नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एका जंगलात एक कोंबडी रहात होती. एका काटेरी कुंपणाजवळ तिने चार अंडी ठेवली. त्यानंतर ती चारापाणी शोधायला जंगलात गेली. थोड्या वेळानंतर ती परत आली. तिला तेथे तिच्या चार अंड्यांशेजारी आणखी एक पाचवे अंडे दिसले. ते अंडे इतर चार अंडयांपेक्षा खूपच मोठे होते. “हे अंडे आपले नाही, मग ते कुणाचे असेल?“ असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. तिने त्याचा तपास करायचा ठरवले.
October 5, 2025
पुणे येथील सुप्रसिद्ध `पद्मगंधा प्रकाशन’ चे प्रमुख आणि मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष श्री अरुण जाखडे यांचे जीवनानुभव कहाणी त्यांच्याच शब्दात !
March 19, 2019
प्रत्येक गावात दादा, काका, मामा, नाना अशा नावाने ओळखली जाणारी माणसे असतात. अशाच एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला सर्व गाव ‘आबा’ म्हणायचा. साऱ्या गावाचे ते ‘आबा’ होते..
May 10, 2022

देसाईआजोबांनी जोऱ्यात फोन आपटला . रागानी ते अगदी हिरवे पिवळे पडले होते , टकलाला घाम आला होता , त्यांनी हाताशीच असलेल्या टॉवेलनी टकालाचा घाम पुसल्यावर टकलाला आधीच्या पेक्षा जास्त केस चिकटलेले वाटले तेंव्हा लक्षात आले कि तो त्यांच्या मनीचा बसायचा टॉवेल होता .
January 19, 2024

“डोन्ट वरी बेबी. सगळं ठीक होईल. आता मी आहे ना तुझ्या सोबत? चल आपण पटपट जाऊया चौकीपर्यंत. मीनव्हाईल जर माझ्या मोबाईलला रेंज आलीच तर आपण यावरून कॉल करू… ओके?” दोघंही गप्पा मारत चौकीच्या दिशेनं चालू लागले….
April 5, 2020
ईश्वर प्रेरणेने आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडत असतात. ‘नरेंद्र ते विवेकानंद – एक झंझावात’ हे चरित्र म्हणजे माझ्या आयुष्यातील योगायोग म्हणावा लागेल, किंबहुना हा दैवी चमत्कारच ठरला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. विवेकानंदांचे चरित्र वाचता वाचता सांगत गेलो, सांगता सांगता लिहीत गेलो. ते लोकांना आवडेल, त्यांनी उचलून धरले. हे कसे घडले? या प्रश्नांची उत्तरे माझ्याजवळ नाहीत.
July 18, 2022
सरकसवाला,
मी मोज दावितो सकला ! ।।धृ.।।
“पदके' मिळवियली गाठीची,
माझी कामे नवलाईची !
साधतील ती इतरा कैची ?
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला ! ।।१।।
घेतो गादीवर कोलांटी,
दादाच्या मग खांद्यावरती,
चढुनि उडी मी घेतो उलटी
सरकसवाला,
मी मोज दावितो सकला ।।२।।
बाजा तोंडाचा बहु वाजे,
घोडा काठीचा हा साजे,
घाली रंगण त्या आवाजे,
सरकसवाला,
मी मौजे दावितो सकला ! ।।३।।
छातीवर मोटार चढे ही, .
सरकस बघुनी बोले आई !
की मी डोक्यावर घर घेई' !
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला ! ।।४।।
हत्ती हा काळ्या मातीचा,
बंगाली वाघहि रबराचा,
साखरि छावा हा सिंहाचा !
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला ! ।।५।।
ऐसे प्राणी जमवुनि नाना,
बसवुनि एका ताटी त्यांना
खातो मीही त्यासह खाना !
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला |! ।।६।।
June 18, 2026

भूक लागलीय पण वडापाव नको, पैसे हवेत. कशासाठी ? मी पैसे देणार नाही हे तिनं ओळखलं असावं. हातातले पैसे परत थाळीत टाकून तिनं ते मोजायला सुरुवात केली. निघतोय असे बघितल्यावर खाली बघूनच म्हणाली, पैसा दिला नाय तर बा मारल.
May 2, 2022
प्रसिद्ध लेखक मंगेश कदम आपल्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये एसी फुल्ल असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. चेहरा सुद्धा आक्रसल्यासारखा दिसत होता. मेजावरच्या ऍश ट्रे मध्ये तीन मोठ्या गोल्डफ्लेक लाइट्स अर्धवट जळालेल्या अवस्थेत होत्या. चौथी सिगरेट अर्धवट पिऊन झालेली त्यांच्या बोटाच्या चिमटीत होती.
September 8, 2023
स्वारी च्या संभाषणातून इंग्लिश शब्दांचा अगदी भडीमार होत होता आधी त्याच्या मित्राचा फोन असावा बहुतेक यावर त्याने त्याच्या ऑफिस बद्दल बर्याच फुशारक्या मारल्या.
September 8, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti