प्रत्येकजण राजपाल यादव यांच्या अभिनयाचे फॅन आहेत. जरी त्याची उंची खूप कमी असली, तरी त्याची प्रतिभा तितकीच मोठी आहे.
March 16, 2022
शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव या छोट्या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता. शंकरबापू आपेगावकर हे राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक होते. ते वारकरी प्रकारचे सुद्धा पखवाजवादन करीत. त्यांचा १९८६ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. शंकरबापू आपेगावकर यांचे मूळ नाव शंकर शिंदे होते.
शंकरबापू आपेगावकर यांचा मुलगा उद्धवबापू आपेगावकर हे ही पखवाजवादक आहे. शंकरबापू आपेगावकर यांचे निधन ९ जानेवारी २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 9, 2019
वालचंद हिराचंद दोशी सार्वजनिक बांधकाम, सागरी वाहतूक, मोटार उद्योग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातील नवा कालखंड निर्माण करणारे उद्योगसम्राट! वालचंद हे एक वेगळ्या प्रकारचे उद्योगपती होते. वालचंद हिराचंद यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८८२ रोजी झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले.
वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-मा.वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले.
बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली.
मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये मा.वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली. ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय(ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली.
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अॅ्न्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला.
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅचन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली. प्रीमिअर इलेक्ट्रॉरनिक्सन, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अॅरक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अॅएन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शभन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, मा.वालचंद कूपर लिमिटेड, मा.वालचंद नगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली. वालचंद हिराचंद यांचे ८ एप्रिल १९५३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ- इंटरनेट
November 23, 2018
शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांनी त्यांना केवळ पाच वर्षांचे असल्यापासून शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला आरंभ केला. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९३८ रोजी जम्मू येथे झाला. त्यांच्या आई गायिका उमा दत्त शर्मा यांनी सखोल अभ्यास करून ठरवले की शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे भारतातील पहिले वादक बनावे. त्यांच्या इच्छेनुसार, शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि उमा दत्त शर्मा यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी आपल्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण १९५५ मध्ये मुंबई येथे केले. संतूर या वाद्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. आता शिव कुमार शर्मा म्हटले की संतूर वादक असेच मनात येते. १९५६ साली शांताराम यांच्या "झनक झनक पायल बाजे" गाण्यास त्यांनी संगीत दिले. १९६० साली त्यांनी स्वतःचा एकल गीतसंच प्रसिद्ध केला. १९६७ साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत "कॉल ऑफ द व्हॅली" ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीने त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिले आहे. त्याची सुरुवात १९८० साली "सिलसिला" चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने "शिव-हरी" या नावाने संगीत दिले होते. त्यांनी फासले, चाँदनी, लम्हे, डर या चित्रपटांना सुद्धा संगीत दिले. त्यांचा मुलगा राहुल हासुद्धा संतूर वादक असून १९९६ पासून तो शिवकुमारांना साथ करतो आहे. मा.शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाची सुरूवात संथ आलापचारीने होते. ती ध्रुपद अंगाची असल्याने मुर्की, खटका वगैरे प्रकार वर्ज्य असतात. नंतर जोड अंगाचे वादन ते करतात. यात पूर्णपणे तालबद्ध नसले तरी लयीच्या अंगाने रागस्वरूप उलगडत जाणारे वादन असते. सांगता अत्यंत वेगवान लयीतल्या झाल्याने होते. त्यानंतर तबल्याच्या साथीने विलंबीत किंवा मध्य लयीतली गत आणि शेवटी द्रुतगतीतली गत असा वादनाचा क्रम असतो. कारकीर्दीच्या सुरूवातीला मसीतखानी आणि रजाखानी अंगाने त्रितालातल्या गती वाजवणार्याो शिवकुमार शर्मांनी पुढे रूपक, झपताल, एकताल यासारखे प्रचलित ताल तसेच मत्त ताल (९ मात्रा), रूद्र ताल (११ मात्रा), जय ताल (१३ मात्रा) आणि पंचम सवारी (१५ मात्रा) अशा तालांमधेही तितक्याच सहजतेने वादन केलेले दिसते. पिलू, पहाडीसारख्या रागांवर आधारलेल्या धुन तसेच लोकसंगीतावर आधारलेल्या धुन वाजवण्यात कौशल्य मिळवलेले मा.शिवकुमार शर्मां यांच्या तोडीचे वादक कलाकार मोजकेच असतील. मा.शिवकुमारांचे संतूर वादन सर्वार्थाने समृद्ध असते. ज्यांना संगीतातल्या तांत्रिक बाबी समजत नाहीत, अशांना संतूरमधून प्रकटणार्या नादमाधुर्याचा, भाव आणि नवरसांच्या उत्कट अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येतो. एखादे तरल भावचित्र मनात साकार व्हावे, किंवा खळाळता झरा, समुद्रात उसळाणार्याे लाटा किंवा स्तब्ध उभ्या असलेल्या हिमशिखराचे चित्र डोळ्यापुढे उभे रहावे इतके परिणामकारक रागस्वरूप शिवजी सहज उभे करतात. त्यांचा ललत ऐकताना भल्या पहाटे शुचिर्भूत होउन मंदिरात ध्यानस्थ बसल्याची जाणिव होते, रागेश्री ऐकताना मिलनासाठी अतुर झालेली सुंदर अभिसारिका डोळ्यापुढे येते, मारवा अनाम हुरहुर लावून जातो तर श्री ऐकताना हृद्यस्थ जनार्दनाला शरण गेल्याची भावस्थिती प्रत्ययाला येते. आजमितीला संतूर आणि मा.शिवकुमार शर्मा हे जणू समानार्थी शब्द झालेले आहेत. संतूरला अभिजात संगीताच्या व्यासपीठावर सतार, सारंगी किंवा सरोदच्या तोलामोलाचे स्थान मिळालेले आहे. पं. मा.शिवकुमार शर्मांना पद्मविभूषणसह देशोदेशींचे सन्मान, पुरस्कार मिळालेले आहेत.
पं.शिवकुमार शर्मा यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे `पं. शिवकुमार शर्मा द मॅन अँड हिज म्युझिक’ या अनोख्या कॉफी-टेबल बुक अनेक दुर्मीळ प्रकाशचित्रांनी हे पुस्तक सजले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया / म.टा
January 14, 2019
ज.द. गोंधळेकर हे टाइम्स ऑफ इंडियाचे कलादिग्दर्शक होते. ते चांगले शिक्षक, संस्थाचालक आणि दूरदृष्टी असलेले कलावंत होते. जर्मनी, बेल्जियम या देशांत आणि लॅटिन अमेरिकेत भरलेल्या अनेक चित्रप्रदर्शनांत गोंधळेकरांची चित्रे झळकली आहेत. गोंधळेकरांची ५०-६०चित्रे जगातील कलादालनांची शोभा वाढवत आहेत.
April 22, 2022
नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांद्वारे रसिकांत लोकप्रिय झालेले फारुख शेख यांनी वकिलीचे शिक्षण घेत असतानाच नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी झाला. ७०-८० च्या दशकात फारूक शेख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. समांतर चित्रपट आणि तसेच मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये त्यांचा मुक्त संचार सुरू होता. त्यांिनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. विनोद आणि संवेदनशील विषयांवर त्यां चा हातखंडा होता. नुरी, शतरंज के खिलाडी, चष्मेतबद्दुर, गरम हवा इत्यािदी चित्रपट गाजले. `क्लब ६०′ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. `यह जवानी है दिवानी’ या चित्रपटामध्ये त्यांनी रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेला सिकंदर मिर्झा प्रेक्षकांना खूपच भावला होता.
सहजसुंदर अभिनय ही त्यांची जमेची बाजू होती. मा.फारुक शेख यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले होते. `चमत्कार’, `जी मंत्रीजी’, `श्रीकांत’ या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने एक वेगळाच प्रभाव निर्माण झाला होता. झी टिव्हीवरील प्रसिद्ध `जीना इसी का नाम’ या शोचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. या शोमध्ये त्यांनी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलाखतही घेतली होती. सत्यजित रे, मुज्जफर अली, हृषिकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत फारुक शेख यांनी काम केले होते. शबाना आझमी, दीप्ती नवल अशा अभिनेत्रींसोबत फारूक शेख यांची जोडी अधिक गाजली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळेपणा होता. त्यांची विनोदशैली आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची वृत्ती यासाठी फारुक शेख यांची ओळख होती.
फारुख शेख निव्वळ कलाकार नव्हते, तर माणुसकी जपणारे कलाकार होते. एक अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, प्रचंड अभ्यासू कलावंत, असे फारुख शेख यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निरागस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय या गुणांमुळे समांतर चित्रपटांत काम करतानाही फारुख शेख सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे ‘नायक’ बनलेले होते. फारुख शेख यांचे २७ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 28, 2017
राष्ट्र सेवादलाच्या कार्यालयात मोठमोठ्या व्यक्ती येत असत त्यांना जवळून पाहता यावे म्ह्णून दादा सेवादलामध्ये भरती झाले. दादा त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम भागही घेऊ लागले आणि तेथेच त्यांची निळू फुले आणि राम नगरकर यांच्याशी मैत्री झाली.
August 17, 2021
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या सुनील अभ्यंकर यांना नाटकात भूमिका करणेच अधिक आव्हानात्मक वाटते. अभिनयाचा खरा कस हा रंगमंचावरच लागतो असे त्यांचे मत आहे. त्यांच्या वाट्याला आता पर्यंत विनोदी अंगाने जाणाऱ्या भूमीकाच आल्या असल्यातरी त्यांना गंभीर भूमीका करणेही आवडते. एका गंभीर भूमिकेच्या प्रतीक्षेत ते आहेत. तसेच खलनायकी ढंगाची भूमिका करणेही त्यांना आवडते. मात्र अद्याप त्यांना तशी संधी मिळालेली नाही.
June 17, 2022
उस्तादजींना त्यांच्या वडीलांकडून अनेक वाद्याचे प्रशिक्षण मिळाले पण ते सरोदकडे जास्त आकर्षित झाले .त्यांचे वडील अलाउदिन खान कडक शिस्तीचे होते. पहाटेच त्यांचे संगीताचे धडे सुरु होत ते अठरा तास चालत. उस्तादजी तबला आणि पखवाज त्यांच्या काकांकडून आफताबुददीन खान यांच्याकडून शिकले. सुप्रसिद्ध सरोद वादक तामीर बरन आणि सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडेही शिकले त्यावेळी ते शिबपूर येथे येत असत.
July 20, 2021
ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेले थॉमस त्यांच्या आयुष्याची शेवटची पंचावन्न वर्षे भारतातच राहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केलेल्या थॉमस कँडी यांनी भावाच्या मदतीने कॅप्टन मोल्सवर्थचे अर्धवट राहिलेले इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे काम पूर्ण केले.
February 26, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti