आत्म निर्भर हा शब्द कोव्हीड साथीने आपल्यात रुजवला.पण ही संकल्पना ४०वर्षांपूर्वीच यांनी विशाखापट्टणम जिल्ह्यातील ५०हून अधिक खेडी आत्मनिर्भर करुन ही कल्पना वास्तवात येऊ शकते याचा भक्कम पुरावा दिला होता. अमेरिकेत संशोधन किंवा नोकरीची संधी सोडून मायभूमीत परतून देशसेवा करण्याचा पर्याय निवडल्याबाबत त्यांनी जराही खंत नव्हती. कारण त्यांचे ध्येय पक्के होते. दृष्टी ठाम होती, त्यामुळेच ते असामान्य होते.
‘हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है’ या शोलेतल्या संवादाने व आपल्या अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांना रिझवणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी अनेक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी झाला. ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटात सुद्धा असरानी यांनी काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मे.पुं रेगे हे व्यवसायाने 'तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. त्यांची महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्टय़े होती. महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्वविाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो. भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. रेगे यांच्याविषयी महाराष्ट्रातील लेखन-वाचन व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांना नितांत आदर आणि कुतूहल असते. त्यांनी महाराष्ट्राला कुठलाही नवीन विचार दिला नाही, विचार कसा करावा याविषयीही त्यांनी काही सांगितले नाही; पण त्यांनी गंभीर लेखनासोबत ‘विश्वकोश’, ‘नवभारत’ यांचे प्रत्यक्ष काम करून आपल्या चिंतनशील प्रकृतीला क्रियाशीलतेचीही जोड द्यायची असते, या विसाव्या शतकातील ज्ञानपरंपरेचा वारसा सक्षमपणे चालवला.
मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पश्चिमी तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास हा त्यांचा पश्चिमी तत्त्वज्ञानाचा ग्रंथ ज्यांनी वाचला असेल त्यांना याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांनी काही काळ ‘नवभारत’ आणि ‘क्वेस्ट’ या मासिकांचेही संपादन केले. ‘नवभारत’मध्ये त्यांनी संपादकीय, लेख, पुस्तक परीक्षणे अशा विविध स्वरूपांचे लेखन केले. त्याचबरोबर तत्त्वज्ञानावरील पाठय़पुस्तकांचेही लेखन केले.
‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’, ‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’, ‘स्वातंत्र्य आणि न्याय’, ‘िहदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत, तर ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात नावानुसार पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास आहे. रेगे यांचे ‘मर्मभेद’ हे संपादित पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. मे.पुं रेगे यांचे २८ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आनंद बक्षी, हे अभ्यासू, परिश्रम घेणारे गीतकार ओळखले जात होते. गीतकारासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी पाच वेळा पटकावला तर याच पुरस्कारासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ४० नामांकने त्यांना लाभली.
बरवे यांचे जीवनकार्य लक्षात राहाते, ते अशा सुटय़ा-सुटय़ा चित्रमालिकांतून नव्हे, तर त्यांच्या एकंदर चित्रविचारातून! याच चित्रविचाराने, ‘अमूर्त’ म्हणजे काहीतरी पलीकडचे आणि गूढ नव्हे, नेहमी दिसणाऱ्या वस्तूंचा संबंधदेखील ‘अमूर्त’ असू शकतो, असा विश्वास अनेकांना दिला. याच चित्रविचारातून, ‘कशाचे चित्र काढू?’ हा प्रश्न अनेक कलाविद्यार्थ्यांसाठी कायमचा सुटला!
श्रीकांत देशपांडे हे रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचे नातू होत. त्यांचा जन्म १२ जून १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. वसंतराव तथा नानासाहेब देशपांडे यांचा सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या आरंभापासून महत्त्वाचा वाटा होता.
श्रीकांत देशपांडे यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण सरस्वतीबाई राणे यांच्याकडून घेतले. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांच्याकडेही त्यांनी किराणा घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे तालीम घेतली होती. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ते सहसचिव होते. तसेच या महोत्सवात अनेकदा त्यांनी आपली गायकी सादर केली होती. ते पुणे विद्यापीठाच्या डॉक्टसरेटसाठीच्या (संगीत विषय) प्रवेश समितीवर सन्माननीय सदस्य होते. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी अनेक कार्यक्रम केले होते.
भारतातून अनेक संगीत परिषदांमधून श्रीकांत देशपांडे यांचे गायन झाले. तसेच रागमाला परफॉर्मिग आर्टस् ऑफ कॅनडा आणि इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनच्या वतीने अमेरिकेसह कॅनडामध्ये त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देशाविदेशात गायनाच्या अनेक मैफली केल्या होत्या. सवाई गंधर्वसंमेलन, तानसेन समारोह, गुणीदास संमेलन, दीनानाथ मंगेशकर संमेलन, सूरश्री केसरबाई संमेलनातही त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले होते. श्रीकांत देशपांडे यांचे २९ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण दीनानाथ मंगेशकर यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे मा.दीनानाथ मंगेशकर यांचे गुरू. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी झाला.त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवलं. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता.
१९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका मास्टर दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छोडो छोडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते.
‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. गोमंतकात या गायक नटाला कोल्हटकरांनी मास्टर हे उपपद लावले. प्रसिद्ध क्रिकेटपटू सी. के. नायडू हे मास्टर दीनानाथांचे पक्के दोस्त. मास्टर दीनानाथ हे सी. के. नायडू यांची क्रिकेटची मॅच बघायला यायचे, तर नायडू हे मास्टर दीनानाथांची नाटके पाहायला येत. मास्टर दीनानाथ यांचे २४ एप्रिल १९४२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला…
वसंतराव देशपांडे म्हटले की अनेक नाट्यगीते , ठुमरी आणि शास्त्रीय संगीतातील अनेक प्रकार आठवतात. याबरोबर आठवते ते त्यांचे ‘ कट्यार काळजात घुसली ‘ हे नाटक आणि त्यांनी केलेली खासाहेबांची अविस्मरणिय भूमिका.
“कन्नड कोकिळा” अशी गंगूबाई हनगळ यांची ओळख होती. मराठी भावगीतांच्या इतिहासातील पहिली युगलगीत विख्यात गायक श्री जी. एन जोशी व गंगूबाई यांची आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti