(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक श्रीकांत देशपांडे

    श्रीकांत देशपांडे हे रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचे नातू होत. त्यांचा जन्म १२ जून १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. वसंतराव तथा नानासाहेब देशपांडे यांचा सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या आरंभापासून महत्त्वाचा वाटा होता.

    श्रीकांत देशपांडे यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण सरस्वतीबाई राणे यांच्याकडून घेतले. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांच्याकडेही त्यांनी किराणा घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे तालीम घेतली होती. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ते सहसचिव होते. तसेच या महोत्सवात अनेकदा त्यांनी आपली गायकी सादर केली होती. ते पुणे विद्यापीठाच्या डॉक्टसरेटसाठीच्या (संगीत विषय) प्रवेश समितीवर सन्माननीय सदस्य होते. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी अनेक कार्यक्रम केले होते.

    भारतातून अनेक संगीत परिषदांमधून श्रीकांत देशपांडे यांचे गायन झाले. तसेच रागमाला परफॉर्मिग आर्टस् ऑफ कॅनडा आणि इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनच्या वतीने अमेरिकेसह कॅनडामध्ये त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देशाविदेशात गायनाच्या अनेक मैफली केल्या होत्या. सवाई गंधर्वसंमेलन, तानसेन समारोह, गुणीदास संमेलन, दीनानाथ मंगेशकर संमेलन, सूरश्री केसरबाई संमेलनातही त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले होते. श्रीकांत देशपांडे यांचे २९ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 12, 2017


  • विनोदी अभिनेता जॉनी वॉकर

    जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे.

      June 22, 2021


  • जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे

    महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा अभ्यास करताना माधवराव चितळे हे नाव टाळून पुढे जाता येत नाही. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३४ रोजी औरंगाबाद येथे झाला. नेपाळ, भूतान, बांग्लादेश व पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांबरोबर शांततापूर्ण मार्गाने केलेला पाणीवाटपाचा करार असो, भारताची पहिली राष्ट्रीय जलनीती साकारणं असो, किंवा राष्ट्रीय जलदिन साजरा करण्याची कल्पना राबवणं असो, प्रत्येक टप्प्यावर डॉ. माधवराव चितळे हे नाव, पाण्याशी जोडलेलं आहे.

    डॉ. माधव चितळे यांचे शालेय शिक्षण चाळीसगाव येथे झाले. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून दुस-या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर माधव चितळे यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासहित बी.ई. सिव्हिलची पदवी प्राप्त केली.

    माधव चितळे यांनी १९९२ पर्यंत सरकारी नोकरीच्या माध्यमातून आणि निवृत्तीनंतर अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात योगदान दिले आहे. पुण्यात पानशेत धरण फुटल्यानंतर पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी त्यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पुढे नगरचा मुळा प्रकल्प, मुंबईचा भातसा प्रकल्प येथेही अभियंता म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर कोयनेच्या भूकंपानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणून कोयनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांची नियुक्ती चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे झाली. पुढे प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वुड्रो विल्सन स्कूलच्या आंतरराष्ट्रीय व सामाजिक व्यवहाराच्या अभ्यासक्रमासाठी चितळे यांचं नाव सुचवलं गेलं.

    १० वर्षे जबाबदारीच्या पदांवर काम केलेल्या लोकांमधून जगभरातील ४० व्यक्तींची निवड या अभ्यासक्रमासाठी केली जाते. चितळे यांची या मुलाखतीतून निवड झाली. प्रिन्स्टनमध्ये त्यांनी 'सर्वोत्तम पर्विन फेलो' हा सन्मान पटकावला. त्यापुढील काळात दिल्लीत केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

    ५ वर्षांच्या या दिल्लीतील नियुक्तीचा काळ संपत येत असतानाच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जलसंपदा मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली. जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असतानाच सामान्य जनतेच्या मनात पाण्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून चितळे यांनी जल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला फक्त दिल्लीत साजरा होणारा हा जल दिवस पुढे १९९२ साली भारतभरात १२०० ठिकाणी साजरा झाला. सरकारी सेवेतून निवृत्तीनंतर १ जानेवारी १९९३ रोजी आंतरराष्ट्रीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे सरकार्यवाह म्हणून माधव चितळे यांची नियुक्ती झाली.

    जलसंधारण आणि जलसंपदेबाबत जनजागरण या क्षेत्रांमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना १९९३ सालच्या स्टॉकहोम वॉटर प्राईझ या पाण्याचे नोबेल पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जलसंधारणाबरोबरच अन्यही अनेक क्षेत्रांत चितळे यांचे समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे. औरंगाबाद येथे वाल्मीकि रामायणावर त्यांनी दिलेली ८८ प्रवचने पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाली आहेत. भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेच्या प्रसारासाठीही ते काम करीत असतात.

    माधव चितळे यांचा विवाह आशा पटवर्धन (विजया चितळे) यांच्याशी झाला. आशा पटवर्धन विद्यार्थीदशेत स्वतः उत्तम खेळाडू, संगीत विशारद व सुवर्णपदक विजेती होत्या. विजया चितळे यांनी त्यांच्या माधव चितळे यांच्या बरोबरच्या सहजीवनावर 'सुवर्णकिरणे' या नावाने पुस्तक लिहिले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.

    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      August 8, 2021


  • ज्येष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर

    मीनाक्षी शिरोडकर यांनी १९३८ मध्ये ब्रम्हचारी चित्रपटात दिलेल्या या बोल्डसीनची चर्चा त्याकाळी रंगली नसती तरच नवल. स्वीमसूटमधील दृश्यामुळे मीनाक्षी यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. रेडिओपासून सुरुवात केलेल्या मीनाक्षी शिरोडकर यांनी कालांतराने चित्रपटात भूमिका स्वीकारल्या. आचार्य अत्रेंनी त्यांचं ‘रतन’ हे नाव बदलून ‘मीनाक्षी’ केलं.

      June 3, 2022


  • डिसिल्व्हा अंकल

    डिसिल्व्हा अंकल… छायाचित्रणाची आवड… आयकर विभागातील सुरक्षित नोकरीत स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याच्या निर्णयातून खऱया अर्थाने त्यांची छायाचित्रकारिता फुलली…

      November 8, 2018


  • विख्यात व्हायोलीन वादक व गायक पं गजाननबुवा जोशी

    विख्यात व्हायोलीन वादक व गायक मा. पं गजाननबुवा जोशी यांचा जन्म ३० जानेवारी १९११ रोजी झाला.

    ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा ह्या तीनही घराण्याच्या गायकीवर एकाच वेळी प्रभुत्व मिळवून त्याच वेळी एक विख्यात व्हायोलीन वादक म्हणूनही किर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त केलेले पं. गजाननबुवा जोशी ह्यांनी शास्त्रीय संगीताच्या विश्वात आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे एक गौरवशाली असे स्थान निर्माण केले आहे.

    हातचे राखून न ठेवता आपल्याकडचे सारे शिष्यांना देणाऱ्या गुरूंपैकी गजाननबुवा एक होते. संगीताचा विद्यार्थी म्हणूनच जगायचे, वावरायचे हेच त्यांचे ध्येय होते, त्यामुळे शेवटपर्यंत ते विद्यार्थी म्हणूनच वावरले, जगले व शिकत राहिले. दौऱ्याहून परतल्यानंतर आपले अनुभव सांगतील म्हणून सगळे उत्सुक असायचे, पण बुवा खिशातून एखादा कागदाचा कपटा काढून त्यावर लिहून आणलेली बंदीश शिकविण्यात दंग होऊन जायचे. वाळूतून तेल निघेल एवढी मेहनत घेणाऱ्यांपैकी गजाननबुवा एक तालिया होते. स्वरांचा सच्चा असलेला हा माणूस व्हायोलिन केवळ वाजवतच नसे, तर त्यांचे व्हायोलिन गात असे. गाणे बोलायचे नाही तर ते गाण्याशी बोलायचे, असा हा आदळआपट न करणारा महान तालिया होता.

    गजाननबुवा जोशी यांचे २८ जून १९८७ निधन झाले. गजाननबुवा जोशी यांचे दुर्मिळ रेकॉर्डिंग इंटरनेटवर उपलब्ध आहे.

    http://www.gajananbuwajoshi.com

    -- संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      June 28, 2017


  • अभिनेत्री रिंकू राजगुरू

    अभिनेत्री रिंकू राजगुरूचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला.

    ‘सैराट’ या एकाच चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये रिंकूने 'आर्ची'ची व्यक्तिरेखा साकारली. या चित्रपटाने तिला अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळवून दिली. आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणाऱ्या नायिकेपेक्षा अत्यंत विपरीत अशी नायिका रिंकूनं या चित्रपटात साकारली आणि प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं. रिंकू राजगुरू मूळची सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजची. तिचे खरे नाव प्रेरणा महादेव राजगुरू.

    अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नसताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला निवडले आणि या संधीचं रिंकूनं सोनं केलं. ‘सैराट’चा पुढे कन्नडमध्येही रिमेक झाला. तसेच हा चित्रपट कालांतरानं हिंदी भाषेतही आला. ‘सैराट’मधील अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'सैराट'च्या सुपरडुपर यशानंतर 'कागर' हा रिंकू राजगुरुचा दुसरा सिनेमा यायला बरेच दिवस लागले. ‘कागर’ या तिच्या चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. परंतु, तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. तिने ‘झुंड’ व ‘मेकअप’चित्रपटामध्ये काम केले आहे.

    रिंकू राजगुरूने गेल्या वर्षी वेबविश्वात पदार्पण केले आहे. रिंकु राजगुरूने ‘हंड्रेड’या हॉट स्टारवरील वेबसीरिज मध्ये लारा दत्ता सोबत काम काम केले आहे. या वेबसीरिज मध्ये एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या नेत्राने (रिंकू राजगुरू) अन्य मुलींप्रमाणेच अनेक स्वप्न पाहिली असतात. यात स्वित्झर्लंडला जाण्याचं स्वप्न नेत्राने मनाशी अगदी कवटाळून धरलं असतं. मात्र तिच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडतो ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. याच काळात तिची भेट एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी (लारा दत्ता) होते आणि या कथेला नवं वळण मिळतं. एका सर्व सामान्य कुटुंबात वाढलेली नेत्रा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन वाट धरते. या वाटेत तिला कोणकोणत्या अ़डचणी येता, ती स्वप्न कसं पूर्ण करते, ही या वेबसीरिजची कथा आहे. रिंकू राजगुरू लवकरच ‘आठवा रंग प्रेमाचा’नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      June 3, 2022


  • ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ

    एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती.

      January 5, 2022


  • झीनत अमान

    ग्लॅमरस दिसणं म्हणजे नक्की काय, हे आपण जेव्हा जेव्हा झीनत अमान ला पाहतो तेव्हा आपल्याला कळतं. हिंदी चित्रपट सृष्टीत एका पेक्षा एक सौंदयवती ने आपल्या सौंदर्याचे मोहिनी घातले, आपला फॅशन सेन्स आणि पडद्यावरील ड्रॅमॅटिक भूमिकांमुळे सदैव चर्चेत राहणा-या झीनत अमान यांचे खरे आयुष्यही तसेच ड्रॅमॅटिक होते. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५१ रोजी झाला. १९७० साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी करणा-या झीनत अमान यांनी लॉस एंजलिसमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. झीनत अमान यांनी मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९७१ साली ओ.पी. राल्हन यांच्या 'हलचल' या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९७० मध्ये झीनतने वेस्टर्न लूकचा ट्रेंड स्थापित केला. ७० च्या दशकात झीनत यांची लोकप्रियता इतकी होती की, प्रत्येक मॅगझिनच्या कव्हरपेजवर त्या झळकत होत्या. सुरुवातीच्या काळात झीनतला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. मात्र नंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये सेक्स सिम्बॉल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. सिनेमांत त्याकाळी हुक्का आणि सिगारेट ओढणे खूप मोठी गोष्ट होती. झीनतने 'हरे रामा हरे कृष्णा'मध्ये हुक्का आणि सिगारेट ओढले होते.

    १९८० साली 'अब्दुल्लाह'च्या सेटवर झीनत आणि संजयची भेट झाली. फिल्म इंडस्ट्रीत अशीही चर्चा होती, की संजय आणि झीनत यांचे लग्न झाले होते. मात्र काही सूत्र या बातमीचे खंडन करतात. काही काळानंतर या दोघांच्या अफेअरबद्दल संजयची पत्नी झरीनला समजले होते. मात्र कालांतराने संजय आणि झीनत यांच्यात वाद होऊ लागले. झीनत यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "मला लग्न करायचे होते, फॅमिली हवी होती, मजहरमध्ये ती क्वालिटी नसतानाही मी त्याला लाईफ पार्टनर म्हणून निवडले." १९८५ साली झीनत आणि मजहर यांचे लग्न केले. त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र मजहर आणि झीनतचे वैवाहिक आयुष्य सुखी नव्हते. असे म्हटले जाते, की मजहर तिला मारहाण करायचे. त्रासाला कंटाळून झीनतने मजहरबरोबर घटस्फोट घेतला. सप्टेंबर १९९८ मध्ये मजहर खानचे निधन झाले. संजय खान आणि झीनतचे अफेअर बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होते. मात्र संजय खान विवाहित होते. शिवाय त्यांना तीन मुलेही होती.

    राज कपुर हे सत्यम शिवम सुंदरम साठी, राज कपुर एक बोल्ड व्यक्तीमत्वाच्या शोधात होते. असे सांगितले जाते कि झीनत अमान ने आपण किती बोल्ड आहोत हे सिध्द करण्यासाठी जेव्हा राज कपुर ने सांगितले, तेव्हा झीनत ने न्हाणी घरातुन एक बादली पाणि आपल्या अंगावर ओतुन घेऊन थेट राज कपुरांच्या समक्ष उभी राहिली होती, तिथेच तिचे सत्यम शिवम सुंदरम मध्ये वर्णी लागले. सत्यम शिवम सुंदरम मध्ये झीनत ने एकदम नॉन ग्लॅमरस रोल केले, पण एकच गाणं आहे, "चंचल कोमल निर्मल", या गाण्यात त्यांनी अंग प्रदर्शन तर केलेच आहे, पण पुर्ण चित्रपटात असणारे डिग्लॅम लुक तिने ह्या गाण्यात भरुन काढले आहे.

    संपूर्ण कारकिर्दी दरम्यान झीनत अमान यांना "प्रणय प्रतीक" मानले गेले. तिने 'शालीमार', 'यादों की बारात', 'अजनबी', 'धर्मवीर', 'छलिया बाबू', 'डॉन', 'हीरा पन्ना', 'द ग्रेट गॅम्बलर', 'अलीबाबा आणि चालीस चोर', 'दोस्ताना', 'कुर्बानी', 'राम बलराम', 'लावारिस', 'गोपीचन्द जासूस', 'अशान्ति', 'क्रोधी', 'चोर के घर चोर', 'पु्कार' आदी चित्रपटात भूमिका केली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 19, 2018


  • ज्येष्ठ पत्रकार खंडुराज गायकवाड

    मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संघटनेवर ते अनेक वर्षे पदाधिकारी म्हणून सक्रिय राहीले आहेत.

      June 15, 2022