(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्वरसम्राज्ञी तथा अभिनेत्री कीर्ती शिलेदार

    कीर्ती शिलेदार ह्या जयराम व जयमाला शिलेदार यांच्या कन्या. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले. कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले.

    संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली.

    संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत. रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे.

    संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात.

    कीर्ती शिलेदार यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    कीर्ती शिलेदार यांची गाजलेली नाटके
    ‘अभोगी’, ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्र’, ‘द्रौपदी’, ‘भेटता प्रिया’, ‘मंदोदरी’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘ययाति आणि देवयानी’, ‘रंगात रंगला श्रीरंग’, ‘रामराज्यवियोग’, ‘रूपमती’, ‘विद्याहरण’, ‘शाकुंतल’, ‘शारदा’, ‘श्रीरंग प्रेमभंग’, ‘संशयकल्लोळ’.

      August 16, 2017


  • ख्यातनाम गीतकार  समीर अंजान पांडे ऊर्फ शीतल पांडे ऊर्फ  समीर

    आज हिंदी चित्रपटसृष्टीतील २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी सर्वाधिक ३,४०० गाणी लिहिल्याबद्दल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदले गेलेले ख्यातनाम गीतकार #समीर_अंजान_पांडे ऊर्फ शीतल पांडे ऊर्फ #समीर यांचा वाढदिवस.

      March 1, 2024


  • महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे

    महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी गावदेवी, मुंबई येथे झाला. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान. त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय. कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन. या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला. चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव मा.पु. ल. देशपांडे यांच्यावर होता. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ म्हणत असत. मा.'पु लं'चे शालेय शिक्षण पार्लेच्या टिळक विद्यालयात झाले. व पुढील शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात आणि विलिंग्डन महाविद्यालयात झाले. भास्कर संगीतालय येथील दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे (पेटी) धडे घेतले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले.

    पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’ म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले. सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वार्यायवरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं. राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला. १९४७ ते १९५४ या काळात ते चित्रपटात रमले. ’वंदे मातरम्‌‘, ’दूधभात‘ आणि ’गुळाच्या गणपती‘त ते त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रसिद्धीस आले. म्हणजे चित्रपटाचे कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे असे.

    १९४७ सालच्या मो.ग.रांगणेकरांच्या ’कुबेर‘ या चित्रपटाला संगीत देऊन पु.ल.देशपांडे संगीत दिग्दर्शक झाले. चित्रपटातील गाणी त्यांनी म्हटली होती. आता ते पार्श्वगायकही झाले होते. वंदे मातरम्‌मध्ये पुल व त्यांच्या पत्नीय सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पु.ल. गायक असलेले नायक होते. त्या भूमिकेमुळे पु.ल. चित्रपट‌अभिनेते झाले. पु.ल.देशपांडे यांचा ’देवबाप्पा’ चित्रपटसृष्टीत अविस्मरणीय ठरला. ’नाच रे मोरा’ हे अवीट गोडीचे गाणे अजूनही मुलांचे आवडते गाणे आहे. ’पुढचं पाऊल‘ या चित्रपटात त्यांनी ’कृष्णा महारा‘ची भूमिका केली, आणि ते अभिनयसंपन्नट नट म्हणून प्रसिद्धीस आले. पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं असत. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय होते. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. ते उत्तम संवादिनी वादक होते. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणार्या मा.पु. ल. व सुनीताबाई यांनी बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. मा.पु. लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. पु. ल. देशपांडे यांचे १२ जून २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      June 12, 2017


  • गणिती शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे उर्फ पां. वा. सुखात्मे

    पुण्यात स्थायिक झाल्यावर आपल्या ज्ञानाचा गोरगरीबांना उपयोग करवून देण्याचं ठरवलं. कारण विलायतेहून आल्यावर त्यांना महा. पं. मदनमोहन मालवीय यांनी ‘आपल्या गरीब देशाला तुमच्या ह्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल?’ विचारलेला हा प्रश्न कायम त्यांच्या कानात गुंजारव करीत होता.

      January 28, 2022


  • लक्षवेधी – स्वप्नाली पाटील

    साधारणपणे दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ – २००८ साली ठाण्यातल्या घंटाळी मंदिरात मी आणि स्वप्नाली पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलो. निमित्त होतं गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या एका शूटचं. या मंदिराच्या आवारात असलेल्या डौलदार झाडांच्या बॅकग्राऊंडला आम्ही शूट करत होतो. मराठमोळी संस्कृती उठून दिसावी असाच पेहराव स्वप्नालीचा होता. लाल रंगाची नक्षीदार साडी, नाकात नथ, लाल रंगाची मोठाली टिकली, अंबाडा त्यावर हळुवारपणे सजलेला मोगऱयाचा गजरा आणि या सगळ्यात तिचा खुललेला चेहरा. हे सारं काही कॅमेऱयात बंदिस्त करण्याची माझी धडपड सुरू होती. अत्यंत प्रसन्न वातावरणात आमचं शूट तासाभरात पार पडलं.

      March 23, 2019


  • ज्येष्ठ पत्रकार दिनेश केळुसकर

    त्यांनी ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. कोकणासह राज्य, देशातीलही अनेक धांडसी विषयांचे कव्हरेज दिनेश केळुसकर यांनी केले आहे.

      March 16, 2022


  • चिंतामणराव कोल्हटकर

    चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. त्यांचा जन्म १२ मार्च १८९१ रोजी नेवरे रत्नागिरी येथे झाला.चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अभ्यासात अधिक गती नसल्याचे पाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात असलेली शेती केली. सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले आणि १९१८ मध्ये दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्या समवेत स्थापन केलेल्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’पर्यंतचा साराच इतिहास मोठा संघर्षमय, रोमांचकारी आणि अद्‌भुत असाच आहे. कोल्हटकर १९११ मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. १९१४ साली ते किर्लोस्कर नाटक मंडळीत आले. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. १९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी बलवंत नाटक कंपनी काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक प्रकारची कामे केली.

    कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, इ. नाटके खूप गाजली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले. राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, अशा अनेक नामवंत नाटककारांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणली. चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या बळवंत संगीत मंडळीतर्फे उत्तमोत्तम नाट्यकृती सादर केल्या आणि गद्य आणि पद्य यांचा अपूर्व साक्षात्कार रंगभूमीवर घडवला. १९३३ च्या सुमारास मराठी संगीत रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला. तेव्हा चिंतामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. मा.चिंतामणराव कोल्हटकरांनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्च र्समध्ये रूपांतर केले. पण त्यांना या व्यवसायात प्रचंड खोट बसली. कोर्टकचेर्यास, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पाहून आणि आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागण्यासारखी मानहानी झाल्याने ते चित्रपट व्यवसायातून बाहेर पडले आणि परत नाटकाकडे वळले. चिंतामणरावांनी पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले.

    अखेरीस त्यांनी ललित कला कुंज नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले. कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या माझे नाटककार या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक १९६६ मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला. त्यांचा मुलगा मा.चित्तरंजन कोल्हटकर हे सुद्धा नाट्यअभिनेते होते. चिंतामणराव यांच्या नात आणि मा.चित्तरंजन कोल्हटकर यांची ज्येष्ठ कन्या, मा.विनीता करमरकर यांनी मा.चिंतामण कोल्हटकर यांचे बलवंत चिंतामणी या नावाने चरित्र लिहिले आहे. मा.विश्राम बेडेकर, मा.पु.ल. देशपांडे, मा.चंद्रकांत गोखले, मा.वसंत शिंदे, मा. शांता जोग हे सर्व मा.चिंतामण कोल्हटकर यांचे नाट्यक्षेत्रातले शिष्य म्हणून पुढे नावारूपाला आले. मा.चिंतामणराव कोल्हटकर १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५ व्या, आणि १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला होता. चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    चिंतामणराव कोल्हटकर यांनी कामे केलेली नाटके
    आंधळ्यांची शाळा, आशीर्वाद, एकच प्याला, कमला, काकाची शशी, कांचनगडची मोहना, जग काय म्हणेल, झुंझारराव, तानसेन, तुकाराम, तोतयाचे बंड, त्राटिका, द्रौपदी, नेकजात मराठा, पाणिग्रहण, पुण्यप्रभाव, प्रेमध्वज, बेबंदशाही, ब्रह्मकुमारी, भाऊबंदकी, भाग्यवान, भावबंधन, माते तुला काय हवंय?,
    मानाजीराव, मानापमान, रणदुंदुभी, राजमुकुट, राजसंन्यास, विद्याहरण, वैजयंती, शिवसंभव, संन्यस्त खड्ग, संशयकल्लोळ, सोन्याचा कळस, स्वयंसेवक, हॅम्लेट, हाच मुलाचा बाप, हिरवा चुडा.

      March 12, 2017


  • १० मे – कवी ग्रेस यांची जयंती

    कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी...'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.

    माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८ पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते. ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. 'छंद', 'सत्यकथा' या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'संध्याकाळच्या कविता' प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कविता संग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली.त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली. यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६) आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते. मा.ग्रेस हे विलक्षण आत्ममग्न कवी होते. ग्रेस एक बेट आहे आणि या बेटाला समजून घेण्यासाठी त्या बेटावरच यावे लागते असे मा.ग्रेस वारंवार म्हणायचे. मा.ग्रेस यांचे मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे. मा.ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. 'चर्चबेल' हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'मितवा', 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', 'मृगजळाचे बांधकाम', 'वाऱ्याने हलते रान', 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. " मा.माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून 'ग्रेस' हे नाव धारण करण्यामागे कारण ठरली ती लोकप्रिय पाश्चात्त्य अभिनेत्री इन्ग्रीड बर्गमन. 'द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस' या चित्रपटात इन्ग्रीडसंबंधी 'शी इज इन ग्रेस' असं वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि आपल्याला प्रतिभेचा पहिला साक्षात्कार झाला, असं ग्रेस यांनी म्हटलं आहे. इन्ग्रीडचे ऋण आठवणीत राहावं यासाठी त्यांनी कायमस्वरूपी 'ग्रेस' हेच नाव लावलं. स्वतःला त्यांनी दुःखाच्या स्वाधीन केले होते. त्याबाबतीत त्यांनी म्हटलेले आहे, "मी महाकवी दुःखाचा म्हणत, दुःखाचा धागा विणताना, दगडाचे माझ्या हाती, वेगाने फूल होते'. मा.ग्रेस यांच्या ‘ती आई होती म्हणुनि...’ या गीताबद्दल, मा.ग्रेस यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, त्यांना ही कविता सुचली. त्यांच्या विषण्ण मनाने ही कविता लिहिली. ग्रेस यांच्या कवितेतल्या शब्दांना हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांनी साद घातली आणि एक अजरामर गीत जन्माला आलं...

    ती गेली तेव्हा रिमझिम
    पाऊस निनादत होता
    मेघात अडकली किरणे
    हा सूर्य सोडवीत होता...

    पावसाचा रिमझिम निनाद दु:खाचा सांगावा घेऊन येणारा...आई गेल्यानंतरचं पोरकेपण सांगणारा...जाणारी ती आई होती म्हणून घनव्याकूळ करणारा... हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांमधून ग्रेस यांची ही कविता ऐकताना आपल्या मनाची अवस्था कशी होते हे सांगण्यासाठी शब्द बापुडे होतात. पावसाच्या प्रत्येक थेंबात दु:ख ठिबकत राहावं ना, अगदी तसच वाटत राहतं. त्यांच्या इतर ''भय इथले संपत नाही'',घर थकलेले संन्यासी '',पाऊस कधीच पडतो''अशा या सुंदर कवितांना ही हृदयनाथ यांनी आपल्या सुरेल स्वरांच्या कोंदणात बसवून अजरामर केले आहे. ग्रेस यांच्या ''संध्याकाळच्या कविता''या संग्रहाला १९६८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे ''कवी केशवसुत''पारितोषिक मिळाले .त्यांच्या ''वाऱ्याने हलते रान'' या ललितबंध संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.२०१२ साली ''युनिक फीचर्स ''ने आयोजित केलेल्या ''दुसऱ्या मराठी ई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय गुणी व प्रतिभाशाली संगीतकार रोशन हे ग्रेस यांचे आवडते संगीतकार. 'चर्चबेल' या ललित गद्याच्या पुस्तकात ग्रेस यांचा 'रोशनची गाणी' या शीर्षकाचा अतिशय सुंदर लेख आहे. त्यात सुरवातीलाच ग्रेस म्हणतात, 'मी रोशनचे छायाचित्र पाहिले आहे, पण त्याला भेटू शकलो नाही. भेटायची खूप इच्छा होती. अशा ब-याच गोष्टी राहून गेल्या आहेत; राहून जातात. मृत्यू असं काही करुन जातो.' ग्रेसनी, रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या 'बहुबेगम' चित्रपटातील कव्वालीतील वाकिफ़ हूं खूब इश्क की तर्जे-बयां से मैं, ऐसे में तुझको ढूंढके लाऊं कहां से मैं! या ओळी उद़्धृत करुन, रोशनना आदरांजली वाहिली होती. ग्रेस यांचे २६ मार्च २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ग्रेस यांचे कवितासंग्रह
    संध्याकाळच्या कविता (१९६७)
    राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
    चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
    सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
    सांजभयाच्या साजणी (२००६)
    बाई! जोगिया पुरुष (२०१२)

    ललितबंध संग्रह
    चर्चबेल (१९७४)
    मितवा (१९८७)
    संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
    मृगजळाचे बांधकाम (२००३)
    वाऱ्याने हलते रान (२००८)
    कावळे उडाले स्वामी (२०१०)
    ओल्या वेळूची बासरी (२०१२)

    ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस होता
    https://youtu.be/pM3eOOP786w
    भय इथले संपत नाही.
    https://youtu.be/x88r7JI4ljU
    तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं
    https://youtu.be/e_-9GiAMInY

      May 10, 2017


  • जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर

    जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले.

    सुरवातीला जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. त्याच दरम्यान "हमीदाबाईची कोठी' या नाटकामध्ये भूमिका केली व मोठे यश मिळाले. अगदी सुरवातीला "दमन', "गड जेजुरी जेजुरी' आदी चित्रपटांमध्ये काम केले. रंगभूमीवर आपला ठसा उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे.

    नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्तीस ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे आणि सलाम बॉम्बे या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळायला सुरुवात झाली नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. अंधायुद्ध, परिंदा, अंगार, तिरंगा, क्रांतिवीर, वजूद, अब-तक-छप्पन, अटॅक ऑफ २६११, गुलाम-ए-मुस्तफा, टॅक्सी नं. ९२११, यशवंत, युगपुरुष, खामोशी, अपहरण, वेलकम, हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.

    नाना पाटेकर यांनी प्रहार चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना भारतीय सैनिकांसोबत दिवस राहिले होते. विशेष म्हणजे ते त्यावेळी ते कलाकार म्हणून नाही तर एक सैनिक म्हणून राहिले होते.नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून प्रहार मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील. प्रहार या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले.

    १९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अपहरण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले. बंगाल फिल्म पत्रकारिता संघातर्फे बेस्ट ऍक्टर पुरस्कार अबतक छप्पन या चित्रपटातील भूमिकेकरिता मिळाला. इतरांपर्यंत संवाद फेकण्याची त्यांची शैली. या क्षणी त्यांच्या चेहर्या वर येणारे चढउतार नैसर्गिकच. मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्याटवर येणारा संताप सहजरीत्या त्यांच्या अभिनयातून आपणास पहावयास मिळते. ही व यासारखी अनेक चित्रपटांतून त्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले.

    हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिडीकिंग म्हणवणारे दिलीपकुमार, अभिनय सम्राट राजकुमार आणि यँग्री यंग मॅन अभिताभ बच्चन यांचीही अभिनयशैली निराळी, या महान नायकांच्या अभिनयक्षमतेला नानांची अभिनयक्षमताच टक्कर देऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. ‘खामोशी’ चित्रपटातील नाना पाटेकरांची भूमिका अगदी वेगळीच. जिवंत अभिनय आपणास त्यांच्या चित्रपटातून पहावयास मिळतात. टेलिव्हीजन कार्टून मालिका ‘जंगल बुक’ याकरिता स्वतःचा आवाज दिला. यशवंत, आंच, वजूद या चित्रपटातून त्यांनी गाणी ही गायली. नाना पाटेकर यांचा अभिनय असलेला डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे प्रेरणादायी कार्य सांगणारा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट नक्की बघावा. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला नाना पाटेकरचा 'नटसम्राट' शिरवाडकर यांचे 'नटसम्राट' या चित्रपटात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका पेलणारे नाना पाटेकर यांनी ती भूमिका अतुच्य कळसावर नेऊन ठेवली. नानांनी देऊळ चित्रपटात पण सुंदर भूमिका केली आहे. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या नाना यांना भारत सरकाने ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवले आहे.

    पत्नी निलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हा त्यांचा परिवार. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये मकरंद अनासपुरे याच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतक-यांना मदत करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 1, 2019


  • बॉलिवूडमधील ‘काश्मीर की कली’ शर्मिला टागोर

    शर्मिला टागोर यांचे वडील गितेन्द्रनाथ टागोर एल्गिन मिल्स चे महाप्रबंधक होते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९४६ रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून हिंदी सिनेमात अभिनयाला सुरुवात केली. १९५९ सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटा पासून आपले फिल्मी करियरची सुरवात केली. शर्मिला टागोर बॉलिवूड मध्ये अनेक ट्रेंड सुरु करणारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सिनेमांत पहिल्यांदा बिकिनी शॉट देणारी पहिली अभिनेत्री म्हणूनसुध्दा त्यांना ओळखले जाते. १९६० मध्ये शर्मिला टागोर यांनी बिकनी घालून बॉलीवूड मध्ये हलचल उडवून दिली.

    भारताला सर्वात प्रथम नोबेल पुरस्काार मिळवून देणा-या रवींद्रनाथ टागोर यांची नातेवाईक असलेली शर्मिला टागोर आणि मन्सू र अली खान पतोडी ही एक आदर्श जोडी म्हीणून गणली जाते. मन्सूीर अली खान पतोडी व शर्मिला टागोर यांची प्रेम कहाणी १९५९ पासून होती या दोघांनी १९६८ च्या डिसेंबर मध्ये लग्न केले. जेव्हा नवाब मन्सूर अली खाँ पतौडी यांनी आपल्या आई साजिदा सुल्तान यांच्याकडे शर्मिला टागोर यांच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली व आपल्या आईकडे शर्मिला टागोर यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र साजिदा सुल्तान या नात्यासाठी तयार नव्हत्या. कारण शर्मिला या बंगाली होत्या.

    लग्नासाठी परवानगी मिळवण्यासाठी साजिदा यांनी नवाब पतौडी आणि शर्मिला यांच्यासमोर एक अट ठेवली. ती म्हणजे लग्नापूर्वी शर्मिला यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा. धर्मांतर करुनच त्या नवाब पतौडीसोबत लग्न करु शकतील, असे त्यांनी म्हटले. शर्मिला यांनी ही अट मान्य केली आणि लग्नापूर्वी त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. यासाठी त्यांचे नाव बदलून आयशा सुल्तान असे ठेवण्यात आले. असे सांगितले जाते की १९६७ मध्ये मन्सूेर पतोडी यांची आई साजिदा सुल्तान शर्मिलाला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. तेव्हा शर्मिला टागोर यांचा बहुचर्चित 'एन इव्हिनिंग इन पेरिस' सिनेमा प्रदर्शित होणार होता. या शर्मिला यांनी बिकिनी परिधान केली होती.

    शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर मुंबईमध्ये ठिक-ठिकाणी लागले होते. शर्मिला टागोर यांना नवीब पतोडी यांच्या आई मुंबईला येणार याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर लागलेले बिकिनी पोस्टर्स काढून टाकण्यास सांगितले होते. शर्मिला टागोर यांना भिती वाटत होती, की हे पोस्टर्स पाहून नवाब पटौदी यांची आई नाराज होऊ नये. १९६६ मध्ये फिल्मफेयर मॅगझिनच्या ऑगस्ट महिन्याच्या कव्हरवर शर्मिला टागोर बिकिनी परिधान करून झळकल्या होत्या. भारतीय प्रेक्षकांनी प्रथमच अभिनेत्रीला बिकिनीमध्ये पोज देताना पाहिल्याने एकच खळबळ माजली होती. वाद एवढा वाढला की, संसदेतही या मुद्द्यावरून रणक्रंदन झाले.

    शर्मिला टागोर त्या काळातील पहिल्यात अशा अभिनेत्री होत्या, ज्यांनी एखाद्या मॅगझिनसाठी बिकिनी परिधान करून फोटोशूट केले होते. एवढेच नाही, तर फिल्मफेयर मॅगझिनसाठी बिकिनी पोज देणाऱ्या त्या पहिल्या अॅक्ट्रेस बनल्या. शर्मिला टागोर यांच्या आराधना या चित्रपटाला फिल्मफेयर सर्वश्रेष्ट अभिनेत्री अवार्ड व मासूस या चित्रपटाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार ने सम्मानित केले. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांची जोडीला बॉलिवुडची सफल जोडी मानले जाते. दोघांनी ६ सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले ते आराधना, सफर, अमर प्रेम, छोटी बहू, दाग और आविष्कार.

    राजेश खन्ना यांच्यासोबत आराधना हा शर्मिला यांचा बहुचर्चित सिनेमा होता. बेशरम सिनेमात मा.अमिताभ सोबत काम केले होते. २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शर्मिला टागोर सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष होत्या. या पदावर कार्यरत असताना आजच्या काळात होणा-या अंगप्रदर्शनावर त्यांनी चिंता व्यक्त केली होती. आज शर्मिला टागोर चित्रपटापासून लांब असल्या तरी सामाजिक कार्या मध्ये त्यांचे खूप काम आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 8, 2017