(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माझी जबाबदारी

    जळी स्थळी एकच नारा. मुखपट्टी. (मास्क) अंतर आणि हात धुणे. कोरोनाने याचा खूपच उदोउदो केला आहे. माहिती नाही हे सगळे अजून किती दिवस चालणार आहे पण या त्रिसूत्री जबाबदारीने आणखीन काही गोष्टी शिकवल्या आहेत.

      December 19, 2021


  • लेडी विथ द लॅम्प

    १८२० साली इटलीमध्ये फ्लाॅरेन्स येथे नाइटिंगेलचा जन्म झाला. वयाच्या ३३व्या वर्षी १८५३ मध्ये झालेल्या क्राइमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची तिने अहोरात्र शुश्रुषा केली. रात्री हातात दिवा घेऊन जखमी सैनिकांना शांत झोप लागली आहे का? हे ती प्रत्येक खाटेजवळ जाऊन पहात असे. इतकी तिने त्या जखमी सैनिकांची सेवाभावाने काळजी घेतली म्हणून तिला ‘लेडी विथ द लॅम्प’ असे संबोधले जाऊ लागले.

      May 12, 2021


  • इंद्रधनूच्या निमित्ताने…

    एका मोठ्या कार्यक्रमाची जुळवाजुळव दोन महिने आधीच सुरू झाली होती. माझा जवळचा मित्र महेश वर्दे 'इंद्रधनू' या संस्थेचा अध्यक्ष होता. इंद्रधनूचा वार्षिक कार्यक्रम भव्य स्वरूपात एका मोठ्या ग्राऊंडमध्ये आयोजित करण्याचा त्यांचा विचार चालू होता. राजकपूर आणि व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातील गाणी असा मोठा विषय त्यांनी निवडला होता. सुप्रसिद्ध संगीत संयोजक अप्पा वढावकर संगीत संचालन करणार होते. तर भाऊ मराठे आणि मंगला खाडिलकर असे महाराष्ट्रातले दोन मातब्बर निवेदक सूत्रसंचालन करणार होते. माझ्याबरोबर माधुरी करमरकर, अजित परब, सुचित्रा भागवत, गौरी कवी, उमेश वाजपेयी असे अनेक प्रसिद्ध कलाकार गाणार होते. कार्यक्रम पाच तासांचा होता. महेश अतिशय मनापासून आणि काळजीपूर्वक कार्यक्रमाची आखणी करत होता. कार्यक्रम संध्याकाळचा असल्याने ग्रँड रिहल्सल त्याच दिवशी सकाळी घेण्याचे त्याने ठरवले. महेश आणि मी जवळचे मित्र असल्याने

    या कार्यक्रमात गाण्यासाठी माझे मानधन या विषयावर आम्ही बोललोच नव्हतो आणि त्याची काही गरजही नव्हती. रिहल्सलच्या मध्यंतरात महेशचा मुलगा रिशू सर्वांना ताजे मावा केक्स वाटत होता. केक्स फारच छान होते म्हणून मी अजून एक केक उचलला. रिशू लहान होता. तो म्हणाला,

    "बाबांनी प्रत्येकाला एकच केक द्यायला सांगितला आहे, काका.

    मी रिशूला सांगितले, "बाबांना माझा निरोप सांग की अनिरुद्ध काकाने एक जास्त केक घेतला आहे. त्याचे पैसे त्याच्या मानधनातून कापून घ्या.”

    रिशूने आज्ञाधारकपणे माझा निरोप महेशला सांगितला. पण महेश कसला वस्ताद ! तो काय हे ऐकून घेणार की काय? त्याने मला रिशूकडून उलट निरोप पाठवला.

    "बाबा म्हणाले, अनिरुद्ध काकाला सांग की एका मावा केकचे पैसे तुझ्या मानधनातून कापून घेतल्यावर तुला देण्यासाठी काही पैसे उरणारच नाहीत. उलट तुलाच काही पैसे द्यावे लागतील.”

    अजित परब आणि माधुरी करमरकर हे ऐकून आवाक्च झाले. "हे काय चालले आहे?” त्यांनी विचारले.

    “काही नाही रे! रिहल्सलचा ताण कमी करण्यासाठी आम्ही गंमत करतोय." मी उत्तरलो. अर्थात् अशी गंमत करण्यासाठी, आमची किती जवळची मैत्री आहे हे मी त्यांना कसं सांगणार? असे असंख्य जवळचे मित्र मला मिळाले आणि त्या सर्वांनी माझे आयुष्य समृद्ध आणि आनंदी केले. राज कपूर आणि व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातील बहतेक गाणी लोकप्रिय असल्यामुळे या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. ३० डिसेंबर २००५ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. 'कोहिनूर ऑफ इंडिया' हा मानाचा पुरस्कार मला मिळाल्यामुळे एक स्मृतीचिन्ह देऊन या कार्यक्रमात इंद्रधनुतर्फे माझा सत्कार करण्यात आला. एकूण २००५ हे वर्ष मला बरेच काही देऊन गेले.

    - अनिरुद्ध जोशी

      August 4, 2022


  • जाने कहाँ गये वो दिन

    आयुष्यभर ज्या चार्ली चॅप्लिनला आदर्श मानलं, त्याने जोकरपण आधीच सिद्ध केलं होतं , पण आयुष्याच्या सायंपर्वात राज कपूरला स्वतःमध्ये जोकर आहे हे मान्य करावे लागले. हा थोडासा मावळतीचा अध्याय होता, जिथे हिशेब सुरु होतात, आठवणी सतावतात आणि मनाजोगती एखादीतरी कलाकृती निर्माण करावीशी वाटते. राजने या टप्प्यावर “मेरा नाम जोकर ” नावाचे धाडस केले -आतल्या आवाजाला स्मरून !

      December 27, 2020


  • बारक्या

    आपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !!

      February 4, 2026


  • माझी प्रवास’साठी’

    जन्म कुंडलीतील नववं घर, हे त्या माणसाच्या आयुष्यातील प्रवास सांगतं. तिथं जर शुभ ग्रह असेल तर प्रवासाचं सुख हमखास मिळतं. त्यातूनही तिथे शुक्र असेल तर परदेशप्रवास हा नक्कीच होतो.

      August 2, 2021


  • चमचेगिरी

    चाटू…. हे असते लाकडाचे म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. मात्र त्याला रोज स्वयंपाक घरात येता येत नाही. एक दिवस त्याचाही येतो. त्यामुळे ते किती महत्वाचे आहे याची किंमत कळते. चिक. लापशी. वाळवणाचा कोणताही पदार्थ शिजवताना काही ही असो.

      September 2, 2022


  • रोमहर्षक… लंडन ! (माझी लंडनवारी – 18)

    प्रियांकाने लंडनला आल्यापासूनचे सगळे किस्से सांगितले. ती एका स्काऊटच्या कॅम्पसाठी इथे आली होती. त्यांच्या ग्रुपला नॅशनल लेव्हलवर गोल्ड मेडल मिळाले होते आणि त्या ग्रुपला लंडन मधल्या ग्लोबल स्काऊट कॅम्पसाठी इन्व्हिटेशन होते. तो कॅम्प नऊ दिवसांचा होता. जंगलामध्ये टेंट मध्ये रहात होते ते! किती थ्रिलिंग अनुभव होते तिचे.

      January 18, 2022


  • सोनेरी तसवीर !

    सोनेरी तसवीर ! त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते. भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती.

      July 10, 2012


  • कर्णपिशाच्य! (माझे डॉक्टर – ४)

    त्याच काय झालं होत कि, नेहमी प्रमाणे एकदा सर्दी झाली. दोन दिवसांनी कानठळी बसली! औषधाने आठवड्यात आणि बिनऔषधाने सात दिवसात सर्दी कमी होते, हा आजवरचा अनुभव होता. आम्ही या अनुभवावर विसंबून रेटून नेलं. ‘जो इतरावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला!’ या युक्तीची सत्यता पटली! येथे मला माझ्या अनुभवानेच दगा दिला. कानाला ऐकू येईना! सर्दी यथाअवकाश कमी झाली. पण कानांनी आपले कार्य बंदच ठेवले. त्यात भर म्हणजे दोन्ही कानातून, म्हणजे आतूनच आवाज येऊ लागले, तेही वेगवेगळे!

      November 12, 2020