नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
दिवाळी जवळ आली रे आली की रामजी शेठजींचा मूड एकदम बिघडायचा. एक माणूस म्हणून ते चांगले होते पण पदरचा पैसा गेला की त्यांचा जीव कासावीस होत असे. गणपती उत्सवाला शेकड्यांनी वर्गणी द्यायला लागायची.
May 15, 2022
आत्माराम नीलकंठ अर्थात आनंद साधले यांची ‘ मातीच्या चुली ‘ (आत्मचरित्र ) आणि ‘ हा जय नावाचा इतिहास आहे ‘(महाभारतावरील ) हि पुस्तके चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटणार नाहीत, तुम्हीही ती वाचली असतीलच. पंचाहत्तर वर्ष्याच्या आयुष्यात त्यांनी साठ पुस्तक लिहिली आहेत ! त्यांच्या लेखनाबद्दल लेखक / वाचक मंडळीत खूप प्रवाद आहेत.आपण त्या प्रवादांत न पडता आता फक्त त्यांच्या ‘ हटके ‘ कथान बद्दल बोलू.
August 24, 2018

ओढा जिथे चंद्रकोरीसारखा वळला होता, तिथूनच थोड्या अंतरावर खुळीचं खोपट होतं. खुळीचं खोपट आणि ओढा ह्यामध्ये मोठं मोकळं कुरण होतं. जेव्हां ओढा पाणी पुरवत असे तेव्हां कुरणात गुरं चरत. मागची झाडी आणि समोरचा ओढा ह्याभोवती खुळीने मनाने एक वर्तुळ आंखून घेतलं होतं. त्याबाहेर ती जात नसे.
हाच तिचा खुळेपणा होता.
March 23, 2022
लांबलचक रस्ता, आजूबाजूला फक्त आणि फक्त गर्द हिरवी झाडे आणि वर ढगांमध्ये लपलेला सूर्य आणि त्याने झालेले शांत आणि कुंद वातावरण! सुरवातीला तर चालायला मजा वाटत होती. पण बराच वेळ झाला तरी सेंटर कोर्टचा मागमूस नाही कुठे!
January 25, 2022

स्थळ : ठाणे ते पुणे एक्सप्रेस हायवे , पुणे ते रत्नागिरी व्हाया कोकरूड , थोडक्यात मुंबई गोवा महामार्गावरील प्रचंड खड्डे आणि दरवर्षीची अपरिहार्य असणारी ट्रॅफिकमधील घुसमट टाळण्यासाठी ठाणे पुणे रत्नागिरी असा मार्ग धरलेला . एका अर्थानं ट्रॅफिक जॅमला कात्रजचा घाट दाखविण्याचा प्लॅन . मुंबईहून जाणाऱ्या चाकरमान्यांसारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून माझ्यामते दूरदृष्टीने घेतलेली काळजी.
September 25, 2019
गुडी पाडवा आणि अक्षय तृतीया हे सण घराघरात हा साजरे करतो, ज्यांना देवगड चा रुबाब परवडत नाही, त्यांच्यासाठी रत्नागिरी हापूस असतो. तो हि खिशाला जड वाटला तर कर्नाटकी, पायरी इत्यादी चुलत-मावस भावंडे तृप्तीचा ढेकर सोबत घेऊन येतातच. जसे गणरायाचे दर्शन वेगवेगळ्या रुपात, भावमुद्रात होते तसेच हा कोकणचा राजा रोज वेगवेगळ्या रंग रुपात आम्हाला भेटत रहातो…..
May 16, 2021
भारतीय रेल्वे हे प्रवासाचे फार मोठे साधन आहे यामध्ये मालवाहतूक विशेष प्रमाणात केली जाते. भारतीय रेल्वे मध्ये अनेक लोकांना काम मिळाले आहे हे नाकारता येत नाही. रेल्वेतील लोकांचा प्रवास सुखमय होण्यासाठी रेल्वेने फार मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वेने अनेक कामगारांचे संसार चालविली आहे त रेल्वे कर्मचाऱ्याला कमी भाड्यामध्ये खोली पाणी वर लाईट याची चांगली सुविद्या निर्माण करून दिलीआहे.
December 29, 2022
शब्दांचे पक्षी येऊन बसतात भावनांनी लदबदलेल्या वाक्यांच्या फांदीवर तेंव्हा सुरु झालेला असतो. कवितेचा किलबिलाट पानांपानांच्या आडून...मुळासहित सगळ्या झाडाचे कान अधिर होऊन जातील काही क्षणातंच..स्तब्ध होऊन आकाश ही विसावेल क्षणभर ढगांसहित...हळूहळू..उतरत जाईल कविता कागदावर..मेघातून झिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या थेंबाप्रमाणे.. कोंब फुटतील शब्दांना मनाच्या मऊ-मऊ मातीत खोल..वर येण्यासाठी संघर्ष होईल मातीशी.अंगातले सारे बळ एकवठून वाट काढत शिरावे लागेल मातीच्या कुशीतून..आकाशाच्या शोधात..तितकेच खोल जात मुळांनाही भेदावे लागेल परखड विचारांचे कठीण कवच..
अंतरातल्या कडेकपारीतून वाहणाऱ्या नदीचा खळखळाट गच्च डोळे मिटून ऐकतांना बेभान होऊन उधळणाऱ्या वाऱ्यासारखे सोडून देत स्वतःला शब्द उसळत असतात खळखळ करून.. सर्वदूर..काळ्या कुळकुळीत खडकांमध्ये उंचावरुन पडणाऱ्या शुभ्र पांढऱ्या तुषारांवर सकाळच्या सोनेरी उन्हाची पडणारी तिरीप उलगडत असते कवितेतील शब्दांचे गुढ आणि गहन अर्थ.
प्रवाही पणाचा ओंडका रेंगाळू देत नाही शब्दांना कधीच अव्यक्त पाणथळाच्या काठाशी..कुठलंही अनामिक नातं सांगून एकमेकांना बिलगत नाहीत कागदावरील समांतर रेघांच्या वेली..याच वेलीवर बहरुन उलगडलेली असतात गुच्छागुच्छांतून अक्षरांच्या आकारांची इवलाली गंध भरलेली टवटवीत फुलांची मने.बाजूला समासही उभा असतो ... तटस्थ...ति-हाइत होऊन न्याहळत असतो मुक्तछंदातील कवितेच्या परिच्छेदाचा हिरवागार विस्तीर्ण प्रदेश....जंगलातील विशालकाय चिंचेच्या वृक्षावर स्वत:ला उलटे टांगून घेतलेल्या वटवाघळासारख्या लटकून असलेल्या आठवणी सतत गल्का करत असतात, फडफड करत असतात..संवेदनाच्या मुंग्यांनी अंतरात घेतलेला कडकडून चावा स्वस्थ बसू देत नाही जरासुद्धा..त्यांलासुद्धा ठणक लागलेली असते..शब्दांची..किती ठणकत रहावे शब्दांनी..अविरतपणे..वेदनेने संपूर्णपणे झोकून देत कावितेच्या खाईत लोटून द्यावे स्वत:ला मागचा पुढचा विचारही न करता...चक्कं ऋतूंच्या साक्षीने स्वरांनीच दाटून यावे गळ्याभोवती.. अन् वाऱ्यातून वाहत यावे संगीत.. मन मोहून टाकणारे.. तरीही कविता निर्मितीच्या प्रसववेदनांनी गळून जाव्यात सर्व लौकिक प्रतिष्ठांच्या खोट्या पाकळ्या, मैलोनमैल प्रवास करून अंगातून त्राण गळून गेल्यासारख्या...उरावा फक्त कल्पनांचा आणि विचारांचा प्रातिभिक कल्लोळ देहामध्ये.
भावना मारुन-मारुन शुष्क झालेल्या झाडांच्या फांद्यांना इच्छांचा लहरी वारा हेलकावे देतो अन् फांद्या एकमेकांवर घासून अंतरिचा वणवा पेटतो....या वणव्यात एक- एक करुन कविता जळत असते...रात्रभर..आग पेटतच राहते..उभे जंगल पेटलेले असतांना..कविता मात्र अधिकच उजळून निघते.सोन्यासारखी..! उदात्त होते..
अनुभवाच्या झाडावर राहून -राहून चमकणाऱ्या नेत्रसुखद कल्पनेच्या काजव्यांनी पानांपानांत भरून ठेवलेला उजेड मिणमिण करत खुणावतोय,अंतरंगाला उजळून टाकतोय.लख्खं करतोय..त्याच प्रकाशात मग दिसू लागते कविता स्पष्टपणे.,.आकार घेते..सजीव होते.
-- संतोष सेलूकर.
July 12, 2022
आम्हीच माघार घेतली पाहिजे बरोबर आहे घर त्यांच राज्यही त्यांचेच आम्ही आश्रीत तेंव्हा बोलायचे नाही गप्प गुमान बंद करा आणि बसा शांत. आता नानांची पण काही चूक नाही. आर्थिक परिस्थिती मुळे सिनेमा नाटक सहली काहीही जमले नाही व्यवसाय. कामाचा व्याप मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा व वेळ गेला. आत्ता कुठे सगळे स्थिरस्थावर झाले आहे.
February 16, 2022
ब्रेन रॉट पासून समाजातल्या सर्वांना वाचवायचं असेल तर ही कथा मालिका सर्वांनी वाचायला हवी आणि नावासह सर्वत्र पाठवायला हवी . आपल्याला एका भयंकराशी सामना करायचा आहे , याची जाणीव असो द्यावी .
December 19, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti