पहिल्या भारतीय कॉमिक चित्रमालिकेचे निर्माते ही अंकल पै म्हणजेच अनंत पै यांची प्रमुख ओळख. ही कॉमिक चित्र मालिका अमर चित्र कथा या नावाने जगप्रसिद्ध आहे. वयाच्या बाराव्या वर्षी ते मुंबईत आले, तसा त्यांचा जन्म कर्नाटकातील करकाला गावचा. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांचे आई वडिल वारले. त्यानंतर त्यांनी मुंबईचा रस्ता धरला.
March 1, 2024
अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या. देवेन वर्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते. देवेन वर्मा यांनी १४९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी १५० हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते. मा.देवेन वर्मा यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 14, 2019
ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे.
August 13, 2021
पुरुषोत्तम दार्व्हेकर हे नाट्य वर्तुळात मास्तर या नावाने परिचीत होते. अतीशय अभ्यासू, विचारवंत आणि वक्तशीर असे त्यांचे व्यक्तीमत्व होते अनेक नाटकांना त्यांचे दिग्दर्शन लाभले होते.
September 21, 2021
डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते. पण त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला डॉ.काशिनाथ घाणेकर यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. संभाजीराजांचा विषय निघाला किवा भालजींचे जुने चित्रपट कुठे सुरु असले कि “डॉ.काशिनाथ घाणेकर”…यांचा विषय निघणार नाही असे होणार नाही…
March 2, 2024
आशाताईंच्या गाण्याबद्दल आपण सगळेच जाणतो.
त्या उत्तम जेवण सुध्दा बनवतात. आशा भोसले यांनी दहा वर्षांपूर्वी “आशाज रेस्टॉरंट प्रा.लिमिटेड” या नावाने हॉटेल व्यवसायाची मुर्हूतमेढ रोवली व आशाज् हे खास भारतीय पदार्थांचे हे रेस्टॉरंट त्यांनी दुबईत सुरू केले.
त्यानंतर आबूधाबी, कतार,कुवेत, बहारीन, इजिप्त, ब्रिटन या देशांतही या कंपनीच्या शाखा काढण्यात आल्या.
विशेष म्हणजे आशाताईंनी स्वतःच्या खास रेसिपीज या हॉटेलांतून उपलब्ध करून दिल्या आहेत. जगभरात भारतीय पदार्थांची खासियत कळावी यासाठी आपण या उद्योगात उतरल्याचे त्या म्हणतात.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
September 9, 2016
मराठी अभिनेता प्रसाद ओक यांचे शालेय शिक्षण भावे स्कूल, व बीएमसीसी पुणे येथे झाले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमासारखाच एक कार्यक्रम पुण्यात चारुदत्त आफळे सादर करायचे. यात चंद्रशेखर महामुनी गायक होते. त्यांच्या टीमसोबत प्रसाद ओक कोरस म्हणून गात असत. प्रसाद ओक यांनी करिअरची सुरुवात नाटकांपासून केली होती. रणांगण, भ्रमाचा भोपळा या नाटकांमधून प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. पण सगळ्यात महत्वाचा टप्पा होता तो सारेगमप या झीच्या रिअॅलिटी शोचा. प्रसाद ओक यांया आई संगीत विशारद आहेत पण प्रसाद ओक हे कधीच गाणे शिकले नाही, त्यांना उपजतच गात्या गळ्याची देणगी मिळालीये, त्यानी आपल्या करिअरची सुरुवातही गाण्याच्या कार्यक्रमातनं केली होती, ‘सारेगमप’ स्पर्धेतून गायक म्हणूनही प्रसाद ओक यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. सारेगमपचा विजेता बनल्यानंतर प्रसाद ओक हे झी मराठीचा ब्रँड अँबेसेडर बनले, एका वाहीनीचा चेहरा बनणारा प्रसाद हा पहिला मराठी कलाकार. त्यानंतर स्टार वाहिनीनेही प्रसाद ओक यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केले होते. आतापर्यंत ७० ते ७५ सिनेमे, ८० ते ८५ मालिका आणि २५ नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा प्रसाद ओक यांनी उमटवला आहे. ‘अवघाचि संसार’ मालिकेतली खलनायकी वळणाची भूमिकाही असो वा ‘नांदी’ नाटकातली स्त्री भूमिका, प्रसाद ओक यांनी सर्वच भूमिकांना योग्य न्याय दिला. प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःचे मोठे फॅन निर्माण केले आहे. नांदी या नाटकात त्यांनी रुक्मीणीची भूमिका केली होती. नांदीचे एकूण १०० प्रयोग केले. ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘नांदी’ या संगीत नाटकांतील त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक झाले. ‘दामिनी’, ‘घरकुल’, ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाची संसार’, ‘असंभव’, ‘वादळवाट’ आणि ‘होणार ‘सून मी ह्या घरची’ या प्रसाद ओक यांच्या मालिका विशेष लोकप्रिय ठरल्या, ‘धतिंग धिंगाणा’, ‘खेळ मांडला’, ‘हाय काय नाय काय’, ‘फुल ३ धमाल’, ‘दोघात तिसरा’, ‘क्षण’, ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ हे प्रसाद ओक यांचे गाजलेले सिनेमे.
नुकतीच प्रसाद ओक यांनी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली व ती लोकांच्या खास पसंतीस पडली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
February 20, 2017
पुढे जाऊन त्यांनी शिकलेल्या अनेक कलांचे मिश्रण करून जुडो ह्या शाखेची सुरवात केली. पुढे जुडो ही कला शारीरिक, मानसिक आणि नैतिक अध्यापनासाठी जपानमध्ये उदयास आली.
October 28, 2021
‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिकही ते चालवत असत. त्या मासिकाचे तब्बल वीस वर्षे त्यांनी संपादन केले. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्या मासिकासाठी त्यांनी भालबा केळकर, केशवराव भोळे यांनाही लिहिते केले.वाटवे हे मुलाखतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी घेतलेल्या शरद तळवलकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, विवेक, लालन सारंग यांच्या मुलाखती विशेष गाजल्या. त्यांची अनेकांशी मैत्री होती. चित्रपट क्षेत्राबाबतच्या गप्पांमध्ये ते रंग भरत, जुने किस्से सांगत.
March 16, 2022
मेल अँड फीमेल, डायनामाइट, दी बकॅनिअर, नॉर्थवेस्ट माउंटेड पुलिस, दी किंग ऑफ किंग्ज, दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ – असे त्याचे सिनेमे प्रसिद्ध आहेत.
January 21, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti