नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
रविवारची सुट्टी. दुपारचं जेवण झाल्यावर मी गॅलरीत खुर्ची टाकून निवांत बसलो होतो. जूनचा महिना असल्यामुळे आभाळ भरुन आलं होतं. आता थोड्याच वेळात थेंब पडायला लागतील, असं भर दुपारी ‘नभ मेघांनी आक्रमिलं’ होतं. तेवढ्यात मला कुणाचा तरी आवाज आला. होय, पाऊसच माझ्याशी बोलत होता. तो मला म्हणाला, ‘कसा आहेस मित्रा, ओळखलंस का मला?’ मी गोंधळून गेलो. मला काय बोलावं ते सुचेना.
July 13, 2021
कठोर परिश्रमाचे फळ नेहमीच चांगले असते. त्यामुळे तू गणिताचा मन लावून अभ्यास केल्यास तुला गणितात चांगले गुण मिळू शकतात. तुझ्या वडिलांनाही समजावून सांगण्यासाठी मी स्वत: तुझ्या घरी येणार आहे.
January 28, 2018
एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूस ठेवला .
काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे .
दुसरा मात्र उडेचना.
राजा काळजीत पडला ,
अगदी सारखे दोन पक्षी. एक भरारी घेतोय दुसरा थंड.
काय करावे.. काय करावे..?
राजाने दवंडी पिटविली, गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून .
दुसऱ्या दिवशी पहाटेस राजा बागेत आला, बघतो तो दुसरा गरुड पहिल्या पेक्षाही उंच गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .
राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. हे अजब घडले कसे ? आणि केले तरी कोणी !
एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला, "महाराज मी केले."
राजा : अरे पण कसे ?
शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली,
दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघत आहातच.
तात्पर्य :-
आपली फांदी कधीतरी सोडून बघा.
सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका.
कदाचित बाहेर अधिक सुंदर
खुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल.
Change ur thought.....
May change ur life....
"विचार बदला, आयुष्य बदलेल"
comfort zone मधुन बाहेर पडा. आहे त्या परीस्थीतीत जीवनाचा आनंद घ्या ....
March 6, 2017
दूरसंचार क्षेत्राच्या इतिहासातील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा! त्या पहिल्या मोबाईलचे नाव होतं ‘डायनाटेक’. एक किलोहून त्याचं वजन जरा जास्तच होतं. त्याची लांबी १३ सें.मी. व रुंदी ५ सें.मी. होती. तो चार्ज होण्यासाठी तब्बल दहा तास लागायचे. पूर्ण चार्ज झाल्यावर तो फक्त अर्धा तास वापरता यायचा.
April 4, 2022
गैरसमज. शंका. संशय आणि मनात आढी ठेवून तू तू मै मै सुरू. आईबाबा प्रमाणेच मुलालाही पटते कष्टाचे दिवस आठवतात पण त्याला बोलता येत नाही. एकीने जन्म दिला आहे तर दुसरी जन्माची जोडीदार म्हणून तो कुणाचीच बाजू घेऊ शकत नाही. आणि घेतलीच तर भडका उडतो. वातावरण बिघडते.
January 6, 2022
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
February 26, 2018
घटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे आत्मिक समाधानाकडे रुजलेली असतात. हाच खरा जीवनाचा आनंद नव्हे काय?
September 24, 2020
आम्हीच माघार घेतली पाहिजे बरोबर आहे घर त्यांच राज्यही त्यांचेच आम्ही आश्रीत तेंव्हा बोलायचे नाही गप्प गुमान बंद करा आणि बसा शांत. आता नानांची पण काही चूक नाही. आर्थिक परिस्थिती मुळे सिनेमा नाटक सहली काहीही जमले नाही व्यवसाय. कामाचा व्याप मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा व वेळ गेला. आत्ता कुठे सगळे स्थिरस्थावर झाले आहे.
February 16, 2022
साप्ताहिक मार्मिक त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करत होते.त्यांतली मा. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे मराठी मनांना जागवीत होती. संपादकीयात काय लिहिलंय ह्याला खूप महत्त्व होतं. जून १९६६मध्ये शिवसेनेचा स्थापना झाली होती.
January 25, 2023
सूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट झाली कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले .
August 19, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti