(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी कवी व गायक संदीप खरे

    संदीप खरे यांनी इयत्ता चौथीत असताना पहिली कविता केली. त्यांचा जन्म १३ मे १९७३ रोजी झाला. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्याने कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजलेल्या 'उमलते अंकुर' या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली. ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या त्याच्या कवितांसग्रहांची विक्रमी विक्री झाली आहे. त्याने स्वत: स्वरबद्ध केलेल्या तसेच सलिल कुलकर्णी आणि अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या सीडीही अपार लोकप्रियता लाभली आहे. सलग अनेक वर्षे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असलेला आणि १२०० प्रयोगांजवळ पोहोचलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम तर मराठी भावसंगीतामध्ये एक इतिहास घडवतो आहे. या कार्यक्रमातील गीतांसोबत संदीप करीत असलेल्या गद्य कवितांचे सादरीकरण हे देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले आहे. ‘मी मोर्चा काढला नाही, मी संपही केला नाही’.. ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात’.. ‘लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं’.. ‘दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला’.. ‘डिपाडी डिपांग’.. यांसारख्या कविता आणि लोकप्रिय गीतांमधून कवी संदीप खरे यांनी खरे मराठीत नाव कमवले आहे.

    संदीप खरे आता ‘मोबाइल अॅप’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या अॅपद्वारे रसिकांना संदीपच्या काही कविता विनाशुल्क तर काही कविता अल्बमच्या माध्यमातून सशुल्क उपलब्ध होणार असून मोबाइल अॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणारा संदीप खरे हे मराठीतील पहिलाच कवी ठरले आहे. जगभरातील मराठी रसिकांमध्ये आणि विशेषत: युवा पिढीमध्ये संदीप खरे यांच्या कविता अत्यंत लोकप्रिय आहेत. पायरसी आणि ‘संदीप खरे’ज वर्ल्ड – ‘गुगल प्ले स्टोअर’वरून हे अॅप विनाशुल्क ‘डाऊनलोड’ करता येऊ शकेल. लिंक

    https://play.google.com/store/apps/details?id=com.innomobilesystems.skworld

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    संदीप खरे यांच्या कविता व गाणी
    https://www.youtube.com/watch?v=AhyCHlFF_9Q
    https://www.youtube.com/watch?v=U-yKzJsJWVk
    https://www.youtube.com/watch?v=EThnG-4lp7w

      May 15, 2017


  • अजित सातघरे… गाण्यातील माणूस….

    हा अजित सातघरे कोण ? अनेकांना प्रश्न पडला असे , याला पाहिले नाही कधी टीव्ही वर, कधी ऐकले नाही. तरीपण ह्या माणसाची ओळख करून देणार आहे एक गाण्यामधील आनंदयात्री म्हणून.

      November 12, 2019


  • `ज्ञानकोशकार’ डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर

    `ज्ञानकोशकार’ म्हणून डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या नावामागे उपाधी लागली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पांडित्य आणि विक्षिप्तपणा यांचे अजब मिश्रण होते. श्रीधर व्यंकटेश केतकर हे एक लेखक, समाजशास्त्रज्ञ व विचारवंत म्हणून जेवढे ज्ञात आहेत, त्यापेक्षा ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून अधिक सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला.समाजप्रबोधनासाठी जीवनभर अत्यंत निर्धारपूर्वक झटलेले व ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ या आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकाने देशाबरोबरच पाश्चारत्त्य जगातही मान्यता पावलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर. एक समाजशास्त्रज्ञ, विचारवंत आणि लेखक म्हणून ते लोकप्रिय ठरले हे खरे, पण ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून ते विशेष प्रसिद्ध झाले.

    डॉ. केतकर यांनी मनाचा निश्चरय करून ज्ञानकोशाचे कार्य पूर्ण करायचेच असा निर्धार जेव्हा केला, तेव्हा सुप्रसिद्ध इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी आपल्या मनातील रास्त शंका केतकरांपुढे मांडीत म्हटले, ‘हे काम एवढे अवाढव्य आहे की, त्यासाठी एखाद्याची पुरी हयात खर्च होईल.’ डॉ. केतकर यावर स्मितहास्य करीत म्हणाले,‘ प्रयत्न तरी करून पाहूया.’ आणि डॉ. केतकर यांनी आपल्या प्रचंड मेहनतीने हे अपूर्व व असामान्य काम बारा वर्षांत पूर्ण केले व याकामी आपणास सहकारी संपादक म्हणून य. रा. दाते, चिं. ग. कर्वे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले हेही अत्यंत प्रांजळपणे कबूल केले. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कोकणातील दाभोळजवळील अंजनवेल हे मूळ गाव. त्यांचे वडील पोस्ट खात्यात पोस्टमास्तर होते. वडीलांचे छत्र लहानपणीच नाहीसे झाल्यामुळे आईच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक दुसर्याा इयत्तेपासून प्रवेश मिळेपर्यंत त्यांचे शिक्षण उमरावतीस झाले. तिसरीहून चौथीत जाताना त्यांनी ‘हायस्कूल एंट्रंस’ ही परीक्षा देऊन पहिल्याप्रथमच आपली शालेय चमक दाखवली. नववीत असताना गंमत म्हणून ते दहावीच्या परीक्षेला बसले व अनेक विषयांत उत्तम गुण मिळवून शिक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. पुढे व्हर्नाक्युलर स्कॉलरशिप’ च्या परीक्षेत बसून दुसर्यात क्रमांकावर उत्तीर्ण झाले.

    शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या केतकर यांनी अनेक हालअपेष्टांना तोंड देत ते उच्चविभूषित झाले. शिवाय शालेय जीवनात जोपासलेल्या वाचन, कविता करणे, इतिहास, वाङ्‌मय, राजकारण, रोमन कायदा यांत विशेष रस घेणे यांचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात झाला. ते इंग्लंडमध्ये सांपत्तिक स्थिती हलाखीची असूनही उच्च शिक्षण घेताना कसे जीवन जगले व शिक्षणाची हौस पूर्ण केली हे समजून घेणे उचित ठरेल. इंग्लंडमध्ये ‘हिंदुइझम’ या तेथे प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथावर आणि ‘अथिनियम’ किंवा ‘राजस्थान’ या नियतकालिकात समालोचन करून किंवा लेख लिहून ते आपला उदरनिर्वाह चालवित. पण या पैशांतून भागत नसे. तेव्हा ते दिवसातून एकदाच जेवण घेत. जेवणाला पुरेसे पैसे नसल्यामुळे लंडनमध्ये स्वस्तात स्वस्त जेवण कुठे मिळेल याचे ते ‘तज्ज्ञ’ बनले. ते स्वस्त जेवण जेवण्यास ये-जा करण्यासाठी खिशात आवश्यक पैसे नसल्याने लंडनमध्ये पायी फिरण्याची ‘खास मौज’ ते अनुभवीत. पण आपले हे दैन्य त्यांनी इतरांना दाखवून दिले तर नाहीच, पण त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची खबरदारीही त्यांनी घेतली.

    ऑक्टोबर १९१२ मध्ये उच्चविद्याविभूषित होऊन ते जेव्हा हिंदुस्थानात परतले तेव्हा त्यांच्या जीवनातील खर्याा कार्यास सुरवात झाली. त्याकाळी अनेक हिंदुस्थानी लोक पाश्चाेत्य पदवी संपादून मायदेशी येत व बड्या पगाराची नोकरी मिळवून ऐषारामी जीवन जगत. पण डॉ. केतकर यांनी अनुकरण केले ते रँग्लर अप्पासाहेब परांजपे यांचे. त्यांनी त्यागपूर्वक जीवन जगण्याचा निर्धार केला होता. १९१३-१४ च्या दरम्यान त्यांनी कलकत्ता विद्यापीठात पदवीधर विद्यार्थ्यांना राजकारण व अर्थशास्त्र शिकविण्याचे काम स्वीकारले खरे, पण त्यांच्या सत्य बाण्यामुळे त्यांना नोकरीचा त्याग करावा लागला. येथील वास्तव्यात त्यांनी ‘इंडियन इकॉनॉमिक्स’ हे पुस्तक लिहिले, पण त्यातील सत्यांशामुळे ते विरोधाचे धनी बनले. ‘हिंदू लॉ’ या दुसर्याय पुस्तकात त्यांनी अर्थकारण व समाजनियमन या दोन क्षेत्रांतील विचारांना चालना दिली. शिवाय सामाजिक, राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहून समाजमन जागृत करण्याचे काम केले. या वेळपर्यंत त्यांची परिपक्व झालेली परिस्थिती आणि कर्तबगार व्यक्तींचे प्रयत्न यांची सांगड पडली की त्यातून मोठी कार्ये उभी राहत असतात याची पूर्ण जाणीव झाली आणि त्यांनी ‘ज्ञानकोशा’च्या भव्य दिव्य कार्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले. तोपर्यंत तेलगू, बंगाली, हिंदी, गुजराथी, ऊर्दू यांसारख्या भारतीय भाषांत ज्ञानकोश तयार झाले होते.

    केतकरांनी ‘मराठी’ ज्ञानकोशाचा ध्यास घेतला. १९१५ च्या ऑगस्टमध्ये त्यांनी सर्वप्रथम ज्ञानकोशाची कल्पना मांडली व आर्थिक अडचणींवर मात करीत असंख्यांचे असंतोष मनात साठवित व असंख्यांचे सहकार्य घेत बारा वर्षांनी त्यांनी हा ज्ञानकोश तयार केला. त्यांच्या या अद्वितिय कार्याची पावती देत त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या ‘श्रीधर व्यंकटेश केतकर’ या नावाऐवजी त्यांना ‘श्रीधर व्यंकटेश ज्ञानकोशे’ असे संबोधून त्यांचा गौरव केला. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे १० एप्रिल १९३७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      February 2, 2017


  • रेल्वे मंत्री सुरेश प्रभू

    वाजपेयी यांच्या काळातील मंत्रीपदाचा तसेच विविध अभ्यास मंडळांवरील अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेता सुरेश प्रभू रेल्वे खात्यात सध्या धडाकेबाज काम करत आहेत.

      July 16, 2017


  • विजयदुर्गचे ज्येष्ठ उद्योजक अविनाश गोखले

    शिक्षणाच्या बाबतीत विजयदुर्ग मध्ये माध्यमिक विद्यालय होण्यासाठी अविनाश गोखले यांनी जीवाचे रान करुन परवानगी आणली. त्या वेळी मंत्रालयात परवानगी साठी ते दादा राणेंच्या आमदार निवासात त्यांचे विजयदुर्गतील मित्र गुंडू वाडये यांच्या सोबत दिवस दिवस काढून तत्कालीन मंत्री भाई सावंत आणि विजयदुर्ग मधील इतर शिक्षक याचे मदतीने ती परवानगी मिळवली.

      June 22, 2022


  • संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमदखान पठाण उर्फ डॉ. यु. म. पठाण

    संत साहित्य, शिलालेख यांच्या अभ्यासाबरोबरच लघुकथा, ललित लेख, व्यक्तिचित्रे हे वाङ्मयप्रकार त्यांनी लीलया हाताळले आहेत. ‘मराठवाड्यातील मराठी शिलालेख’ या ग्रंथात त्यांनी १२० शिलालेखांचं संपादन केलं आहे. या व्यतिरिक्त साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेला फारशी – मराठी अनुबंध, सुफी संतांचं मराठी साहित्य, राज्य मराठी भाषा विकास संस्थेनं प्रकाशित केलेला मराठीतील पहिला मराठी – फारशी व्युत्पत्ती कोश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं प्रकाशित केलेला ‘मराठी बखरीतील फारशीचं स्वरूप’ या ग्रंथांचा समावेश आहे.

      March 9, 2022


  • अद्वितीय, अनुकरणीय उद्योजक – श्री.सुभाष चुत्तर

    १० वी नापास असा शिक्का बसलेला हा उद्योजक माणुसकीचा चेहरा असलेला उद्योग उभारतो काय, हजारो कोटींचा व्यवहार करतो काय आणि सगळचं अनाकलनीय. अर्थात यामागे किती कष्ट आणि ज्ञान मिळवले असेल त्याचा उल्लेख या लेखात मला करताच आला नाही. पण सुभाष चुत्तारांचा हा प्रवास केवळ मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा पालकांना निश्चित अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच.

      July 26, 2017


  • मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी

    लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली.

      October 17, 2021


  • माधव रघुनाथ खाडिलकर उर्फ माधवराव खाडिलकर

    जन्म.३ मार्च १९४३ रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील जायगव्हाण गावी.
    सामाजिक,राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या विचारांसह सांस्कृतिक कलांचा आस्वाद सर्वसामान्यांना घेता यावा, यासाठी “उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट च्या माध्यमातून अविरतपणे कार्यरत असलेल्या माधवराव खाडिलकर हे ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका आशाताई खाडीलकर यांचे पती होत.

      April 27, 2024


  • सुप्रसिद्ध गायिका ज्योत्स्ना भोळे

    १९४१ साली ‘ नाट्यनिकेतन ‘ या संस्थेत प्रवेश केल्यावर संगीत अभिनेत्री म्ह्णून त्या चांगल्याच प्रस्थापित झाल्या त्यांनी या संस्थेत अकरा नाटकांमधून भूमिका केल्या त्यामध्ये ‘ संगीत कुलवधू ‘ या नाटकात त्यांना अजरामर कीर्ती मिळाली.

      August 16, 2021