गुलाम दस्तगीर बिराजदार हे प्रसिद्ध गझलकार बदीऊज्जमा बिराजदार यांचे वडील होत. पंडित गुलाम यांना राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती यांनी वाचस्पती या पदवीने सन्मानित केले होते. शहाजी हायस्कूल, सोलापूर व मुंबई येथे त्यांनी संस्कृत शिक्षक म्हणून सेवा केली. आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा राष्ट्रपती यांचे हस्ते पुरस्कार मिळाला होता. तसेच विविध संस्थांनी त्यांना महापंडित, पंडितेंद्र, संस्कृतरत्नम, परशुरामश्री, विद्यापारंगत, वाचस्पती अशा पदव्या बहाल केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य, संस्कृत पाठ्य पुस्तक निर्माण बालभारतीचे ते अध्यक्ष होते.बिराजदार यांना १८ हून अधिक पुरस्कार मिळालेले होते.
April 22, 2022
मराठी अभिनेत्री गिरिजा ओकचा जन्म २७ डिसेंबर १९८७ रोजी झाला. हिंदी-मराठी चित्रपट तसेच मराठी मालिका आणि नाटक यातून मोजक्याच पण उत्कृष्ट भूमिका सादर करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री गिरिजा ओक ही प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची कन्या. १५ वर्षाची असताना मोठ्या तिने पडद्यावर पदार्पण केले. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे.
गिरिजा ओक चा विवाह सुरुद गोडबोले बरोबर झाला आहे. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळे मडगुळे' या चित्रपटांत तिने काम केले आहे. 'लज्जा' या झी मराठी वरिल मालिका हि तीची पहीली मालिका होती. जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा सर्व माध्यमात अभिनेत्री गिरीजा ओकने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
December 27, 2018
किस्सा असा आहे की बिली बावडनला झालेला तो आजार म्हणजे rheumatoid arthritis म्हणजेच संधिवात. बिलीला संधिवाताने ग्रासले अणि त्याला स्नायूंच्या हालचाली करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे त्याला इतक्या तरुण वयात क्रिकेट सोडावे लागले. पुढे बिली अंपायर झाला अणि तिथे सुद्धा त्याला संधिवाताचा त्रास होऊ लागला. त्याला पटकन हात वरती करता येत नाहीत, एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहिले की त्याला परत हालचाल करणे कठीण जाते. अंग दुखू नये म्हणून त्याला थोड्या थोड्यावेळाने स्ट्रेचिंग करण्याचे डॉक्टरांचे निर्देश आहेत. आता बिली परत त्याचे काम सोडू शकत नव्हता. यावेळेस त्याने लढायचे ठरवले आणि त्याने त्याच्या अंपायरिंग मध्ये कराव्या लागणाऱ्या हालचालींमध्ये काही कल्पक बदल केले.
April 11, 2022
जगातील पहिली व सर्वात चलाख महिला हेर माता हारी यांचा जन्म ७ ऑगस्ट १८७६ रोजीनेदरलँडमधील लियुवर्डेन या छोट्या गावी झाला.
गुप्तहेरांच्या विश्वामध्ये नेहमीच पुरुषांचे नाव पहिले घेतले जाते. म्हणजे बहुतेकांना केवळ असेच वाटत असेल की गुप्तहेरी फक्त पुरुषच करायचे, स्त्रिया नाही, असा समज असले तर तो एक गैरसमजच म्हणावा लागेल, कारण स्त्री हेरांनी देखील गुप्तहेर जगात अगदी निनादून सोडलं होतं. या स्त्री हेरांमध्ये सर्वात पहिलं नाव कोणाच घेतलं जातं असेल तर माता हारी हीचं!
जगभरातील महिला गुप्तहेरांमध्ये माता हारीचा उल्लेख नाही असं होणारच नाही!
माता हारी हे त्यांच टोपण नाव. एका डच कुटुंबात या असिम सौदर्यवतीचा जन्म झाला. त्यांच खरं नाव होतं गेरत्रुद मार्गरेट जेले. पुढे काही काळ त्यांनी पॅरीस मध्ये व्यतीत केला. त्यांचे सौदर्य आणि अद्कारी लाजवाब होती. त्या उत्तम नृत्यांगना देखील होत्या आणि याच गोष्टीच्या आधारे त्यांनी भल्या भल्या गुप्त मोहिमा लीलया पार पाडल्या होत्या. माता हारी यांना भारतीय नृत्यकले बद्दल खास आकर्षण होतं. त्यांनी भारतीय नृत्यकला आत्मसात केली आणि त्यात त्या पारंगत देखील झाल्या.
