मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट की एका नव्या प्रवासाची सुरुवात? पुनर्जन्म खरंच असतो का? मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं आणि आपल्या पुढच्या जन्माचा संबंध आपल्या कर्माशी असतो का?
October 9, 2026
सुप्रसिद्ध पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक श्री दा कृ सोमण यांनी पंचांगातील विविधता, कालगणनेच्या विविध पद्धती, leap year, अधिकमास यांचा कालगणनेशी संबंध यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकलाय मराठीसृष्टी टॉक्सच्या या पॉडकास्ट मध्ये.
November 20, 2025
पाकिस्तानच्या निर्मात्यांचे नंतर काय झाले? | लेखक माधव भांडारी | Marathisrushti Talks फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तानचा इतिहास आपण अनेकदा ऐकतो. पण पाकिस्तानची निर्मिती घडवून आणणाऱ्या व्यक्ती, नेते आणि संघटनांचे पुढे काय झाले? ज्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी निर्णायक भूमिका बजावली, त्यांना नव्या राष्ट्राने नेमके कसे वागवले? या विचारप्रवर्तक चर्चेत लेखक श्री. माधव भांडारी त्यांच्या गाजलेल्या “पाकिस्तानच्या निर्मात्यांचे नंतर काय झाले?” पुस्तकाच्या माध्यमातून अनेक ऐतिहासिक संदर्भ, दुर्लक्षित घटना आणि धक्कादायक वास्तव उलगडतात. या चर्चेत आपण जाणून घेणार आहोत:
July 24, 2026
श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !
October 2, 2025
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो? प्रत्येक वेळी आजार झाल्यावर वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आपल्या आरोग्याचा संपूर्ण इतिहास जाणणारा एक फॅमिली डॉक्टर असणं किती महत्त्वाचं आहे? Marathisrushti Talks च्या या विशेष भागात, सूत्रसंचालक धनश्री प्रधान दामले यांनी संवाद साधला आहे डॉ. श्रुती श्रीधर यांच्याशी. त्या एक जनरल फिजिशियन (MBBS) असून, त्यांना दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन आणि पुराव्यांवर आधारित एकात्मिक उपचारपद्धतींमध्ये विशेष रुची आहे.
October 2, 2026
पुणे म्हणजे ढोल-ताशा पथकांचं माहेरघर… पण या परंपरेचा खरा प्रवास नेमका कसा सुरू झाला? ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून रुजलेली शिस्तबद्ध ढोल-ताशा पथक संस्कृती, बाप्पा पेंडसे यांचा दूरदृष्टीपूर्ण प्रयत्न, बरची नृत्याची परंपरा, पारंपरिक वाद्यांचं महत्त्व आणि आज महाराष्ट्रभर व परदेशातही पोहोचलेली ही संस्कृती — या सगळ्याचा वेध घेतला आहे या विशेष भागात.
September 11, 2026
अयोध्या म्हणजे केवळ प्रभू श्रीरामांची जन्मभूमी नाही – तर हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरा जपणारी एक प्राचीन नगरी आहे. या विशेष भागात मराठीसृष्टी टॉक्स च्या host धनश्री प्रधान दामले यांच्यासोबत ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि भाजपचे माजी प्रवक्ते माधव भांडारी अयोध्येच्या इतिहासाचा वेध घेत आहेत. श्रीरामांच्या जन्मापूर्वी अयोध्या कशी होती.
September 4, 2026
चित्रपट संगीतक्षेत्रात संगीतकार जोड्यांचा एक सुरेल इतिहास आहे. त्याच धर्तीवर चित्रपटातल्या गाण्यांना मेलोडियस संगीत देणारी मराठी संगीतकार जोडी म्हणजे अविनाश-विश्वजीत अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी मराठी असले तरी फक्त मराठी संगीतक्षेत्रापुरते मर्यादित न राहता आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी हॉलिवूड पर्यंत नेला आहे. सुमधुर गाण्यांचे जादूगार – अविनाश विश्वजीत मराठीसृष्टी टॉक्स वर धनश्री बरोबर संवाद साधत आहेत
December 14, 2025
‘सह्याजीराव’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले आणि तब्बल ६ वेळा Limca Book of Records मध्ये नोंद झालेले विक्रमवीर सतिश चाफेकर यांच्याशी फक्त स्वाक्षरी संग्रहच नाही तर त्यांच्या एकूणच विविधांगी संग्रहांबद्दल जाणून घेऊया आपल्या या भागात…
November 6, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti