(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त

    १९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो.

      January 21, 2022


  • इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद स्वामी

    ते गीतेवर सविस्तर प्रवचने करत. प्रभुपाद स्वामींनी वयाच्या ३३व्या वर्षी दीक्षा घेतली व गौंडिय वैष्णव शिकवणुकीसाठी सारे आयुष्य वाहून घेतले.

      September 1, 2021


  • भारताचे माजी राष्ट्रपती वराहगिरी वेंकटगिरी

    जगात सर्वात आधी एटीएम मशीनचा वापर २७ जून १९६७ ला बार्कलेज बँकेने केला होता. ही पहिली एटीएम मशीन लंडनच्या बार्कलेज बँकेच्या शाखेत लावण्यात आली. भारतात सर्वात पहिली एटीएम मशीन १९८७ मध्ये लावली गेली. हे पहिले एटीएम हाँगकाँग ॲ‍ण्ड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ने मुंबईत लावले होते.

      June 28, 2022


  • बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करणारी मराठमोळी विद्या माळवदे

    लॉचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्याने एअर होस्टेसच्या रुपात करिअरला सुरुवात केली होती.मात्र नशिबाने ती बॉलिवूडमध्ये आली आणि एअरहोस्टेसहून अभिनेत्री बनली. विद्याला शाहरुख खान स्टारर’चक दे इंडिया’या सिनेमासाठी ओळखले जाते. ‘चक दे इंडिया’या सिनेमात विद्याने गोलकिपरची भूमिका वठवली होती.

      April 27, 2024


  • अभिनेत्री वैजयंती माला बाली

    एक अभिनेत्री, शास्त्रीय नृत्यांगना, कर्नाटकी गायिका, नृत्य प्रशिक्षक व राजकारणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वैजयंती माला यांनी वयाच्या १३ व्या वर्षी तामिळ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. एम डी रमन व वसु़ंधरादेवी हे त्यांचे आईवडिल. पापाकुट्टी (अर्थ लहान मुलगी) या नावाने ती ओळखली जात असे.

    वैजयंती माला यांची आई तमिळ चित्रपटांतील एकेकाळची एक आघाडीची नायिका होती. ७ वर्षांची असल्यापासुन मा.वैजयंती माला यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात ती पारंगत झाली.

    त्यांचे कौटुंबिक परिचित दिग्दर्शक एम डी रमन वझकई या तमिळ चित्रपटासाठी एका नव्या अभिनेत्रीच्या शोधात होते. त्या दरम्यान वैजयंतीमालाला त्यांनी नृत्य करतांना पाहिले व ते प्रभावित झाले. मात्र वैजयंतीमाला यांना त्यांच्या चित्रपटात संधी देण्यापुर्वी त्यांना तिच्या आजीचे, यदुगिरी देवी यांचे मन वळवावे लागले होते. कारण तिच्या शिक्षण व नृत्यावर याचा परिणाम होईल असे आजीचे मत होते.

    वयाच्या सोहाव्या वर्षी अभिनय केलेला वैजयंतीमाला यांचा हा पहिलाच चित्रपट आर्थिकद्रुष्ट्या यशस्वी ठरल्याने याच चित्रपटाचा तेलगु मधे जीवितम या शीर्षकाने रिमेक करण्यात आला. नायिकेच्या भुमिकेसाठी पुन्हा वैजयंतीमालाची यांचीच निवड करण्यात आली. हा चित्रपट देखील यशस्वी झाला. १९५१ मध्ये आलेल्या 'बहार' या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

    १९५४ मध्ये रिलीज झालेला नागिन हा सिनेमा त्यांच्या करिअरमधील पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. 'देवदास' हा सिनेमा वैजयंती माला यांच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. विमल राय दिग्दर्शित या सिनेमात वैजयंती माला यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९५८ मध्ये पडद्यावर झळकलेल्या 'साधना' या सिनेमातील भूमिकेसाठी वैजयंती माला यांना त्यांच्या करिअरमधील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

    देवदास, नया दौर, मधुमती, गंगा जमुना, लीडर, आम्रपाली, गंवार, लीडर, सुरज, संगम, पैगाम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी त्यांना ओळखले जाते. त्या गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगणा आहेत. एकामागून एक हिट सिनेमे देणा-या वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये आपल्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसह काम केले आहे.

    दिलीप कुमार, राजकपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, सुनील दत्त या अभिनेत्यांसोबत ऑन स्क्रिन त्यांची जोडी चांगली जमली होती. ‘संगम‘चे चित्रीकरण चालू असतांना एकदा वैजयंतीमालाचा वाढदिवस आला॰ राजने एक मोठा केक आणून त्यावर एकच मोठी मेणबत्ती लावली॰ सर्वांच्या प्रश्नार्थक नजरांना राजने हा वैजयंतीमालाचा RK मधील पहिलाच वाढदिवस आहे; तिचे येथे आणखी भरपूर वाढदिवस होवोत, मग मेणबत्यांची संख्या वाढत जाईल, असे सांगितले.

    १९६८ मध्ये वैजयंती माला यांनी डॉ. चमनलाल बाली यांच्यासह लग्न केले. लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करणे बंद केले. १९६९ मध्ये रिलीज झालेला 'प्रिन्स' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये हिंदीसह तेलगू, तामिळ आणि बांग्ला या भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला.

    वैजयंती माला यांना संगीत नाटक अॅकाडमी व पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ४८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे अध्यक्षपद भुषविले तर लोकसभा सदस्य म्हणुन त्यांनी काही काळ काम पाहिले. सन २००७ मधे बॉंडींग नावाने तिचे आत्मचरित्र प्रकाशित झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-दिव्य मराठी

      August 13, 2017


  • उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर

    भारतातील चार राज्यांत पसरलेल्या किर्लोस्कर उद्योगसमूहात १८,००० हून अधिक लोक काम करतात. देशातील विजेच्या मोटारी, डीझेल एंजिने व सेंट्रिफ्युगल पंप यांच्या एकूण उत्पादनापैकी अनुक्रमे ३६, ६५ व ४० टक्के उत्पादन किर्लोस्करांकडून होते. ह्या समूहाचे एकूण वार्षिक उत्पादन ६३ कोटी रूपयांचे आहे.

      September 26, 2021


  • महान गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर

    विदुषी मोगुबाई कुर्डीकर या किशोरी अमोणकर यांचा मातोश्री. त्यांचा जन्म १५ जुलै १९०४ रोजी झाला. अत्रौली (जयपूर) घराण्याचे अत्यंत कठीण गायकीची महाराष्ट्रातील अनेक अभ्यास केला गेला आहे, पण ही परंपरा सर्वात चागल्या गायीका म्हणुन मान गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांना जातो. मा.मोगुबाई कुर्डीकर ह्या अल्लादिया खॉ साहेबांच्या शिष्या. विदुषी मोगुबाई कुर्डीकर त्या वेळच्या परंपरेच्या मानाने उदारमतवादी होत्या. दुसऱ्या घराण्याचे गाणे शिकवण्यासाठी त्यांनी ताईंना अन्य गुरुजनांकडे जाण्याचे उत्तेजन दिले. जरी केसरबाई यांच्या प्रति मोगुबाई कुर्डीकर ची सांगीतिक स्पर्धा होती, तरीही मोगुबाई कुर्डीकर नी किशोरीताईंना केसरबाईंकडे शिकायला पाठवले. दुर्दैवाने काही कारणामुळे हे शिक्षण झाले नाही. ताईंना अन्यहि काही गुरु होते. मोहनराव पालेकरांची ताईंना काही वर्षे तालीम होती.त्याच्या शिष्य, शिष्या पैकी पद्मा तळवलकर, कमल तांबे , वामनराव देशपांडे, सुहासिनी मुळगावकर, बबनराव हळदणकर, अरुण द्रविड, व मा.किशोरी अमोणकर हे आहेत. विदुषी मोगुबाई कुर्डीकर या रागांचे भाव प्रकट करणार्या् स्वर व राग वैशिष्ट्यांचे विशेष महत्त्व लहानपणी किशोरीताईंना वारंवार समजावून सांगत असत. जयपूर घराण्याची गायकी ही आकारयुक्त असते. आकाराच्या स्वरूपात स्वरांचे अत्युच्च स्वरूप प्रकट होत असते. स्वरांच्या बिंदूचे किरण किंवा प्रकटणारी आभा किती गहन व खोल जाते, जयपूर घराण्यात शिकवताना रागांची नावे सांगितली जात नाहीत. विदुषी मोगुबाई कुर्डीकर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १० फेब्रुवारी २००१ रोजी विदुषी मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट

      February 10, 2017


  • मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत काणेकर

    मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी झाला. अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७ मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्‌एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १९४१ मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते.

    अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.

    गीतकार म्हणून मा. अनंत काणेकर यांनी लिहिलेली गाणी

    आता कशाला उद्याची बात
    आला खुशीत्‌ समिंदर
    एकलेपणाची आग लागली
    तू माझी अन्‌ तुझा मीच
    दर्यावर डोले माझं

    अनंत काणेकर यांचे २२ जानेवारी १९८० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 2, 2016


  • दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी

    बाहुबली चित्रपटात देवसेनाची भूमिका करणारी अनुष्का ही रियल लाइफमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनुष्का शेट्टी हे साऊथ सिने इंडस्ट्रीतील एक मोठं नाव असून तिकडे ती टॉपची हिरोईन आहे. इतकेच नाहीतर सिनेमासाठी पैसे घेण्याबाबतीतही ती साऊथमधील सर्व अभिनेत्रांच्या कितीतरी पुढे आहे.

      March 19, 2019


  • अभिनेत्री नंदिता पाटकर

    नंदिता पाटकर एक मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत. नंदिता यांनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. त्यांनी सुरुवातीला आरजे आणि व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.नंदिता या झी मराठी वरील माझे पति सौभाग्यवती या मराठी मालिकेत त्यांनी अभिनय केला होता.

      March 1, 2024