(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आनंद लुटणारे मन !

    सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार  कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते. 

  • शेतातील धन

    एक शेतकरी होता. तो फारच गरीब परंतु मनाने फार सज्जन होता. दररोज शेतीत राबणे व काम करताना हरिनाम घेणे हेच त्याने आपले मुख्य काम मानले होते. त्याला तशी फार मोठी शेती नव्हती परंतु शेतीचे उत्पन्न जेवढे येईल त्यात तो समाधानी होता. त्याला एकूण चार मुले होती. परंतु ती सर्वच कामचुकार व आळशी होती. त्याची शेतकर्‍याला चिंता होती.

    एके दिवशी शेतकरी आजारी पडला व त्याचा आजार वाढतच गेला. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले. त्या वर्षी पीक फार आले नाही. शेवटी आता आपण यातून वाचणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने चारही मुलांना जवळ बोलावले व अस्पष्ट आवाजात आपल्या शेतात धन आहे असे सांगून प्राण सोडला. शेतात गुप्त धन असल्याचे चारही मुलांना कळल्यानंतर ती चारही मुले शेतावर गेली व त्यांनी
    सगळीकडून शेत उकरायला सुरुवात केली. परंतु त्यांना कोठेही धन सापडले नाही. त्यामुळे सर्वजण हताश झाले. मात्र शेत उकरून झाले होते. त्यामुळे त्यात निदान बी तरी टाकावे, असा विचार थोरल्या मुलाच्या मनात आला व त्याने ती कल्पना आपल्या इतर तीन भावांना सांगितली. त्यांनाही ती पटली. त्याप्रमाणे चौघा भावांनी एकत्र येऊन ज्वारीची पेरणी केली. त्या वर्षी वेळेवर पाऊस आला त्यामुळे बी
    शेतात चांगले रुजले व ज्वारीचे पीक येऊ लागले. त्यानंतर पुन्हा चौघांनी आता पीक आलेच आहे तर त्याची योग्य निगरानी करण्याचे ठरविले. पिकाला योग्य वेळी खत पाणी देऊन त्यांनी शेतीची मशागत केली. त्यामुळे शेतात ज्वारीची कणसे डोलू लागली. गावातील जो तो पीक चांगले आले म्हणून शेतकर्यांच्या मुलांचे कोतुक करू लागला. चौघा मुलांनी योग्य वेळी ज्वारीची कणसे खुडली. त्यातून दहा-बारा पोती ज्वारीचे उत्पन्न झाले. ती ज्वारी विकून चौघाही मुलांना भरपूर पैसे मिळाले. पैसे हातात पडल्यानंतर चौघांनाही विलक्षण आनंद झाला व आपल्या वडिलांनी शेतात ठेवलेले गुप्तधन हेच होते, अशी त्यांची धारणा झाली.

    त्यानंतर चौघांनी मिळून भरपूर मेहनत करून दरवर्षी आपल्या शेतातून असेच धन गोळा करण्याचा निश्चय केला.

  • असा हा खारीचा वाटा.

    नुकताच पावसाळा सुरु झालेला होता. पावसाच्या सरी सारख्या अधून मधून पडत होत्या. सर्वत्र हिरवळ दिसू लागली होती. थोड्याच दिवसांनंतर त्या हिरवळीचे धागे, निसर्ग दाट व पक्के करणार. आणि एक अप्रतिम हिरवागार असा गाल्लीचा सर्व उघड्या रानोमाळ जागांमध्ये पसरुन टाकल्याचा आनंद निर्माण होणार. हा गाल्लीचा, त्या वर्षाऋतूच्या स्वागता साठीच असावा. अशा हलक्या फुलक्या अगमन प्रसंगीच्या नव पावसाळी वातावरणात प्रवास करावा. खिडकीजवळ बैठक मिळालेली असावी. बाहेरील नयन मनोहर द्दष्य टिपताना मिळणारा आनंद, वर्णन करण्याच्या पलीकडला.

    ठाण्याहून पुण्याला रेल्वेने चाललो होतो. खिडकीजवळची जागा. बाहेरील वातावरण वर वर्णन केल्या प्रमाणे. आणि तो आनंद लूटण्यात मग्न झालो होतो. इतक्यांत माझे लक्ष विचलीत झाले एका घटनेमुळे. माझ्या समोरच्या बाकावर एक वयस्कर बाई बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी एक पंधरा वर्षाचा मुलगा देखील होता. बाईंच्या हातात एक पिशवी होती. त्यातून त्या काहीतरी काढून त्या मुलाच्या हाती देत होत्या. मुलगा बाहेर बघून, ती वस्तू जोरकस प्रयत्न करीत, बाहेर दुर अंतरावर फेकून देत असे. त्या बाई व मुलाच्या या हरकती सतत चालू होत्या. मला काहींच बोध होईना, की तो बाहेर काय फेकीत होता.

    बराच वेळ पर्यंत मी हे सारे बघत राहीलो. बेचैन होऊ लागलो. त्यांच्या ह्या बागण्याचे कोडे कांही उलगडेना. शेवटी विचार मालीकेचा बांध तुटला.

    मी त्या बाईनाच विचारले. “ आजी मला क्षमा करा. मी एक गोष्ट वियारुं का तुम्हाला ? मी मघापासून बघतो आहे, तुम्ही ह्या मुलाला कांही तरी देत आहांत. हा मुलगा तेच बाहेर दुर फेकून देत आहे. मला ह्याचा काहीच उलगडा होत नाही. त्या बाई एकदम हसल्या. प्रथम त्या मुलाकडे बघू लागल्या. हा माझा नातू. मुलाचा मुलगा. आम्ही सर्वजण एकत्र राहतो. नेहमी मी आपल्या मुलीकडे पुण्याला जात असते.

    “ मला एक सवय म्हणा वा छंद आहे. घरांत नेहमी अनेक प्रकारची फळे आणली जातात. जसे चिकू, सिताफळ, बोर, मोसंबी,संत्री, आंबा, रामफळ, चिंचा, पेरु, पपई, कलींगड, खरबूज .इत्यादी. मी त्यांच्या बिया एकत्र करुन, एका टोपलीत जमा करुन ठेवते. गच्चीवरील टेरेसवर ठेऊन देते. सर्व बियाणे सुकतात त्याना पिशवित ठेवते. पावसाळ्याचा मोसम सुरु झाला की जेव्हां माझे पुण्याला जाणे होते, मी ती बियाने बरोबर घेते. ती मी रस्याने फेकीत जाते. बी, जमीन व पाणी याच्या संपर्कात अल्यास त्या रुजण्याची बरीच शक्यता असते. मला माहीत नाही, की काय होत असेल त्या बियांचे. अंकुरल्या, रुजल्या वा कुजल्या. न त्यांच्यसाठी पोषण, न संरक्षण, न योजना. फक्त एक अंधारामधला प्रयोग. सर्व कांही अज्ञानामध्ये. फक्त एकच हेतू मनांत ठेऊन हे केले जाते. झाडे लावा, निसर्ग वाढवा, आणि पर्यावरण सांभाळा. खारीचा हा माझा वाटा समजून समाधान मानते. “

    त्या बाईंचे डोळे सर्व सांगताना पानावलेले दिसले. त्यात दिसली चमक, तगमग आणि वयाची जाण. तरी देखील काहींतरी रचनात्मक करण्याची जीद्द.

    सारे एकून माझे ह्रदय भरुन आले. मी त्यांच्या वयाला व कार्याला अभिवादन केले.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • अंगठ्याचा ठसा

    गावाकडील एक प्रसंग. बँकेमध्ये पेसे काढण्यासाठी गेलो होतो. खुर्चीवर बसून पैसे काढण्याचा फॉर्म भरू लागलो. एक खेडूत बाई, नौवारी लुगडे व कपाळावर मोठे कुंकू, माझ्या जवळ येवून विनऊ लागली. “माझा फॉर्म भरून देता का?” “किती रुपये काढायचे आहेत?” मी विचारले. “पंचवीस हजार रुपये काढायचे आहेत.” मी थोडेसे आश्चर्याने तिच्याकडे बघितले. त्या बाईंचा पेहेराव, अशिक्षितपणाची झलक आणि बोलण्यातील गावान्ढालपण ह्याची माझ्यामनावर त्या बाई विषयी प्रथमदर्शनी जी प्रतिमा निर्माण झाली होती, त्याला केवळ त्या आकड्याने धक्का बसला. मी तिचा फार्म घेत पासबुक मागितले. अपडेटेड असलेले पास बुक बघून मी पुन्हा आवक झालो. त्यात थोडे थोडके पैसे नसून पांच लाख पेक्षा जास्त रक्कम होती. क्षणभर स्वताहाच्या समजा बद्दल आणि परिस्थितिच्या अव्लोकित सामर्थ्या बद्दल थोडिशी खंत वाटली. जास्त चौकाशी न करता, मी तिचा पैसे काढण्याचा फार्म भरुण दिला. तिला स्वक्षारी करण्यास संगीतले. ती चटकन पुढे आली. व तिने आपल्या दाव्या हाताचा अंगठा पुढे केला “ मल लिव्हन एत नाही. मी नेहमी डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसाच् देत असते.” ती सहज म्हणाली..

    “अग मावशे तुझी कामालच आहे. तुझ्या पासबुकात भरपूर पैसे आहेत. तुला लिहिता वाचता एत नाही. तू अंगठ्याचा ठसा देतेस. कुणीतरी फसवील याची भीती वाटत नाही का?” मी गंमत म्हणून विचारले. हा ती मिश्कील्तेने म्हणाली, “ अहो सहीसारखी सही करून माणस फसवितात कि. साह्यान धोका होऊ शकतो. परंतु अंगठ्याच्या ठशाला नाही. माणस माणसालाच फासावितील परंतु माणूस देवाला फसवू शकेल का? साऱ्या जगात माझ्या हाताच्या अंगठ्यावानी दुसरा अंगठा कोठे मिळेल? हा अंगठा देवाची ठेव आहे. त्याच्या सारखा दुसरा मिळणार नाही. लोक लबाडी करतात ती साह्याची आणि लिखापढीची. मला कोण फसणार? “

    एक नैसर्गिक सत्य. महान तत्वज्ञान. तिच्या तथाकथित अशिक्षीत मुखातून माझ्या तथाकथित सुशक्षित डोक्यावर आदळले जात असल्याच्या भास होऊ लागला. समाज गैरसमज ह्याची दरी कोणत्या दिशेने रुंदावत जाते. ह्याचे माणसाला भान राहत नाही. आजच्या आधुनिक युगाने आणि संगणकासारख्या इलेक्ट्रोनिक माध्यमांनी सुध्या ओळख माण्यतेसाठी अंगठ्याचा ठसा हाच एकमेव प्रभावी साधन असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या समोर अंक, शब्द, खुणा, प्रतिमा, इत्यादी दुयमच ठरतात. त्या अनामिक अशिक्षित परंतु अनुभव संपन्न मावशीला अभिवादन करून मी घरी आलो.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सोनेरी तसवीर !

    त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते. भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती. ग्रंथालयात शिरताच भिंतीवर एक भव्य काचेची फ्रेम केलेली तसवीर दिसली. फ्रेमची चौकट सोनेरी असून, अतिशय आकर्षक होती. मध्यभागी एका वहीचा वेडावाकडा फाडलेला कागद चिकटवलेला होता. त्यावर चार रेघोट्या आखून कसलासा आलेख काढलेला होता. अतिशय उत्कृष्ट सजविलेल्या कालाकृतीपूर्ण, अशा फ्रेम मधल्या त्या लहानश्या तुकड्याने, मनाची उत्सुकता शिगेला पोहोंचली. खालती टीप म्हणून एक संदेश होता.

    वैद्यकीय शास्त्रातला एक महान संशोधक अलेक्झांदर फ्लेमिंग याने पेनिसिलीन ह्या जीवदायी व मानववादी जीवसृष्टीला वरदान ठरेल असे औषध शोधून काढले. त्याच्या ह्या शोध कार्याची दाखल घेऊन त्याला नोबेल पारितोषिक ही दिले गेले. त्यांनी भारताला भेट दिली, तेव्हा ते पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात आले होते.

    जमलेल्या एका विद्यार्थी समुदायात अनौपचारिक गप्पा मारीत असताना, कुणीतरी त्यांना पेनिसिलीन विषयी प्रश्न विचारला. एका विद्यार्थ्याच्याच हातातली वही घेऊन, त्यांनी चटकन छोटा ग्राफ काढला. आणि प्रश्नाची उकल केली. तोच तो भाग्यवान कागदाचा तुकडा,

    ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तास्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवीत होता.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • मनाची श्रीमंती

    वचनं की दरिद्रता' असे म्हणतात. माणूस कितीही गरीब वा दरिद्री असला तरी ही गरिबी वा दारिद्र्य प्रत्येक वेळी दाखवायलाच पाहिजे असे नाही. उलट कितीही दारिद्र्य असले तरी आपले बोलणे-चालणे, तसेच आचरणातून ' श्रीमंती' दाखविता येते. त्याचीच ही कथा.

    एका चाळीतील एका खोलीत एक महिला व तिची चार लहान मुले राहात होती. त्यांची परिस्थिती फारच गरिबीची होती; परंतु त्या महिलेने आपल्या मुलांना अशी शिकवण दिली होती की, आपण फार गरीब आहोत हे ते नेहमीच विसरून जाऊन रोजचा दिवस आनंदाने जगत होती. कारण ते सर्वजण एकाच खोलीत राहात असले तरी खोलीचा वेगवेगळ्या भागांना त्यांनी दिवाणखाना, पाकशाळा, शयनगृह,
    अभ्यासगृह अशी नावे दिली होती. म्हणजे पाकशाळेच्या भागात स्वयंपाक व भोजन करणे, अभ्यासगृहामध्ये मुलांनी अभ्यास करणे व शयनगृहात झोपणे. गरिबीमुळे त्यांच्या घरात फारशी भांडी नव्हती. रोज भोजन करायला ते पत्रावळी वापरत. मात्र त्यांना ते सोन्याच्या थाळ्या म्हणत. तसेच पदार्थांनाही त्यांनी वेगवेगळी नावे दिली होती. पिठलं- भाकरी केली असल्यास त्यांना ते श्रीखंड-पुरी म्हणत. गुळाला ते अमृतखंड म्हणत, तर मिरच्यांचा ठेचा असल्यास ते त्याला खमंग पक्वान्न असं म्हणत. जेवताना या शब्दावरून त्यांच्यात नेहमीच हास्यविनोद चालत. फाटक्या सतरंजीला ते काश्मिरी गालिचा म्हणत, तर मोडक्या खुर्चीला ते सिंहासन असे संबोधित. एकदा त्या चाळीत त्यांच्या खोलीच्या बाजूलाच एक नवीन बिर्‍हाडकरू आले. दिवसा तसेच रात्री मुलांचे ते वेगवेगळे शब्दप्रयोग त्यांच्या कानावर आले. त्यामुळे त्या बिन्हाडकरूला वाटले, आपल्या शेजारी फार श्रीमंत माणसे राहात आहेत.

    मात्र इतके श्रीमंत कुटुंब चाळीत कसे काय राहाते, याबद्दल त्या बिर्‍हाडकरूला विलक्षण कुतूहल वाटत होते. काही दिवसांनी त्यांचा परिचय होत गेला व एके दिवशी तो नवीन बिऱ्हाडकरू त्या महिलेच्या घरात गेला. तेव्हा त्याला ती महिला सिंहासनावर बसून (मोडक्या खुर्चीवर) काश्मिरी गालिचावर (फाटकी सतरंजी) बसलेल्या आपल्या मुलांना शिकवित होती, असे दृश्य दिसले. खोलीत त्याने सर्वत्र नजर फिरवली, तेव्हा त्यांच्या शब्दप्रयोगाचा अर्थ कळायला त्याला फारसा वेळ लागला नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाने व समाधानाने कसे जगायचे हे त्या कुटुंबाकडून तो शिकला होता.

    त्याबद्दल त्या कुटुंबाचे कौतुक करून त्याने त्यांचा निरोप घेतला.

  • असेही एक स्वच्छता अभियान

    एकनाथरावांचे कार्य अत्यंत छोटे वाटत असले तरी प्रचंड असे वाटते. उत्पन्न झालेल्या भावनांना कांहीजण विचारांच्या चक्रांत स्वतःच्या मनाला वाटेल तसे करु इच्छीतात.

  • सोनेरी तसवीर !

    तोच तो भाग्यवान    कागदाचा तुकडा, ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तस्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या  पाऊलखुणा दाखवीत होता.

  • आजी ग आजी!

    सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते.

  • शंकेचे निरसन

    एक राजा होता. तो फारच चिकित्सक होता. त्याला थोडी जरी शंका आली तरी तो ती शंका लगेच विचारी व शंकेचे निरसन झाल्याशिवाय तो स्वस्थ बसायचा नाही. त्यामुळे त्या राजाबरोबर गप्पा वा चर्चा करायला सहसा कोणीही तयार होत नसत. त्या राजाचे जे राजगुरू होते, त्यांना मात्र राजाची या स्वभावाची पूर्ण कल्पना होती. राजाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी अनेकदा तेच पुढाकार घेत असत. एकदा राजा धर्मगुरूबरोबर चर्चा करीत असताना परमेश्वराचा विषय निघाला. ईश्वर कसा सर्वत्र असतो व तो संकटकाळी आपल्या भक्ताला कसा प्रत्यक्ष येऊन वाचवितो हे धर्मगुरूंनी अनेक उदाहरणांसह राजाला पटवून सांगितले. त्यावर राजाने संकटसमयी परमेश्वर आपल्या भक्ताला कसे वाचवितो? तो नेमके काय करतो? याबद्दल निरनिराळ्या शंका व्यक्त केल्या. त्याच्या सर्वच शंकांना धर्मगुरुंना उत्तर देता आले
    नाही म्हणून ते राजगुरुकडे गेले. राजाचे शंकानिरसन करण्यासाठी राजगुरूंनी प्रत्यक्ष कृतीच करायचा निर्णय घेतला. त्या राजाला एक नातू होता. तो फारच सुंदर व हुशार होता. त्यामुळे राजाचा फार आवडता होता. दुसऱ्या दिवशी राजगुरू राजाला घेऊन उपवनात फिरायला गेले. आजूबाजूला पहाऱ्याचे सैनिक होतेच. तेथे राजाला तलावाच्या ठिकाणी पाठमोरा बसलेला आपला नातू दिसला. म्हणून राजा घाईघाईने
    तलावाकडे निघाला. तेवढ्यात त्याला त्याचा नातू तलावात पडल्याचे दिसले. नातवाला पोहता येत नाही, हे राजाला माहीत होते, त्यामुळे त्याने स्वतः पळत जाऊन तलावात उडी टाकली व आपल्या नातवाला बाहेर काढले. वास्तविक तो नातवासारखा दिसणारा मेणाचा पुतळा होता. परंतु राजाने त्याला खरा नातू समजून त्याला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली होती. नंतर सर्व प्रकार समजल्यानंतर राजगुरू राजाला म्हणाले, परमेश्वर आपल्या भक्ताला म्हणजे आपल्या आवडत्या माणसाला संकटातून कसे वाचवितो याचे कोडे तुम्हाला पडले होते ना?

    त्याचे उत्तर देण्यासाठी आम्हाला हे सर्व नाटक करावे लागले. उपवनात आजूबाजूला एवढे शिपाई असताना तुम्ही एकाही शिपायाला आदेश न देता नातवाला वाचविण्यासाठी तलावात स्वत: उडी मारली. यावरून परमेश्वर आपल्या भक्ताचे कसे रक्षण करतो हे तुम्हाला कळलेच असेल. राजाचे समाधान झाले व पुढे त्याच्या शंकेखोर स्वभावाला आळाही बसला.