आपल्या नृत्यादरम्यान त्या अनेक मादक हालचाली करून समोरच्याच्या काळजाचा ठाव घ्यायच्या. ज्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्तींना त्यांच्याबद्दल आकर्षण होते. “माता हरी” या जर्मन सेनेकडून काम करायच्या. पहिल्या जागतिक युद्धाच्या काळात आपल्या मादक नृत्याने शत्रूसेनेतील अनेक ऑफिसर्सना भुलवून, त्यांच्याशी जवळीक निर्माण करून अत्यंत गौप्यनीय माहित गोळा करण्याचे काम माता हरी यांनी केले. प्रसंगी शरीरीसंबंध ठेवून त्यांना वश करायच्या आणि गुप्त माहित्या काढून घ्यायच्या आणि जर्मन सेनेला पुरवायच्या. माता हारी यांचे पती नेदरलँड्सच्या सैन्यामध्ये कार्यरत होते. तेथून त्यांची इंडोनेशिया मध्ये बदली करण्यात आली होती. त्यांच्या समवेत माता हारी देखील इंडोनेशिया मध्ये आल्या, तेथे येऊन त्यांनी एक डान्स ग्रुप स्थापन केला. याच दरम्यानच्या काळात त्यांनी स्वत:चे माता हारी असे टोपण नामकरण केले.
माता हारीचा मलय अर्थात इंडोनेशियन भाषेमध्ये अर्थ होतो सूर्य! नवऱ्यासोबतच्या रोजच्या भाडंणाला वैतागून त्यांनी घटस्फोट घेतला आणि आपले बस्तान पॅरीस मध्ये हलवले.
पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान माता हारी यांनी अनेक युरोपियन देशांमध्ये प्रवास केला होता. याच वेळेस स्पेनला जाताना इंग्लंडच्या फालमाउथ बंदरावर ब्रिटीश गुप्तहेर संस्थेने त्यांना ताब्यात घेतले. फ्रान्स आणि ब्रिटीश गुप्तहेर संस्थांना शंका होती की माता हारी या जर्मनीला गुप्त माहित्य पुरवतात या आरोपाबद्दलचे त्यांच्याजवळ ठोस पुरावे देखील नव्हतें, तरी माता हारी यांच्यावर डबल एजंटचा आरोप लावण्यात आला. याच आरोपाच्या आधारावर फ्रान्समध्ये १५ ऑक्टोबर १९१७ रोजी माता हारी यांना अखेर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 7, 2021
सुलभा देशपांडे या माहेरच्या सुलभा कामेरकर. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘अविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे कार्य उभारले.
April 29, 2024
आई रिटायर होतेय', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे', 'जाऊ बाई जोरात', 'श्यामची मम्मी', 'एक चावट संध्याकाळ' ही गाजलेली नाटकं, 'हसरतें', 'श्रीमान श्रीमती' या सुपरहिट मालिका आणि 'चौकट राजा', 'झपाटलेला' यासारखे सिनेमे आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारणारे अशोक पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. त्यांचा जन्म ५ जून, १९४८ रोजी झाला.
कथाकार, नाटककार म्हणून १९७१ मध्ये त्यांनी ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही पहिली एकांकिका लिहिली. त्यांनी लिहिलेली पहिली कथा 'नवाकाळ' या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे 'श्री दीपलक्ष्मी', साप्ताहिक मार्मिक' आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. 'झोपा आता गुपचूप' हे त्यांचे पहिले नाटक. 'मुंबई पोर्ट ट्र्स्ट'च्या 'एकटा जीव सदाशिव' या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती. अनुपम खेर यांच्या ’कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी केले होते. अशोक पाटोळे यांची अनेक नाटके हिंदी-गुजरातीतही यशस्वी ठरली आहेत. सातव्या मुलीची सातवी सातवी मुलगी हा कथासंग्रह व पाचोळ्या हा त्यांचा कविता संग्रहदेखील प्रसिद्ध झाला होता. अधांतर, हद्दपार, अध्यात न मध्यात, हसरतें यांसारख्या यशस्वी दूरदर्शन मालिकांचे लेखनही त्यांनी केले होते. अशोक पाटोळे यांचे १२ मे २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 5, 2017
भेंडीबाजार घराण्याची दुर्मीळ झालेली गायकी तीन तपांच्या निरंतर प्रयत्नांनी पुन्हा प्रस्थापित करून ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. समाजातील सर्व स्तरांमध्ये अभिजात संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली.
June 27, 2019
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे ग.दि. माडगूळकर यांचे हे धाकटे बंधू. त्यांचा जन्म ६ जुलै १९२७ रोजी झाला. व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर नोकरीत होते. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी 'माणदेशी माणसे' (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, सीताराम एकनाथ, काळी आई, जांभळीचे दिवस ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत.
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक, आणि सत्तांतर, ह्या त्यांच्या कादंबर्यां उल्लेखनीय आहेत. व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. 'कोवळे दिवस' ह्या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत.
'पुढच पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकेही लिहिली, 'तू वेडा कुंभार', 'सती', 'पति गेले गं काठेवाडी' ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. 'कुनाचा कुनाला मेळ न्हाई' आणि 'बिनबियांचे झाड' ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली.
'प्रवास एक लेखकाचा' या नावाने मा.व्यंकटेश माडगूळकरांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे.
व्यंकटेश माडगूळकर यांचे २८ ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.
श्री.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 28, 2017
निरागस हास्याच्या, अप्रतिम तरीही साध्या सौंदर्याच्या, आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटसृष्टी परिपूर्ण म्हणून नूतनजी ओळखल्या जात. त्यांचा जन्म ४ जून १९३६ रोजी झाला. नूतन यांचे माहेरचे नाव नूतन समर्थ, सासरचे नाव नूतन बेहल. मिलन चित्रपटातलं 'सावन का महिना', सरस्वती चंद्र चित्रपटातलं 'चंदन सा बदन' , कर्मा चित्रपटातलं 'दिल दिया है जान भी देंगे' सुजाता मधलं "जलते है जिस के लिये", बंदिनी मधलं "मेरे साजन है उस पार" आणि दिल ही तो है मधलं "तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही" ही नूतनजीची गाणी खूप गाजली. ही गाणी...व त्यातलं नूतन यांचे ते साधं तरीही सुंदर दिसण...
गौतम राजाध्यक्षांसारखा एक मोठा फोटोग्राफर नूतनला जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असे. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगकाठी आणि उंच बांधा. सगळे असून नूतन सगळ्या चित्रपट सृष्टीसाठी नूतन ताईच राहिली. सीमा, पेइंग गेस्ट, बंदिनी, सुजाता, अनाडी ते सौदागर अशा अनेक सिनेमातील यादगार भूमिका करून गेल्या. नूतन यांचा आवाज चांगला होता; आणि स्वत:ची गाणी स्वत: गावीत असे त्यांना मनापासून वाटायचे॰ त्याच्या आईने निर्माण केलेल्या ” छबिली ” या चित्रपटात इच्छा पूर्ण झाली॰ त्याची त्यातील दोन गाणी बरीच लोकप्रिय झाली; त्यामुळेच त्यांनी सुभाष देसाई या निर्मात्याच्या मागे लागून त्याच्या ती नायिकेची भूमिका करत असलेल्या ” छलिया ” चित्रपटातील गाणी आग्रहाने, हट्ट करून गायली॰ नूतन १९५१ साली ‘ मिस इंडिया ‘ या किताबाची मानकरी ठरली होत्या॰ १९७४ मध्ये केंद्र शासनाने त्यांना ‘पद्मश्री ‘ पुरस्कार प्रदान केला. नूतन यांचे २१ फेब्रुवारी १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 4, 2017
त्यांचं ‘मातीची चूल’ हे आत्मचरित्रही स्पष्ट आणि रोखठोक विवेचनामुळे चर्चिलं गेलं. लहान मुलांसाठी त्यांनी ‘इसापनीती’ आणि ‘हितोपदेश’सारखी पुस्तकं लिहिली. ‘नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर’ हे नाटकही त्यांच्या नावावर आहे.
July 5, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti