नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
माझा पासपोर्ट अप्लाय केल्यापासून तिसर्या दिवशी तो घरात आला आणि माझ्या डोक्यातल्या सरकारी यंत्रणेला छेद बसला. थोडक्यात म्हणजे गोगलगायच्या गतीने काम करणार्या गवरमेंटवरचा विश्वास उडाला. लोकांच्या कामाच्या बाबतीत अतिदक्ष असणारे आपले सरकार एवढे कार्यक्षम झाले असेल ही स्वप्नातदेखील कल्पना नव्हती. मी साध्या पासपोर्टबद्दल बोलतोय. तात्काल नव्हे. जिथे तात्काल पासपोर्ट यायला आठ दिवस लागतात तिथे साधारण पासपोर्ट तिसर्या दिवशी घरात? आणि ते ही जुन्या आणि नव्या पासपोर्टवरचा पत्ता वेगवेगळा असताना! निदान पासपोर्ट या सरकारी सेवेची टर उडवण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले असे म्हणायला हरकत नाही.
मला दहा वर्षापूर्वीची अवस्था आठवली. पहिल्यांदा एजंट पकडायला लागायचा. तो लेकाचा माझी सगळी ओरिजिनल कागदपत्रे घेउुन गायब झाल्यावर एखाद्या डिटेक्टिवसारखा त्याला हुडकून काढायला पंधरा दिवसात ज्या यातना झाल्या होत्या त्या विचारू नका. नंतर पासपोर्ट गेला खड्ड्यात माझी ओरिजीनल्स तरी परत मिळू देत म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली आणि देव पावला. किती कागदपत्रे आणि किती फोटो लागायचे!
आता पासपोर्ट काहीच्या काहीच सुधारले आहे असे बर्याचजणांकडून ऐकले होते मात्र मागचा अनुभव पाठीशी असल्यामुळे आयत्यावेळी घोटाळा नको म्हणून मी दहावीपासून आतापर्यंतच्या जेवढ्या म्हणून परीक्षा पास केल्या होत्या त्या सगळ्यांची सर्टिफिकेट्स घेउुन गेलो होतो. तेवढेच नाही तर माझ्या नावावर येणारे लाईटबिल, आम आदमी का आधिकार आधार, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसेन्स, इलेक्शनचे वोटिंग कार्ड, जुना पासपोर्ट असा सगळा बाडबिस्ताराच घेउुन गेलो होतो. शिवाय अमक्याची झेरॉक्स द्या आणि तमक्याचे ओरिजिनल दाखवा ही भानगड नको म्हणून दोन बंडल झेरॉक्स घेउुन गेलो होतो. काही जरी झाले तरी तिथे कुणाच्याही कचाट्यात सापडायचे नाही हे ठरवले होते. त्यातला एखादा कागद जरी हरवला असता तर तो पुन्हा मिळवणे महामुश्किल होते याची जाणीव मलादेखील होती.
पहिला पासपोर्ट संपून एक वर्ष उलटून गेले होते. तो रिन्यु करायला टाईम जुळून येत नव्हता. आज उद्या करत एकदाची अपॉईंटमेंट बूक केली. अपॉईंटमेंटदिवशी तिथे गेल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला कारण काम भलतेच सिस्टेमॅटिक होते. गेटवरच्या वाचमनपासून त्याची सुरवात. आत जाणार्या लोकांना वेळेनुसार रांगा करून तो आत सोडत होता. एकदा आत गेले की कोणत्याही नॉर्मल (सिनीयर सिटीझन आणि अतिलहान बालके यांची रांग वेगळी असते) लाईनमध्ये उभे राहून टोकन घ्यायचे. टोकन घेताना तिथले लोक अमाप कार्यक्षम आहेत हे लगेच कळते. पटापट आपल्याकडचे पेपर घेउुन चेक करतात आणि टोकन देतात.
मग ते टोकन घेउुन पुढल्या ‘ए’ या सेक्शनमध्ये जायचे. हा सेक्शन सर्वात महत्वाचा. कारण तुमचे पेपर, तुमच्याबद्दलची माहिती आणि फोटो ही सगळी कार्यवाही या ठिकाणी पार पडते. पासपोर्टसाठी आता तर पहिल्याप्रमाणे फोटो घेउुन जायचीही गरज नाही. तिथल्या प्रत्येक टेबलावर असणार्या डीएसएलआरच्या कॅमेराने फोटो काढले जातात. आपल्याशी गप्पा मारत आपली माहिती सर्व्हरवर अपलोड केलेली कळतदेखील नाही. तिथेच आपला पासपोर्ट कुठपर्यंत पोहोचलाय याची खुशाली मेसेजद्वारे पाहिजे असल्यास केवळ पंचेचाळीस रुपये भरून ती सुविधा घ्यायची सोय आहे शिवाय पासपोर्टसाठी कव्हर हवे असल्यास इथे पैसे भरायचे आणि रिसीट घ्यायची. मग ते पोष्टाने घरी येते.
पण आॅनलाईन फॉर्म भरताना मी एक छोटासा घोटाळा केलाच होता. जन्मठिकाण आणि जिल्हा या रकान्यात जन्मभूमी आणि जन्मभूमीचा जिल्हा म्हणून सांगलीऐवजी ठाणे अशी चूक माझ्याकडून झाली होती. मी भरलेली माहिती पासपोर्टवर प्रिंट होणार नसल्याने मी बिनधास्त होतो. पण आत गेल्यागेल्या सुरवातीलाच त्या मुलीने माझे नाव, पूर्ण पत्ता आणि शिक्षण विचारल्यानंतर ती माझ्या जन्मगावाकडे वळली. मी ते सांगितल्यावर “हे कोणत्या जिल्ह्यात येते?” अशी विचारणा झाली.
“सांगली.”
“मग तुम्ही ठाणे लिहून आणले आहे.”
मी स्वत:ची अक्कल लावून सांगलीतल्या जागेवर ठाण्याची जागा म्हणून कब्जा केल्यामुळे गप्प बसलो. मग बहुधा माझी दया येउुन तिने दोन जिल्ह्यांमधला प्रादेशिक तिडा सोडवून नीट केला. वास्तविक चूक लक्षात आल्यावर मीही तो सोडवायचा प्रयत्न केला होता पण मला ती माहिती बदलता आली नव्हती. तिने त्या सगळ्या कागदपत्रांपमधून लाईटबिल, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्टच्या झेरॉक्स घउुन बाकीचे काही नको म्हणून सांगितले आणि केवळ तीच कागदपत्रे पुढच्याही सेक्शनमध्ये दाखवा म्हणून बजावले.
टोकन नंबर दिसण्यासाठी जागोजागी डिस्प्ले लावलेले आहेत. त्याही आकड्यांनी लोक बावरून जाउु नयेत म्हणून मदत करायला स्वयंसेवकही आहेत. कोणत्या टोकनचा नंबर आलाय हे ते मोठ्याने सांगतात. त्यामुळे शक्यतो चुकायला होत नाही. पुढे ‘बी’ आणि ‘सी’ सेक्शनमध्ये जाउुन तिथल्या साहेबांना तीच कागदपत्रे दाखवली. कागदपत्रे वेगवेगळ्या रंगाच्या पेनने चेक करून पुन्हा ती आपल्याच हातात देण्यात येतात. शेवटच्या सेक्शनमध्ये माझ्या जुन्या पासपोर्टवर पंचने छिदे्र मारून साहेबाने तो खराब केला आणि “झाले आता, निघा.” म्हणून त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला.
ती चेक केलेली कागदपत्रे माझ्याच हातात होती. हा बाबा तर “झाले. बाहेर जा.” म्हणतोय. पुन्हा विचारावे म्हटले तर तो उत्तर सांगायच्या मूडमध्ये दिसत नव्हता म्हणून सगळी लोक जाताहेत तिकडे गेलो. एक्झिट दरवाजावर उभ्या असलेल्या वॉचमनला विचारल्यावर त्यानेही बाहेरचाच रस्ता दाखवला.
त्या सर्वांनी चेक केलेला माझी ओळख, शिक्षण आणि कुठे रहातोय या पुराव्यांच्या झेरॉक्सचा गठ्ठा माझ्याकडेच होता आणि वॉचमनही तेवढ्याच निष्काळजीने बाहेर जा म्हणाल्यावर मी त्याला हातातले पेपर कुठे द्यायचे म्हणून विचारले.
“तुमच्याकडेच ठेवा.” असे उत्तर आले.
म्हणजे त्या सगळ्यांकडून पेपर तपासून घ्यायचे आणि तो बंडल घेउुन आपण घरी यायचे. पुढे पासपोर्टचे काय होईल माहित नाही, हे मला पटण्यासारखे नव्हते.
“पासपोर्ट नक्की घरी येईल ना?” म्हणून विचारल्यावर तो माझ्याकडे “काय येडा माणूस आहे, एवढ्यांदा सांगितले तरी कळत नाही.” अशा नजरेने पहात होता. डोक्यात डाउुट घेउुन बाहेर रिक्षात बसतो की नाही एवढ्यात पासपोर्ट सेवा केंद्राचा “तुमचा पासपोर्ट प्रिंटींगसाठी पाठवण्यात येत आहे.” असा मेसेज आला. मी ट्राफिकजाममधून घरी पोहोचतो की नाही तोपर्यंत “तुमचा पासपोर्ट प्रिंट झाला.” म्हणून मेसेज. पुन्हा थोडा वेळ गेल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनचा मेसेज आणि संध्याकाळी साक्षात पोलिसांचा फोन! “तुमचा पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आला आहे. तुमची सगळी कागदपत्रे घेउुन उद्या सकाळी अकरा वाजता पोलीस स्टेशनला या.”
या सर्व गोष्टी काही तासांत घडल्या हे पचवणे माझ्यासारख्याला खूप जड जात होते. मग मी पोलीस स्टेशमध्ये देण्यासाठीची सोसायटीची एनओसी तेवढी घेतली. बाकीच्या झेरॉक्स होत्याच. मला कुठल्याही सरकारी आॅफिसमध्ये जाताना काहीही कारण नसताना उगाचच भीती वाटते. म्हणजे एकेक अनुभवच तसे आहेत. कुठलीही कागदपत्रे घेउुन जा, जो नसतो नेमका तोच कागद विचारला जातो. बरं पराभव मान्य केला तरी पुरेसे नाही. हे लोक त्यांच्या आॅफिसमधून आपल्याला आउुटच करतात.
बरोबर अकरा वाजता आमच्या एरियात झालेल्या चकचकीत पोलीसस्टेशनमध्ये वेळेआधीच गेलो. उगाच लफडी नकोत. खिडकीत बसलेल्या एका हवालदारमामांना “पासपोर्ट व्हेरीफिकेशन?” म्हणून विचारल्यावर त्यांनी दुसर्याबाजूने आत जा म्हणून सांगितले. दुसर्या बाजूने आत गेल्यावर मी कुठल्यातरी भलत्याच आॅफिसमध्ये प्रकटलो आणि तिथले सगळेजण माझ्याकडे “आता हा आणि कोण आला?” अशा नजरेने पाहू लागले. काहीतरी घोटाळा होता म्हणून तसाच बाहेर आलो पुन्हा “दुसर्या बाजूने आत..” असे दोनदा स्वत:शीच पुटपुटत ज्या गुप्तमार्गाने घुसलो ते समोर मुद्देमाल कक्ष लिहीलेल्या दरवाजाजवळ निघालो. समोरून एक हवालदार “अहो, तुम्ही इकडे काय करताय?” म्हणून ओरडल्यावर आपण नको त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे याची मला कल्पना आली. त्यांना काहीही उत्तर न देता अक्षरश: तिथून बाहेरच पळालो. मग तिथे उभा असणार्या एका जाणकार माणसाला विचारून खात्री करून घेतल्यावरच पुढल्या आॅफिसच्या दिशेने पाउुल उचलले.
दहा मिनीटांत पोलीस व्हेरीफिकेशन झाले. दोनतीन ठिकाणी माझ्या सह्या घेउुन व्हेरीफिकेशन फॉर्मवर फोटो चिकटवण्यात आले. पोलीसमामांच्या टॅबने माझा फोटो घेण्यात आला आणि त्याचदिवशी संध्याकाळी “तुमचा पासपोर्ट डिस्पॅच झाला.” असा मेसेज आला आणि माझा सरकारी यंत्रणेवरचा विश्वासच उडाला.
आॅफिसमध्ये असताना दुसर्यादिवशी बाराच्या आसपास बायकोचा फोन आला, “वॉट्सअप चा मेसेज बघून लगेच कॉल करा.” अशी आॅर्डर होती.
बायकोला स्मार्टफोन घेउुन दिल्यापासून अमेझॉन, फ्लिपकार्टवरच्या लेटेस्ट आॅफर्स, नको असलेली फर्निचर युनिट्स वगैरे पहावे लागते. अगदीच काही नसलं तरी ही फेसबुकवरच्या हजारो फोटोंपैकी कुठलेतरी इंटेरियरचे फोटो पाठवते आणि “आपण आपल्या घरी तसे करून घ्यायचे.” असे टुमणे मागे लावते. आता काय पाठवले आहे म्हणून मी मेसेज उघडला तर परवा जो पासपोर्ट रिन्यू करायला मी अपॉईंटमेंट घेतली होती त्या पासपोर्टचा खराखुरा फोटो होता. अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पासपोर्ट घरी पोहोचवून एका सरकारी आॅफिसने सरकारी यंत्रणा किती कार्यक्षम असू शकते याचा प्रत्यय दिला होता.
“विनात्रासाचा एवढ्या लवकर निघतो तर आमचाही पासपोर्ट काढून घ्या ना.”
आता ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब,’ ही सबबही उरली नव्हती कारण झालेल्या घटनांची साक्षीदारही तीच होती.
© विजय माने, ठाणे
http://vijaymane.blog
July 23, 2018
"दोन वाईट गोष्टींमधून एक निवडायची वेळ आल्यास अशी गोष्ट निवडा जी तुम्ही पूर्वी करून पाहिली नाही."
"ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे याचा विचार करण्यात वेळ न घालवता, ग्लास रिकामा झाल्यावर धुणार कोण याचा विचार करावा."
लहानपणी खेळांविषयी प्रेम असतं तर......... तारुण्यात प्रेमाचे खेळ सुरू होतात...
आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत आम्हाला ते शिकवतात की , ' प्रत्येक स्त्रीला मातेसमान माना ' ठिक आहे यामुळे आपली नीतीमत्ता सुधारेल पण आपल्या वडीलांची बिघडेल त्याचं काय ? - आचार्य अत्रे
हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलायं, काही कल्पना आहे का?... .... अहो, आपल्या स्वयंसिद्ध बापुंचं प्रवचन सुरु असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहुन मला एवढा धक्का बसला की हातातला बिअरचा कॅन निसटून खाली पडला!!!
यशाच्या मार्गावर नेहमीच 'अंडर कन्स्ट्रक्शन'ची पाटी लटकत असते......
' सदैव' आणि 'कधीच नाही' हे शब्द कधीच वापरू नयेत हे सदैव लक्षात ठेवा.
पहिले चाक ज्याने शोधून काढले, त्याचे एवढे कौतुक कशाला? इतर तीन ज्यांनी शोधली, ते खरे कौतुकाला पात्र आहेत!!!!
माणसांचीही गंमत असते पाहा. तुम्ही एखाद्या माणसाला सांगा, आकाशगंगेत ३०० अब्ज तारे आहेत.... तो चटकन विश्वास ठेवतो. पण, पार्कातल्या बेंचला नुकताच रंग लावलाय, तो ओला आहे असं सांगा.... तो स्वत: हात लावून बोटं बरबटवून खात्री करून घेतल्याशिवाय राहात नाही!!!!
का? का? का? १. पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात? २. स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक 'बसतात' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात?
३. जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का? ४. बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का 5. १00 वर्षांची म्हातारी जेव्हा 'हच का नया लाइफटाइम रिचार्ज' घेते!
आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो. आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो. आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!!
जुनी मोटर कार खरेदी करावयाची असल्यास , तिची योग्य किंमत ठरविण्याची पद्धत जी कार आवडेल ती दोन तास ट्रायलसाठी मागून घ्यावी व अशाच दुसर्या जुन्या गाड्यांच्या डिलरकडे घेऊन जावी. त्याला सांगावं की , तुम्हाला ही गाडी विकायची आहे. किती किंमत येईल ? तो सांगेल ती किंमत गाडीची खरी किंमत !
तुम्ही बरोबर असता तेव्हा कोणी तुम्हाला लक्षात ठेवत नाही, तुम्ही चुकता तेव्हा कोणी तुम्हाला विसरत नाही ....
प्रोफेसर विसराळू का असतात याचं कारण एका प्रोफेसरांनीच शोधून काढलं. परंतु नंतर ते कारण प्रोफेसर विसरून गेले.
हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!
नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे.
मार्क ट्वेन हा अतिशय बुद्धिमान आणि खोचक विनोद करणारा लेखक होऊन गेला. त्याची काही निरिक्षणे जगप्रसिद्ध आहेत. त्याचा हा सर्वांगसुंदर विनोद "जेंव्हा एक तरुणी एका तरुणाच्या हृदयावर डोके ठेवते ; तेव्हा मला फ़ार गंमत वाटते . त्याला हृदय नसतं ; आणि तिला डोके नसतं ....."
-- सुमित्र श्रीधर माडगूळकर
September 22, 2009
अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता .
September 22, 2024
नदीकाठाजवळ पाण्यात, धुक्याच्या पडद्या आडून, थोडा थोडा स्पष्ट होत गेला एका मचव्याचा आकार. मचव्यावर दोन माणसं होती. मचवा काठावर चढला. वल्हवणारा उठून उभा राहिला आणि मचव्याच्या तळातून टोपलीभर मासे घेऊन आणि जाळं खांद्यावर टाकून उतरला. त्याचा जोडीदार जो तोपर्यंत मचव्यातच बसून होता त्यानं ओरडून सांगितलं, “पावलू, येतना तुजें तुबक घेवन यो, एक दोन सोशे मेळटात जाल्यार पळोवया.” (पावलू, येताना तुझी बंदूक घेऊन ये, एकदोन ससे मिळाले तर बघू.)
May 5, 2022
ती गाडीतून खाली उतरली पाठोपाठ दोन मुले आणि एक म्हातारी बाई पण उतरली,ती तिची सासू असणार असा मी अंदाज केला होता , ती सासूच होती. ते सर्वजण जवळ आले तेव्हा ती सून हसली माझ्याकडे बघून, मी पण हसले. पण तिच्या सासूला जेव्हा बघितले तेव्हा लक्षात आले ह्या बाईना कुठेतरी आधी, पूर्वी पाहिले आहे, ती सासूपण हसली ,
ती पण माझ्याकडे बघत होती.
April 18, 2020
तो होळीचा दिवस होता. ग्रंथसाहिब दर्शनासाठी ते दोघे मुद्दाम अंबाल्याहून अमृतसरला आले होते. त्यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले होते. पिढीजात कापड व्यवसायातून फुरसत काढून तो फिरण्यासाठी बाहेर पडला होता. होळीनिमित्त सुवर्णमंदिरात विशेष अर्चना केली जाते. होळी हा मोठा व महत्त्वाचा सण मानला जात असल्यामुळे पंकजच्या माँ, पिताजींनी त्यांना अमृतसरला जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आदल्या रात्रीच ते दोघे तेथे पोहोचले होते. पंकज आधीही तिथे गेला होता.
June 3, 2026
ही सगळीच माणसे सर्वार्थांनच धार्मिक ! साहित्यिक ! राजकीय ! सामाजिक ! न्यायिक ! शैक्षणिक ! उद्योजक ! बैंकिंग !
अशा क्षेत्रातील मोठ्ठी ! विद्वान ! उच्च पदस्थ असून किती निर्मोही होती !… किती सन्यस्त वृत्तिची होती !…. किती लाघवी आणी अत्यंत साधी रहाणीमान असणारी होती !… किती परोपकारी होती…याची आज प्रकर्षाने जाणीव होते ..अशा आदर्श व्यक्ती आज खुपच दुर्मिळ झाल्या आहेत. हे मात्र खरे . यांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला..हे माझे पूर्वकर्म …एवढेच मी म्हणेन !
June 7, 2021

मोरूचा बाप मोरूला म्हणाला , ‘ ऊठ लेका , जागा हो , तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा . आता कोणत्याही क्षणी मतांची भीक मागायला आणि आपली सेवा करावयाला विविध पक्षांचे विनम्र पाईक कर जोडून येतील , त्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे , त्यांना म्हणावे , हे आमचे अपेक्षापत्र आहे.
October 20, 2019
December 17, 2022
पाणी हे जीवनावश्यक, या पृथ्वी वरचे अमृतचं जणू काही, पण आज त्याचा उपयोग आपण करून घेतोय पण त्याची साठवण? 100% होत्ये का? तर अजिबात नाही.
October 25, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti