विविध भूमिका केल्या. द थीफ ऑफ बगदाद या चित्रपटातील अबुची भूमिका सगळ्यात स्मरणीय ठरली. याशिवाय जंगलबुक, मॅन ईटर्स ऑफ कुमाउं वगैरे अनेक चित्रपटांतील भूमिका समीक्षकांची दाद घेउन गेल्या.
१९४४ मध्ये साबू दस्तगीर हे अमेरिकेचा नागरिक झाले व अमेरिकेच्या हवाई दलात टेल गनर (विमानाच्या शेपटात बसून मोठी बंदूक चालवणारा) म्हणून रुजू झाले. अनेक वेळा लढाईत भाग घेउन त्याने डिस्टींग्विश्ड फ्लाईंग क्रॉस हे पदक मिळवले.
साबूच्या नावाबद्दल मतभेद आहेत. पत्रकार फिलिप लीबफ्रीडच्या मते याचे खरे नाव सेलार शेख साबू असे होते. साबू यांनी १९४८ मध्ये मेरिलिन कूपर नावाच्या अभिनेत्रीशी लग्न केले. त्यांना दोन अपत्ये झाली. साबू यांच्या मित्रमंडळीत जेम्स स्टुअर्ट, रोनाल्ड रेगन वगैरे हॉलिवुडातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे होती. साबू दस्तगीर यांचे २ डिसेंबर १९६३ रोजी निधन झाले.
https://www.youtube.com/watch?v=VqeR_A8eMJ8
https://www.youtube.com/watch?v=fM14Gfpfdrc
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 16, 2019
ग. दि. माडगूळकर यांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य आनंद माडगूळकर पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार हून अधिक प्रयोग देशात आणि परदेशांत सादर केले आहेत.
August 1, 2021
अभिनेता ओमी वैद्य यांचा जन्म १० जानेवारी १९८२ रोजी युका व्हॅली, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे झाला.
ओमी वैद्य यांनी लॉस एंजेलिस काउंटी हायस्कूल फॉर आर्ट्समधून पदवी प्राप्त केली आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांताक्रूझ येथे शिक्षण केले. ओम वैद्य यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनेता, दिग्दर्शक, संपादक, लेखक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे.
3 इडियट्स या चित्रपटासाठी त्यांना स्टार डेब्यू मेल ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. त्याला 3 इडियट्ससाठी 2010 चा लायन्स गोल्ड अवॉर्डही मिळाला होता. २०१० मध्ये त्यांना 3 इडियट्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. 3 इडियट्स या चित्रपटा नंतर ओमी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. चतुर रामलिंगम हे पात्र रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरले होते.
अरेस्टेड डेव्हलपमेंट, द ऑफिस, दिल तो बच्चा है जी, देसी बॉईज यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ओमीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
सिनेमाच नाही तर ओमी वैद्य जाहिरातींमधूनही झळकत असतो. जाहीरातक्षेत्रातही ओमी फार लोकप्रियत बनला आहे.
ओमी वैद्य यांनी ऑगस्ट २००९ मध्ये मीनल पटेल सोबत लग्न केले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
January 10, 2022
त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. मुंबईच्या १९ व्या शतकातील इतिहासाचे प्रणेते म्हणून मा. नाना शंकरशेट यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरशेट यांचे खरे नाव नाना मुरकुटे. मुरकुटे कुटुंब हे मुळातच सधन. नानांचे एक पूर्वज बाबूलशेट हे कोकणातून १८ व्या शतकात मुंबईत आले.
म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना खूप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली. वडील गेल्यावर तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली. मा.नाना शंकरशेट हे त्या शतकातील मुंबईच्या प्रमुख व्यापाऱ्यांमध्ये गणले जात. नानांनी आपला व्यापार इतका पद्धतशीरपणे वाढवला, की त्यांनी अल्पावधीत प्रचंड पैसा मिळवला. तोही सचोटीने आणि आपली विश्वासार्हता कायम राखून. त्यांचे नाव आणि त्यांची विश्वासार्हता एवढी पक्की होती, की अरब, अफगाण आणि अन्य परदेशी व्यापारी बँकांकडे आपली संपत्ती ठेवण्याऐवजी नानांकडे ठेवत असत, असे म्हटले जाई. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबईतील असे एकही क्षेत्र नव्हते ज्यावर मा.नानांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटला नाही. समाजकारण, समाज सुधारणा, प्रशासन, विकास, धार्मिक रुढी अशा सर्व क्षेत्रांत नानांनी भरीव कामगिरी बजावली. नानां त्यांवर सर जमशेटजी जिजिभाईंची छाप पडली होती. हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले.
एल्फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले.बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. १८५५ मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रँटच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची १८४५ मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली.
मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते. नानांचे सामाजिक कार्यही मोठे होते. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रँड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. मुंबईच्या प्रशासनात कार्यरत असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गँस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे. जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली. बाँबे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल. विशेष म्हणजे बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वेगाडी १८५३ मध्ये धावली, तिचे कार्यालय नानांच्या राहत्या घरातच होते. मा.नाना आणि गिरगाव यांचे नाते नानांच्या अंतापर्यंत अतूट राहिले. गिरगावचा नानांनी अक्षरश: कायापालट केला. गिरगावातला नानांचा वाडा आज अस्तित्वात नाही, त्याजागी आता आधुनिक वास्तू उभी आहे. पण या जुन्या वाडय़ाचा इतिहास, त्या वाडय़ाला भेट दिलेली महनीय मंडळी, नानांचे देवघर, दिवाणखाना आणि दारावरची घंटा आणि तिचा नाद या सर्वाना कालपरवापर्यंत दंतकथांचे स्वरूप होते. मा. नानांच्या निधनानंतर मा.नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली. मा.नाना शंकरशेट यांचे ३१ जुलै १८६५ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
February 10, 2017
नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात विनोदी अभिनेते दामूअण्णा यांनी विशिष्ट प्रकारे हसण्याची लकब, तिरळा डोळा आणि प्रभावी शब्द फेक याद्वारे आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ८ मार्च १८९३ रोजी निपाणी येथे झाला.
दामूअण्णा मालवणकर यांचे पूर्ण नाव दामूअण्णा बापूशेठ मालवणकर. त्यांच्या वडिलांचा सोनारकामाचा पिढीजात व्यवसाय होता. त्यामुळे दामूअण्णांनी त्यातच लक्ष घालावे अशी त्यांचे वडील बापूशेठ यांची अपेक्षा होती. पण त्यांना लहानपणापासूनच नाटकांचे वेड होते. घरातून या नाटकवेडाला विरोधच होता. त्यामुळे दामूअण्णा चोरून नाटके पाहत असत. तारुण्यात नाटकांच्या ध्यासामुळे त्यांनी घरातून पळून जाऊन महाराष्ट्र कंपनीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांनी त्यांना परत आणून सोनारकामात लक्ष घालण्यास भाग पाडले. मात्र १९१३ साली ते पुन्हा एकदा घरातून बाहेर पडले आणि सांगलीला चित्ताकर्षक मंडळीत गेले. तिथे त्यांना बिनपगारी नोकरी मिळाली.
चित्ताकर्षक कंपनीत दामूअण्णांना नाटकांच्या जाहिरातींचे फलक ढकलगाडीवर घालून रस्त्यावरून ङ्गिरवून आणण्याचे काम दिले गेले. पडतील ती कामे करण्यात त्यांचा वेळ जात असे. काही काळानंतर चित्ताकर्षक मंडळीच्या ‘त्राटिका’ या नाटकात दामूअण्णांना शिंप्याची भूमिका दिली गेली. ती भूमिका अगदी छोटी होती, मात्र त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. हे साल होते १९१५. पुढे १९१६ साली चित्ताकर्षक कंपनी बंद पडली आणि दामूअण्णा लोकमान्य नाटक मंडळीत गेले. तिथे त्यांनी मामा वरेरकर लिखित ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात डॉ. पशूची भूमिका अगदी तडङ्गेने केली. त्यामुळे त्यांचा नावलौकिक होण्यास सुरुवात झाली. १९१८ साली दामूअण्णा मालवणकर केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श मंडळीत गेले. तेथे त्यांना काम मिळाले नाही, तेव्हा ते दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक मंडळीत गेले. त्या कंपनीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘मृच्छकटिक’, ‘भावबंधन’, ‘विद्याहरण’, ‘उग्रमंगल’, ‘सन्यस्त खड़्ग’, ‘वेड्यांचा बाजार’ वगैरे नाटकात भूमिका करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. पुढे १९३३-३४ साली बलवंत नाटक कंपनी बंद पडली आणि त्याचेच चित्रसंस्थेत रूपांतर झाले. त्यामुळे दामूअण्णा दीनानाथ मंगेशकरांकडेच राहिले.
१९३४ साली आलेल्या ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका देण्यात आली. चित्रपटातल्या त्यांच्या कामांची हीच सुरुवात होती. पुढे ३-४ वर्षात ‘लक्ष्मीचे खेळ’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘ठकीचे लग्न’ वगैरे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
त्यानंतर १९३८ साली ते कोल्हापूरला आले आणि त्यांनी मा. विनायक यांच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात आश्रम चालकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे त्यांना चांगले नाव मिळाले. मा. विनायक यांच्या चित्रपटातच त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळाला. विनोदी चित्रपटांचे नवे दालनच उभे करण्यात मा. विनायक यांना दामूअण्णा मालवणकरांनी मदत केली. १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रँडीची बाटली’ या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली. ‘बगाराम’च्या भूमिकेत त्यांना आपल्या विनोदी अभिनयाला पूर्ण वाव देता आला आणि ही भूमिका लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘लग्न पहावं करून’, ‘सावकारी पाहुणे’, ‘गजाभाऊ’ या चित्रपटांतूनही त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या आणि आपल्या विनोदी अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.
त्यानंतर विनायक यांच्याकडे ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘अर्धांगी’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटांत, तसेच ‘सुभद्रा’, ‘बडी मॉं’ या हिंदी चित्रपटात विविध भूमिका केल्या. मा.विनायक यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांच्यासाठी खास विनोदी भूमिका असायचीच. १९४७ साली मा. विनायक यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ‘चूल आणि मूल’ या चित्रपटातून भूमिका केली. पुढे ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्रह्मघोटाळा’ (१९४९), ‘गळ्याची शपथ’ (१९४९), ‘बायको पाहिजे’ (१९५०), ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटांत त्यांनी नायक म्हणून भूमिका केल्या आणि खर्याी अर्थाने विनोदी अभिनेता म्हणून स्वत:चे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. त्याशिवायही अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. सुरुवातीच्या काळात बिनपगारी, त्यानंतर दोन आणे रोजगारावर काम करत दामूअण्णा दोन हजार रुपये घेऊन भूमिका करीत असत. चित्रपटातील लोकप्रियता शिगेला पोहोचली, तरीसुद्धा दामूअण्णांना नाटकाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. राजाराम नाटक मंडळीत गंगाधरपंत लोंढे दामूअण्णांना ‘भावबंधन’मधल्या ‘गोकुळ’च्या भूमिकेसाठी खास बोलावून घेत.
त्या वेळी ते ३५० रुपये नाईटवर काम करत. १९४४ साली लोंढे यांचे निधन झाल्यावर दामूअण्णांनी ‘प्रभाकर नाटक मंडळी’ ही स्वत:ची संस्था सुरू केली आणि वीर माधव जोशी यांचे ‘उधार-उसनवार’ हे नाटक रंगमंचावर आणले. चित्रपटसृष्टीतले काम सांभाळून त्यांनी आठ वर्षे सार्या महाराष्ट्रभर नाटकांचे प्रयोग केले. १९५२ साली ही नाटक कंपनी बंद पडल्यावर दामूअण्णांनी चित्रपट याच आपल्या कार्यक्षेत्रावर पुन्हा भर दिला. राम गणेश गडकरी यांचा ‘तिंबूनाना’, चिं.वि. जोशींचा ‘चिमणराव’ आणि ना.धों. ताम्हणकर यांचा ‘दाजी धडपडे’ हे तिन्ही मानसपुत्र साकार करत दामूअण्णांनी त्या व्यक्तिरेखांना अजरामर केले. त्यांनी जवळपास ७५ हिंदी-मराठी चित्रपटांतून व अंदाजे ५० नाटकांतून विनोदी भूमिका केल्या.
भारती मंगेशकर म्हणजेच ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी ह्या दामुअण्णा मालवणकर यांची कन्या. पु.ल नी एकदा भारती मंगेशकर यांना बघितले तेव्हा म्हणाले होते " ही मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!" दामूअण्णा मालवणकर यांचे निधन १४ मे १९७५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/शशिकांत किणीकर
May 14, 2019
भारताचे अर्थमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी नवी दिल्ली येथे झाला. अरुण जेटली हे भारतीय जनता पक्षाचा एक महत्त्वाचा नेता म्हणून ओळखले जातात. आधी पेशाने वकील, पण त्यानंतर पूर्ण वेळ राजकारणात उरतले. अरुण जेटली यांचे वडिल महाराज किशन जेटली हे प्रख्यात वकील होते. दिल्लीतील सेंट झेव्हियर्स शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण घेतले आणि पदवीचे शिक्षण त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून घेतले. त्यानंतर १९७७ ला त्यांनी विधीची पदवी घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते.
१९७४ मध्ये ते दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले. अरुण जेटली यांच्या राजकीय कारकीर्दीला महाविद्यालयापासूनच सुरुवात झाली. अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. सुरुवातीच्या काळापासूनच वक्तृत्व आणि वादविवादावर त्यांचे प्रभुत्व होते. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष बनले आणि त्यांचा राजकारणाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.आणीबाणीच्या काळात अरुण जेटली यांना अटक करण्यात आली होती. जेटली यांना अंबाला येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेथून हलवून तिहारच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणीबाणीनंतर ते पुन्हा राजकारणात जोमाने काम करू लागले. त्यांची १९७७ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
१९७७ ला कायद्याची पदवी घेतल्यापासून अरुण जेटली हे एक यशस्वी वकील म्हणून ओळखले जातात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात ते काम पाहतात. १९९० मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ म्हणून निवडले गेले होते. कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि अनुभव पाहून १९९८ ला त्यांची निवड संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला जाणाऱ्या शिष्टमंडळात झाली होती.
१३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांची नियुक्ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात करण्यात आली. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि प्रसारण या मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आले. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. मे २०१४ पासून ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहे. देशात आर्थिक सुधारणा होणे हे महत्त्वाचे आहे अशी भूमिका ते मांडतात. अल्पकाळासाठी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची देखील जबाबदारी होती. सध्या ते भारताचे अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहेत. आजवर अरुण जेटली यांनी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, त्यानंतर राज्यसभेवर खासदार, तिथं भूषविलं विरोधी पक्षनेतेपदही... पण लोकसभेची निवडणूक मात्र पहिल्यांदाच लढवली; त्यात त्यांना अपयश आलं. ग्लॅमर आणि ड्रेस सेन्सच्या बाबतीत अरुण जेटली सर्वापेक्षा वेगळे दिसतात. चष्म्याच्या फ्रेमपासून चप्पल, बुटापर्यंत सर्वामधून उमदेपणा झळकतो. त्यांच्या वार्डरोबमध्ये जगभरातील ब्रँडचे कपडे उपलब्ध असतात.
२४ मे १९८२ रोजी त्यांचा विवाह संगीता डोग्रा यांच्याशी झाला. संगीता डोग्रा जम्मू-काश्मी रचे कॉंग्रेसी नेता व उपमुख्यमंत्री राहिलेल्या गिरीधारीलाल डोग्रा यांच्या कन्या. त्यांचा जन्म मात्र अमृतसरचा. जम्मू विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए केलं आणि त्यानंतर १९८२ मध्ये जेटलींकडून लग्नाची मागणी आली. त्या वेळी अरुण जेटली नामवंत वकील होण्याबरोबरच भाजपमध्येही स्थिरावले होते. त्यांच्या लग्नाला अर्थातच दोन्ही पक्षांचे नामवंत होते... त्यात पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी ही बडी मंडळी होती. लग्नानंतर संगीता यांचं नाव बदललं गेलं, त्या झाल्या डॉली. आणि अर्थातच हळूहळू त्या भाजपच्या कार्यकर्त्याही बनल्या. घरातून बालपणापासूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या संगीता उर्फ "डॉली‘ या अरुण जेटली यांच्या निवडणुकीचे सारं व्यवस्थापन स्वत: पाहतात. त्यांना रोहन आणि सोनाली अशी दोन मुले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 28, 2018
पल्लवी जोशी यांनी लहान वयात रंगमंचात काम करणं सुरु केले. त्यांनी बाल कलाकार म्हणून बदला आणि आदमी सडक का नावाचे दोन चित्रपटात अभिनय केला होता.
त्यांचा जन्म ४ एप्रिल १९६९ रोजी झाला. त्यांनी १९७९ साली आलेल्या झालेल्या दादा ह्या चित्रपटात एक कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीच्या भूमिका साकारली होती. १९८० आणि १९९० च्या काळात त्यांनी काही आर्ट फिल्म मध्ये काम केली ज्या मध्ये रुक्मावती की हवेली, सुरज का सातवा घोडा, तृषाग्नी, वंचित आणि रिहाई प्रमुख होता. त्यांनी व्यावसायिक मोठ्या बजेटची चित्रपटात बहिण किवा हिरोईनची मैत्रीण सारखे सहकारी भूमिकेत देखील अभिनय केली होती ज्यात सौदागर, पनाह, तहलका आणि मुजरीम हे चित्रपट प्रमुख होता.
पल्लवी जोशी यांनी मेरी आवाज ही पहचान है या मालिकेत काम केले आहे. एखादा अपवाद वगळता नेहमी हिंदीत रमणारी पल्लवी जोशी मराठीतून "सा रे ग म' करू लागल्या, तेव्हा समस्त मराठी रसिकांना तो सुखद धक्का होता. त्यांचे निवेदन, टाळ्या वाजविण्यासाठीचे आवाहन अल्पावधीतच लोकप्रिय झाले. हिंदीतील "अंताक्षरी'ही त्यांनी केली.
"रिटा' हा मराठी चित्रपट त्यांनी केला आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या "बुद्धा इन ट्रॅफिक जॅम' या चित्रपटात ती अनुपम खेर यांच्या पत्नीची भूमिका केली होती. "सौदागर', "तेहलका' मध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या. श्याम बेनेगल यांच्या "मेकिंग ऑफ महात्मा' मध्येही त्यांनी काम केले होते.
"वो छोकरी'साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. टीव्हीवरही "जुस्तजू', "अल्पविराम' या त्यांच्या मालिका खूप गाजल्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
April 15, 2017
मुसोलिनीने विरोधकांना सोडले नाही. त्याने विरोधी पक्ष बरखास्त केले. त्यांच्या कार्यालयांना कुलूप ठोकले. त्यांचा इतका छळ केला की अनेक जण देश सोडून पळून गेले. एखाद्या विरोधकाला पकडले तर त्याला स्वतःचा बचाव करण्याचा, अपील करण्याचा हक्क देणारे कायदेच बदलून टाकले. कुणीही विरोधात बोलले की, मुसोलिनी ‘राष्ट्रवाद’चा मुद्दा सांगायचा. त्याने विरोधी पक्षाला तर संपवलेच, पण स्वतःच्या फॅसिस्ट पक्षातील त्याच्या विरोधकांच्या तोंडालाही कुलूप लावले. त्याच्या पक्षातील मातब्बर नेता दीनो ग्रांदीला राजदूत म्हणून लंडनला पाठविले, लिआंद्रो अर्पिनाती याला लिपारी बेटावर धाडले, सोफानी याला मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही. अशा तऱ्हेने मुसोलिनीची कार्यपद्धती सुरू होती.
April 28, 2022
डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.
June 28, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti