ते स्पष्टवक्ते, आशावादी व पक्षीय राजकारणांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघास दूर ठेवण्याची स्पष्ट दृष्टी असणारे असे समजले जातात.
September 11, 2021
भारतकुमार राऊत हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दी इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, दी मेट्रोपोलिस ऑन सॅटर्डे, दी पायोनियर अशा मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.
April 6, 2022
मधुबाला म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले स्वप्न. भारतीय सौंदर्याचा प्रवास मधुबाला यांच्याजवळ येऊन थांबतो. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला.अत्यंत सुंदर रूप घेऊन जन्माला आलेल्या मधुबाला यांची कारकीर्द मात्र शापित ठरली. आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मा.मधुबाला यांचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. लहानपणी बेबी मुमताज म्हणूनही त्या ओळखली जायच्या. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला' असे नामकरण केले होते. बालवयातच काम करायला सुरुवात केल्यामुळे मधुबाला कधी शाळेत जाऊ शकली नव्हती. तिला उर्दू भाषा येत होती, परंतु इंग्रजीचा एकही शब्द तिला बोलता येत नव्हता. मधुबालावर तिच्या वडिलांचा पगडा खूप जास्त होता. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे मधुबाला कधीही पार्टी, प्रीमिअरमध्ये दिसली नाही. १९४२ साली आलेल्या 'बसंत' या सिनेमाद्वारे त्यांनी बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा पडद्यावर एन्ट्री घेतली. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. तर अभिनेत्री म्हणून १९४७ मध्ये 'नीलकमल' या सिनेमात त्या पहिल्यांदा झळकली होत्या. याचवर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट रिलीज झाला होता. 'दिल की रानी' हे दुस-या सिनेमाचे नाव. १९४८ मध्ये मा. मधुबाला यांचा 'अमर प्रेम' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सर्व सिनेमात मा.मधुबाला राज कपूर यांच्यासोबत झळकली होती. या सिनेमानंतर मधुबाला यांनी बॉम्बे टॉकीजच्या 'महल' सिनेमात काम केले होते. 'महल'ला मिळालेल्या यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याकाळातील आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने काम केले होते. अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद या आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने स्क्रिन स्पेस शेअर केली होती. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकुण ६६ सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केले होते. त्यानंतर किशोर कुमार यांच्यासह मधुबालाचे लग्न झाले.हॉलिवुडमध्ये जसा मर्लीन मन्रोने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिचा काळ गाजवला, तसाच बॉलिवुडमध्ये लावण्यवती मा.मधुबाला यांनी बॉलीवूड मध्ये गाजवला. भारतातच नव्हे पण हॉलीवुडपर्यंत मा.मधुबाला यांच्या सौंदर्याची कीर्ती गेली होती. जगप्रसिद्ध दिग्दर्शक मा.फ्रँक काप्रा यांनी भारतात येऊन मा.मधुबाला यांना हॉलीवुडमधील चित्रपटात चमकविण्याचे प्रयत्न केले होते.. पण त्यांच्या वडिलाच्या मुळे ते शक्य झाले नाही. काप्रामुळे तिच्याबद्दल तेथील माध्यमांनी यामुळे खूप लिखाण केले. १९५२ च्या तेथील एका नियतकालिकात असे म्हटले गेले की, "Madhubala ~~ The biggest star in the world and she is not in Beverlie Hills." मा.नर्गिस यांच्या नंतर भारतीय टपाल खात्याने १८ मार्च २००८ ला मा.मधुबाला यांचे तिकीटा काढून मान दिला होता. मधुबाला यांचे निधन २३ फेब्रुवारी १९६९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट
February 23, 2017
छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मोहन वाघ यांचा जन्म ७ डिसेंबर १९२९ रोजी झाला.
मोहन वाघ मूळचे कारवारचे. जे. जे. कला महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडलेल्या वाघांनी नंतर छायाचित्रकारिता सुरू केली. छायाचित्रणापासून करिअरची सुरूवात करणारे मोहन वाघ नंतर नेपथ्य, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते म्हणून नावारूपास आले. कमाल अमरोहींच्या पाकिजासाठी त्यांना डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. नाटकाच्या प्रेमापोटी ते त्या कलेकडे वळले. अनेक नाटकांसाठी त्यांनी नेपथ्यरचना केली. त्यानंतर या कलेच्या प्रेमापोटीच त्यांनी चंद्रलेखा ही नाट्यसंस्था काढली. चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव. त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. या संस्थेतर्फे त्यांनी अनेक दर्जेदार नाटके रंगभूमीवर आणली.
चंद्रलेखाची नाटके म्हणजे नेपथ्यापासून, कथा, सादरीकरण, कलावंत आणि अभिनय यांचा दर्जा असा अलिखित नियम होऊन बसला. ऑल दी बेस्ट ही एकांकिका पाहिल्यानंतर तिचे नाटकात रूपांतर करण्याचे व्यावसायिक धाडस त्यांनीच दाखवले आणि हे नाटक यशस्वीही करून दाखवले. या नाटकाच्या माध्यमातून संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, भरत जाधव, श्रेयस तळपदे हे कलावंत पुढे आले. दरवर्षी ३१ डिसेंबरला नवे नाटक आणण्याचा पायंडा पाडून तो त्यांनी कसोशिने पाळला. मोहन वाघांनी तब्बल ८३ नाटकांची निर्मिती केली. त्यांचे १५,६४७ एवढे प्रयोग केले, पण त्यांची फक्त १५ नाटकंच व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरली. तरीही प्रत्येक कलाकाराला प्रयोगानंतर पाकीट द्यायलाच हवं, आजचं पाकीट उद्या द्यायचं नाही, हा त्यांचा नियम होता. नाटक चांगले पैसे मिळवून देवो अथवा नाही, पण त्यांनी कधीही कलाकारांना मानधनासाठी रखडून ठेवलं नाही. ही त्यांची शिस्त होती.
त्यातही रणांगण, स्वामी, बटाट्याची चाळ, ऑल द बेस्ट ही नाटके तुफान गाजली. प्रेमगंध, बहुरूपी आणि एक तिकीट सिनेमाचं ही नाटके तर उत्कृष्ट नेपथ्यामुळेही गाजली. नेपथ्यामुळे नाटक गाजविण्याचाही विक्रम मोहन वाघ यांनी प्रस्थापित केला. मोहन वाघांनी नवख्या कलाकारांना घेऊन केलेल्या ऑल दी बेस्ट नाटकाचे तीन हजारांवर प्रयोग झाले आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर या सध्या मराठी सिनेसृष्टीत गाजणार्याआ नटांना मोहन वाघांनीच ऑल दी बेस्टमधून ब्रेक दिला. त्यांच्या गरूडझेप या नाटकाने मराठी रंगभूमीवर विशेष स्थान निर्माण केले. नाट्यपरिषदेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते. लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते. बाळासाहेबांनी तर त्यांना कॅमेराही दिला होता. रंगमंचासोबतच त्यांनी कॅमेरा हे माध्यमही अतिशय समर्थपणे पेलले. फोटोग्राफीची अत्यंत आवड असणाऱ्या लतादीदींनी तर याचे धडे मोहन वाघ यांच्याकडून गिरविले.
दीदींसह असंख्य तारे-तारका आणि सुनील गावस्कर यांच्यासारखे क्रिकेटपटू मोहन वाघ यांना आपल्या जिव्हाळ्याच्या आप्तेष्टांपैकी मानत असत. पु.ल. देशपांडे, व्हि. शांताराम, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर या आणि अनेक विभुतींचे फोटो त्यांच्या कॅमेर्यााने टिपले. ते फोटो 'वाघांचे फोटो' म्हणून ओळखले जावेत असा त्यांचा ठसा त्यावर उमटलेला आहे. त्यांच्या या फोटोग्राफीबद्दल खुद्द लतादिदींनी त्यांना 'हे तर फोटोग्राफीतले लता मंगेशकर आहेत, अशी कौतुकफुले उधळली होती. मोहन वाघ यांच्यामुळेच मधुबाला, नर्गिस, वैजयंतीमाला या गाजलेल्या अभिनेत्रींची विलोभनीय छायाचित्रे लोकांसमोर येऊ शकली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचे जावई.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 7, 2017
मोहनदास सुखटणकर यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० रोजी गोव्यातील माशेल येथे झाला. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण माशेल आणि म्हापसा येथे झाले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’.
अभिनय येतो म्हणून नाही, तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून, आरोंदेकर मास्तरांनी त्या नाटुकलीत काम करायची त्यांना शिक्षा केली होती. त्या नाटुकल्याच्या निमित्ताने मोहनदास सुखटणकरांच्या गालाला जो पहिल्यांदा रंग लागला तो कायमचा. नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून ज्या वेळी त्यांनी बक्षीस पटकावले, त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धिटाईचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली. त्या निमित्ताने आपल्याला मुळातच अभिनयाची आवड होती याची जाणीवही त्यांना झाली.
पुढे गोव्यात ‘अँग्लो-पोर्तुगीज इन्स्टिटय़ूट’ या हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनातून तीन ते चार वर्ष स्व-लिखित कोकणी प्रहसनांतून मोहनदासांनी विनोदी भूमिका साकारल्या व पारितोषिकेही मिळवली. तेव्हा अभिनयात करिअर करायचे आहे, असे काही त्यांच्या मनात नव्हते. पण छंद म्हणूनच सुखटणकर सारे करीत होते. त्यांच्या गांधीवादी विचारांच्या मामांचे एक सांगणे असायचे, आयुष्यात छंद जोपासावेत, पण मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून नाही. मामांचे विचार त्यांच्यावर बिंबले ते कायमचे. त्यामुळे अभिनयाचा छंद जोपासताना सुखटणकरांनी शाळेच्या अभ्यासाची कधीही हेळसांड केली नाही. गावी मॅट्रिकच्या परीक्षेचे केंद्र नसल्याने १९५० मध्ये ते परीक्षेसाठी मुंबईला आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी नोकरीची शोधाशोध सुरू केली.
‘बर्मा शेल’ मध्ये लेखी परीक्षा व मुलाखतीत यशस्वी झाले, पण वैद्यकीय चाचणीत कमी वजन भरल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही. बॅलार्डपिअर येथून चर्चगेटला चालत निघाले असताना मुंबईत राहून काय करायचे, पुन्हा गोव्याला जाऊ या असा विचार त्यांच्या मनात घोळायला लागला. फ्लोरा फाउंटनजवळ ते आले असता एक गाडी थांबली. गाडीत ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे सहसंपादक डी. के. रांगणेकर होते. रांगणेकर कुटुंब मूळचे गोव्याचे असल्याने ते सुखटणकर कुटुंबीयांना ओळखत होते. विचारपूस झाल्यानंतर रांगणेकर यांनी त्यांना गाडीत बसायला सांगितले व त्यांना चष्म्याच्या काचा व फ्रेम बनविणाऱ्या ‘माँटेक्स कॉर्पोरेशन’ कंपनीच्या मालकांकडे घेऊन गेले.
‘याला नोकरी द्या’ अशी विनंती मालकाला केली. येथे ‘टंकलेखक’ म्हणून सुमारे सहा महिने त्यांनी नोकरी केली. १ एप्रिल १९५१ मध्ये ‘ओरिएन्टल इन्शुरन्स’ मध्ये ते ‘लिपिक’ म्हणून लागले आणि ३० नोव्हेंबर १९९० मध्ये महामंडळाच्या सेवेतून ‘प्रसिद्धी अधिकारी’ म्हणून निवृत्त झाले. नोकरी करत असताना ते जयहिंद महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र’ विषय घेऊन ‘बी.ए.’ झाले. महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी डॉ. चारुशीला गुप्ते यांनी जयहिंद मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करून सुखटणकरांना सचिव बनवले. या वाङ्मय मंडळांतर्गत विविध कार्यक्रम झाले.. महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी ‘लग्नाची बेडी’ हे नाटक करून मंडळाने निधी जमा केला. त्यार नाटकात मोहनदास यांनी ‘गोकर्ण’ची भूमिका साकारली होती. आत्माराम भेंडे, आशा भेंडे, बबन प्रभू ही व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी माणसेही त्यात होती.
त्यानंतर सुखटणकर विविध एकांकिका स्पर्धांमधून भाग घेऊ लागले. त्यांनी एकांकिकांतून फक्त विनोदी भूमिकाच केल्या नाहीत, तर गंभीरही केल्या. ‘वहिनी’ या एकांकिकेत त्यांनी ‘वल्लभ’ची गंभीर भूमिका रमाकांत देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली.
‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या स्पध्रेत चारुशीला गुप्ते यांच्या ‘आम्ही सारेच वेडे’चा प्रयोग झाला. त्यात सुखटणकरांनी एका प्रौढाची विनोदी भूमिका वठवून उत्कृष्ट अभिनयासाठी असलेले पारितोषिक मिळवले.
भारतीय विद्याभवनात ‘आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा’ व्हायच्या. तिथे सुखटणकरांनी ‘भाऊबंदकी’त काम केले आणि. गंगाधर गाडगीळांच्या ‘वेडयांचा चौकोना’तही केले.. या दोन्ही नाटकांसाठी त्यांना बक्षीस मिळाले.१९५८ साली बी. ए. झाल्यावर मोहनदास सुखटणकर मुंबईतच ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’मध्ये शिकू लागले.आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत या कॉलेजने सादर केलेल्या ‘बळी’ आणि ‘लाल गुलाबाची भेट’ या एकांकिकांसाठी त्यांना अभिनयाची प्रशस्तीपत्रके मिळाली.
१९५९ साली महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने ‘अशीच एक रात्र येते’ हे प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांचे नाटक सादर केले. त्यात भय्यासाहेब वकील ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका मोहनदास सुखटणकरांनी वठवली. या नाटकात त्यांच्याबरोबर प्रसिद्ध लेखिका विजया पाटील यांनी काम केले होते, तर भय्यासाहेब वकिलाच्या मुलीची भूमिका मीनल मडकईकर यांनी केली होती. या नाटकाच्या प्रयोगाला ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’चे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी सुखटणकरांनाला गाठून ‘तू गोव्याचा. आमच्या संस्थेत तू असलंच पाहिजेस,’ वगैरे गोष्टी सुनावल्या, आणि त्यांना ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’मध्ये घेतले.
मोहनदास सुखटणकर यांच्या आयुष्यात आणि नाटय़ प्रवासात ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले. संस्थेच्या बहुतेक नाटकांमधून मोहनदास सुखटणकर यांनी कामं केलीत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात स्त्रीपात्र सोडून त्यांनी बहुतेक भूमिका साकारल्या. मोहनदास सुखटणकर यांनी चाळीस नाटकांमधून कामं केली आहेत. मत्स्यगंधा (चंडोल) , लेकुरे उदंड झाली (दासोपंत ), अखेरचा सवाल (हरिभाऊ), दुर्गी (मोरोबा नाडकर्णी), स्पर्श (नाटेकर), आभाळाचे रंग (आबा) ही काही त्यांची गाजलेली नाटकं.
नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ आदी मराठी चित्रपटांतही काम केले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रांवरील अनेक श्रुतिका, नभोनाटय़ यातही ते सहभागी झाले. मुंबई दूरदर्शन केंद्रावरील विविध नाटके, ‘गजरा’ या कार्यक्रमात ते होते. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या त्यांच्या निवडक मराठी मालिका तर ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदूी मालिका. पण दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेत ते फारसे रमले नाहीत.
नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा निकटचा सहवास त्यांना लाभला. शिरवाडकर यांचे मोठे ऋण आपल्यावर असल्याचे ते मानतात. शशी मेहता यांच्यासह सुखटणकर यांनी शिरवाडकर यांच्या नाटकातील स्वगते, कविता यांचा समावेश असलेला ‘शब्दकळा कुसमाग्रजांच्या’ हा कार्यक्रम सादर केला. कुसुमाग्रज यांच्या सूचनेवरूनच ‘गोवा हिंदू’ने गोव्यात १९८१ ‘स्नेहमंदिर’ वृद्धाश्रम उभारला. रामकृष्ण नायक यांच्याबरोबर सुखटणकर यांचेही या कामात योगदान आहे. साहित्य, सांस्कृतिक, नाटय़ क्षेत्रातील दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. पु. ल. देशपांडे, पं. भीमसेन जोशी, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शंकर वैद्य, सुधीर मोघे, वसंत कानेटकर, भास्कर चंदावरकर, जयवंत दळवी, व. पु. काळे आदी मंडळी या ना त्या निमित्ताने अनेकदा त्यांच्या घरी आली आहेत.
मोहनदास सुखटणकर यांना राजहंस प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे देण्यात येणारा 'राजहंस पुरस्कार' , नाट्यक्षेत्राची ५०हून अधिक वर्षे सेवा केल्याबद्दल मुंबईच्या ’आम्ही गोवेंकर’ या प्रतिष्ठित संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 21, 2018
फिअरलेस नाडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाडियाचे खरे नाव ‘मेरी इवान्स’ असे होते. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९०८ रोजी पर्थ येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील फिअरलेस नाडिया ही एक दिग्गज अभिनेत्री होती. जे बी एच आणि होमी वाडिया यांनी १९३० साली वाडिया मुव्हिटोन स्टुडिओची स्थापना केली होती. त्यांनीच ‘स्टंट क्वीन’ असलेल्या फिअरलेस नाडियाला लाँच केले होते. मूळची ऑस्ट्रेलियन असलेल्या नाडियाने भारतात अनेक अॅक्शन चित्रपट केले आणि अल्पावधीतच ती स्टार झाली. ती तिच्या बहारदार नृत्यासाठी, अॅक्शन्ससाठी प्रसिद्ध होतीच. शिवाय तिला चाबूकवाली म्हणूनही ओळखले जायचे. नाडियाने होमी वाडियाशी लग्न केले.
नाडिया लहान असतानाच तिच्या आई-वडिलांसह भारतात आली. तिचे वडील ब्रिटीश आर्मीमध्ये सैनिक होते. पेशावरमध्ये मोठी झालेली नाडिया तेथेच घोडेस्वारी शिकली. लहानपणीच त्यांनी घोडेस्वारी, जिमनॅस्टिक, बॅले डान्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सर्कशीत प्रवेश केला व यानिमित्ताने त्या भारतभर फिरल्या.
पहिल्या महायुद्धात तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ती आणि तिची आई मुंबईत स्थलांतरित झाल्या. त्यानंतर उत्तम नोकरी मिळावी याकरिता मेरीने (नाडिया) शॉर्टहॅण्ड टायपिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जाड असलेल्या मेरीने वजन कमी करण्याचाही निर्णय घेतला होता, त्यासाठी तिने रशियन नृत्य प्रशिक्षक मदाम अस्त्रोवा यांच्या नृत्यकला शाळेत नाव नोंदवले. त्यावेळी मदामनेच मेरीमध्ये असलेले कलागुण जाणले आणि भारतभर फिरण्या-या त्याच्या नृत्य/थेएटर ग्रुपमध्ये तिला सहभागी करून घेतले. त्याच्याच सांगण्यावरून तिने आपले नाव मेरीवरून नाडिया असे ठेवले.
नाडियाच्या एकाही चित्रपटाची डीव्हीडी सध्या उपलब्ध नाही. पण जे बी एच वाडिया यांचे नातू रियाद विन्सी वाडिया यांनी तिच्यावर १९९३ साली एक सुंदर माहितीपट तयार केला होता. त्याचे नाव ‘फिअरलेस : द हंटरवाली स्टोरी’ असे आहे. यात नाडियाच्या काही छायाचित्र आणि व्हिडिओंच्या माध्यमातून तिचे आयुष्य आणि करिअर दाखविण्यात आले आहे. द हंटरवाली उर्फ मेरी इवान्स यांचे ९ जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://youtu.be/Y0A6a09C7hM
https://youtu.be/dcZ_ab5LcuQ
January 8, 2019
आन, अंदाज, मदर इंडिया, रेश्मा और शेरा, राजा जानी आणि दस नंबरी यासारख्या हिट चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या होत्या. १९६८ मध्ये त्यांना सरस्वतीचंद्र सर्वोत्कृष्ट संवाद लेखक म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७५ मध्ये त्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
November 1, 2019
नरेंद्रभाई चुडासामा हे ‘नाना’ चुडासामा म्हणूनच पहिल्यापासून परिचित राहिले. त्यांचा जन्म १७ जून १९३३ रोजी झाला. नाना चुडासामा यांची ओळख आय लव्ह मुंबई, जायन्ट्स इंटरनॅशनल या एनजीओं एवढीच त्यांच्या मालकीच्या रेस्टॉरंटर लावलेल्या फलकांमुळेही होती. मुंबईच्या उच्च वर्तुळात त्यांचा वावर होता आणि त्यांच्या या रेस्टॉरंटध्येही त्याच वर्गाचा वावर होता. परंतु या फलकावर व्यक्त झालेल्या भावना मात्र सामान्य मुंबईकरांच्या असंत. त्यांचे वडिल मानसिंग चुडासामा हे एकेकाळी मुंबईचे पोलिस आयुक्त होते.
‘जेसीज’, ‘जायंटस इंटरनॅशनल’ या समाजभावी क्लबांमार्फत उभ्या केलेल्या कामांतूनच समाजापर्यंत पोहोचले. १९७२ मध्ये नानांच्या पुढाकाराने भारतभर ‘जायंट्स’तर्फे विविध सेवाकार्ये सुरू झाली आणि नाना चुडासामा हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यातील वंचितांपर्यंत पोहोचले. लातूर, उस्मानाबादचा भूकंप, कच्छ-भुजमधील प्रलयंकारी भूकंपानंतर कमीत कमी वेळेत या संघटनेने मदतकार्य सुरू केले. जायंटसच्या आजवरच्या वाटचालीत नानांनी विविध योजना सुरू केल्या.
कुटुंब नियोजन, शैक्षणिक मोहिमा, जलसंवर्धनाचे प्रयोग, पर्यावरण रक्षण, नेत्रदान मोहिमा, अपंग साहाय्यता उपक्रम, बेटी बचाओ अभियान, अशा अनेक मोहिमांना नानांनी बळ दिले. स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार रोखले नाहीत, तर भविष्यात एक गंभीर सामाजिक समस्या उभी राहील, हे ओळखून नानांनी समाजाच्या विविध स्तरांतील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी एकत्र आणले. ज्या मुंबईत आपण राहतो, ते शहर आपले आहे, या शहराचे पर्यावरण जपले पाहिजे, याची जाणीव प्रत्येक मुंबईकराच्या मनात जागी करून देण्यासाठी नानांनी ‘आय लव्ह मुंबई’ नावाची चळवळ सुरू केली. ही चळवळ पुढे मुंबईच्या समाजजीवनाचे एक अविभाज्य अंग बनून गेली. या चळवळीच्या माध्यमातून मुंबईत अनेक सार्वजनिक शौचालये उभी राहिली.
मुंबईच्या नगरपालपदाची सलग दोन वेळा धुरा सांभाळणारे नाना चुडासामा हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही सामाजिक स्तरातील व्यक्तीशी समान पातळीवरून मत्री साधण्याची नानांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. विविध क्षेत्रांतील नानांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून २००५ मध्ये केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरविले.
जुन्या मुंबईबद्दल प्रेम असणारे आणि मुंबईच्या नव्या स्वरूपाचे स्वागत करण्यास सदैव उत्सुक असणारे एक व्यक्तिमत्व म्हणून नाना चुडासामा यांची ओळख होती. नाना चुडासामा यांचे निधन २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
June 17, 2019
गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे तसेच चीनला अधिकृत भेट देणारे वेंकटरामन हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती । कामराज यांच्या रशिया भेटीवर आधारित प्रवासवर्णनासाठी त्यांना सोव्हिएट लँड-नेहरू पारितोषिक देण्यात आले.
November 2, 2023
वसंत शिंदे यांनी १९४६ पासून १९९६ पर्यंत ४० दिग्दर्शकांकडे कामे केली अगदी दादासाहेब फाळके यांच्यापासून संजय सुरकरपर्यंत जवळ जवळ सर्वच म्हणावे लागतील. त्यांना ‘ सांगत्ये ऐका ‘ या चित्रपटासाठी ‘ दादासाहेब फाळके गौरवचिन्ह ‘ मिळाले, तर नाटक आणि चित्रपट यांच्यामधील भूमिकांसाठी ‘ दिनकर कामण्णा सुवर्णपदक ‘ मिळाले , शांताबाई हुबळीकर पुरस्कार , बालगंधर्व पुरस्कार , चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
July 17, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti