पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी-संन्यास ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कला-विलास’ च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले.
शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली. लग्नाची बेडी, एकच प्याला मधल्या संगीत भुमिका ते शेवटपर्यंत करत होते. मी गातो नाचतो आनंदे.. अशी काही भावगीते पण त्यांनी गायली. व्ही. शांताराम यांच्या अमरभूपाळी या चित्रपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांनी न्याय दिला. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. पंडितराव नगरकर यांचे २८ जुलै १९७७ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 26, 2017
मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी भा. रा. तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७४ रोजी मध्य प्रदेशातील मुगावली येथे झाला.
भा.रा.तांबे हे मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी म्हणून प्रसिद्ध होते. केशवसुत यांच्यानंतरचे मराठीतील महत्वाचे कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. भा.रा.तांबे यांचे संपूर्ण नाव भास्कर रामचंद्र तांबे असे होते. ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते. म्हणून राजकवी तांबे या नावानेही ते ओळखले जातात. भा.रा. तांबे यांच्या कवितेचे वैशिष्ठय म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येतो. त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनाचे निर्दोष व आनंदी असे वर्णन केले आहे. म्हणून त्याच्या कवितेस संतुष्ट कविता असे यथार्थतेने संबोधता येईल.
बालगीत व नाटयगीत हे काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले व लोकप्रिय केले.
त्यांच्या ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ‘मधु मागशी माझ्या सख्या परी’ ‘कळा ज्या लागल्या जीवा’ ‘रुद्रास आवाहन’ ‘रुणझुणू ये’ यांसारख्या कविता स्मरणात राहतील अशाच आहेत. भा.रा.तांबे यांचे निधन ७ डिसेंबर १९४१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 28, 2019
मराठीतील प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म २३ मे १८९६ रोजी अमरावती येथे झाला.
मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा मा.केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे. मा.केशवराव भोळे १९२६ साली पुण्यात आले. गायक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या भोळ्यांनी गाण्यांना चाली बांधणेही आरंभले.
१९३१ सालाच्या सुमारास मराठीत बोलपटांचे प्रमाण जसजसे वाढू लागले, तसतसे प्रसंगाच्या मांडणीस व पात्ररचनेस सुसंगत व उठावदार संगीत देण्याचे प्रयोग होऊ लागले. भोळ्यांनी त्या दृष्टीने सांगीतिक प्रयोग करून पाहिले. पार्श्वगायनाचा पहिला प्रयोग त्यांनी 'कृष्णावतार' या चित्रपटामध्ये केला. प्रभात फिल्म कंपनीमध्ये असताना त्यांनी 'अमृतमंथन', 'माझा मुलगा', 'संत तुकाराम', 'कुंकू' इत्यादी चित्रपटांना संगीत दिले. १९३२ साली त्यांचे दुर्गा केळेकरांशी लग्न झाले. लग्नानंतर त्या ज्योत्स्ना भोळे झाल्या. मा.केशवराव भोळे यांनी १९३३ साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते.
पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला. त्या नाटकात नाटककार श्री.वि.वर्तक यांच्या पत्नी सौ पद्मावती वर्तक, म.रा. रानडे, पार्श्वनाथ आळतेकर, के.नारायण काळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर यांनी भूमिका केल्या होत्या. नायिका-बिंबाच्या भूमिकेत ज्योत्स्ना भोळे होत्या. ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ’ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्ना भोळे त्या नाटकाच्या वेळी फक्त १८ वर्षांच्या होत्या.
‘एकलव्य’ ह्या टोपणानावाने केशवराव भोळे ह्यांनी वसुंधरा ह्या साप्ताहिकात लिहिलेले अभिजात गायक-गायिकांविषयीचे अनेक लेख त्यांच्या रमणीय शैलीमुळे आणि माहितगारीमुळे विख्यात झाले. तेच लेख पुढे आजचे प्रसिद्ध गायक (१९३३) ह्या पुस्तकात संगृहीत करण्यात आले. ह्या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ती म्हणजे संगीताचे मानकरी (१९४९) होय. त्यांनी नंतर ‘शुद्धसारंग’ ह्याही टोपणनावाने लेख लिहिले. त्यांत त्याची चिकित्सावृत्ती, परखडपणा, बोचरेपणा इ. विशेष दिसून येतात. आवाजाची दुनिया (१९४८), अस्ताई (१९६२), वसंतकाकाची पत्रे (१९६४), माझे संगीत (१९६४), अंतरा (१९६७) आणि जे आठवते ते (१९७४) हे आत्मचरित्र ही त्यांची ग्रंथसंपदा.
केशवराव भोळे यांचे ९ नोव्हेंबर १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 15, 2017
अच्युत बर्वे यांची अनुभवसृष्टी ही स्वतंत्र आणि स्वयंभू होती. त्यांची कथातंत्रावरची पकड असामान्य होते. त्यांचा मानवी स्वभावाचा अभ्यासही मनोवैज्ञानिकालाही नवीन वाटेल, असे होते.
April 16, 2022
अभिनेत्री व राजकारणी नवनीत कौर राणा यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी झाला. नवनीत कौर या मूळच्या पंजाबी. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते. नवनीत राणा यांचे शिक्षण मुंबईत झालेले आहे. आधी मॉडेलिंग नंतर म्युझिक अल्बम आणि नंतर चित्रपट सृष्टीत त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. नवनीत कौर राणा यांनी तेलगू , कन्नड आणि पंजाबी चित्रपटात अभिनेत्री म्हणून आपला ठसा उंटावताना अनेक ब्लॉक बस्टर हिट दिलेले आहेत. नवनीत कौर यांनी कन्नड़ चित्रपट दर्शन ने आपले करीयरची सूरवात केली. त्यांनी तेलुगु चित्रपट सीनू, वसंथी व लक्ष्मी, चेतना, जग्पथी, गुड बॉय, भूमा मध्ये अभिनय केला आहे.
नवनीत कौर यांनी मल्याळम चित्रपट लव इन सिंगापुर व पंजाबीतील लड़ गए पेंच मध्ये अभिनय केला आहे. नवनीत कौर २०११ मध्ये आमदार रवी राणा यांच्याशी अमरावती येथे विवाहबद्ध झाल्या. त्यांचा विवाहदेखील गाजला कारण त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न केले. आमदार रवी राणा यांनी तीन हजार जोडप्यांसमवेत आपले लग्न केले होते. त्यामुळे राणा दाम्पत्याचा विवाह गिनीज बुकातदेखील नोंदवला गेलेला आहे. सातत्याने प्रकाशझोतात राहण्यासाठी भव्य सोहळे आयोजित करण्याची आमदार राणा यांची परंपरा राहिली आहे.
नवनित कौर राणा या चित्रपट तारका असल्याने त्यांच्या दहीहंडीच्या सोहळ्यात दरवर्षी बॉलीवुड स्टारची हजेरी असंते. नवनीत कौर यांचे पती आमदार रवि राणा गेल्या दहा वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून नवनीत कौर राणा यांनी निवडणूक लढविली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 3, 2019
प्रेमनाथ यांचे वडील रायसाहेब कर्तारनाथ यांची अशी इच्छा होती की, आपल्या मुलाने लष्करात सामील व्हावं. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२६ रोजी जबलपुर येथे झाला. ते स्वत: एकेकाळी रेवा स्टेटचे आय.जी.पी. होते. आपल्या मुलानेही प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन जगावं अशी त्याची भारी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रेमनाथला लष्करात पाठवलं सुध्दा, पण प्रेमनाथची स्वत:ची आवड वेगळीच होती. त्याला मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत उडी घ्यायची होती. एवढयासाठी त्याने सैन्यातून पळ काढला आणि मुंबई गाठली. इथे आल्यावर इंदौरचे एक नातेवाईक पृथ्वीराज कपूर यांच्या नाटक कंपनीतच होते. त्यांचा त्यांनी आश्रय घेतला. पण पृथ्वीराज कपूराना सगळी हकीकत कळल्यानंतर त्यांनी आपला मुलगा राज कपूर यांना सोबत घेऊन प्रेमनाथ यांना घरी जाण्यास सांगितलं. नाराज मनानं प्रेमनाथ घरी परतला. पण इथे एक भलतंच नाटक घडलं.
प्रेमनाथबरोबर आलेल्या राज कपूरने प्रेमनाथची बहीण कृष्णा हिला बघितलं आणि पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. नंतर हे नातं अगदी घटट् झालं. प्रेमनाथने याच नात्याला यशाची पायरी बनविण्याचं ठरवलं. पृथ्वी थिएटर्सच्या 'दीवार' नाटकात प्रेमनाथने ब्रिटीश माणसाची रंगविलेली भूमिका सगळयांना आवडली. ही भूमिका त्याला कपूर घराण्याशी जवळचं नातं जोडलं गेल्यामुळेच मिळाली होती. नंतर राज कपूरच्या 'आग' चित्रपटात 'चित्रकार राजाबाब' ची महत्त्वपुर्ण भूमिका प्रेमनाथला मिळाली. या चित्रपटातली प्रेमनाथची भूमिका खूप गाजली. प्रेमनाथला नायक म्हणून पहिला चित्रपट 'अजित' या नावाने मिळाला होता. यात त्याची नायिका होती मोनिका देसाई. १९५१ साली प्रेमनाथ यांचे सात चित्रपट पडद्यावर आले. नंतर त्यांनी अनेक टॉपच्या हिरोईन्सबरोबर काम केले. हिंदी चित्रपटात प्रेमनाथला एक अशा अभिनेत्याच्या नात्याने ओळखले, जाते ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून राज्य करणारा म्हणून नाही तर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात आपली छाप उमटविली.
अभिनेता म्हणून यशस्वी झाल्यानंतर अचानकपणे खलनायकाच्या भूमिका स्वीकारल्या त्यातही यशस्वी झाले. त्यांनी राजकपूरच्या बॉबी या चित्रपटापासून चरित्र भूमिका करण्यास सुरुवात केली. या चित्रपटातून त्यांनी डिंपल कपाडियाच्या वडीलांची भूमिका केली. या चित्रपटातील अभिनयाने त्यांना सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेअर मिळवून दिले. त्यांना अमीर गरीब, शोर, रोटी कपडा मकान, बॉबी या चित्रपटांकरिता सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ऐंशीच्या दशकात प्रकृती स्वास्थ्य खालावल्याने प्रेमनाथ यांनी चित्रपटात काम करणे काही अंशी कमी केले. या काळात त्यांच्या कर्ज, क्रोधी, देशप्रेमी यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले. १९८५ मध्ये आलेला हम दोनो हा प्रेमनाथ यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. निर्माता निर्देशक सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांची जोडी. बरीच नावाजली गेली. सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांनी कालीचरण, विश्वनाथ, गौतम गोविंदा, कर्ज, आणि क्रोधी यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. मा.प्रेमनाथ यांचे ३ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 28, 2017
मोगूबाईंवर १९११ साली हरिदासबुवांकडून गाण्याचे संस्कार झाले . मोगूबाई मुळातच बुद्धीमान. मोगुबाई चटकन आत्मसात करायच्या.
August 2, 2021
इक्बाल दरबार यांनी यूके, यूएई, सिंगापूर, मॉरिशस, मालदीव, फ्रान्स इत्यादी ठिकाणी नौशाद कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल ओ.पी नय्यर, आरडी बर्मन, श्रीकांत ठाकरे यांच्या सारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुतेक सर्व नामांकित संगीत दिग्दर्शकांच्या समवेत त्यांच्या मैफिलीच्या वेळी साथ दिली आहे. इक्बाल दरबार हे पुणे आकाशवाणी वरील ‘ए’ ग्रेड कलाकार आहेत. त्यांनी पुणे आकाशवाणी वरील मालिका, नाटक आणि चित्रपटांसाठी संगीत आणि शीर्षक ट्रॅक दिले आहेत.
March 31, 2022
कवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी बडनगर (उज्जैन ) येथे झाला. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. मा.प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते. कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता. भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. ऐ मेरे वतन के लोगो हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथे एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचकलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर हे गाणे लिहिले. कवी प्रदीप यांच्या कवितांची पाकिस्तानात नक्कल होत असे. ‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ये गीत पाकिस्तान्यांना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आले. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले. १७०० गाणी लिहिणाऱ्या मा.प्रदीप यांना १९९७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. मा. कवी प्रदीप यांचे ११ डिसेंबर १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कवी प्रदीप यांची काही गाजलेली गाणी
अब तेरा सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैया (किस्मत)
आओ बच्चों तुम्हे दिखाएँ झाँखी हिंदुस्तान की (जागृति, गायकः प्रदीप)
आज आशिया के लोगों का काफिला चला (काफिला)
आज मौसम सलोना सलोना रे (झूला)
आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो दुनिया वालो ये हिंदुस्तान हमारा है (चित्रपट : किस्मत)
इन्सान का इन्सान से हो भाई चारा (पैगाम)
ऊपर गगन विशाल (मशाल)
ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख मे भरलो पानी (गीत)
ओ अमीरों के परमेश्वर (पैगाम)
कान्हा बजाये बांसरी और ग्वाले... (नास्तिक)
गगन झन झना रहा (नास्तिक)
चना जोर गरम बाबू (बंधन)
चल चल रे नौजवान (बंधन)
चल मुसाफिर चल (कभी धूप कभी छाँव)
चलो चले माँ (जागृति
देख तेरे संसार की हाल क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान (नास्तिक, गायक: प्रदीप)
धीरे धीरे आ रे बादल, धीरे धीरे आ (किस्मत)
पपीहा रे, पपीहा रे, मेरे पियासे (किस्मत)
February 8, 2017
मोरेश्वर वासुदेव उर्फ बंडोपंत सोलापूरकर यांचा जन्म १८ एप्रिल १९३३ रोजी झाला.
बँड संस्कृती रुजवण्यात महत्त्वाची भूमिका असलेलं अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून बंडोपंत सोलापूरकर यांची ख्याती होती. त्यांनी बँडची संस्कृती नुसती रुजवलीच नाही, तर तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याचे महत्त्व अधोरेखित केले. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे मोठे बंधू अण्णासाहेब सोलापूरकर यांच्याकडे क्लॅरोनेट वादनाचे प्राथमिक आणि पंडित नागेश खळीकर यांच्याकडे गायकी अंगाने वादनाचे धडे गिरवले. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या मार्गदर्शनाखाली लयकारी आणि मिंड यांतील बारकाव्यांचा अभ्यास केला. या दिग्गजांकडे मिळालेल्या शिक्षणाचा फायदा घेत त्यांनी क्लॅरोनेटसारख्या पाश्चात्त्य वाद्याला आपलेसे करीत ते जनमानसात पोहोचवले. परंपरावादी पुण्यात पाश्चात्त्य वाद्यांविषयी उत्सुकता निर्माण करण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी यानिमित्तानं केली. पाश्चात्त्य वाद्यातून भारतीय स्वर काढण्याचे कौशल्य त्यांना साध्य झाले होते. एकल वादनाच्या मैफलीतून त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलीच होती. कुंदगोळ आणि पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवासारख्या मोठ्या संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी सातत्यानं वादन केले.
प्रभात फिल्म कंपनीच्या संगीत विभागात काम करताना ‘माणूस’सारख्या चित्रपटातही क्लॅरोनेट वाजवले होते. तसेच राम कदम, कल्याणजी आनंदजी, रवींद्र जैन, वसंत देसाई आदी संगीतकारांसह काम केले. ‘गुळाचा गणपती’, ‘बाळा जो जो रे’, ‘माहेरची साडी’, ‘राम लखन’ आदी अनेक चित्रपटांसाठीही वादन केले. एकल वादनातून मोठी लोकप्रियता मिळत असतानाही त्यांनी बँडकडे दुर्लक्ष केले नाही. उलट, या दोन्हीत योग्य तो समन्वय राखत त्यांनी दोन्ही गोष्टी जनमानसात पोहोचवल्या.
प्रभात बँडने अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. सोलापूरकर कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या या बँडपथकाने मिरवणुकीमध्ये ब्रास असलेल्या वाद्यांवर मराठी गीतांचे वादन ही प्रथा सुरू केली. क्लॅरोनेटवादक म्हणून ख्याती असलेले बंडोपंत सोलापूरकर हे सॅक्सोफोन, ट्रम्पेट अशा ब्रासच्या वाद्यवादनासह अनेक वर्षे गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी असायचे. त्यांच्या कष्टांमुळे बँडसंस्कृतीला प्रतिष्ठा मिळाली. बँडबरोबर राहात त्यांनी लग्नसमारंभ, गणेशोत्सवातही उत्साहाने वादन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मिरवणुकीत त्यांचे वादन हा आकर्षणाचा विषय असे. एखाद्या गायकाला महोत्सवांत सातत्याने गाण्याची संधी मिळते; पण बंडोपंतानी गाणगापूर आणि कुंदगोळच्या महोत्सवात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ विनाखंड वादन करून अलिखित विक्रमच नोंदवला. त्यांच्या या संगीतसेवेसाठी अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. या पुरस्कारांबरोबरच त्यांना रसिकांच्या प्रेमाची दादही मिळाली.
बंडोपंत सोलापूरकर यांचे २३ जानेवारी २०१३ रोजी निधन झाले.
January 23, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti